#टोमणात्मक_थोडसं

तर "दे दी हमे आजादी, बिना खड्ग बिना ढाल."
या गाण्यावरून आम्हाला कळलं की भारतात अपूर्व अशी रक्तहीन क्रांती झाली आणि भारत "लगेच" स्वतंत्र झाला

नंतर असं पण कळलं की

तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, कुंवर सिंह हे १८५७ चं बंड एका न्यूज चॅनलकडून न्युज
कव्हर करायला गेले होते, लढायला नव्हे.

तीनही चापेकर बंधू आणि महादेव विनायक रानडे राणीच्या राज्यारोहण वाढदिवस समारंभात फॅन्सी फटाके चोरायला गेले होते.

विनायक दामोदर सावरकर, सेनापती बापट, श्यामजी कृष्ण वर्मा, मॅडम भिकाजी कामा, व्ही. व्ही. एस. अय्यर हे खासगी ट्रॅव्हल कंपनीकडून
ग्रुप डिस्काउंटवर युरोप टूरला गेले होते.
मदनलाल धिंग्रा कर्झन वायलीबरोबर कानगोष्टी खेळत होते आणि त्या सहन न झाल्याने वायलीने स्वतःच पिस्तुल काढून आत्महत्या केली.
रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान, ठाकूर रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी हे सगळे गम्मत म्हणून काकोरीला रेल्वे कशी असते
ते पाहायला गेले होते. सुर्यसेन, गणेश घोष, लोकेनाथ बाल, अंबिका चक्रवर्ती, हरिगोपाल बाल (तेग्रा), अनंत सिंह, आनंद प्रसाद गुप्ता, त्रिपुरा सेन, बिधुभूषण भट्टाचार्य, प्रीतिलता वड्डेदार, कल्पना दत्त, हिमांशु सेन, बिनोद बिहारी चौधरी, सुबोध रॉय आणि मोनोरंजन भट्टाचार्य हे सगळे
तेव्हाच्या बंगालमधील चितगावमध्ये पोलीस स्टेशनसमोरच्या मैदानात "डोंगराला आग लागली पळा पळा" खेळत होते.
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि इतर क्रांतिकारक आफ्रिकेतील परदेशी पाहुण्यांच्या वयाहून अगदीच लहान असल्याने खेळण्यांच्या दुकानातून पिस्तुलं घेऊन टिकल्या आणि रोल उडवत होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे जपानी आणि जर्मन भाषेत करियर करायच्या विचारात जपान आणि जर्मनीला जाऊन मुलाखती देत होते. तिथं काही होईना म्हणून मग सगळं सोडून अंदमानला आले, ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये पडले, प्रचंड स्टाफ उभा केला आणि व्यवसाय उत्तम चालावा म्हणून अंदमान आणि निकोबारला "स्वराज्य
आणि शहीद" अशी नावं देऊन टाकली, आणि बाकीचे लाखो वाट चुकलेले तरुण पण असेच फालतू उद्योग करत होते.

आणि मग काय झालं!!!!!

मग एक दिवस एक मानवतावादी आणि मनाने तरुण माणूस उठला. इंग्रजांसमोर जाऊन उभा राहिला आणि "चला फुटा इथून" असं हिंदीत म्हणला. मग मात्र त्या गोऱ्या लोकांची जी काही
हालत झाली ती काही विचारू नका हो
त्या गोऱ्या लोकांना त्यांचं सामान आवरायला पुढची पाच वर्षे लागली आणि जमेल तिथून, जमेल तसं, लपत छपत ते साधे ब्रिटिश लोक घाबरून भारतातून निघून गेले.
.
.
.
केवळ या एका डरकाळीमुळे आज आपण हा स्वतंत्र भारत पाहू शकतो.

©श्रेयस नाखरे Shreyas Nakhare साभार

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Barty Croutch Junior

Barty Croutch Junior Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @BartyCroutch

Aug 16
#थोडसंदेशाबद्दल

पहा काळ्या पाण्याची शिक्षा झालेले किती लोक आहेत.

मित्रांनो,आपण यांना ओळखता का..?

*१. स्वातंत्र्यवीर अण्णाजी,*
*२. स्वातंत्र्यवीर भिमाजी*
*३. स्वातंत्र्यवीर बागल यदु पाटील*
*४. स्वातंत्र्यवीर भीमराव*
*५. स्वातंत्र्यवीर आत्माराम सन्तु भोसले*
*६. स्वातंत्र्यवीर बाबाजी भुजंग भोसले*
*७. स्वातंत्र्यवीर राजू खंडू भोसले*
*८. स्वातंत्र्यवीर रघु मानाजी भोसले*
*९. स्वातंत्र्यवीर विठू हंगू भोसले*
*१०. स्वातंत्र्यवीर व्याकात्राव भोसले*
*११. स्वातंत्र्यवीर बिरबत कुणबी*
*१२. स्वातंत्र्यवीर अन्न नाथु*
*१३. स्वातंत्र्यवीर बाळकृष्ण*
*१४. स्वातंत्र्यवीर बारकू*
*१५. स्वातंत्र्यवीर भीमा*
*१६. स्वातंत्र्यवीर गानू बापू चव्हाण*
*१७. स्वातंत्र्यवीर कृष्णाप्पा गोपाल चव्हाण*
*१८. स्वातंत्र्यवीर महादेव चव्हाण*
*१९. स्वातंत्र्यवीर दामोदर आबाजी*
*२०. स्वातंत्र्यवीर दत्तू नथु*
Read 21 tweets
Jun 2
अदभूत कथा रहस्य
कृपया न चुकता वाचा 🙏🏻🙏🏻

भारतात चोरीमुळे प्रसिद्ध झालेले एक प्राचीन मंदिर आहे. अलीकडच्या इतिहासात चार वेळा, चोरांनी मंदिराची मूर्ती चोरली पण ती परत केली कारण ते त्यासोबत फार दूर जाऊ शकत नव्हते.

त्यांनी दिलेल्या कारणांमुळे कथा आणखीनच वेधक बनवतात.
मृदंग सैलेश्वरी मंदिर हे केरळ राज्याच्या दक्षिणेकडील मुझाकुन्नू - कन्नूर जिल्ह्यात स्थित एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर परशुराम ऋषींनी स्थापन केलेल्या 108 मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराला “मृदंग सैलेश्वरी” असे नाव पडण्यामागे एक कथा आहे. मृदुंग हे प्राचीन भारतातील तालवाद्य आहे.
प्राचीन हिंदू शिल्पकलेमध्ये, मृदंग हे अनेकदा गणेश आणि नंदी, शिवाचे वाहन आणि अनुयायी या हिंदू देवतांच्या निवडीचे साधन म्हणून चित्रित केले जाते. मृदंग हे देव वाद्य किंवा देवांचे वाद्य म्हणूनही ओळखले जाते. असे मानले जाते की या ठिकाणी स्वर्गातून मृदंगाच्या आकारातील खडकाचा तुकडा,
Read 19 tweets
Mar 27
डचांनी एवढी लांबलचक जहाजे कशी बांधली? ही नाविक पॉवर कशी काय बनली याची उत्सुकता फार होती. मुद्दामहुन वर्किंग विंड-मिल पाहिली. एका चर्च चे "पास्टर" यांच्याशी बोललो, व विंडमिल च्या इंजिनीयर या दोघांकडूनही ही प्रक्रिया समजून घेतली. दोन वाक्यात सांगायचे झाले तर
१३ व्या १४ व्या शतकामध्ये डच या व्यापारी देशांच्या लोकांना "ओक" च्या लाकडाचे काही गुणधर्म कळले. हे लाकूड गोड्या पाण्यामध्ये अनेक दिवस भिजत ठेवले तर त्याच्यामध्ये काही केमिकल बदल होतात. संजूबाबाच्या भाषेत बोलायचे झाले तर "लाकडात पाण्यामुळे काही केमिकल लोचा होतो"
त्यामुळे असे लाकूड जास्त स्ट्रॉंग राहते. जास्त लांबलचक त्याची linear स्ट्रेंथ राहते, शिवाय त्याचे Horizontal वेगवेगळ्या आकाराचे तुकडे करणे व ते विशिष्ट पद्धतीने कापणे हे सहज शक्य होतं. नेदरलॅंड्स भाग हा भारतातील बंगाल किंवा महाराष्ट्रातील अलिबाग जिथे भरपूर पाणी आहे,
Read 19 tweets
Mar 25
"पेडगावचे शहाणे."
बऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे, असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का? की पेडगावच का? दुसरे कुठले गाव का नाही? पाहुया तर मग :-

६ जून १६७४ ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्यासाठी एकूण साधारण १ कोटी
रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला? त्याची ही गमतीशीर हकीगत आणि गनिमी काव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण :-

अहमदनगर जिल्ह्यात 'पेडगाव' नावाचं एक गाव आहे. तिथे बहादुरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की
२०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत आणि त्यांच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि
Read 13 tweets
Mar 17
*अरविंद केजरीवाल आणि कंपनी*

*भारताचे सार्वभौमत्व संपवण्यासाठी राजकारणात प्लांट केलेली माणसे*

अरविंद केजरीवाल दिल्लीचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. आज भारतात या माणसाला ओळखत नाही असा कोणीही नसेल. पण मला आपल्याला 2006 या काळात घेऊन जायचे आहे.
आपल्यापैकी किती जणांनी अरविंद
केजरीवाल हे नाव 2006 साली ऐकलं होतं? कोणीच नसेल, मला तरी अजिबात माहीत नव्हते. पण या माणसाला 2006 साली *रोमन मॅगसेसे अवॉर्ड* होता. आता आपण म्हणाल की असे किती तरी समाजसेवक आपल्याला माहीत पण नसतात, पण त्यांना अवॉर्ड मिळाल्यावर ते आपल्याला समजतात. पण हा रोमन मॅगसेसे अवॉर्ड या
केजरीवालला कशासाठी मिळाला हे तुम्हाला माहिताय का? आता हे जेव्हा तुम्हाला समजेल तेंव्हा तुमच्या पायाखालची जमीन पहिल्यांदा सरकेल. या केजरीवालला अवॉर्ड "Emerging Leadership in india" या साठी मिळाला होता. लागला का पहिला शॉक? ज्या माणसाला आपण ओळखत पण नाही त्याला लिडरशीपसाठी
Read 22 tweets
Mar 6
साडेतीनशे वर्षांपूर्वी गुप्त संकेतांचा वापर करून, श्री शिवाजी महाराजांवर विजापूरचा अफझलखान आक्रमण करण्यास निघाल्याची सूचना महाराजांना देणारे, हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे पत्र. प्रत्येक ओळीचे आद्याक्षर क्रमाने वाचत गेले तर त्याचा पुढील अर्थ निघतो.
‘विजापुरचा सरदार निघाला आहे’ असा स्पष्ट संदेश त्यात दिलेला दिसतोय.

विवेके करावे कार्यसाधन ।
जाणार नरतनु हे जाणून ।

पुढील भविष्यार्थी मन ।
रहाटोचिं नये ॥१॥

चालो नये असन्मार्गी ।
सत्यता बाणल्या अंगी ।

रघुवीरकृपा ते प्रसंगी ।
दासामहात्म्य वाढवी ॥२॥
रजनीनाथ आणि दिनकर ।
नित्यनेमे करिती संचार ।

घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदीशे ॥३॥

आदिमाया मूळ भवानी ।
हेचि जगाची स्वामिनी ।

एकांती विवंचना करोनी ।
इष्ट योजना करावी ॥४॥

या खुणांमधल्या प्रत्येक वाक्याचे पहिले अक्षर लिहा. आणि वाचा.
सर्वात शेवटची ओळ म्हणजे सल्ला...
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(