#किल्ले_तिकोना#मावळ#Sanket_Jagtap
पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. या किल्ल्यावरून ३-४ कि.मी. अंतरावरील तुंग किल्ला दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे .
#इतिहास
तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला.
नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इ.स. १६५७मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तहात'
शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती. #गडावरील_ठिकाणे
गडमाथ्यावर त्रिंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर, एक तलाव, २ तळी व धान्य कोठाराचे पडीक अवशेष आढळतात.
बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाईचे मंदिर आहे. मंदिर असलेले लेणे सातवाहनोत्तरकालीन असावे. या दक्षिणाभिमुखी लेण्यात एक टाके खोदलेले आहे. लेण्यासमोरच एक तळेही आहे. लेण्यासमोर एका कोरीव दगडावर दोन भागात काम केले आहे.
वरच्या बाजूस एक पुरुषाकृती असून त्याच्या पायाखाली बाई दाखविलेली आहे. खालच्या भागात दोन स्त्रिया असून त्यांच्या हातात फुलांच्या माळा आहेत . #गडावर_जाण्याच्या_वाटा
तिकोना पेठेतून जाणारी वाट कड्यावरून थेट गडाच्या दरवाज्यात जाते. गडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात.
#मार्ग
पुणे - जवण नं. 1 ही बस घेऊन गडाच्या पायथ्याशी जाता येते, किंवा कामशेत-कालेकॉलनीमार्गे तिकोना पेठेत पोहोचता येते. लोणावळा-दुधिवरे खिंड मार्हीगे काले -तिकोनाला जाता येते.
#किल्ले_तुंग#Sanket_Jagtap
११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता. #इतिहास
पवन [मावळ] प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो.
पूर्वी बोरघाटामार्गे चालणा-या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून पवना धरण,लोहगड, विसापूर,तिकोणा,मोरगिरी पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.
या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही.
मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी[नेताजी पालकर]यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि [तिकोना] या भागातील अनेक गावे जाळली
#विंचूकडा#लोहगड#Sanket_Jagtap
सह्याद्रीत दिसायला लोहगडाचा कडा रांगडा, भयाण अगदी पण त्याच्या काळ्या कातळावर अंग पसरतो तेव्हा प्रेमळ व्यक्ती आहे हा असा सुखद अनुभव नक्कीच येतो, असा हजारो वर्ष अभेद्य उभा आहे निसर्गात तडाखे झेलत वर्षानुवर्ष अविरत झटणारा हा कडा जसेच्या तसे आजही
अभंग अडग म्हणजेच...,
“विंचवाच्या नांगी सारखा असणारा शत्रुंना यमसदनी पाठवणारा ऐतिहासिक विंचुकडा....”🚩
डोंगर नैसर्गिक दृष्टीनेच किती दुर्गम संरक्षीत आहे गडाचे कडा नैसर्गिकच चखोट आहेत किल्ला बांधण्यापुर्वी केलेली तिथल्या ठिकाणची पाहणी आणि गड बांधण्यास भौगोलिक दृष्ट्या
तिथली योग्य असणारी वास्तुस्थापत्य विंचुकडा :
कैद्यांना, फितुरांना, गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी गडावरील एक राखीव जागा कडा शिक्षा सुनाविल्यानंतर कैद्यांचा अशा ठिकाणाहून कडेलोट केले जात...
#शिवविचार_प्रतिष्ठान#शिवदिनविशेष
१४ जानेवारी इ.स.१६४१
शहाजीराजांचे कोंडदेवांना पत्र
शहाजीराजांना सूनमुख पाहण्याची उत्सुकता वाटली असणे स्वाभाविक आहे.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१४ जानेवारी इ.स.१६४८
कोकण मोहिम आटोपून शिवाजी राजे राजगडावर आले. हाच तो दिवस ज्या दिवशी शिवाजी राजांनी
आपल्या नव्या राजधानीवरील वास्तूत गृहप्रवेश केला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१४ जानेवारी इ.स.१६५८
स्वराज्याचे रोपटे पळापळाने वाढत होते.पुरंदरावर महाराजांनी फत्तेखानाचा दारुण पराभव केला होता.स्वराज्याची राजधानी म्हणुन रायगडाची निवड केली होती.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१४ जानेवारी इ.स.१६८५
छत्रपती संभाजी महाराजांनी शहाबुद्दीनचा पराभव केला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१४ जानेवारी इ.स.१७६१ #मराठा_शौर्यदिन - #पानिपतची_तिसरी_लढाई
हाच तो काळा दिवस ज्या दिवशी पानिपतावर मराठ्यांची एक सबंध पिढी शहीद झाली होती. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
#धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असलेला ही अद्भुत नळदुर्ग - रणमंडळ जोडगोळी. सोलापूरहून ४८ तर तुळजापूरहून ३२ किलोमीटरवर हा नळदुर्ग आहे. मोठा आकार, प्रेक्षणीय अशा अनेक वास्तू आणि मुख्य म्हणजे पाणीमहालाचे गूढ सौंदर्य
या साऱ्यांमुळे हा किल्ला पर्यटकांपासून ते अभ्यासकांपर्यंत अनेकांना सतत खुणावत असतो.
१२६ एकर क्षेत्रफळ आणि त्याला तब्बल ११४ बुरुजांची दुहेरी तटबंदी, ही आकडेवारीच या किल्ल्याची भव्यता स्पष्ट करते.
नळदुर्ग ही चालुक्यांची निर्मिती आहे पण स्थानिक लोक त्याचा इतिहास अगदी
पुराणातील राजा नल आणि दमयंतीपर्यंत नेऊन भिडवतात. चालुक्यांनंतर इथे बहमनी राजवट आली. या बहमनी राजवटीचे तुकडे झाल्यावर पुढे तो विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. या राजवटीतच सुलतान अबुल मुजफ्फर अली आदिलशाह पहिला याने इ.स. १५६० मध्ये गडाला आजचे हे आक्रमक रूप दिले.
#शिवविचार_प्रतिष्ठान#शिवदिनविशेष
१३ जानेवारी इ.स.१६८०
संभाजीराजे व शिवाजी महाराज यांची पन्हाळा या गडावर ऐतिहासिक भेट.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१३ जानेवारी इ.स.१६८५
मराठ्याचा पुण्यावर मारा व इतर भागात हालचाली, कोथळीगडाजवळ ७०० मराठी स्वार, १००० मराठा सैनिक शिरवळ भागात तर
नवलाख उंब्रे येथे मराठी फौजेच्या हालचाली
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१३ जानेवारी इ.स.१७०९ किंवा १७१०
छत्रपति शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक नरवीर जीवाजी महाले (संकपाळ) यांचा पुण्यदिन आहे.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१३ जानेवारी इ.स.१७६१
डिसेंबर-जानेवारी मधे अन्नाविना मराठ्यांची बरीच जनावरे, घोडे मेले. १३ जानेवारी रोजी उपाशी पोटी सर्व सैन्य रनांगणावर लढाईसाठी उतरले. सैन्य पूर्ण खचलेले होते.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
#सरदार_पुरंदरे#गढी#सासवड #Sanket_Jagtap
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ऐतिहासिक नगरीत शनिवारवाड्याचा जुळा भाऊ म्हणून ओळख असलेली पुरंदरे गढी आहे. सासवड हे गाव पुणे शहरापासून ३० कि.मी अंतरावर आहे. गढीचे भव्य दगडी बुरूज आणि त्याचे भव्य सागवानी प्रवेशद्वार
शनिवारवाड्याची आठवण करून देते. वाड्याची संपूर्ण तटबंदी असलेली भिंत आजही मजबूत आहे. आतमध्ये तशी बर्यापैकी पडझड झालेली आहे. तरी आतील वाड्याचे भव्यपण आजही टिकून आहे. बाहेर वाड्याच्या तटाशी गणेश मंदिर आहे. हा द्विभुज गणेश आहे.
शके १६२५ (इ.स. १७०३) मधील एका पत्रात 'कसबे सासवडचे कुलकर्ण व कर्यात सासवडचे कुलकर्ण पदाबद्दल समस्त पुरंदरे यांनी अत्र्यांशी वाद घातले' अशी नोंद आहे. 'शके १६१४ (इ.स. १६९२) च्या फाल्गुन महिन्यात तुकोपंत पुरंदरे, धनाजी जाधवांबरोबर चंजीस (जिंजीस) जाऊन जमिनीच्या सनदा घेत आहे', अशी एका