१
चंपावाडी, शेणवीवाडी, आंग्रेवाडी, कांदेवाडी, भीमराववाडी, वैद्यवाडी, अमृतवाडी, गणेशवाडी, करेलवाडी, हेमराजवाडी, कोटकरवाडी, गंगाराम खत्रीची वाडी, दोन भटवाडय़ा, सरकारी तबेला (क्रांतीनगर) या वाडय़ामधून वेगवेगळय़ा जातीधर्माची मंडळी गुण्यागोविंदाने राहत होती. भाई जीवनजी लेन...
२
Sep 21 • 6 tweets • 2 min read
घरात हगता यायला हवं... या एका इच्छेचे एक्स्टेंशन कित्येकांना भांडुप, ठाणे, डोंबिवली करत बदलापूर पर्यंत घेऊन गेलं.
आता जुन्या चाळीतल्या कॉमन संडासांच्या जागी मास्टर बेड रूमला अटॅचट टाॅयलेट आलंय. पण इथलं त्याचे घर आता त्याचे नाहीय. ते विकून तर तो मोठ्या घरात सेटल झाला होता.
१
"संडासची थोडी कळ काढली असती तर साला राहिलो असतो मुंबईत" असा विचार त्याच्या मनात पटकन येऊन जातो.
आता गणपतीचे ११ दिवस इथला रस्ता मोकळा असतो त्यात जुन्या उत्सवाची "vibe" असते (असं त्याला वाटत ) म्हणून या ११ दिवसात तो पोराबाळांना घेऊन इथल्या रस्त्यावर फिरतो.
२
Jun 5 • 17 tweets • 3 min read
हे मोदी समर्थका.. ऐक !
१० वर्षं तुझं ऐकत आलो. आज तू ऐक.
#काॅपे
तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान बनतीलही...
पण "ये जीत भी कोई जीत है" असं तुला वाटतंय याची खात्री आहे.
पण तुला ठाऊक नसलेली एक गोष्ट ही, की आजच्या या परिस्थितीला तू जबाबदार आहेस - थेट जबाबदर !
१
कधीकाळी अटलजींचा असलेला पक्ष मोदी-शहांनी टोटल उलट्या दिशेला नेऊन ठेवला. तुझ्या डोळ्यादेखत - नव्हे, तुझ्या संमतीने !
"अश्या फोडाफोडीने कमावलेल्या सत्तेला मी चिमट्याने सुद्धा स्पर्श करणार नाही" असं म्हणाले होते अटलजी.
२
Mar 21 • 10 tweets • 2 min read
लिव्हिंग डेलाईटस... 😎
'गर्व से कहों मैं हिंदू हुं।... चला म्हणतो.
'भारत का बच्चा बच्चा अब जय श्रीराम बोलेगा' ...चला आजपासून जय श्रीराम!
'हिंदू खतरेमे' म्हणून भाजपला मत द्यायचं... चला देतो...
१
मग गर्व से कहों, भारत का बच्चा बच्चा, हिंदू खतरेमे नंतर तुम्हाला सत्ता मिळणार...
पण मला काय मिळणार ?
वाळु पसरलेले, गुलमोहराची झाडे असलेले असे केवळ दोनच प्लॅटफॉर्म असलेले गोरेगांव. त्यावेळेस लाकडाचे इंडिकेटर होते. वर कौलारु छप्पर, पश्चिमेला दोनच तिकीट खिडक्या असलेले टुमदार स्टेशन. लोखंडी गज असलेल्या पारंपारिक खिडक्या, लाकडाचे फेन्सिंग आणि लाकडाचेच वासे...
खांब असलेले छान एखाद्या कोकणातील खेडेगांवासारखे सुंदर गोरेगांव.
पूर्वी एस्. व्ही. रोडला, घोडबंदर रोड म्हणूनच संबोधलं जातं असे. या रोडवर फिल्मीस्तान चा मोठा स्टुडिओ म्हणजे मानचिन्ह. त्यावेळेच्या गोरेगाव मधे सिग्नल्सची गरजच नव्हती. पूर्ण गोरेगावात जेमतेम ३/४ मोटारगाड्या असतील.
May 11, 2023 • 7 tweets • 2 min read
लोक देशभर समिक्षात्मक टीका करत आहेत. जर सगळंच बेकायदेशीर होतं तर मग हे सरकारच बेकायदा आहे आणि असं बेकायदा सरकार 'आता झालंच आहे तर चालू दे पुढे' अशी न्यायालयाची भूमिका कशी काय असू शकते? असा प्रश्न लोकांना पडला आहे.
प्रतोद म्हणून गोगावलेंची निवडच बेकायदा होती तर त्या प्रतोदांनी जे मतदान करण्याचा व्हीप काढला तो बेकायदेशीर नव्हता का? आणि तो बेकायदेशीर असेल तर चाचणीत मिळालेलं बहुमत कायदेशीर कसं हा प्रश्न आहे.
व्हीप पक्षप्रमुख काढू शकतात, संसदीय गटाचा नेता नाही असं सुप्रीम कोर्ट एकीकडे...
Feb 21, 2023 • 25 tweets • 4 min read
उद्धवसाहेब फक्त इतकंच करा...
अॅड. विश्वास कश्यप
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे अस्तित्व संपवलं... पक्ष गेला चिन्ह गेलं... आता उद्धव ठाकरेंनी नेमकं काय करायला हवं असं सांगणारं अॅड. विश्वास कश्यप यांचं उद्धव ठाकरेंसाठी कळकळीने लिहिलेलं पत्र...
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
महोदय, प्रथमतः आपणास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा!
आपण सध्या प्रचंड वाईट मानसिक अवस्थेतून जात आहात याची आम्हाला कल्पना आहे. आपली प्रकृती सुद्धा ठीक नाही.
Feb 19, 2023 • 9 tweets • 2 min read
थॅंक्यू मिस्टर शिंदे...
अनेकांप्रमाणेच मीही गावावरून नोकरीसाठी मुंबईला आलेलो. मुंबईत आल्यावर शिवसेना कळायला लागली. नोकरीला लागल्यावर लोकाधिकार समितिचं काम करताना शिवसेना अंगात भिनायला लागली. बाळासाहेबांची ऐकलेल्या भाषणांनी अंगात संचारणं म्हणजे काय असतं ते जाणवायला लागलं.
अनेक तालुक्यात लोकाधिकार समितीतर्फे निरीक्षक म्हणून काम करताना गावा खेड्यातल्या शिवसैनिकांची ओळख व्हायला लागली. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले साधेभोळे, निष्ठावान शिवसैनिक. कुणालाही हेवा वाटेल असा हा ठेवा आहे.
Feb 4, 2023 • 4 tweets • 1 min read
"पनामा पेपर" आठवतो का?
तोच तो, ज्यात आपला पद्मश्री+पद्मभूषण+पद्मविभूषण असलेला "सदी का महानायक", त्याची सूनबाई, विजय मल्ल्या, हरिष साळवे अशा लोकांची नावं आली होती?
जगभरातल्या टॅक्सचोर गुंतवणूकदारांचा भांडाफोड करणारं हे इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या पत्रकाराचं पुढं काय झालं?
डाफ्ने करुआना गॅलिझिआ नावाच्या ह्या स्त्री पत्रकाराला तिच्या परिवारासह बॉम्बने उडवण्यात आलं होतं; चिथड्या-चिथड्या झाल्या होत्या तिच्या!
"हे" हिडेनबर्गच्या नॅथन अँडरसनला माहिती नसेल?
Nov 28, 2022 • 10 tweets • 2 min read
एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही ह्या, अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा, काही लोकांना प्रचंड गर्व असतो.
म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला...
नाती
कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण...
ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच...
Nov 18, 2022 • 10 tweets • 3 min read
सावरकरांना "माफीवीर" कुणी बनवलं??
कॉंग्रेसने की भाजपने??
- डॉ. सुनील देशमुख.
७० च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारवलेले होते बहुदा त्यांची ही शेवटची पिढी...
माझे मराठी आणि इतिहासाचे शिक्षक कॉंग्रेस विचारधारा मानणारे होते पण त्यांनी कधीही आमच्यावर ती थोपवली नाही. उलट आम्हाला आमची स्वतःचं मत व्यक्त करायलाच शिकवलं. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचीच सरकारे होती "पण तरीही आमच्या अभ्यासक्रमात सावरकर होते."
Oct 22, 2022 • 26 tweets • 5 min read
अॅड. सतीश उके कुठायत?
आमच्या मनाला वाटेल त्यांच्यावर आम्ही ईडीची कारवाई करू शकतो, या भाजप नेत्यांच्या अहंकाराने आता कडेलोट केला आहे. महाराष्ट्र ही समृध्द राज्याची जननी आहे, हे ठाऊक असल्याने आपल्या सत्तेआड कोणी येऊ नये, अशी खूणगाठ बांधलेल्या भाजप नेत्यांनी ईडीचा पध्दतशीर...
वापर केला आणि जे आडवे येतील त्यांना ठरवून वाटेला लावलं. हे करण्याच्या मागे महाराष्ट्रातले सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव सगळेच विरोधक घेत आहेत. आता तर सामान्य माणूसही फडणवीसांच्या चेहर्याखालची मानसिकता ओळखू लागला आहे. आव कितीही प्रामाणिक असला तरी आता या....
Aug 1, 2022 • 9 tweets • 2 min read
तुम्हाला केतन पारीख आठवतोय..? मधोपूरा बँक आठवतेय...?
तो केतन पारीख, ज्याने १६०० कोटींचा शेअर्स घोटाळा केला. त्यात ती माधोपूरा बँक सपशेल बुडाली. CBI ने चौकशी केली, केतन पारीखला अटक झाली. काही महिन्याने त्याने जामिनासाठी अर्ज केला, त्याला जामीन मंजूर झाला...!
त्या जामीनाविरोधात मधोपूरा बँकेने आणि CBI ने आव्हान दिले...
हे आव्हान (अपील) बँकेने मागे घ्यावे आणि जामीनाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून माधोपूरा सहकारी बँकेच्या एका संचालकाने या केतन पारीखकडून अडीच कोटी रुपयांची लाच घेतली होती.
Jul 30, 2022 • 6 tweets • 1 min read
"गुजराथी-मारवाडी निघून गेले; तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी रहाणार नाही", अशी मुक्ताफळं उधळणार्या भगत'सिंग' कोश्यारी, जरा ऐका...
तुमच्यासकट, सगळ्या गुजराथी-मारवाड्यांना 'शिंगा'वरुन महाराष्ट्राबाहेर घेऊन जा... शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राला काही फरक पडणं तर, सोडाचं...
उलट, तो प्रथमच मोकळा श्वास घेऊन सुखा-समाधानात जगेल!
जनहो, आजवर महाराष्ट्राच्या खेडोपाडी भोंदू 'भगत' मौजूद असलेलं आम्ही लहानपणापासूनच ऐकत आलोत... पण, आता भोंदू 'भगता'चा शिरकाव, महाराष्ट्राच्या "..........." सुद्धा???
Jul 21, 2022 • 14 tweets • 3 min read
ते काका आज पुन्हा भेटले. त्यांचा हास्यक्लब संपायला आणि मी बागेत पोचायला एक वेळ आली. थोडे खट्टू होते. म्हणाले 'आता मोदीजींनी आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली रेल्वे प्रवास सवलत पण काढून घेतली' मी फक्त दीर्घ हुंकार भरला.
माझी नजर त्यांना छद्मी वाटली की काय कोण जाणे पण त्यांनी दुसर्याच क्षणी स्वतःला सावरलं आणि म्हणाले 'अर्थात यातही काही दूरगामी उद्देश असणार, उगाच नाहीत करणार असं मोदीजी'.
मी म्हणालो 'काका अगदी बरोबर आहे, मला तर हा मोदीजींचा मास्टरस्ट्रोक वाटतो.
Jul 6, 2022 • 12 tweets • 2 min read
होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय - प्रतिमा जोशी.
मुंबई नगरी ही पहिल्यापासूनच बहुभाषी असली आणि तिच्या उभारणीत नि जडणघडणीत मराठ्यांसह सर्व प्रांतीयांचा वाटा असला, तरी तिचे अव्वल भौगोलिक स्थान आणि प्राचीनत्व हे निखळ मराठी आणि मराठीच आहे.
महाराष्ट्राला गुजरातशी सयामी जुळ्यासारखे जोडून द्वैभाषिक राज्य चालवण्याचा केंद्राचा हेका महाराष्ट्रीयांनी मोडून काढला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. आणि गेली पन्नास वर्षे 'मुंबई कोणाची?' हा प्रश्न सतत ऐरणीवर येत राहिला.
Jun 24, 2022 • 27 tweets • 5 min read
उध्दवजी, पुरंदरचा तह आणि शिवरायांना आठवा!
दत्तकुमार खंडागळ - संपादक वज्रधारी, मो. 9561551006
शिवसेनेतील भाजप पुरस्कृत बंडाळीमुळे सध्या राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि पक्षालाच मुळासकट उखाडून काढण्याचा प्रयत्न ...
शिवसेनेतील आमदारांना हाताशी धरून केला गेला आहे. शिवसेनेत या पुर्वी छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे अशा लोकांची बंडाळी झाली पण या वेळी एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड मोठे आणि धक्कादायक आहे. उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान देणारे आहे.
May 13, 2022 • 12 tweets • 6 min read
वाटलं होतं की कोविडनंतर लोक बदलतील!
जगण्याची एक संधी मिळावी म्हणून त्या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतोय... पण त्यांना ती संधी मिळालीच नाही!
कोविडमुळे ५ लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एकजण ...
एका न दिसणाऱ्या विषाणूने मारुन टाकला. त्यावेळी आपल्या मनात काय विचार होते हे प्रत्येकाने स्वतःला एकदा विचारून पाहावे. सगळं पहिल्यापासून सुरुवात करू, पुन्हा उभं राहू... फक्त या आजाराच्या संकटातून बाहेर पडावं, आपल्याला एक संधी मिळावी हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता ना?
May 6, 2022 • 14 tweets • 3 min read
नोक्टुरिया ...
(Frequent urination at Night)
ज्येष्ठ नागरिकांसाठी, खरे तर सर्वांसाठी!
लघवी केली की लगेच पाणी प्यायला हवे!
नॉक्टुरिया म्हणजे रात्री वारंवार लघवी होणे, हे हृदयाच्या विफलतेचे लक्षण आहे, मूत्राशयाचे नाही.
शिवपुरीचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बन्सल स्पष्ट करतात की, नॉक्टुरिया हे खरेतर हृदय आणि मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळा येण्याचे लक्षण आहे. याचा प्रौढ आणि वृद्ध लोकांना सर्वात जास्त त्रास होतो कारण त्यांना लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते.
Mar 29, 2022 • 20 tweets • 5 min read
पत्रकार हेमंत देसाई यांच्या वॉलवरून
लोकांच्या मनावर एखादी गोष्ट कशी बिंबवायची याचे एक आधुनिक विज्ञान आहे आणि त्यामधील पीएचडी भाजपने संपादन केली आहे. मोदीजींनी फारसा विकास केला नसूनही, ते 'विकासपुरुष' असल्याची प्रतिमा या मंडळींनी निर्माण केली.
त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सकाळी हातपायतोंड धुवून, मग लगेच पैसे खायला बसतात, अशाप्रकारचे समीकरण त्यांनी ठळक केले आहे. हे सरकार महावसुली सरकार आहे, असे भाजपमधील सर्व नेते जप केल्यासारखे म्हणत असतात.
Jan 29, 2022 • 8 tweets • 4 min read
मद्यराष्ट्र???
सुपर मार्केटमध्ये वाइन विकायला ठेवली म्हणून काही प्रत्येक दारू न पिणारा माणूस वाइन प्यायला सुरू करणार नाही. हातभट्टी, देशी, फेनी, व्हिस्की, स्कॉच, रम, जिन, ब्रँडी, व्होडका, टकीला, श्यांपेन वगैरे वेगळ्या प्रकारची दारू पिणारे लोकही इतर सगळ्या दारू सोडून ...
फक्त वाइन प्यायला सुरू करणार नाहीयेत.
वाइन ही आजकाल उच्चभ्रू आणि रईस (जमिनी विकून श्रीमंत झालेल्या अडाणी लोकांना वगळून) लोकांमध्ये इज्जतीने पिली जाणारी गोष्ट आहे. २००० रुपयांची वाइन पिवून कुठल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराने बायकोला मारहाण केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.