शिवसेनेत एवढी मोठी फूट पडायला, एवढे आमदार खासदार पक्षासोबत बंडखोरी करायला @rautsanjay61 जबाबदार आहेत..? वाचा एकदा.
कोरोना काळात मुद्दाम साप सोडणे वगैरै चालू होते तेव्हा हे ५१ आमदार आणि १२ खासदार शेपटं घालून होते...तेव्हा एकटे संजय राऊत लढत होते...👇
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्यजी ठाकरे, शिवसेना, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची यथेच्छ बदनामीची मोहीम चालू होती,पोलीस तपास पण दळभद्री बिहारी पोलीसांकडे दिला गेला तेव्हा देखील हे गद्दार शेपटं घालून होते आणि एकटे संजय राऊत लढत होते..
अर्णव गोस्वामी सरळ सरळ "ए उद्धव ठाकरे...."👇
असं म्हणत एकेरी भाषेत गर्जना करत होता ,एका मुख्यमंत्र्याला अशी भाषा वापरत महाराष्ट्राची छी थू करत होता तेव्हा देखील हे बंडखोर शेपटं घालून होते आणि तेव्हा सुद्धा एकटे संजय राऊत सामना मधून किल्ला लढवत होते.
कंगना राणावत , सरळ सरळ मुंबईचा, महाराष्ट्राचा अपमान करत विविध स्टेटमेंट 👇
करत होती...तेव्हा सुद्धा हे ५१/१२ शेपटं घालून बसले होते आणि संजय राऊत लढत होते..
आर्यन खानच्या आडून संपूर्ण मुंबई पोलीस व महाराष्ट्र राज्य यांची बदनामी चालवली गेली तेव्हा ही हे ५१/१२ शेपटं घालून बसले होते आणि संजय राऊत भाजपला अंगावर घेत लढत होते...👇
ठाकरे कुटुंबातील महिलांवर, नसलेल्या बंगल्यावरून सोमय्या बोंबलत होता तेव्हा देखील हे धोकेबाज शेपटं घालून बसले होते आणि नेहमीप्रमाणे एकटे संजय राऊत लढत होते...
२०१४ च्या विधानसभेत फुटकळ खाती तोंडावर मारून शिवसेना पक्ष गलीतगात्र करत असताना, शिवसेनेला हीन वागणूक दिली जात असताना, 👇
वेळोवेळी अपमान केला जात असताना हे पळपुटे तेव्हा एंजॉय करत होते आणि अस्वस्थ उद्धव ठाकरेंना संजय राऊत सांभाळत होते...
२०१९ ला सरळ सरळ भाजप तुकडा फेकत होते तेव्हा भाजपला व मोदी शहा यांना अंगावर घ्यायचे काम एकटे संजय राऊत करत होते... आणि हे सगळे तेव्हा भयकंपीत होते...👇
त्यावेळी रोज संजय राऊत यांची ट्विट गाजत होती...
थोड्क्यात
हे ५१ आमदार आणि १२ खासदार सेनेच्या नावावर गेले तीस चाळीस वर्षांपासून विविध पदे/सत्ता यांची फळे चाखत होते तेव्हा संपूर्ण स्ट्रॅटर्जीकल विविध निर्णयात संजय राऊत रात्रीचा दिवस करत होते आणि 👇
त्याच मेहनतीवर हे गद्दार सगळं काही उपभोगत होते..
राणे गेले...राज ठाकरे गेले...
संपूर्ण राज्यातील एक समन्वयक म्हणून संजय राऊत उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते...बाकीचे सगळे फळे चाखत होते..
हे बंडखोर गद्दार राज्यातील जनतेला, मतदारांना अडाणी समजतात...रूदाली बनत...👇
त्यांना वाटतं सर्वांनी मिळून एकट्या संजय राऊतांवर खापर फोडून त्यांना विलन बनवलं तर जनतेला तेच खरं वाटेल..
आम्ही झाडी नी डोंगार का पाहीले तर म्हणे संजय राऊत नी शरद पवार...अहो सोडा हे सगळं... जनता हुशार आहे... सर्वांना चांगलंच माहित आहे कोण कशामुळे गेलं आहे ते...👇
ही असली बालीश कारणे आपल्या पोरा-बाळांना सांगा... समजलं का ?? संजय राऊत साहेबांना विलन ठरवून तुम्ही तुमचे मनसुबे साध्य करण्याचा प्रयत्न करणार असाल तर तो कधीही यशस्वी होणार नाही. प्रत्येक शिवसैनिक राऊत साहेबांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे.
एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे की आमच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता द्या आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टात गद्दार गटाचे वकील म्हणतायत पक्षातल्या एवढ्या मोठ्या सदस्यांना सध्याचं नेतृत्व मान्य नसून त्यांनी पक्षात राहूनच वेगळा गट निर्माण केला आहे तर ती बंडखोरी कशी..? 👇
जर एवढ्या आमदार खासदार पदाधिकारी यांचा सध्याच्या पक्ष नेतृत्वाला विरोध असेल तर पक्ष नेतृत्व बदलण्यात गैर काय..?
बघितलं ना काय चालू आहे.? काही लक्षात येतंय.? किती खालच्या पातळीवर उतरून राजकारण चालू आहे हे आता तरी समजलं का.? अख्खा पक्षच स्वतः च्या नावावर करण्याचा घाट घातला आहे. 👇
आजपर्यंत करोडो शिवसैनिकांनी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली रक्ताचं पाणी करून वाढवलेला पक्ष एका फटक्यात स्वतः च्या मालकीचा करण्याचे मनसुबे रचले गेले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट दोन्ही ठिकाणी पक्षावर दावा केला आहे आणि उघडपणे उद्धवजी ठाकरे साहेबांना विरोध दर्शवला आहे. 👇
महाराष्ट्रात 2 लाखाहून जास्त मंदिरं आहेत आणि 3-4 हजार मस्जिद, भोंग्यांचा परिणाम बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक बाबींवर, सणांवर होणार हे लक्षात घ्या.
आता तुम्हाला फक्त आणि फक्त मशिदीवरचे भोंगे दाखवले जातायत परंतु कायद्याप्रमाणे भोंगे बंद झाले तर ते सर्वधर्मीयांच्या 👇
प्रार्थनास्थळांवरील भोंगे बंद होणार मग त्यात सगळी मंदिरे देखील आली. पहाटेच्या काकड आरत्या, रात्रभर हरिनाम सप्ताहात चालणारी मधुर भजनं, प्रत्येक सण उत्सवात चालणारे आवाज, हे सगळं काही बंद होईल. जर हे सगळं बंद झालं तर आयुष्य जगण्याची मजा राहिल असं वाटतं का ?? 👇
किती लोकाना या गोष्टींच्या आवाजाचा रोज त्रास होतो ते खरं सांगा बरं. माझं विचाराल तर काकडआरत्या,भजन,किर्तन,सणवारातले भोंगे आणि मशिदींवरील भोंगे या सगळ्याची बालपणापासून सवय झालेली असल्याने मला तरी हा मुद्दा आजच्या घडीला इतर सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांपेक्षा मोठा आहे असं वाटत नाही👇