🧵थ्रेड -संजय राऊत यांना ज्यामुळं अटक झाली त्या पत्राचाळ प्रकरणाचा घटनाक्रम असा आहे. #SanjayRautArrested 2007- प्रवीण राऊतांची गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (GACPL) पत्रा चाळीतील रहिवासी आणि म्हाडा यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झाला.
यानुसार GACPL पत्रा चाळीतील 672 भाडेकरूंना नवीन घरं बांधण्याचं त्याचबरोबर तिथे म्हाडासाठी काही फ्लॅट विकसित करण्याचं आणि उर्वरित क्षेत्र खाजगी विकासकांना विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं.
2014-15- प्रवीण राऊत आणि GACL च्या इतर संचालकांनी म्हाडाची दिशाभूल केली आणि 672 विस्थापित भाडेकरूंसाठी पुनर्वसन नं करता तसेच म्हाडाच्या भागाचे बांधकाम न करता 901.79 कोटी रुपये वसूल करून नऊ खाजगी विकासकांना एफएसआय विकला .
त्याचदरम्यान GACPL ने Meadows नावाचा प्रकल्प सुरू केला आणि फ्लॅट खरेदीदारांकडून सुमारे 138 कोटी रुपयांची बुकिंग रक्कम घेतली. ईडीने आरोप केला आहे की गुरु आशिष कन्स्ट्रक्शन्सने या “बेकायदेशीर कृत्यांमधून” एकूण रक्कम 1,039.79 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.
2018- करारानुसार विकासकाला प्रकल्प पूर्ण होईपर्यंत पत्रा चाळीतील सर्व ६७२ भाडेकरूंना दरमहा भाडे द्यायचे होते. मात्र 2014-15 पर्यंतच भाडे देण्यात आलं आणि त्यांनतर ते बंद करण्यात आलं.
त्यामुळं भाडे न भरल्याने आणि इतर अनियमिततेमुळे म्हाडाने जानेवारी 2018- GACPL ला टर्मिनेशन नोटीस पाठवली. GACPL कडून एफएसआय घेतलेल्या नऊ खासगी विकासकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याने प्रकल्प पुन्हा रखडला.
2020 फेब्रुवारी - प्रवीण राऊत यांना EOW ने अटक केली , तर सारंग वाधवानला EOW ने त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अटक केली होती. प्रवीण राऊत यांच्याच चौकशीत संजय राऊत यांचं नाव पहिल्यांदा बाहेर आलं.
ED ने केलेल्या दाव्यानुसार प्रवीण राऊत यांना वाधवाण यांच्या एचडीआयएल कडून 100 कोटी रुपये मिळाले आणि ते त्यांनी "त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य,यांच्या विविध खात्यांमध्ये "वळवले". यामध्ये संजय राऊत यांच्या कुटुंबाचा समावेश होता.
ईडीने ठेवलेल्या आरोपानुसार यातील 83 लाख रुपये संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देण्यात आले होते जे त्यांनी दादरमध्ये फ्लॅट विकत घेण्यासाठी वापरले. तसेच महाराष्ट्रातील अलिबागमधील किहीम बीचवर वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर 8 प्लॉट खरेदी केल्याचा दावा ईडीचा आहे
2021 जून - पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पाला सरकारने पुन्हा मान्यता दिली. यावर्षी 22 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार रखडलेले बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आले. आता म्हाडा स्वतः विकासक म्हणून हा प्रकल्प पूर्ण करणार असून 672 भाडेकरूंना फ्लॅट देणार आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
🧵थ्रेड
भारताचा राष्ट्रीय ध्वज असा विकसित होत गेला आणि फायनली भारताला तिरंगा मिळाला. #Tricolour
1⃣ 1906 पहिला अनधिकृत ध्वज -
भारताचा पहिला झेंडा 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाता येथे पारसी बागान स्क्वेअरमध्ये फडकवण्यात आला होता. यावर कमळासोबत लाल,पिवळ,हिरवा अशा ३ आडव्या पट्ट्या होत्या
2⃣ 1907 बर्लिन समितीचा ध्वज -
मॅडम कामा आणि इतर क्रांतिकारकांच्या गटाने 1907 मध्ये हा ध्वज पॅरिसमध्ये फडकावला होता. हा पहिल्या ध्वजा सारखाच होता फक्त वरच्या पट्ट्यामध्ये कमळा ऐवजी सप्तर्षी दर्शवणारे तारे होते.
1917 होमरूल आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेला ध्वज -
तिसरा राष्ट्रीय ध्वज डॉ. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 1917 मध्ये होमरूल चळवळीदरम्यान फडकवला. या ध्वजावर सप्तर्षीच्या 7 ताऱ्यांसह 5 लाल आणि 4 हिरव्या आडव्या पट्ट्या होत्या आणि पांढरा चंद्रकोर आणि युनियन जॅक होता.