बिल्कीसबानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना दयासंदर्भात नवे मुद्दे
-रोहिंग्या निर्वासितांना घरे देण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी घोषणा केल्यानंतर काही तासांत गृहखात्याकडून तसा प्रस्ताव नसल्याचा खुलासा
-बिल्कीसबानो प्रकरणावर मात्र ४८ तास केंद्राचे मौन
-स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कैद्यांच्या सुटकेबाबत केंद्रीय गृह खात्याच्या २२ जूनच्या निर्देशांनुसार, बलात्कारासह १२ घृणास्पद अपराधांमधील दोषींना सवलत न देण्याच्या स्पष्ट सूचना
-गुजरात सरकारने २०१४ च्या ताज्या धोरणाऐवजी १९९२ च्या जुन्या धोरणाचा दोषींना सोडण्यासाठी आधार
२०१४ च्या धोरणानुसार बलात्कार, खून, अन्य घृणास्पद अपराधांच्या कैद्यांना दया देता येत नाही. तथापि, बिल्कीसबानो प्रकरणातील एका अपराध्याने सर्वोच्च न्यायालयात दावा केला की त्यांना शिक्षा सुनावली त्यानंतरचे नव्हे तर आधीचे धाेरण त्यांना लागू होते. गुजरात सरकारकडून त्या मुद्यावर निर्णय
थोडक्यात, केंद्र सरकारची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, आपल्याला घ्यायच्या निर्णयाला अनुकूल असे धोरण-कायदा-नियम हवे तसे वाकवून #BilkisBanoCase मधील अपराधी मोकळे सोडण्यात आले. रोहिंग्यांबद्दल जितकी तत्परता केंद्र सरकारने दाखवली तेवढी अजूनही बिल्कीसबानो प्रकरणी दाखवली नाही
राजकीय साठमारीमध्ये माजी अर्थमंत्री @PChidambaram_IN यांनी राज्यसभेत अवघ्या २२ मिनिटांच्या भाषणात मांडलेली आकडेवारी थरकाप उडविणारी आहे.
३१ मार्च २०२१ अखेर केंद्र सरकारच्या नोकऱ्यांत ८ लाख, ७२ हजार, २४३ जागा रिक्त होत्या. त्यापैकी ७८ हजार २६४ भरल्या
चालू आर्थिक वर्षात रोजगार निर्मितीत महत्त्वाचा ठरणारा भांडवली खर्च ५ लाख ५४ हजार २३६ कोटी रू अपेक्षित होता. प्रत्यक्षात तो ६ लाख २ हजार ७११ कोटी झाल्याचे दाखविले गेले. परंतु,त्यात एअर इंडियाच्या एकरकमी कर्जफेडीचे ५१ हजार कोटी जमेस धरले. कर्जाची परतफेड भांडवली खर्च कसा असू शकतो?
तरूणांचा देश असलेल्या भारताचे सरासरी वय २८.४३ वर्षे आहे. ९४ कोटी लोक कार्यक्षम गटात(Workforce)येतात. परंतु, त्यापैकी औपचारिक, अनौपचारिक असे ५२ कोटी लाेकांच्या हातालाच काम आहे. दरवर्षी ४७.५ लाख लोक रोजगाराची गरज असलेल्या गटात येतात. सरकारने पाच वर्षांत ६० लाख रोजगाराची घोषणा केली.