Shrimant Mane Profile picture
Editor, @lokmat, Nagpur Journalist For 30 Years Author of Book भक्‍ती-भीती-भास (Marathi). Retweets always not endorsement. Views are personal
Aug 17, 2022 5 tweets 1 min read
बिल्कीसबानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना दयासंदर्भात नवे मुद्दे
-रोहिंग्या निर्वासितांना घरे देण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी घोषणा केल्यानंतर काही तासांत गृहखात्याकडून तसा प्रस्ताव नसल्याचा खुलासा
-बिल्कीसबानो प्रकरणावर मात्र ४८ तास केंद्राचे मौन -स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कैद्यांच्या सुटकेबाबत केंद्रीय गृह खात्याच्या २२ जूनच्या निर्देशांनुसार, बलात्कारासह १२ घृणास्पद अपराधांमधील दोषींना सवलत न देण्याच्या स्पष्ट सूचना
-गुजरात सरकारने २०१४ च्या ताज्या धोरणाऐवजी १९९२ च्या जुन्या धोरणाचा दोषींना सोडण्यासाठी आधार
Feb 8, 2022 6 tweets 2 min read
राजकीय साठमारीमध्ये माजी अर्थमंत्री @PChidambaram_IN यांनी राज्यसभेत अवघ्या २२ मिनिटांच्या भाषणात मांडलेली आकडेवारी थरकाप उडविणारी आहे.
३१ मार्च २०२१ अखेर केंद्र सरकारच्या नोकऱ्यांत ८ लाख, ७२ हजार, २४३ जागा रिक्त होत्या. त्यापैकी ७८ हजार २६४ भरल्या
चालू आर्थिक वर्षात रोजगार निर्मितीत महत्त्वाचा ठरणारा भांडवली खर्च ५ लाख ५४ हजार २३६ कोटी रू अपेक्षित होता. प्रत्यक्षात तो ६ लाख २ हजार ७११ कोटी झाल्याचे दाखविले गेले. परंतु,त्यात एअर इंडियाच्या एकरकमी कर्जफेडीचे ५१ हजार कोटी जमेस धरले. कर्जाची परतफेड भांडवली खर्च कसा असू शकतो?