Barty Croutch Junior Profile picture
|| Parody Account || Dabbling in Dark Magic ||
Nov 9, 2022 14 tweets 8 min read
लोणार सरोवराच्या बाजूचे विस्मयकारी रामाचे मंदीर.
लोणार सरोवराच्या पाण्यापाशी जाताना उंचावरून एका पायवाटेने खाली उतरत यावं लागतं. हा रस्ता नागमोडी वळणाचा आणि जंगलातून जाणारा आहे. याचं पायवाटेवर जरासं आडवाटने बाजूला काही अंतर चालतं गेलं की डाव्या बाजूला थोडंसं उंचावर हे एक अदभूत आणि खास वैशिष्ट्यपूर्ण असे श्रीरामांचे मंदिर आहे. मोडतोड आणि अत्यंत दुर्लक्षित झालेलं हे मंदिर अजूनही त्याच्या पुराणकालीन वैभवशाली श्रीमंतीची साक्ष देत उभे आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात फक्त श्रीरामांची मूर्ती आहे, सहसा श्रीराम यांची एकटी मूर्ती कधीही नसते,
Sep 23, 2022 21 tweets 8 min read
*साबणाचा पुनर्जन्म*

हॉटेल रूम मध्ये चेक इन केल्यानंतर, बॅग्ज ठेवून आपण सहसा पहिल्यांदा वॉशरूम कडे वळतो. बाथरूम काउंटर पाशी ठेवलेला आकर्षक पॅकिंग मधला साबण वापरतो. प्रत्येक हॉटेल अतिशय चोखंदळपणे साबण, शॅम्पू, त्यांचे पॅकिंग, त्यावरील ब्रॅण्डिंग याकडे लक्ष देऊन निवडत असते. पण हे छोटे आकर्षक साबण पुढे जाऊन त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरते. १-२ दिवस वापरून ग्राहक साबण तसाच ठेवतात (काही ग्राहक घरी नेतातही !) आणि त्या उरलेल्या साबणाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हॉटेल्स कडे येऊन पडते. तुम्ही म्हणाल एका छोट्याश्या साबणाला इतकं काय महत्व द्यायचं ?
Sep 7, 2022 8 tweets 2 min read
एक कडवट सत्य...

एके काळी ३० -३२ वर्षांपुर्वी, आम्ही आई-बाबांचं बोट धरून लालबागचे गणपती पहायला जायचो.
चिंचपोकळी पूल, रंगारी बदक चाळ, तेजूकाया, गरमखाडा, गणेश गल्ली, मार्केटचा गणपती, नरेपार्क, लाल मैदान.. मार्केटच्या गणपतीला बाहेरच्या मैदानात जत्रा भरायची. मग हे माग, ते माग, हट्ट कर. पेटीत पैसे टाका चमत्कार बघा. कांबळी चलत् चित्र प्रदर्शन हे त्यावेळचं मुख्य आकर्षण असायचे. मग बघता-बघता गणपतीचं मार्केटींग सुरु झालं. तो नवसाला पावू लागला, राजा झाला, पेटी मोठी झाली, चमत्कार सुद्धा मोठे झाले. रांग वाढली, भाव वाढला, प्रसिद्धी वाढली, पैसा वाढला, आकर्षण
Aug 17, 2022 10 tweets 8 min read
#टोमणात्मक_थोडसं

तर "दे दी हमे आजादी, बिना खड्ग बिना ढाल."
या गाण्यावरून आम्हाला कळलं की भारतात अपूर्व अशी रक्तहीन क्रांती झाली आणि भारत "लगेच" स्वतंत्र झाला

नंतर असं पण कळलं की

तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, कुंवर सिंह हे १८५७ चं बंड एका न्यूज चॅनलकडून न्युज कव्हर करायला गेले होते, लढायला नव्हे.

तीनही चापेकर बंधू आणि महादेव विनायक रानडे राणीच्या राज्यारोहण वाढदिवस समारंभात फॅन्सी फटाके चोरायला गेले होते.

विनायक दामोदर सावरकर, सेनापती बापट, श्यामजी कृष्ण वर्मा, मॅडम भिकाजी कामा, व्ही. व्ही. एस. अय्यर हे खासगी ट्रॅव्हल कंपनीकडून
Aug 16, 2022 21 tweets 9 min read
#थोडसंदेशाबद्दल

पहा काळ्या पाण्याची शिक्षा झालेले किती लोक आहेत.

मित्रांनो,आपण यांना ओळखता का..?

*१. स्वातंत्र्यवीर अण्णाजी,*
*२. स्वातंत्र्यवीर भिमाजी*
*३. स्वातंत्र्यवीर बागल यदु पाटील*
*४. स्वातंत्र्यवीर भीमराव*
*५. स्वातंत्र्यवीर आत्माराम सन्तु भोसले* *६. स्वातंत्र्यवीर बाबाजी भुजंग भोसले*
*७. स्वातंत्र्यवीर राजू खंडू भोसले*
*८. स्वातंत्र्यवीर रघु मानाजी भोसले*
*९. स्वातंत्र्यवीर विठू हंगू भोसले*
*१०. स्वातंत्र्यवीर व्याकात्राव भोसले*
*११. स्वातंत्र्यवीर बिरबत कुणबी*
*१२. स्वातंत्र्यवीर अन्न नाथु*
Jun 2, 2022 19 tweets 7 min read
अदभूत कथा रहस्य
कृपया न चुकता वाचा 🙏🏻🙏🏻

भारतात चोरीमुळे प्रसिद्ध झालेले एक प्राचीन मंदिर आहे. अलीकडच्या इतिहासात चार वेळा, चोरांनी मंदिराची मूर्ती चोरली पण ती परत केली कारण ते त्यासोबत फार दूर जाऊ शकत नव्हते.

त्यांनी दिलेल्या कारणांमुळे कथा आणखीनच वेधक बनवतात. मृदंग सैलेश्वरी मंदिर हे केरळ राज्याच्या दक्षिणेकडील मुझाकुन्नू - कन्नूर जिल्ह्यात स्थित एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर परशुराम ऋषींनी स्थापन केलेल्या 108 मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराला “मृदंग सैलेश्वरी” असे नाव पडण्यामागे एक कथा आहे. मृदुंग हे प्राचीन भारतातील तालवाद्य आहे.
Mar 27, 2022 19 tweets 7 min read
डचांनी एवढी लांबलचक जहाजे कशी बांधली? ही नाविक पॉवर कशी काय बनली याची उत्सुकता फार होती. मुद्दामहुन वर्किंग विंड-मिल पाहिली. एका चर्च चे "पास्टर" यांच्याशी बोललो, व विंडमिल च्या इंजिनीयर या दोघांकडूनही ही प्रक्रिया समजून घेतली. दोन वाक्यात सांगायचे झाले तर १३ व्या १४ व्या शतकामध्ये डच या व्यापारी देशांच्या लोकांना "ओक" च्या लाकडाचे काही गुणधर्म कळले. हे लाकूड गोड्या पाण्यामध्ये अनेक दिवस भिजत ठेवले तर त्याच्यामध्ये काही केमिकल बदल होतात. संजूबाबाच्या भाषेत बोलायचे झाले तर "लाकडात पाण्यामुळे काही केमिकल लोचा होतो"
Mar 25, 2022 13 tweets 7 min read
"पेडगावचे शहाणे."
बऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे, असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का? की पेडगावच का? दुसरे कुठले गाव का नाही? पाहुया तर मग :-

६ जून १६७४ ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्यासाठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला? त्याची ही गमतीशीर हकीगत आणि गनिमी काव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण :-

अहमदनगर जिल्ह्यात 'पेडगाव' नावाचं एक गाव आहे. तिथे बहादुरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की
Mar 17, 2022 22 tweets 8 min read
*अरविंद केजरीवाल आणि कंपनी*

*भारताचे सार्वभौमत्व संपवण्यासाठी राजकारणात प्लांट केलेली माणसे*

अरविंद केजरीवाल दिल्लीचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. आज भारतात या माणसाला ओळखत नाही असा कोणीही नसेल. पण मला आपल्याला 2006 या काळात घेऊन जायचे आहे.
आपल्यापैकी किती जणांनी अरविंद केजरीवाल हे नाव 2006 साली ऐकलं होतं? कोणीच नसेल, मला तरी अजिबात माहीत नव्हते. पण या माणसाला 2006 साली *रोमन मॅगसेसे अवॉर्ड* होता. आता आपण म्हणाल की असे किती तरी समाजसेवक आपल्याला माहीत पण नसतात, पण त्यांना अवॉर्ड मिळाल्यावर ते आपल्याला समजतात. पण हा रोमन मॅगसेसे अवॉर्ड या
Mar 6, 2022 4 tweets 4 min read
साडेतीनशे वर्षांपूर्वी गुप्त संकेतांचा वापर करून, श्री शिवाजी महाराजांवर विजापूरचा अफझलखान आक्रमण करण्यास निघाल्याची सूचना महाराजांना देणारे, हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे पत्र. प्रत्येक ओळीचे आद्याक्षर क्रमाने वाचत गेले तर त्याचा पुढील अर्थ निघतो. ‘विजापुरचा सरदार निघाला आहे’ असा स्पष्ट संदेश त्यात दिलेला दिसतोय.

विवेके करावे कार्यसाधन ।
जाणार नरतनु हे जाणून ।

पुढील भविष्यार्थी मन ।
रहाटोचिं नये ॥१॥

चालो नये असन्मार्गी ।
सत्यता बाणल्या अंगी ।

रघुवीरकृपा ते प्रसंगी ।
दासामहात्म्य वाढवी ॥२॥
Mar 5, 2022 35 tweets 10 min read
स‌मर्थ रामदास हे महाराजांचे गुरू होते काय, हा गेल्या अनेक वर्षांपासून वादाचा विषय राहिलेला आहे. या वादात स्वाभाविकच दोन पक्ष आहेत. पहिला पक्ष आहे महाराजांची व समर्थांची भेट शके 1571 मध्ये झाली होती असे मानणारांचा, तर दुस-या पक्षाचे म्हणणे आहे, ही भेट शके 1594 मध्ये झाली होती. पक्ष पहिला

पहिल्या पक्षानुसार छत्रपती आणि रामदास स्वामी यांचे अतिशय निकटचे संबंध होते. शिवाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचे जे कार्य हाती घेतले होते, त्यामागील प्रेरणा समर्थांची होती. यास आधार म्हणून शिवाजी महाराजांनी रामदासांना लिहिलेले एक पत्र सादर करण्यात येते.
Mar 3, 2022 11 tweets 6 min read
*मंदिर स्थळांचे रहस्य**❕

🔹तुम्ही अंदाज लावू शकता की या प्रमुख मंदिरांमध्ये काय सामान्य आहे❔:

1. केदारनाथ,
2. कलहष्टी,
3. एकंबरनाथ- कांची,
४. तिरुवनमलाई,
५. तिरुवनाइकावल,
6. चिदंबरम नटराज,
7. रामेश्वरम,
8. कलेश्वरम.

"सर्व शिवमंदिरे आहेत" असे तुमचे उत्तर असेल, तर तुम्ही अंशतः बरोबर आहात. प्रत्यक्षात ही मंदिरे ज्या रेखांशात आहेत.

"ते सर्व 79° रेखांशांमध्ये स्थित आहेत."

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मंदिरांच्या अनेक शेकडो किलोमीटरच्या वास्तुविशारदांनी जीपीएसशिवाय ही अचूक स्थाने कशी तयार केली.
Mar 2, 2022 23 tweets 8 min read
एका भयानक नव्या आजाराचे बळी: तुम्ही-आम्ही.

डॉ. राजस देशपांडे
न्यूरॉलॉजिस्ट
पुणे- मुंबई

ओपीडी च्या दारातून आत येत ती जरा घाईघाईतच, पण दबलेल्या आवाजात म्हणाली "डॉक्टर, माझ्या वडिलांना तपासायला आणलंय, पण ते आत यायच्या आधी मला पाच मिनिट बोलायचंय. चालेल ना?". तिला नमस्कार करून मी खुर्चीवर बसण्यासाठी इशारा केला. एक आवंढा गिळून, खूप विचार करून आल्यासारखी ती बोलायला लागली "डॉक, माझे बाबा खूप ब्रिलिअंट आहेत, त्यांनी आयुष्यभर नुसता भरपूर पैसाच नाही, तर खूप माणसं आणि प्रतिष्ठाही कमावलीय. आमच्यासाठीही खूप केलंय. पण गेल्या काही
Feb 28, 2022 8 tweets 3 min read
अंग्रेजों के कारख़ानों में वो गोली नहीं बनी जो मुझे मार सके, मैं आज़ाद दुनिया में आया था और आज़ाद ही दुनिया से जाऊँगा.!!

#Long_Live_Revolution

परमवीर महानतम बलिदानी भारत माता के सपूतो में एक हुतात्मा श्री चंद्रशेखर आजाद #पंडितजी के बलिदान दिवस पर श्रद्धासुमन पंडित जी के जीवन का अंतिम घटनाक्रम l

साॅंण्डर्स-वध और दिल्ली एसेम्बली बम काण्ड में फाँसी की सजा पाये तीनो क्रान्तिकारियो भगत सिंह, राजगुरु व सुखदेव ने अपील करने से साफ मना कर ही दिया था।
Jan 25, 2022 11 tweets 6 min read
!!!आज काही तरी वेगळं!!!

"सुरीनाम" हा देश कुठे आहे, हे अनेक नाग़रिकांना माहिती नसेल, पण तिथे घडलेल्या सत्तांतरानंतर ह्या देशाबद्दल जाणून घेणं खरंच खूप रसस्पद (इंटरेस्टिंग) आहे!

"सुरीनाम" हा देश दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर, ब्राझील देशाच्या अगदी डोक्यावर आहे! इथे पूर्वी डचांची वसाहत होती! इंग्रज आणि डच यांच्यात झालेल्या करारानुसार शेकडो भारतीयांना इंग्रजांनी सुरीनामला कामगार म्हणून पाठवले! त्यांची गरज संपल्यावर त्यांना २ पर्याय दिले गेले :
१. स्वखर्चावर मायदेशी परतणे;
Jan 9, 2022 23 tweets 8 min read
म्यानमारमध्ये 2,000 वर्षांहून अधिक काळ भारतीय उपस्थित आहेत, परंतु बहुतांश हे 19व्या शतकाच्या मध्यात आले, जेव्हा देशाच्या ब्रिटीश शासकांनी भारताच्या विविध भागांतून लाखो लोकांना सरकार आणि सैन्यात पदे घेण्यासाठी, रस्ते आणि रेल्वेमार्ग बांधण्यासाठी आणले किंवा व्यापार आणि शेतीमध्ये व्यस्त रहाण्यासाठी आणि आज म्यानमारमधील 2.9 दशलक्ष हिंदू देशाच्या ऐतिहासिकदृष्ट्या प्रबळ बौद्धांमध्ये त्यांची ओळख टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत. असेच एक सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र म्हणजे यंगूनमधील श्री काली मंदिर. श्री काली मंदिर यंगूनमध्ये आहे जेथे छोटा किंवा
Dec 30, 2021 14 tweets 8 min read
भुवनेश्वरमध्ये लिंगराज मंदिर हे सर्व मंदिरांपैकी सर्वात प्राचीन आणि सर्वात मोठे मानले जाते. हिंदू धर्माच्या अनुयायांना या मंदिराबद्दल खूप आदर आहे आणि हिंदू लोकांत अत्यंत श्रद्धेने त्यांचा आदर केला जातो. शिवाच्या फालिक स्वरूपात असलेल्या लिंगाचा राजा दर्शविण्यासाठी मंदिराला असे नाव देण्यात आले आहे. हे ज्ञात आहे की 11 व्या शतकात जयपूरच्या राजाने आपली राजधानी बुबनेश्वरा शहरात हलवली तेव्हा त्याने लिंगराज मंदिर बांधण्याचा प्रवास सुरू केला.
तथापि, असे मानले जाते की मंदिराचे काही भाग मूळतः 6 व्या शतकात बांधले गेले होते परंतु त्यांचे नूतनीकरण करण्यात आले
Dec 29, 2021 11 tweets 9 min read
रुद्र महालय मंदिर रुद्रमल हे सरस्वती नदीच्या काठावर आणि गुजरातमधील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असलेल्या सिद्धपूर येथे वसलेले आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि बहुधा चालुक्याच्या काळातील गुजरातचे सर्वात महत्वाचे मंदिर आहे. रुद्र महालयाचे बांधकाम 10 व्या शतकात राजा मूलराजाने सुरू केले आणि सुमारे 12 व्या शतकात राजा जयसिंह सिद्धराजाने पूर्ण केले.
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, रुद्र महालय मंदिरात तीन मजली शिखर, सुमारे 1600 खांब, 12 प्रवेशद्वार, रुंद मध्यवर्ती सभामंडप, तिन्ही बाजूंनी मंडप इत्यादी आहेत. असे मानले जाते की हे मंदिर त्या काळातील
Dec 28, 2021 26 tweets 8 min read
भारतामध्ये शक्ती उपासनेची परंपरा प्राचीन काळापासून शोधली जाऊ शकते. शक्ती ही विश्वाची जननी आहे. शक्तीचे प्रतिनिधित्व करणार्‍या शक्तिशाली देवी मातृकाकडे हस्तांतरित केलेली सर्वोच्च शक्ती आहे, जी नंतर सती किंवा देवी (दुर्गा / पार्वती) च्या विविध नावांनी शक्ती किंवा इतर प्रकृतीमध्ये विकसित झाली आहे. शक्तीची उपासना, एक संपूर्ण भारतीय घटना म्हणून, प्रत्येक प्रकारच्या संस्कृतच्या प्रभावाची पूर्ववर्ती आहे. भारतामध्ये अनेक महत्वाची शाक्त केंद्रे आहेत त्यापैकी ओरिसा हे सर्वात महत्वाचे शक्ती केंद्र मानले जाते आणि गंजम जिल्ह्यातील पुरुषोत्तमपूर जवळ रुषिकुल्या
Dec 26, 2021 10 tweets 6 min read
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. देवीने दिलेल्या आदेशानुसार एका रात्रीत हे मंदिर बांधण्याचा संकल्प पांडवांनी केला होता. त्यानुसार या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. गोवा महामार्गालगत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा भागात प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. या भागाला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना याच भागात अटक करून तुळापूर येथे नेऊन त्यांचा क्रूर हत्या केली. कसबाची अशीच वेगळी ओळख म्हणजे येथील
Dec 23, 2021 13 tweets 5 min read
हिंदू कट्टर का होतो?

कारण प्रबोधनाच्या बुरख्यामागून त्याच्या भावना पायदळी तुडवल्या जातात.

हिंदू इंटॉलरंट का होतो?

कारण विनोदाच्या नावाखाली त्याला विनाकारण डिवचलं जातं.

हिंदू भडकून का उठतो?

कारण- तुम्हाला त्याशिवाय त्याच म्हणण ऐकूच येत नाही! शोले चित्रपटात भगवान शंकराच्या भव्य मूर्तीमागे धर्मेंद्र लपून उभा रहातो. साक्षात शंकरच बोलताहेत अस भासवून हेमामालिनीला "मी तुझ्यासाठी स्थळ शोधलय."म्हणतो, हा प्रसंग आपण सर्वांनी खळखळून हसत बघितला आहे.
हिंदू माणूस असाच आहे. त्याला विनोद म्हणजे काय, सहिष्णुता म्हणजे काय वेगळ सांगाव