Sanket Jagtap 96k  🚩 Profile picture
🚩|| धर्मो रक्षति रक्षितः || 🚩क्षत्रिय मराठा 96k🚩 #शिवदिनविशेष 🚩 #गडकोटमाहिती 🚩#हिंदू 🕉️🚩 #Sanket_Jagtap chemist🧪🧫
Aug 11, 2022 8 tweets 4 min read
#किल्ले_तिकोना #मावळ #Sanket_Jagtap
पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. या किल्ल्यावरून ३-४ कि.मी. अंतरावरील तुंग किल्ला दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे . #इतिहास
तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला.
Aug 11, 2022 10 tweets 4 min read
#किल्ले_तुंग #Sanket_Jagtap
११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता.
#इतिहास
पवन [मावळ] प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणा-या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून पवना धरण,लोहगड, विसापूर,तिकोणा,मोरगिरी पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.

या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही.
Jan 14, 2022 4 tweets 2 min read
#विंचूकडा #लोहगड #Sanket_Jagtap
सह्याद्रीत दिसायला लोहगडाचा कडा रांगडा, भयाण अगदी पण त्याच्या काळ्या कातळावर अंग पसरतो तेव्हा प्रेमळ व्यक्ती आहे हा असा सुखद अनुभव नक्कीच येतो, असा हजारो वर्ष अभेद्य उभा आहे निसर्गात तडाखे झेलत वर्षानुवर्ष अविरत झटणारा हा कडा जसेच्या तसे आजही अभंग अडग म्हणजेच...,
“विंचवाच्या नांगी सारखा असणारा शत्रुंना यमसदनी पाठवणारा ऐतिहासिक विंचुकडा....”🚩

डोंगर नैसर्गिक दृष्टीनेच किती दुर्गम संरक्षीत आहे गडाचे कडा नैसर्गिकच चखोट आहेत किल्ला बांधण्यापुर्वी केलेली तिथल्या ठिकाणची पाहणी आणि गड बांधण्यास भौगोलिक दृष्ट्या
Jan 14, 2022 5 tweets 2 min read
#शिवविचार_प्रतिष्ठान #शिवदिनविशेष
१४ जानेवारी इ.स.१६४१
शहाजीराजांचे कोंडदेवांना पत्र
शहाजीराजांना सूनमुख पाहण्याची उत्सुकता वाटली असणे स्वाभाविक आहे.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

१४ जानेवारी इ.स.१६४८
कोकण मोहिम आटोपून शिवाजी राजे राजगडावर आले. हाच तो दिवस ज्या दिवशी शिवाजी राजांनी आपल्या नव्या राजधानीवरील वास्तूत गृहप्रवेश केला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

१४ जानेवारी इ.स.१६५८
स्वराज्याचे रोपटे पळापळाने वाढत होते.पुरंदरावर महाराजांनी फत्तेखानाचा दारुण पराभव केला होता.स्वराज्याची राजधानी म्हणुन रायगडाची निवड केली होती.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
Jan 13, 2022 10 tweets 3 min read
#किल्ले_नळदुर्ग - #रणमंडळ #Sanket_Jagtap

#धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असलेला ही अद्भुत नळदुर्ग - रणमंडळ जोडगोळी. सोलापूरहून ४८ तर तुळजापूरहून ३२ किलोमीटरवर हा नळदुर्ग आहे. मोठा आकार, प्रेक्षणीय अशा अनेक वास्तू आणि मुख्य म्हणजे पाणीमहालाचे गूढ सौंदर्य या साऱ्यांमुळे हा किल्ला पर्यटकांपासून ते अभ्यासकांपर्यंत अनेकांना सतत खुणावत असतो.
१२६ एकर क्षेत्रफळ आणि त्याला तब्बल ११४ बुरुजांची दुहेरी तटबंदी, ही आकडेवारीच या किल्ल्याची भव्यता स्पष्ट करते.

नळदुर्ग ही चालुक्यांची निर्मिती आहे पण स्थानिक लोक त्याचा इतिहास अगदी
Jan 13, 2022 4 tweets 1 min read
#शिवविचार_प्रतिष्ठान #शिवदिनविशेष
१३ जानेवारी इ.स.१६८०
संभाजीराजे व शिवाजी महाराज यांची पन्हाळा या गडावर ऐतिहासिक भेट.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

१३ जानेवारी इ.स.१६८५
मराठ्याचा पुण्यावर मारा व इतर भागात हालचाली, कोथळीगडाजवळ ७०० मराठी स्वार, १००० मराठा सैनिक शिरवळ भागात तर नवलाख उंब्रे येथे मराठी फौजेच्या हालचाली
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

१३ जानेवारी इ.स.१७०९ किंवा १७१०
छत्रपति शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक नरवीर जीवाजी महाले (संकपाळ) यांचा पुण्यदिन आहे.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
Jan 12, 2022 9 tweets 3 min read
#सरदार_पुरंदरे #गढी #सासवड
#Sanket_Jagtap
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ऐतिहासिक नगरीत शनिवारवाड्याचा जुळा भाऊ म्हणून ओळख असलेली पुरंदरे गढी आहे. सासवड हे गाव पुणे शहरापासून ३० कि.मी अंतरावर आहे. गढीचे भव्य दगडी बुरूज आणि त्याचे भव्य सागवानी प्रवेशद्वार शनिवारवाड्याची आठवण करून देते. वाड्याची संपूर्ण तटबंदी असलेली भिंत आजही मजबूत आहे. आतमध्ये तशी बर्यापैकी पडझड झालेली आहे. तरी आतील वाड्याचे भव्यपण आजही टिकून आहे. बाहेर वाड्याच्या तटाशी गणेश मंदिर आहे. हा द्विभुज गणेश आहे.
Jan 12, 2022 4 tweets 2 min read
#शिवविचार_प्रतिष्ठान #शिवदिनविशेष
१२ जानेवारी इ.स‌.१५९८
#राजमाता_जिजाऊ_जन्मोत्सव
१२ जानेवारी या दिवशी महराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

१२ जानेवारी इ.स.१७०५
छत्रपती शाहु महाराजांनी सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ जानेवारी इ.स.१७०८
#छत्रपती_शाहु_महाराज_राज्याभिषेकदिनमराठा साम्राज्याचा सुवर्ण काळ गनला जाणारा सातरावे शतक, या कलखंडा मध्ये मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा मोगल्यांच्या राज्यात धुमाकुळ घालु लागल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Jan 11, 2022 9 tweets 2 min read
#बदलापूर : चावीच्या आकाराची प्राचीन विहीर
#Sanket_Jagtap
पर्यटकांचं आकर्षण; दुष्काळातही पाणी
इतिहासाच्या शेकडो खाणाखुणा आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. बदलापूर (Badlapur) शहराला तर इतिहासाचा वारसाच लाभलेला आहे. अनेक प्राचीन वास्तूंचे (Antiquarian) नमुने बदलापुरात आढळतात. त्यातील देवळोली गावातील (Devloli village) चावीच्या आकारातील (key shape) प्राचीन विहीर (Ancient well) पर्यटकांना (Tourist Attraction) भुरळ घातली आहे. ही विहीर शिवकालीन असून तिचे पाणी दुष्काळातही (Water in drought also) आटत नाही, असे येथील गावकरी सांगतात.
Jan 11, 2022 6 tweets 2 min read
#शिवविचार_प्रतिष्ठान #शिवदिनविशेष
११ जानेवारी इ.स.१६६६
मुघल सरदार दिलेरखानाने छत्रपती शिवरायांना जीवे मारण्याचा कट रचल्याची खबर शिवरायांना गुप्तहेरामार्फत मिळाली. छत्रपती शिवराय मिर्झाराजे जयसिंगाची छावणी सोडून पन्हाळ्याकडे रवाना.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ११ जानेवारी इ.स.१६८०
रायगड जिल्ह्यामधील खांदेरी किल्ला बांधून पूर्ण.आज रोजी महाराजांकड़े ताब्यात आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

११ जानेवारी इ.स.१६८८
मातबरखानाने पट्टा गड जिंकला१६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Jan 10, 2022 11 tweets 3 min read
सरदार #पानसे #मल्हार_गड #सोनोरी (सरदार पानसे) #Sanket_Jagtap
महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला मल्हारगड पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी त्याची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे.
Jan 10, 2022 5 tweets 2 min read
#शिवविचार_प्रतिष्ठान #शिवदिनविशेष
१० जानेवारी इ.स.१६६४
शिवाजी महाराज सूरतेहून राजगडाकडे निघाले. महाबत खान सुरतेच्या बचावासाठी येत असल्याने ४ दिवस सूरत लुटल्यानंतर जमा झालेली अर्धी लुट जमीन मार्गाने राजगडाकडे चालवली तर बाकीची अर्धी सागरी मार्गाने कोकणात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 १० जानेवारी इ.स.१७२४
बाजीराव-पोर्तुगिज यांच्यात तह झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

१० जानेवारी इ.स.१७३०
शनिवारवाड्याचे बांधकाम १७३०ला सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तूशांत करण्यात आली.शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Jan 9, 2022 11 tweets 3 min read
#रामेश्वर_मंदिर #चौल , #अलिबाग
#Sanket_Jagtap

महाभारतात चंपावती किंवा रेवतीक्षेत्र म्हणून उल्लेखलेले #चौल हे तिमुल्ल, सेमुल्ल, चेमुल्ल, चिमोलो, सैमूर, सिबोर चेऊल अशा विविध नावांनी प्राचीन भारतीय वाङ्मयात प्रसिद्ध आहे चौल हे अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेले सातवाहनकालीन प्राचीन बंदर आहे. येथल्या प्रसिद्ध अक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हीदेखील एक जोडगोळी समजली जाते. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आले; परंतु आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित होतो.
सातवाहन काळात हे बंदर सर्वोच्च शिखरावर होते.
Jan 9, 2022 6 tweets 2 min read
#शिवविचार_प्रतिष्ठान #शिवदिनविशेष
९ जानेवारी इ.स.१६३६
शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

९ जानेवारी इ.स.१६५७
छत्रपती शिवरायांचा "गायकवाड" घराण्यातील "सकवारबाई" यांच्याशी विवाह.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ९ जानेवारी इ.स.१६६४
बहरोचहून मुघलांची फौज सुरतच्या दिशेने रवाना झाल्याची बातमी छत्रपती शिवरायांना समजली, शिवरायांचे मावळ्यांना परतीच्या प्रवासासाठी तात्काळ लवाजमा बांधणीचे आदेश.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

९ जानेवारी इ.स.१६७१
बहादूरखान स्वराज्यावर चालून यायला निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
Jan 8, 2022 6 tweets 1 min read
#शिवविचार_प्रतिष्ठान #शिवदिनविशेष
८ जानेवारी इ.स.१०२६
गझनिच्या मेहमुदाचे सोमनाथ मंदिरावर आक्रमण.महमूद गझनिच्या हिंदुस्तानवरील १७ हल्ल्यांपैकी १६ वा आणि सर्वात भयानक असा हल्ला म्हणजे सोमनाथ मंदिरवरील हल्ला होय.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ८ जानेवारी इ.स.१६५८
कल्याणहून शिवाजी महाराज स्वत: माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले. माहुलीचा किला असनगावच्या जवळ आहे. याच माहुलीगडावर शहाजी राजांनी निजामशाही टिकवण्यासाठी अखेरची झुंज मोगलांशी एकवीस वर्षापूर्वी दिली होती. त्यांत ते हरले होते. तो माहुली - भंडारगड - पळसगड ,
Sep 6, 2021 11 tweets 6 min read
#छत्रपती_शिवाजी_महाराज आणि #इतिहास
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ??
खोटे उत्तर - दौलत खान.
खरे उत्तर - याच दौलतखानाने परत सिद्दीशी हातमिऴवणी केली. त्या अगोदरच राजांनी दर्यासारंगास आरमार प्रमुख नेमले होते. शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता ??
खोटे उत्तर - सिद्दी हिलाल
खरे उत्तर - हा बाटगा सिद्दी हिलाल शाहेस्तेखानाला गुप्त बातम्या पुरवत होता. तेव्हा आमच्या बहीर्जी नाईकांनी याला वाटेतच ठार केला.
Sep 4, 2021 5 tweets 2 min read
#रायगड #रायगड_महादरवाजा
अभूतपूर्व स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण “रायगडावरील महादरवाजा”....🚩

महादरवाजा व लाकडी व्दारावरचे खिळे :

गडाचा हा मुख्य दरवाजा, संरक्षणाच्या, गडाच्या दृष्टीने याची बांधणी संरक्षण बाजू अतिशय महत्त्वाची म्हणूनच शिवरायांच्या दुर्गबांधणीतील Image एक अद्भूत प्रयोग आपल्याला पहायला मिळतो तो म्हणजे महादरवाजाची बांधणी.. आदी दोन बुरूजांच्या कवेत अगदी शेवटपर्यंत न दिसता बेमुलाग पद्धतीने लपवलेली ही बांधणी भक्कम बुरुज, अरूंद अधिक चढाच्या पायऱ्याही काही खास वैशिष्ट्ये शत्रूला अगदी शेवटपर्यंत न दिसता दोन भक्कम बुरूजांच्या मध्ये
Jun 5, 2021 18 tweets 7 min read
#शिवराज्याभिषेक #कशासाठी

#१)_धार्मिक:- तत्कालीन धार्मिक समजुतीप्रमाणे क्षत्रियालाच राजा होता येत असल्याने आणि हिंदू समाजात क्षत्रियच उरला नसल्याने हिंदूपैकी कोणीही राजा होणे शक्य नव्हते.
१/ हे राहणे ही ओघाने आलीच. शिवाजीराजांनी ही खुळचट कल्पना दूर करून हिंदूही या देशाचा राजा होऊ शकतो हे सिध्द करायचे होते.

#२)_राजकीय:- शिवाजीराजांनी स्वकर्तृत्व सिध्द केले असले तरी आदिलशाहीचे दृष्टीने ते आदिलशाही च्या शहाजीराजे या जहागीर दाराचे पुत्र म्हणजे आदिलशाहीचे चाकर होते
२/
Jun 5, 2021 4 tweets 1 min read
#शिवविचार_प्रतिष्ठान #शिवदिनविशेष
५ जून इ.स.१६६६
आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांना ठार मारण्याचा नविन प्रस्ताव "जहाॅंआरा बेगम" च्या मध्यस्तीने औरंगजेबने मागे घेतला.
५ जून इ.स.१६६६
आग्रा कैदेत छत्रपती शिवरायांच्या जीवास धोका असल्याचे समजताच मिर्झाराजे जयसिंगाचा मुलगा "रामसिंग याने शिवरायांच्या निवासस्थानाबाहेर विश्वासातील अर्जुनसिंह कछवाह, सुखसिंह नाथावट आणि तेजसिंह यांच्यामार्फत पहारा चालू केला.

५ जून इ.स.१६७४
(ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, शके १५९६, वार शुक्रवार)

महाराजांनी ऐंद्रिशांतीचे कार्य आटोपले. व मुख्य राज्याभिषेकाला सुरुवात!