१.आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ;
"मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!"
२.माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, "एवढ्यात शेफरलास ?
जी मोजता येत नाही ती खरी उंची."
३.कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो. तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला आणि त्याने मला विचारलं," या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील?" तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल.
४.मला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार ?
एक हिरा लुकलुकला.म्हणाला, "वेडा रे वेडा !!"
५. कमी मार्क मिळाले म्हणून एका कोकराला कोणीतरी बदडत होतं. त्या कोकराच्या डोळ्यातले भाव वाचले मी ! ते म्हणत होतं, 'करून बघायचं कि बघून करायचं,
ठरवू दे की मला मी कसं जगायचं !'
७. एका वाढदिवसाला मला आयुष्यानं विचारलं
"जगलास किती दिवस?"
८. प्रेताने सरणावरच्या लाकडांना विचारलं
"माझ्याबरोबर तुम्ही का जळताय?"
लाकडं म्हणाली, "मैत्री म्हणजे काय ते कळलं नाही का अजूनही तुला?"
९. पांगळ्या मुलाला भर उन्हात खांद्यावरून उतरवून रस्त्याच्या कडेला एका फाटक्या पोतेऱ्यावर बसवल्यावर त्याचा घाम आपल्या नवखंडी पदराने पुसून ती माऊली एकुलती एक कोरडी शिळी पोळी त्याला भरवताना म्हणाली ,"बाळा दमला असशील ना? खा पोटभर !!"
१o. माणसानी देवाला विचारलं संकटं का पाठवतोस ?
देव म्हणाला माणसाला होणाऱ्या माझ्या विस्मरणावरचं हमखास औषध आहे ते.
११. 'विश्वास' या शब्दात "श्वास" का आहे?
दोन्हीही एकदा जरी तुटले तरी संपतं सगळं !
१२. दरवेश्याचं माकडाशी वागणं बघून मला माकडाची दया आली
माझ्या मनाचा मला लगेच प्रश्न, "माकडाची येते पण माझी नाही येत दया तुला?"
त्यावर माझा मनाला प्रतिप्रश्न. "माकडानं दरवेश्याला खेळवताना पाहिलं आहेस कधी?"
१३. नाती का जपायची ?
रेशमाच्या धाग्याचा गुंता सोडवून पहा एकदा...
१४. आठवणींची एक गम्मत आहे.
त्याच्यात गुंतून राहिलात तर नवीन निर्माण नाही होत !!
१५. माणूस देवाला म्हणाला "माझा तुझ्यावर विश्वासच नाही."
देव म्हणाला "वा !! श्रद्धेच्या खूप जवळ पोहोचला आहेस तू. प्रयत्न सुरु ठेव."
१६. गवई एकदा तानपुऱ्याला म्हणाला,"तू नसलास तर कसं होईल माझं?"
तानपुरा म्हणाला ,"अरे वेड्या ! माझी गरज लागू नये हेच तर ध्येय आहे."
१७. विठुमऊली एकदा एकादशीला दमून खाली बसली. मी विचारलं,"काय झालं ?"
विठुराय म्हणाले, "पुंडलिकाचा गजर करतात लेकाचे पण मायपित्यांना एकटं सोडून अजून माझ्याच पायाशी येऊन झोंबतात वेडे कुठले. !"
१८. एकटं वाटलं म्हणून समुद्रावर गेलो एकदा. त्याला विचारलं "कसा एकटा राहतोस वर्षानुवर्ष ?"
तो म्हणाला "एकटा कुठला, मीच माझ्यात रमावं म्हणून ईश्वराने लाटा दिल्या आहेत ना मला."
मी विचारलं "माझं काय?"
तो हसून म्हणाला
"नामस्मरण आणि माझ्या लाटांमध्ये काहीच साम्य दिसत नाही का तुला ?
१] पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे = सोलापूर
२] पंढरपूरस्थित मंदिराचे नाव = श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
३] विठ्ठल कुणाचे देवरूप आहे = श्री विष्णू (कृष्ण)
४] विठोबा द्वापारयुगामध्ये कितवा अवतार मनाला जातो = दुसरा
५] त्याला दशावतारातील कितवा अवतार मानले जाते = नववा
६] शास्त्र पुराणातील विठ्ठलाचे नाव = बौद्ध/बोधराज
७] महाराष्ट्रातील विठ्ठलभक्त संप्रदाय = वारकरी
८] कर्नाटलातील विठ्ठलभक्त संप्रदाय = हरिदास
९] विठ्ठलमंदिर कोणत्या नदीकाठी वसले आहे = भीमा
१०] या नदीला या ठिकाणी कोणत्या नावाने ओळखतात = चंद्रभागा
११] विठ्ठलाला कशाचा हार घातला जातो = तुळशी व मंजिरी
१२] तुळस हे कोणाचे प्रतिक मानले जाते = श्री लक्ष्मी
१३] मुख्य मंदिराची निर्मिती कोणत्या शतकात झाली असावी = १२ वे शतक
१४] कोणी केली/कोणाच्या कालखंडात झाली असावी = देवगिरीचे यादव प्रशासक
१५] विठ्ठलाचे पंचाक्षरी नाव = पंढरीनाथ
वटसावित्री!
नवीनच लग्न झालेल्या एका मित्राकडे बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा होती. मी सहज नवीन वहिनींना प्रश्न केला, काय वहिनी! झाले का बुकिंग?तर ती फणकार्यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे.असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्वास नाही.
सगळेच हबकले.
मित्राच्या चेहर्यावरचे भाव, ‘सांग बाबा काही समजावून!’ असे होते. मग म्हणालो ‘वहिनी’ बसा! विज्ञाननिष्ठा म्हणजे काय हो?
कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास न ठेवणे हेच ना? त्या म्हणाल्या हो! बरोबर.
मी म्हणालो, मग आता सांगा वडाचीच पूजा का करायची? आंबा, फणस, जांभूळ वा बाभळीची का नाही? मी म्हणालो,
मला काय माहिती? म्हटले जाऊ द्या. ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही? ती पुन्हा म्हणाली, मला काय माहिती? मग मी म्हणालो, हे काहीच माहिती नाही?
बाबा आणि मी, दोघांच्या बऱ्याच आवडी-निवडी सारख्याच.....
.... लहानपणी ते माझे सुपरहिरो... त्यांचीच कॉपी करायचो......
.... आयुष्याच्या शाळेत ठामपणे उभं रहायला त्यांनीच भक्कम आधार दिला..... काळानुसार दोघांचे आयुष्य वेगवेगळे झाले....
मी माझ्या व्यापात आणि त्यांचे रिटायर्ड लाईफ.....
.... वाद नव्हता पण संवाद कमी मात्र नक्कीच कमी झाला..... अचानक.... आम्ही दोघंच.. असे खूप वर्षांनी हॉटेलात जाण्याचा योग आला...... पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी बाबांचा हात हातात घेतला..... बाबा हसले......
त्यांच्या मनात काय आले असेल याची कल्पना आली.....
:
:
:
:
पस्तीस वर्षापूर्वी परिस्थिती बरोब्बर उलटी होती......
.... तेव्हा त्यांनीच मला आधार दिला होता आता मी......
.... काळानुसार आमच्या दोघांच्या जागा बदलल्या आणि जबाबदाऱ्या सुद्धा.....
कोकणात साधारणतः 7 जून पर्यंत मान्सूनचं आगमन होतं. चार चार दिवस आकाश उघडत नाही. हा खूप वेगळा अनुभव आहे. गेले काही पावसाळे बाहेर काढल्यावर आता त्याची प्रकर्षाने जाणीव होते आहे.
आता आता हे मिडीयावाले पावसाचा पाठलाग करत रिपोर्ट्स ब्राॅडकास्ट करीत असतात.
केरळमध्ये मान्सून दाखल अशा फूटनोट्स किंवा मग ती सॅटेलाईट पिक्चर्स पावसाची चाहूल सांगत असतात. अगोदर कुठे होते टीव्ही नि हे इंटरनेट. कोकणात खूप आधीपासून बर्याच पद्धती आहेत पाऊस साधारण कधी येईल हे ओळखण्याच्या.
सकाळी परसात देवपूजेची फूलं काढायला बाहेर पडलं की हवा गार असते, पायात अगदी छोट्या आकाराचे लाल किडे दिसायला लागतात. हे एका रात्रीत कुठून उत्पन्न होत असतील याचं मला आजही कुतूहल वाटतं. त्यानंतर भिंगरी नावाचे उडणारे जीव खूप खाली खाली येऊ लागतात.
सदगुरु कशासाठी हवा?
महाभारतातलीच एक कथा आहे.
द्रौपदी स्वयंवरात सर्व राजे, युवराज आपापलं कौशल्य पणाला लावून मत्स्यभेद करण्याची पराकाष्ठा करीत होते.
पणही विलक्षणच होता!
उंच छताला एक चक्र फिरत राहणार. त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला.
ते चक्र फिरत असतांना नेम साधून त्या माशाच्या डोळ्याचा भेद करायचा.
उ:! एवढंच?
नाही! ते तर कुणीही करेल! इथे तर एकाहून एक निष्णात धनुर्धर उपस्थित होते!
अन् स्वयंवर साक्षात याज्ञसेनीचं! सर्वच प्रतिस्पर्धी इरेस पेटलेले!
पऱंतु खरी मेख पुढेच होती!!
नेम सरळ माशाकडे बघून धरायचा नव्हता. खाली भलंमोठं तसराळं पाणी भरून ठेवलं होतं. वर मासा लावलेलं चक्र फिरत असतांना खाली तसराळ्यात बघून नेम धरायचा होता अन् माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता!