इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा

राजा परीक्षिताचा जीव तक्षकाने घेतला आणि मग सर्पनाशक यज्ञ पेटवून जनमेजयाने सर्प मेध आरंभला. जनमेजयाच्या अफाट सामर्थ्याची इंद्राला आधीच भीती होती आणि तक्षकाच्या मृत्युनंतर तो अधिकच शक्तिशाली होणार ही सार्थ भीती सुद्धा त्याला होती. त्यातच तक्षक
इंद्राच्या दरबारात दाखल झाला आणि पूर्वपुण्याईचा हवाला देत त्याने तमाम सर्प कुळाचा कुलच्छेद वाचवण्याची विनंती केली. इंद्राने दूरगामी विचार करून तक्षकाला अभय दिले आणि स्वर्गलोकात स्थान सुद्धा दिले. इकडे संतापाने बेभान झालेल्या जनमेजयाने ते सुप्रसिद्ध शब्द उच्चारले. “इंद्राय स्वाहा
तक्षकाय स्वाहा”
हा सगळा महाभारतकालीन संदर्भ आज सांगण्याचे कारण म्हणजे अमीर खानचा रिलीज झालेला चित्रपट, त्याविरुद्ध हिंदूंनी पेटवलेला बहिष्कार धोरणाचा यज्ञ आणि त्यामुळे व्यथित झालेला देशातील सेलिब्रिटी वर्ग, बॉलीवूड कलाकार, मिडिया आणि सेक्युलर मंडळींनी केलेले अरण्यरुदन.
कलाकार हा
केवळ कलाकार नसतो. सामान्य लोकांच्या साठी तो आयकॉन, रोल मॉडेल अर्थात आदर्श असतो. त्यामुळे तो करत असलेल्या अभिनयालाच त्याची वैचारिक भूमिका समजण्याची गल्लत करणारे त्याचे लक्षावधी चहाते असतात आणि ते त्याचे
अनुकरण करत असतात. या कलाकारांना त्याची जाणीव असते आणि म्हणूनच आपल्या भूमिकेतून आणि वैयक्तिक जीवनातून राष्ट्र विरोधी तत्वांना मानवी चेहरा देणे, भारतीय संस्कृतीचा उपहास करणारा विचार मांडणे आणि हिंदू धर्मविरोधी दृष्टीकोन ते समाजात पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात.
आपल्या देशातील समस्त राष्ट्रविरोधी आणि हिंदू धर्म संस्कृती द्वेष्ट्या मंडळींनी कला, साहित्य आणि मिडियाचे अवकाश गेली सत्तर वर्षात सरकारी कृपेने व्यापले आहे आणि ही मंडळी आपल्या कृतींमधून हा बुद्धिभेद शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या
मंडळींच्या मेंदूमध्ये भिनवत आहेत आणि आपल्या संपूर्ण समाजात सर्वधर्मसमभाव नावाच्या विषाचे चाटण बॉलीवूड नावाच्या मधात मिसळून भिनवत आहेत.
२०१४ नंतर निद्रिस्त हिंदू समाज जागा झाला आहे आणि या सगळ्या विषारी सापांना ठेचणारे #BOYCOTT BOLLYWOOD
सारखे ट्रेंड सोशल मिडिया पेटवत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून या खानावळींचे चित्रपट कोसळत आहेत.

ज्या जनसामान्यांच्या अफाट प्रेमाने हे कलाकार मोट्ठे सेलिब्रिटी झाले आहेत, त्या जनसामान्यांच्या भावना आजवर तुडवताना त्यांना कधीही खंत आणि खेद झाला नाही. परंतु आता मात्र या सर्पमेध
यज्ञात बॉलीवुडची आहुती पडते आहे हे बघितल्यावर समस्त सेलिब्रिटी, मिडिया आणि कलाविश्व इंद्राच्या भूमिकेत गेले आहे आणि जुन्या संबंधांना स्मरून या विकृतींना पाठीशी घालत आहेत.. हे लोक सोयीस्कर विस्मृतीने ग्रस्त आहेत परंतु सर्वसामान्य हिंदू जनता मात्र प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवून आहे.
अमीर खान ची तीन तीन लग्ने, हिंदूच बायका, सैफ अली खान ची दोन दोन लग्ने आणि दुसऱ्या बायकोचे पोट कायम एखाद्या नवाबाने भरलेले ठेवत सरकार च्या कुटुंब नियोजनाच्या चिंधड्या उडवणे.
अमीर खान चे भारत द्वेषी आणि कट्टर हिंदू द्वेषी अश्या पाकिस्तानी मौलानांशी असलेले सख्य, त्यांच्या बरोबर
फोटो काढून घेणे, आवर्जून शेअर करणे. तुर्की , जे राष्ट्र भारताचा प्रचंड द्वेष करते तिथे जाऊन मुद्दामून भारत द्वेषी नेत्यांशी भेटीगाठी घेत त्याचे फोटो शेअर करणे.
या सगळ्या गोष्टी सामान्य हिंदूंच्या डोक्यात गेल्या आहेत आणि त्यामुळेच या बॉलीवूड मेध करण्यासाठी बहिष्कार यज्ञ
पेटवला आहे. यात जर अन्य सेलिब्रिटी, कलाकार, साहित्यिक आणि मिडिया मध्ये चोच मारायला आडवा आला तर त्यांची सुद्धा आहुती यात निश्चित पडणार आहे... त्यामुळे आपण या आगीत बळी जायचे का नाही ? आपल्या करियरची किंवा धंद्याची वाट आपण लावून घ्यायची का नाही हे आपापले ठरवून घ्या...
सुनील शेट्टी सकट सगळ्यांना आता आमिरखान प्रेमाचे भरते आले आहे म्हणून आरसा दाखवायला हा लेख आहे...
समस्त कट्टर हिंदूंनी आता या राष्ट्र विरोधी, हिंदू संस्कृती विरोधी आणि हिंदू धर्म विरोधी शक्तींना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे....
तळटीप :
माझा प्रत्येक लेख माझ्या नावासह असतो आणि मी जे काही लिहितो त्याची जबाबदारी घेतो, त्यामुळे बिनधास्त व्हायरल करा.
©सुजीत भोगले
@Manishapangark1 @migratorscave @devharshada @Maratha__96k @Deepak_Talking @pallavict @Amruta_sv @amar_ghodke @anna_chimbori

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with चिंतामणी 🇮🇳

चिंतामणी 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @tolchintamani01

Jul 23
कॅम्लिनच्या रजनी दांडेकर यांचे निधन

चित्रकलेसाठी लागणाऱ्या रंगांबरोबरच शालेय साहित्याच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या कॅम्लिन या प्रख्यात कंपनीच्या मार्केटिंग विभागाच्या प्रमुख, सुभाष दांडेकर यांच्या पत्नी रजनी दांडेकर (वय ८०) यांचे गुरुवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती सुभाष दांडेकर, मुलगा आशिष, मुलगी अनघा असा परिवार आहे.

अनेक चित्रकार, चित्रकला शिक्षक, कलावंत आणि विद्यार्थी यांना प्रोत्साहन देत दांडेकर कुटुंबीयांनी कॅम्लिन व चित्रकला उद्योगाला चालना
दिली. सुभाष आणि रजनी दांडेकर यांनी २००१ मध्ये कॅम्लिन फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनच्या माध्यमातून दांडेकर दाम्पत्याने समाजोपयोगी विविध उपक्रम राबवले. गेल्या काही दिवसांपासून रजनी आजारी होत्या. लोणावळ्याच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चतुरस्र व्यक्तिमत्त्व

रजनी
Read 6 tweets
Jul 19
#CinemaGully
#सिनेमा_पर्व
#o2
O² (ऑक्सिजन)

आजच हॉटस्टार वर तमिळ थ्रिलर O2 हा चित्रपट पाहिला... दिवसेंदिवस हिंदी फिल्म इंडस्ट्री पेक्षा बाकीच्या फिल्म इंडस्ट्री आपली वेगळी ओळख निर्माण करताहेत...
Rather, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमुळे त्या दबून राहिल्या होत्या ज्या आज हिंदीच्या फोलपणामुळे पुढे आल्या... कदाचित पुढे भविष्यात हिंदी फिल्म इंडस्ट्री पुन्हा उभी राहील, पण सध्या तरी इतर भाषिक फिल्म इंडस्ट्री आपल्याला एंटरटेन करायला मागे पडत नाहीय हेच खरं....
तर, आज सकाळी कॉफी विथ करन शोचा दुसरा एपिसोड download करण्यासाठी मी मोबाइल उघडला, (हो.. controversy gains more TRP ह्याला मीही बळी पडलोय...😑) तर recommendation मध्ये हा चित्रपट दिसला... ट्रेलर पाहून लगेच चित्रपट डाऊनलोड ला टाकला
Read 14 tweets
Jul 17
मोदी...
सोडत नाहीत, करण्यास बाध्य करतात....

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी वरून तोंडावर पडलेल्या सूत्रांनी स्वतःला सावरून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या नावांचे पतंग उडवले होते. पुरोगामी-सेक्युलर सूत्रांना अश्या नियुक्त्या
जात-पंथ-भाषा यावरून करण्यात लिबरल समाधान मिळत असते. अश्या संवैधानिक पदाच्या निवडीची चर्चा ही निवड करतानाची राजकीय स्थिती, सत्तारूढ पक्षाची स्थिती, घडून गेलेली एखादी मोठी घटना, आगामी काळातील संभाव्य घटना, पक्षांतर्गत समतोल, एखाद्याची सोय यातून करण्याची
सवय ही काँग्रेसची कार्यपद्धती होती. सूत्रांना अंदाज बांधताना हीच पद्धत सोईची वाटत आहे. यालाच शोध पत्रकारिता असे सध्या म्हटले जात आहे. काही चालवलेल्या नावांपैकी एका नाव नक्की होते. त्यामुळे सूत्र कॉलर ताठ करून फिरण्यास मोकळे होतात. आम्ही सांगितले होते असे सांगत सुटतात.
Read 14 tweets
Jul 11
ऐन बंडात, अर्ध्या रात्री.......

हॉटेलच्या आवारात सामसूम होती. सगळे वाघ डाराडूर झोपले होते. त्यांच्या गुरगुरण्याचा आवाज शांत झाला होता. सगळ्या वाघांचा राजा असलेला, ढाण्या वाघासारखा
दिसणारा तो दाढीधारी हळूच आपल्या रूममधून बाहेर पडला. त्याने चष्मा सारखा केला. एका हाताने दाढीला ताव दिला आणि (वाघ असला, तरी) मांजरीच्या पावलांनी तो हळूच बाहेर पडला.बाहेर रिक्षा त्याला न्यायला सज्ज होतीच.
आधी स्वतःच ती चालवावी, असा मोह त्याला झाला. पण मर्सिडीजपेक्षा आपली रिक्षा वेगवान आहे, हे दाखवण्याची ही वेळ नाही, ती नंतर येणार आहे, याची त्याला कल्पना होती. आवाजही न करता तो रिक्षात बसला आणि त्यानं रिक्षावाल्याला खूण केली.``अरे, दातेसाहेब, तुम्ही?``
Read 18 tweets
Jul 9
#CinemaGully
#सिनेमा_पर्व
#CBI_5_The_Brain

काल पाहिलेला #मामूटी अभिनीत साऊथ कडील आणखी एक उत्कृष्ट सिनेमा. एका मंत्र्याच्या मृत्यूपासून सुरवात होते . मंत्र्याचे दिल्लीवरून परत येताना त्यांचा हार्ट
अटॅअने मृत्यू होतो . त्यानंतर त्यांचा असिस्टंट गायब होतो . त्या सोबत मंत्र्याच्या मृत्यूवर संशय घेतल्याने मारला गेलेला फ्री लान्स पत्रकार . त्यांनतर त्या पत्रकाराच्या मृत्यू मागील कारण शोधत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या होते
आणि एका दोन नंबर करण्याला अटक करतात त्यानंतर हे प्रकरण CBI कडे सोपविण्याची मागणी होते त्यानुसार CBI ची एन्ट्री होते .

त्यानंतर सुरू होतो खेळ कारण यात जे समोर दिसते तसे काहीच नसते जसे ज्या पोलीस अधिकाऱ्याकडून केस CBI
Read 8 tweets
Jul 6
#CinemaGully
#सिनेमा_पर्व
रॉकेट्री द नंबी इफेक्ट

शब्दांच्या पलीकडचे आहे हे सगळं... एखादा क्षण...एखादा सिन चुकवणे म्हणजे महत्प्रपाप म्हणावं एवढं सुंदर मांडले आहे आर माधवनने आणि ह्या सगळ्यांचे रचयिते आहेत ते म्हणजे...नंबी नारायणन.
खरंच खेदाने मान्य करतो की मंगळयान, पद्मभूषण आणि त्यांनंतर चित्रपटाच्या निमित्ताने...ह्याव्यतिरिक्त ह्या महान व्यक्तीविषयी काहीच माहिती नव्हती...कदाचित जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांना तेवढे समोरच आणले गेले नाही जेणेकरून सर्वांपर्यंत पोचवेत... विक्रम साराभाई, अब्दुल
कलाम ह्यांच्यासोबतच घडलेलं हे व्यक्तिमत्त्व...ज्याने देशाचे नाव उंचावण्यासाठी ज्या सुखाचा त्याग केलाय त्यासमोर नतमस्तक होण्यापलीकडे काहीच नाहीये आपल्याकडे...पाच वर्षात संपूर्ण कुटुंब कमावेल एवढा पगार एका महिन्याला देण्याची ऑफर धुडकवणारा निव्वळ
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(