ते काका आज पुन्हा भेटले. त्यांचा हास्यक्लब संपायला आणि मी बागेत पोचायला एक वेळ आली. थोडे खट्टू होते. म्हणाले 'आता मोदीजींनी आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली रेल्वे प्रवास सवलत पण काढून घेतली' मी फक्त दीर्घ हुंकार भरला.
माझी नजर त्यांना छद्मी वाटली की काय कोण जाणे पण त्यांनी दुसर्याच क्षणी स्वतःला सावरलं आणि म्हणाले 'अर्थात यातही काही दूरगामी उद्देश असणार, उगाच नाहीत करणार असं मोदीजी'.
मी म्हणालो 'काका अगदी बरोबर आहे, मला तर हा मोदीजींचा मास्टरस्ट्रोक वाटतो.
अनावश्यक प्रवास ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगला नाही, 'ठायीच बैसोनी करा एकचित्त' असं महाराजांनी पण म्हणून ठेवलंय. प्रवासाला धडपडत जाऊन दुखापत करून घेण्यापेक्षा घरी टीव्हीसमोर बसून 'मन की बात' बघत राहणं कधीही चांगलंच!
काका काहीच बोलले नाहीत. सुखवस्तू आहेत पण विमानाची भीती बसलीय आणि प्रोस्टेटचा त्रास म्हणून रस्त्यावरचा प्रवास नको असतो. रेल्वे हाच त्यातल्या त्यात पर्याय.
'पण काका एक मात्र झालं. काॅग्रेसच्या सत्तर वर्षात देशाची लूट झाली. आता तुमचंच पहा.
नेहरूंच्या उधळखोरीमुळे तुम्हाला सरकारी शाळेत शिक्षण फुकट मिळालं, विद्यापीठात होस्टेल फुकटभावात मिळालं, पेन्शनसह सरकारी बॅन्केत नोकरी मिळाली, नोकरीत एलटीसीची उधळपट्टी सरकारनं केली म्हणून तुम्हाला मनात नसतांना सुट्टीवर जाऊन आनंद मिळवावा लागला, पीएफ काय आणि ग्रॅच्युइटी काय...
सरकारनं तुमची इच्छा नसतांना लाखो रूपये उधळले तुमच्यावर. अगदी मनमोहन सिंगांच्या काळापर्यंत स्वस्तातलं पेट्रोल -डिझेल घालून नाईलाजानं कार वापरली तुम्ही आणि ज्येष्ठ नागरिक झाल्यावर तर काय मज्जाच मज्जा! मोठी पेन्शन, रेल्वे, बस असो की विमान सगळीकडे सवलत...
आजारी पडलात तर सीजीएचएस खाली फुकट उपचार, औषध फुकट, केवढा तो उधळमाणकेपणा! अवघा देश आणि सामान्य माणसं देशोधडीला लावली सगळं फुकट देऊन!
काका इकडेतिकडे पहायला लागले. पण आज मी ठरवलं होतं की मोदीच सर्वोत्कृष्ट पंतप्रधान हे आता पटवूनच सोडायचं!
पण नशीब चांगलं काका भारताचं की मोदी आले. नोटाबंदीत तुम्हाला रांगा लावून देशभक्ती कशी करायची ते शिकवलं त्यांनी. पेट्रोल, डिझेल महाग करून लोकांना घरीच बसायला प्रवृत्त केलं. घरी बसल्यावर तुम्ही त्यांचं स्मरण करावं म्हणून गॅस महाग केला.
डाळीपासून साळीपर्यंत सगळं महाग करून देशाच्या आर्थिक समृद्धीतला तुमचा हातभार वाढवला. चंद्रशेखर रावला जो कोळसा ४,००० रुपयांना मिळतो तोच अदानीकडून २६,००० रुपयांनी घेतला नसता तर अदानी श्रीमंत न होण्याचा देशद्रोह तुमच्या हातून घडला असता.
काका, सामान्य माणूस दरिद्री झाला तरी हरकत नाही, अदानी श्रीमंत झाला पाहिजे, पाकड्यांना अद्दल घडली पाहिजे, मुसलमान वठणीवर आले पाहिजेत, नेहरू आणि काॅग्रेस कायमची संपली पाहिजे.
खाम्रेड आणि खम्युनिस्टांचं कंबरडं मोडलं पाहिजे, त्याशिवाय राष्ट्रद्रोही लोक संपून राष्ट्रप्रेमी नागरिक तयार होऊन हिंदू राष्ट्र तयार होणार नाही.
काका खूपच अस्वस्थ झाले. घरी जायला निघाले. पण मी थांबलो नाहीच.
काका, तुम्ही हास्यक्लब मात्र सोडू नका मोदीजी आहेत तोपर्यंत. हास्यक्लबात खोटं खोटं हसत रहा, मोदी तेच फोटो फिरवून देशातली जनता किती आनंदी आहे असा प्रचार करू शकले पाहिजेत. बाकी सकाळच्या टूथपेस्टपासून रात्रीच्या गुडनाईट पर्यंत सगळं महाग झाल्यानं...
तुम्ही दिवसभर मनातल्या मनात रडलात तरी चालेल, हास्यक्लब मात्र सोडू नका'.
काकांना अचानक आठवलं की घरी दूध घेऊन लवकर पोचायचं आहे. तडक उठले आणि निघाले. संपूर्ण समाधानात मी पण घरी परतलो. आज एका ज्येष्ठ नागरिकाला राष्ट्रप्रेमी बनवण्याचं पुण्य माझ्या हातून घडलं होतं!
आपण एकवेळ फ्लॅट विकून रस्त्यावर राहू पण अदानी जगातला क्रमांक एकचा श्रीमंत झाला तरच भारतमाता जगात नाव कमवेल हे त्यांना पटलं होतं!
मुंबई नगरी ही पहिल्यापासूनच बहुभाषी असली आणि तिच्या उभारणीत नि जडणघडणीत मराठ्यांसह सर्व प्रांतीयांचा वाटा असला, तरी तिचे अव्वल भौगोलिक स्थान आणि प्राचीनत्व हे निखळ मराठी आणि मराठीच आहे.
महाराष्ट्राला गुजरातशी सयामी जुळ्यासारखे जोडून द्वैभाषिक राज्य चालवण्याचा केंद्राचा हेका महाराष्ट्रीयांनी मोडून काढला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. आणि गेली पन्नास वर्षे 'मुंबई कोणाची?' हा प्रश्न सतत ऐरणीवर येत राहिला.
मुंबई फक्त मराठ्यांचीच नव्हे तर सगळ्यांची, इथपासून ते 'मुंबई तुमची, भांडी घासा आमची' म्हणण्यापर्यंत कटुता ताणली जात असते. मुंबई हे दक्षिण आशियाचे इकॉनॉमिक हब होण्यापर्यंतची घोडदौड ही परप्रांतीयांच्या भांडवलामुळे झाली असे उदाहरणांसकट मांडले जाते.
दत्तकुमार खंडागळ - संपादक वज्रधारी, मो. 9561551006
शिवसेनेतील भाजप पुरस्कृत बंडाळीमुळे सध्या राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि पक्षालाच मुळासकट उखाडून काढण्याचा प्रयत्न ...
शिवसेनेतील आमदारांना हाताशी धरून केला गेला आहे. शिवसेनेत या पुर्वी छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे अशा लोकांची बंडाळी झाली पण या वेळी एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड मोठे आणि धक्कादायक आहे. उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान देणारे आहे.
उध्दव ठाकरेंच्याकडे १७ आमदार उरलेत तर शिंदे तब्बल ३७ आमदार घेवून पळाले आहेत. आज उध्दव ठाकरेंची झालेली अवस्था बघून पुरंदरच्या तहाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. ११ जून १६६५ साली पुरंदरच्या तहात छत्रपती शिवरायांचा मोठा पराभव झाला होता.
जगण्याची एक संधी मिळावी म्हणून त्या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतोय... पण त्यांना ती संधी मिळालीच नाही!
कोविडमुळे ५ लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एकजण ...
एका न दिसणाऱ्या विषाणूने मारुन टाकला. त्यावेळी आपल्या मनात काय विचार होते हे प्रत्येकाने स्वतःला एकदा विचारून पाहावे. सगळं पहिल्यापासून सुरुवात करू, पुन्हा उभं राहू... फक्त या आजाराच्या संकटातून बाहेर पडावं, आपल्याला एक संधी मिळावी हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता ना?
आपल्याला ती संधी मिळालीही... आणि आपण काय करतोय?
जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्ध असो की भारतातील दंगली असो... की महाराष्ट्रातील सध्याचं किळसवाणं राजकारण असो... माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे!
३६५ दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांसाठी बेड उपलब्ध होत नव्हते...
ज्येष्ठ नागरिकांसाठी, खरे तर सर्वांसाठी!
लघवी केली की लगेच पाणी प्यायला हवे!
नॉक्टुरिया म्हणजे रात्री वारंवार लघवी होणे, हे हृदयाच्या विफलतेचे लक्षण आहे, मूत्राशयाचे नाही.
शिवपुरीचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बन्सल स्पष्ट करतात की, नॉक्टुरिया हे खरेतर हृदय आणि मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळा येण्याचे लक्षण आहे. याचा प्रौढ आणि वृद्ध लोकांना सर्वात जास्त त्रास होतो कारण त्यांना लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते.
झोप मोड होईल वा उठण्याचा कंटाळा, या भीतीने लोक रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. पाणी प्यायलं तर लघवी करण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावं लागेल, असं त्यांना वाटतं. त्यांना माहित नाही की झोपण्यापूर्वी किंवा रात्री लघवी केल्यानंतर पाणी न पिणे ...
लोकांच्या मनावर एखादी गोष्ट कशी बिंबवायची याचे एक आधुनिक विज्ञान आहे आणि त्यामधील पीएचडी भाजपने संपादन केली आहे. मोदीजींनी फारसा विकास केला नसूनही, ते 'विकासपुरुष' असल्याची प्रतिमा या मंडळींनी निर्माण केली.
त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सकाळी हातपायतोंड धुवून, मग लगेच पैसे खायला बसतात, अशाप्रकारचे समीकरण त्यांनी ठळक केले आहे. हे सरकार महावसुली सरकार आहे, असे भाजपमधील सर्व नेते जप केल्यासारखे म्हणत असतात.
जणू यांच्याबाबत मात्र 'गंगा मेरी माँ का नाम बाप का नाम हिमाला' अशीच स्थिती आहे... मविआ सरकारमधील काहीजण भ्रष्ट आहेतच, पण अवघे मंत्रिमंडळ अहोरात्र नोटा मोजत आहेत, असे कोणी म्हणू लागले, तर नाइलाजाने दुसरी बाजूही दाखवावी लागते.
सुपर मार्केटमध्ये वाइन विकायला ठेवली म्हणून काही प्रत्येक दारू न पिणारा माणूस वाइन प्यायला सुरू करणार नाही. हातभट्टी, देशी, फेनी, व्हिस्की, स्कॉच, रम, जिन, ब्रँडी, व्होडका, टकीला, श्यांपेन वगैरे वेगळ्या प्रकारची दारू पिणारे लोकही इतर सगळ्या दारू सोडून ...
फक्त वाइन प्यायला सुरू करणार नाहीयेत.
वाइन ही आजकाल उच्चभ्रू आणि रईस (जमिनी विकून श्रीमंत झालेल्या अडाणी लोकांना वगळून) लोकांमध्ये इज्जतीने पिली जाणारी गोष्ट आहे. २००० रुपयांची वाइन पिवून कुठल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराने बायकोला मारहाण केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.
ख्रिस्ती धर्मात वाइन हे सर्वमान्य आणि दैवी पेय आहे. येशू ख्रिस्ताने एका लग्नात वाइन कमी पडली म्हणून पाण्याला वाइनमध्ये बदलण्याचा चमत्कार केला. आजही जगभरातल्या चर्चमध्ये प्रार्थनासभेत प्रसादासारखी बुचभर वाइन प्यायला दिली जाते.