BOL BHIDU Profile picture
गल्ली ते दिल्ली, प्रत्येक गोष्टीतली इत्यंभूत आणि अस्सल माहिती.
Aug 23, 2023 9 tweets 2 min read
भारताचं चांद्रयान-३ हे मिशन यशस्वी झालं असून विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झालं आहे. आता महत्वाचं
असेल ते म्हणजे विक्रम लँडर चंद्रावर नेमके काय काम करेल? जाणून घेऊया चंद्रावर इथून पुढे लँडर आता नेमकं कोणतं काम करेल...#isrochandrayaan3mission #चांद्रयान३ Image विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर लँडरपासून प्रग्यान रोव्हर वेगळा होईल.रोव्हर हा एक लहानसा रोबोट असतो आणि त्याला चाकं देखील जोडलेली असतात. त्यामुळे चंद्रावर लँड झाल्यानंतर लँडर एका जागेवर स्टेबल राहील तर त्याचवेळी रोव्हर मात्र चंद्राच्या पृष्टभागावर फिरत राहील. Image
Nov 10, 2022 4 tweets 1 min read
🧵थ्रेड
श्रीलंकन क्रिकेटर दानुष्का गुणातिलके याला बलात्काराच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर जे निरनिराळे आरोप लावण्यात आले आहेत त्यामध्ये स्टीलथींगचा (stealthing) देखील आरोप आहे. या थ्रेडमधून जाणून घेऊया स्टीलथींग या गुन्ह्याबद्दल ? Image सेक्स करताना जेव्हा पुरुष, पार्टनरच्या संमतीशिवाय कंडोम काढून टाकतो त्याला स्टीलथींग असं म्हटलं जातं. बऱ्याचदा प्रोटेक्टेड सेक्स करण्यासाठीच पार्टनरने संमती दिलेली असते.
Nov 9, 2022 4 tweets 1 min read
🧵थ्रेड
भारताचे सरन्यायाधीश म्हणून डी. वाय. चंद्रचूड यांनी शपथ घेतली आहे. त्यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. त्यात ते पत्नी आणि फॉस्टर चिल्ड्रन सोबत दिसतायत. फॉस्टर चाइल्ड ही दत्तक मुलांपेक्षा वेगळी कॉन्सेप्ट आहे. थ्रेडमधे जाणून घेऊया फॉस्टर चाइल्ड कॉन्सेप्ट
PC -@tashitobgyal Image तर दत्तक मुलांसारखंच फॉस्टर चाईल्ड स्वीकारणारे पालक त्या मुलांचे जन्म देणारे पालक नसतात. मात्र दत्तक मुलांवर पालकांचा कायमचा हक्क असतो. फॉस्टर चाईल्ड कॉन्सेप्टमध्ये तसं नसतं.
Aug 23, 2022 8 tweets 2 min read
🧵थ्रेड
NDTV अदानींनी विकत घेतली आहे. अगदी अंबानींनी जसा नेटवर्क 18 ग्रुप विकत घेतला अगदी तसंच NDTV विकत घेण्याची तयारी चालू आहे आणि मेन म्हणजे २००९ मध्येच NDTV विकली जाणार हे जवळपास फिक्स होतं. हे सगळं एक्सप्लेन करणारा हा थ्रेड.
#NDTV तर ज्याप्रकारे अंबानींनी नेटवर्क 18 विकत घेतली तीच स्क्रिप्ट इथं रिपीट झाली आहे. म्हणजे मीडिया कंपनीवर खूप कर्ज असल्याने त्यांना बेलआउटची गरज असते. अशावेळी कंपनीचे प्रमोटर कर्ज घेतात. तेव्हा कर्ज देणारा Debentures ने कर्ज देतो.
Aug 16, 2022 7 tweets 1 min read
🧵थ्रेड
विनायक मेटे यांचा पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर कार अपघातात मृत्यू झाला. मेटेंच्या मृत्यूबाबत शंका कुशंका उपस्तिथ केल्या जातायेत. त्यापैकी एक आहे हायवे हिप्नोसिस. या थ्रेड मधून जाणून घेऊया ‘हायवे हिप्नोसिस’ म्हणजे नक्की काय असतं ? आणि ते टाळण्यासाठी काय करावं? ‘हायवे हिप्नोसिस’ ला अनेकदा हायवेवर गाडी चालवणारे ड्राइवर बळी पडतात. हिप्नोसिस म्हणजे संमोहित होणं.
Aug 15, 2022 9 tweets 3 min read
🧵थ्रेड
आओ बच्चों तुम्हे दिखाएं झाँकी हिन्दुस्तान की 
दे दी हमें आज़ादी बिना ..
हम लाएँ है तुफान से कश्ती
ही गाणी तुम्ही आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ऐकली असणार,
पण तुम्हाला माहितेय का? 'जागृति'  पिक्चरची ही गाणी, कथा बालकलाकार पाकिस्तानमध्ये डिट्टो कॉपी केली गेली होती तर जागृति पिक्चररमधली हि सगळी गाणी आहेत आणि या पिक्चरचा पाकिस्तानमध्ये ' बेदारी' या नावाने रिमेक करण्यात आला होता. यामध्ये जागृति सिनेमाचा प्लॉट आहे तसा उचलून फक्त तो पाकिस्तानच्या दृष्टीकोनातून सेट करण्यात आला होता. ImageImage
Aug 5, 2022 12 tweets 2 min read
🧵थ्रेड
आज १० वर्षांनंतर सुरेश कलमाडी पुणे महानगरपालिकेत आले. शरीराने थकलेल्या कलमाडींना ओळखनं देखील अवघड झालं होतं. मात्र कधीकाळी भारताने भारतातल्याच नागरिकांवर केलेला एकमेव हवाई बॉम्बहल्ला म्हणून ज्या हल्ल्यावर आरोप होतो त्यात कलमाडी सामील होते. त्याचाच हा किस्सा. Image भारताचा ईशान्य भाग कायम असंतोषामुळे धगधगता राहिला आहे. स्वातंत्र्य मिळल्यावरही या मिझोराम हा आसाम राज्याचा जिल्हा म्हणून राहिला.मिझो लोकांच्या विकासाकडे तत्कालीन प्रांतिक सरकारने पुरेसे लक्ष न दिल्यामुळे या लोकांतील असंतोष वाढत गेला.
Aug 5, 2022 5 tweets 2 min read
#फोटोऑफद_डे
सोशल मीडियावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींचा ##महंगाई_पर_हल्ला_बोल आंदोलनातील हा फोटो व्हायरल होतोय आणि सोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही. या दोन फोटोंमागची नेमकी स्टोरी जाणून घेऊ.
असा आहे इंदिरा गांधींच्या त्या फोटोचा इतिहास
@INCIndia @INCMaharashtra हा फोटो आहे १९७७ सालातला. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर इंदिरा गांधींनी आंदोलन केलं होतं. आणीबाणीनंतर झालेल्या या निवडणुकीत इंदिरा गांधींचीच सत्ता येईल अशी खात्री त्यांना इंटेलिजन्स ब्युरो मधल्या काँग्रेस निकटवर्तीयांकडून देण्यात आली होती.
Aug 4, 2022 8 tweets 2 min read
🧵थ्रेड
नरेंद्र मोदींच्या #HarGharTiranga मोहिमेला प्रतिसाद देत अनेकजण प्रोफाइल पिक्चरमध्ये तिरंगा ठेवत आहेत. मात्र RSS ने आपल्या ऑफिशिअल अकाउंटवर तिरंगा न ठेवल्याने टीका होत आहे. याला RSS ने १९५० ते २००२ अशा ५२ वर्षे संघ कार्यालयावर तिरंगा फडकवला नसल्याच्या घटनेशी जोडलं जातंय. १९५० पासून ते २००२ सालापर्यंत संघाच्या मुख्यालयात प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन या भारताच्या राष्ट्रीय सणादिवशी झेंडावंदन केले जात नव्हते.
Aug 4, 2022 6 tweets 2 min read
🧵थ्रेड
सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीत एक महत्वाचा निर्णय होता, पुढील सुनावणीपर्यंत शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये. ठाकरे गटाचा शिवसेनेचा मुद्दा इलेक्शन कमिशनकडे नेण्यास विरोध आहे. जर आयोगाकडे हा विषय गेला तर सेनेची स्थिती लोकजनशक्ती पक्षागत होऊ शकते. त्याचवेळी शिंदे गट मात्र निवडणूक आयोगाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा यासाठी आग्रही आहे. कालच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीतही शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ येत असल्याने आम्ही इलेक्शन कमिशन कडे धनुष्यबाणाची मागणी केली असल्याचं म्हटलं होतं.
Aug 3, 2022 9 tweets 2 min read
🧵महाराष्ट्रातल्या सत्त्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात असा युक्तिवाद झाला.
#ShivSena #MaharashtraPolitcalCrisis #SupremeCourt उद्धव ठाकरे गट
- शिंदे गटाला स्वतःला मूळ पक्ष म्हणता येणार नाही
ते पार्टीतून बाहेर पडले आहेत आणि इलेक्शन कमिशन समोर त्यांनी ते मान्य केलं आहे
Aug 2, 2022 7 tweets 3 min read
🧵थ्रेड
भारताचा राष्ट्रीय ध्वज असा विकसित होत गेला आणि फायनली भारताला तिरंगा मिळाला. #Tricolour
1⃣ 1906 पहिला अनधिकृत ध्वज -
भारताचा पहिला झेंडा 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाता येथे पारसी बागान स्क्वेअरमध्ये फडकवण्यात आला होता. यावर कमळासोबत लाल,पिवळ,हिरवा अशा ३ आडव्या पट्ट्या होत्या Image 2⃣ 1907 बर्लिन समितीचा ध्वज -
मॅडम कामा आणि इतर क्रांतिकारकांच्या गटाने 1907 मध्ये हा ध्वज पॅरिसमध्ये फडकावला होता. हा पहिल्या ध्वजा सारखाच होता फक्त वरच्या पट्ट्यामध्ये कमळा ऐवजी सप्तर्षी दर्शवणारे तारे होते. Image
Aug 1, 2022 10 tweets 2 min read
🧵थ्रेड -संजय राऊत यांना ज्यामुळं अटक झाली त्या पत्राचाळ प्रकरणाचा घटनाक्रम असा आहे. #SanjayRautArrested
2007- प्रवीण राऊतांची गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (GACPL) पत्रा चाळीतील रहिवासी आणि म्हाडा यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झाला. यानुसार GACPL पत्रा चाळीतील 672 भाडेकरूंना नवीन घरं बांधण्याचं त्याचबरोबर तिथे म्हाडासाठी काही फ्लॅट विकसित करण्याचं आणि उर्वरित क्षेत्र खाजगी विकासकांना विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं.