🧵थ्रेड
भारताचा राष्ट्रीय ध्वज असा विकसित होत गेला आणि फायनली भारताला तिरंगा मिळाला. #Tricolour
1⃣ 1906 पहिला अनधिकृत ध्वज -
भारताचा पहिला झेंडा 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाता येथे पारसी बागान स्क्वेअरमध्ये फडकवण्यात आला होता. यावर कमळासोबत लाल,पिवळ,हिरवा अशा ३ आडव्या पट्ट्या होत्या
2⃣ 1907 बर्लिन समितीचा ध्वज -
मॅडम कामा आणि इतर क्रांतिकारकांच्या गटाने 1907 मध्ये हा ध्वज पॅरिसमध्ये फडकावला होता. हा पहिल्या ध्वजा सारखाच होता फक्त वरच्या पट्ट्यामध्ये कमळा ऐवजी सप्तर्षी दर्शवणारे तारे होते.
1917 होमरूल आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेला ध्वज -
तिसरा राष्ट्रीय ध्वज डॉ. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 1917 मध्ये होमरूल चळवळीदरम्यान फडकवला. या ध्वजावर सप्तर्षीच्या 7 ताऱ्यांसह 5 लाल आणि 4 हिरव्या आडव्या पट्ट्या होत्या आणि पांढरा चंद्रकोर आणि युनियन जॅक होता.
१९२१ मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी डिजाईन केलेला राष्ट्रध्वज -
१९२१ मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी राष्ट्रध्वजाची पहिली डिजाईन तयार केली. त्यांनी लाल आणि हिरव्या पट्ट्यांचा ध्वज सुरवातीला बनवला होता. #PingaliVenkayyaBirthAnniversary
नंतर महात्मा गांधीजींच्या सल्ल्यानुसार यामध्ये पांढरी पट्टी आणि राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक म्हणून चरखा जोडण्यात आला. 1921 मध्ये बेजवाडा (आता विजयवाडा) येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनादरम्यान हा ध्वज फडकवण्यात आला.
1931 मध्ये तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्याचा ठराव संमत करण्यात आला. हा महात्मा गांधींच्या चरख्यासह भगवा, पांढरा आणि हिरवा पट्टे असलेल्या सध्याच्या तिरंगासारखाच होता.
फायनली मग १९४७ मध्ये संविधान सभेने तिरंगा हा स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. यामध्ये चरख्याच्या जागी अशोकचक्र ध्वजावरील प्रतीक म्हणून स्वीकारण्यात आलं. आज हा स्वतंत्र भारताचा तिरंगा आहे. #75yearsofIndependence
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
🧵थ्रेड -संजय राऊत यांना ज्यामुळं अटक झाली त्या पत्राचाळ प्रकरणाचा घटनाक्रम असा आहे. #SanjayRautArrested 2007- प्रवीण राऊतांची गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (GACPL) पत्रा चाळीतील रहिवासी आणि म्हाडा यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झाला.
यानुसार GACPL पत्रा चाळीतील 672 भाडेकरूंना नवीन घरं बांधण्याचं त्याचबरोबर तिथे म्हाडासाठी काही फ्लॅट विकसित करण्याचं आणि उर्वरित क्षेत्र खाजगी विकासकांना विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं.
2014-15- प्रवीण राऊत आणि GACL च्या इतर संचालकांनी म्हाडाची दिशाभूल केली आणि 672 विस्थापित भाडेकरूंसाठी पुनर्वसन नं करता तसेच म्हाडाच्या भागाचे बांधकाम न करता 901.79 कोटी रुपये वसूल करून नऊ खाजगी विकासकांना एफएसआय विकला .