चिंतामणी 🇮🇳 Profile picture
परमवैभवंनेतुमेतत्स्वराष्ट्रम्...!🚩🇮🇳🙏 भारतीय, #देशभक्त, कट्टर हिंदू जय श्रीराम
Feb 27, 2023 35 tweets 9 min read
मराठी भयकथा ☠:
# अपराधी भाग १

घर म्हणजे चार भिंती नाही, ते असता निवारा आपुलकी जपणारा आपल्या सुख आणि दुःखच साक्षीदार पण काय होईल जेव्हा राहता घर बनेल मृत्यचा सापळा. हिवाळ्याचे दिवस होते, खुप थंडी आणि धुकं पसरला होता. रात्रीचा वेळी थंडी अधिक जाणवत होती.त्या अंधाऱ्या रात्री मध्ये एका पुरुषाची किंकाळी घुमते. हॅलो समर्थ नगर पोलीस स्टेशन, सब इन्स्पेक्टर जगदाळे बोलतो आहे. काय? पत्ता सांगा ठीक आहे. तिकडे कोणी कशाला हात लावू नका. आम्ही पोचतोच
Nov 25, 2022 6 tweets 2 min read
स. न. वि. वि.

काळजावर दगड ठेवून हे पत्र लिहीत आहे. गेले काही दिवस मी गुपचूप निरीक्षण केलंय. तुम्हाला माझा कंटाळा आलाय. माझ्यापासून सुटका व्हावी म्हणून तुम्ही अनेक परक्यांशी सल्लामसलत करताहात. मला कायमची घालवण्याचे बेत रचताहात. तुमच्या चोरून चाललेल्या हालचाली मला समजत नाहीत असं का वाटतं तुम्हाला?

पंचवीस - तीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवतात? आपली ओळखदेख नव्हती. पण तुम्हाला नोकरी लागली. तुमच्या आईवडिलांनी तुमचे दोनाचे चार हात केले. संसार सुरु झाला. आणि अवघ्या दीड दोन वर्षात ती जादू झाली. कधीही कुठेही आपण फिरायला गेलो आणि तुमचे मित्र, नातलग भेटले की
Sep 3, 2022 24 tweets 8 min read
गणेशोत्सवाच्या निमित्ताने बरीच मंडळी पर्बोधनकार आजोबांच्या पोस्ट्स घेऊन आभाळ हेपलत आहेत अश्या समस्त मंडळींना उत्तर..

गणपती चौसष्ट कलांमध्ये निपुण आहे. या चौसष्ट कला कोणत्या ? चौसष्ट कला पुढीलप्रमाणे.
१. पानक रस तथा रागासव योजना – मदिरा व पेय तयार करणे.
२. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.
३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४. आकर ज्ञान – खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
Sep 3, 2022 4 tweets 2 min read
*2 सप्टेंबर* च्या मध्यरात्री सर्व राक्षस लोकांची Emergency मिटींग झाली आणि आपल्यातला एक जण पृथ्वीवर जाणार असं ठराव संमत झाला.
मग काय *3 सप्टेंबर* ला पृथ्वीवर विजेचा⛈⛈कडकडाट झाला, सुनामीआली ,१० १२ जण मेले आणि निसर्गाची बरीच हानी झाली.
आफ्रिकेत ‍‍‍जन्म घेता घेता ऐन टाईमला महाराष्ट्रातील *बारामती* येथे भाऊंचा जन्म झाला.
जन्मा पासूनच फोटो काढण्याचा ♀‍♀ शोकीन असलेले, जन्मल्या जन्मल्या नर्स जवळचा मोबाईल घेऊन सेल्फि काढणारे.

कोणी सेल्फी काढत असला कि वेड वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या
Aug 21, 2022 9 tweets 5 min read
#CinemaGully

Guns Of Nevarone

जर्मन फौजांनी एजियन समुद्राच्या तोंडावर, नेव्हरॉन बेटावर दोन अत्याधुनिक, अजस्त्र, महाकाय तोफा वसवल्या होत्या ज्या समोर येणाऱ्या दोस्त राष्ट्रांच्या प्रत्येक युद्धनौकेचा घास गिळत होत्या.
त्यातच जवळच्या बेटावर असलेल्या दोस्त राष्ट्रांच्या २००० सैन्यावर हल्ला करण्याचे जर्मन फौजांचे बेत सुरू होते. दोस्त राष्ट्रांच्या विमानदलाने ह्या घातकी तोफांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण त्यात हल्ला करणारी विमानेच गमावली.
अश्या बिकट परिस्थितीत जर त्या तोफा निकामी केल्या तर २००० सैनिकांना कुमक पोहोचवली जाईल आणि अशी परिस्थिती निर्माण
Aug 20, 2022 6 tweets 2 min read
#CinemaGully
#remake
#bollywood

रिमेकचं भूत
जेव्हा मी लहान होतो, तेव्हा आमिर खानचा 'गजनी', सलमानचा 'वॉन्टेड' आणि अक्षय कुमारचा 'रावडी राठोड' आला होता. त्या काळात रिमेक म्हणजे काय हे कितीतरी लोकांच्या गावी नव्हतं. त्यामुळे सीन टू सीन कॉपी केलेला चित्रपट आम्ही बघायचो आणि अचंबित व्हायचो. त्या चित्रपटांनी जवळपास 100 करोड गल्ला जमवला. ही झाली 2011-12 पर्यंतची गोष्ट. नंतरसुद्धा हॉलिडे सारखे चित्रपट रिमेक होऊन येतच होते. हिटसुद्धा व्हायचे.
गोष्ट अशी झाली,की त्यानंतर भारतात OTT ने जम बसवला. Youtube तर होतंच. डब मूवी च्या
Aug 19, 2022 5 tweets 2 min read
#स्टोव्ह

स्टोव्ह मध्ये राॅकेल भरायला नरसाळे, पत्र्याची नळी असलेला पंप,पुढे काही वर्षांनी प्लॅस्टिकचा फुग्याचा व काॅक असलेला पंप आल्यावरचा आनंद विसरणे शक्य आहे का?

जमिनीवर थोडेफार सांडलेल्या राॅकेलचा वास अजूनही चांगला आठवतो आहे.

स्वयंपाक करताना अन्नाला राॅकेलचा वास येऊ नये Image म्हणून घेतलेली काळजी..

आईचे आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे, हे आता जाणवते.

स्टोव्ह पेटवण्यासाठी काकडा व तो बुडवण्यासाठी "बिटको काला दंत मंजन" च्या छोट्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बाटलीत राॅकेल भरून ठेवायचे.

काडेपेटी व ती ठेवण्यासाठी हिंगाची रिकामी झालेली पत्र्याची डबी असा
Aug 12, 2022 15 tweets 7 min read
इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा

राजा परीक्षिताचा जीव तक्षकाने घेतला आणि मग सर्पनाशक यज्ञ पेटवून जनमेजयाने सर्प मेध आरंभला. जनमेजयाच्या अफाट सामर्थ्याची इंद्राला आधीच भीती होती आणि तक्षकाच्या मृत्युनंतर तो अधिकच शक्तिशाली होणार ही सार्थ भीती सुद्धा त्याला होती. त्यातच तक्षक इंद्राच्या दरबारात दाखल झाला आणि पूर्वपुण्याईचा हवाला देत त्याने तमाम सर्प कुळाचा कुलच्छेद वाचवण्याची विनंती केली. इंद्राने दूरगामी विचार करून तक्षकाला अभय दिले आणि स्वर्गलोकात स्थान सुद्धा दिले. इकडे संतापाने बेभान झालेल्या जनमेजयाने ते सुप्रसिद्ध शब्द उच्चारले. “इंद्राय स्वाहा
Jul 23, 2022 6 tweets 2 min read
कॅम्लिनच्या रजनी दांडेकर यांचे निधन

चित्रकलेसाठी लागणाऱ्या रंगांबरोबरच शालेय साहित्याच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या कॅम्लिन या प्रख्यात कंपनीच्या मार्केटिंग विभागाच्या प्रमुख, सुभाष दांडेकर यांच्या पत्नी रजनी दांडेकर (वय ८०) यांचे गुरुवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती सुभाष दांडेकर, मुलगा आशिष, मुलगी अनघा असा परिवार आहे.

अनेक चित्रकार, चित्रकला शिक्षक, कलावंत आणि विद्यार्थी यांना प्रोत्साहन देत दांडेकर कुटुंबीयांनी कॅम्लिन व चित्रकला उद्योगाला चालना
Jul 19, 2022 14 tweets 7 min read
#CinemaGully
#सिनेमा_पर्व
#o2
O² (ऑक्सिजन)

आजच हॉटस्टार वर तमिळ थ्रिलर O2 हा चित्रपट पाहिला... दिवसेंदिवस हिंदी फिल्म इंडस्ट्री पेक्षा बाकीच्या फिल्म इंडस्ट्री आपली वेगळी ओळख निर्माण करताहेत... Rather, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमुळे त्या दबून राहिल्या होत्या ज्या आज हिंदीच्या फोलपणामुळे पुढे आल्या... कदाचित पुढे भविष्यात हिंदी फिल्म इंडस्ट्री पुन्हा उभी राहील, पण सध्या तरी इतर भाषिक फिल्म इंडस्ट्री आपल्याला एंटरटेन करायला मागे पडत नाहीय हेच खरं....
Jul 17, 2022 14 tweets 6 min read
मोदी...
सोडत नाहीत, करण्यास बाध्य करतात....

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी वरून तोंडावर पडलेल्या सूत्रांनी स्वतःला सावरून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या नावांचे पतंग उडवले होते. पुरोगामी-सेक्युलर सूत्रांना अश्या नियुक्त्या जात-पंथ-भाषा यावरून करण्यात लिबरल समाधान मिळत असते. अश्या संवैधानिक पदाच्या निवडीची चर्चा ही निवड करतानाची राजकीय स्थिती, सत्तारूढ पक्षाची स्थिती, घडून गेलेली एखादी मोठी घटना, आगामी काळातील संभाव्य घटना, पक्षांतर्गत समतोल, एखाद्याची सोय यातून करण्याची
Jul 11, 2022 18 tweets 3 min read
ऐन बंडात, अर्ध्या रात्री.......

हॉटेलच्या आवारात सामसूम होती. सगळे वाघ डाराडूर झोपले होते. त्यांच्या गुरगुरण्याचा आवाज शांत झाला होता. सगळ्या वाघांचा राजा असलेला, ढाण्या वाघासारखा दिसणारा तो दाढीधारी हळूच आपल्या रूममधून बाहेर पडला. त्याने चष्मा सारखा केला. एका हाताने दाढीला ताव दिला आणि (वाघ असला, तरी) मांजरीच्या पावलांनी तो हळूच बाहेर पडला.बाहेर रिक्षा त्याला न्यायला सज्ज होतीच.
Jul 9, 2022 8 tweets 6 min read
#CinemaGully
#सिनेमा_पर्व
#CBI_5_The_Brain

काल पाहिलेला #मामूटी अभिनीत साऊथ कडील आणखी एक उत्कृष्ट सिनेमा. एका मंत्र्याच्या मृत्यूपासून सुरवात होते . मंत्र्याचे दिल्लीवरून परत येताना त्यांचा हार्ट अटॅअने मृत्यू होतो . त्यानंतर त्यांचा असिस्टंट गायब होतो . त्या सोबत मंत्र्याच्या मृत्यूवर संशय घेतल्याने मारला गेलेला फ्री लान्स पत्रकार . त्यांनतर त्या पत्रकाराच्या मृत्यू मागील कारण शोधत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या होते
Jul 6, 2022 16 tweets 7 min read
#CinemaGully
#सिनेमा_पर्व
रॉकेट्री द नंबी इफेक्ट

शब्दांच्या पलीकडचे आहे हे सगळं... एखादा क्षण...एखादा सिन चुकवणे म्हणजे महत्प्रपाप म्हणावं एवढं सुंदर मांडले आहे आर माधवनने आणि ह्या सगळ्यांचे रचयिते आहेत ते म्हणजे...नंबी नारायणन. खरंच खेदाने मान्य करतो की मंगळयान, पद्मभूषण आणि त्यांनंतर चित्रपटाच्या निमित्ताने...ह्याव्यतिरिक्त ह्या महान व्यक्तीविषयी काहीच माहिती नव्हती...कदाचित जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांना तेवढे समोरच आणले गेले नाही जेणेकरून सर्वांपर्यंत पोचवेत... विक्रम साराभाई, अब्दुल
Jun 2, 2022 15 tweets 6 min read
नॅशनल हेराल्ड..नक्की काय प्रकरण आहे ?
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ही कंपनी नॅशनल हेराल्ड चालवत असे. पेपर २००८ साली बंद पडला. काँग्रेसने एजेएलला एकूण ९०.२५ कोटी इतके बिनव्याजी कर्ज दिले होते. त्यावर्षी तिच्या मालकीची स्थावर मालमत्ता सुमारे २००० कोटी रुपये इतक्या बाजारमूल्याची होती !! आणि त्यासमोर काँग्रेसने दिलेले ९०.२५ कोटी रुपये कर्ज होते. म्हणजे उरलेल्यावर फक्त आणि फक्त एजेएलच्या मूळ भागधारकांचा हक्क होता.
May 26, 2022 6 tweets 4 min read
राहुल गांधी 'India at 75' या विषयावर बोलायला केंब्रिजला जाणार अशा बातम्या पेरून काँग्रेस इकोसिस्टिमने अशी हवा निर्माण केली आहे की जणू राहुलबाबाला केंब्रिज विद्यापीठानेच व्याख्यानाचे आमंत्रण दिले आहे.

हे वाचून आश्चर्याचा धक्का बसलेल्यांसाठी एक स्पष्टीकरण. हा कार्यक्रम 'ब्रिज इंडिया' या वेबसाईटने आयोजित केलेला असून त्याचा केंब्रिज विद्यापीठाशी कसलाही संबंध नाही.

ब्रिज इंडिया हे काँग्रेस इकोसिस्टिमचेच एक पिल्लू आहे. या इव्हेंटसाठी त्यांनी पप्पूबरोबरच सलमान खुर्शीद, तेजस्वी यादव, महुआ मोईत्रा, सीताराम येचुरी... असा नेहमीचाच दरबारी गोतावळा जमा
May 20, 2022 17 tweets 6 min read
एक वेगळा विषय मांडतोय..🙏

#वांझ_स्त्री
वांझ असणं खरच खूप वाईट आहे
आज सहज एका व्यावसायिक मित्राकडे कामानिमित्त गेलो होतो.त्याला अपत्य नाहीये अन् त्याच खापर फुटत ते बाईवरच अमाप पैसा अडका गडगंज संपती आणि विशेष म्हणजे सर्व घर सुशिक्षित तरीही इतर लोकांनी बोललेल्या वाक्यात त्या स्त्रीच्या भावना जाणवल्या म्हणून पोस्ट प्रपंच.
वांझ निपुत्रीक वंशाला दिवा नाही वंश खंड आहे हिचा तोंड पाहु नये पांढरतोडीचं,पांढरी पाल लेकरूबाळ
Apr 8, 2022 29 tweets 9 min read
हा हुंकार हिंदुत्वाचा आहे..!
- प्रशांत पोळ

गेल्या एक – दीड महिन्यात अनेक घटना फार वेगाने घडलेल्या आहेत. महाबलाढ्य रशिया ने युक्रेन वर आक्रमण केले. साधारण दोन – चार दिवसात युक्रेन चा पूर्ण पाडाव होईल हेच सर्वांचे भाकीत होते. मात्र तसे झाले नाही. नाटो देश आणि अमेरिका यांनी प्रत्यक्ष मैदानातून माघार घेऊनही युक्रेन सारखा लहानसा देश, आज सदोतीस दिवस झाले तरी चिवटपणाने झुंजतोय. लढतोय. ह्या दरम्यान दोन गोष्टी घडल्या. एक – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि दोन – दिनांक ११ मार्च ला ‘द कश्मीर
Apr 5, 2022 13 tweets 6 min read
राज ठाकरे, मशिदीवरील भोंगे आणि आपण.

राज ठाकरे यांच्याकडे काय पर्याय उपलब्ध होते ?

१) त्यांचा एक आमदार आहे. तो विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा सुस्पष्ट निर्णय आहे आणि त्याचे राज्य सरकारने पालन केले पाहिजे. जर हा हक्कभंग प्रस्ताव सरकारने बहुमतावर रेटून नेला तर याविरुद्ध ते राज्यपालांना ज्ञापन देऊ शकत होते. मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ शकत होते.

२) हे पण जर साधले नसते तर ते सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू शकत होते.

३) हे सुद्धा जमले नसते तर ते या विषयावर आंदोलन पुकारू शकले असते.

परंतु हे सर्व पर्याय नाकारून ते
Mar 30, 2022 13 tweets 6 min read
#विलिक्षण_निरीक्षण या ग्रंथातून साभार प्रस्तुत

नास्तिक मेळावा कार्यक्रम पत्रिका

सत्र पहिले : (दिवा विझवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाईल.)

अ) प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व उपस्थितांना हळदी म्हणून गुद्दा व कुंकू म्हणून बुक्का प्रदान करण्यात येईल ब) नास्तिकांच्या जाहिरनाम्याचे सामूहिक रुदन
क) एकमेकांच्या फेक अकाउंटचा परिचय (व गरज भासल्यास वाभाडे)

साडे नऊ वाजता : अल्पोपहार- चहा पाव ( प्रायोजक -फादर दिब्रिटो )
Mar 20, 2022 31 tweets 8 min read
हिरव्या शिवसेनेचा होणार लवकरच पालापाचोळा !!!
अनंत सामंत या जेष्ठ पञकारांनी संजय राऊतांवर लिहिलेला हा लेख म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाची मनातील सलच आहे. 👇👇 सूचना: संजय राऊत "यांच्या महाराष्ट्रात" त्यांच्या विचाराच्या शिवसेनेचे कोणी कट्टर समर्थक असतील त्यांनी या लेखावर जरूर व्यक्त होण्याची हिंमत करावी. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्चा शिवसैनिकांच्या दुःख आणि वेदनात मात्र आम्हीही सहमत आहोत. अगदी मनापासून!!