अमुक माणूस अमुक राजकरण्याचा वकील होता म्हणून तो सरन्यायाधीश झाल्यावर वाईट वागेल हे फार तकलादू तर्कट आहे. वकीली हा व्यवसाय आहे. नेहमी मोठ्या केसेससाठी चर्चेत असणारे, त्या क्षेत्रात दबदबा असलेले वकील हेही कधी न कधी तुम्हाला न आवडणाऱ्या माणसाच्या बाजूने लढून झालेलेच असतात.
वकिलीनंतर न्यायमूर्ती म्हणून निवड झाल्यावर माणूस वकिली करताना वागत होता तसा वागत राहील असे नाही. कारण तो वेगळा कार्यभार आहे.त्यामुळे न्यायदान करताना त्याने काय भूमिका घेतल्या, त्यात तर्कसंगती होती का, त्याला न्यायपालिकेच्या मूलभूत कर्तव्यांचे भान आहे का
या बाबी एखाद्या न्यायिक अधिकाऱ्याची कारकीर्द समजून घेताना महत्त्वाच्या ठरतात.
नवीन सरन्यायाधीश महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यांनी पदभार स्वीकारताना तीन गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची संकल्प बोलून दाखवला आहे. त्या म्हणजे:
१. लिस्टिंग प्रक्रिया पारदर्शक करणे
२. तातडीच्या केसेस मेंशन करण्याची सुलभ सोय ठेवणे
३. किमान एक संविधान पीठ पूर्णवेळ कार्यरत ठेवणे
या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आणि भारतीय न्यायव्यवस्थेसाठी लाभकारक आहेत. नवीन सरन्यायाधीशांचा कार्यकाल अडीच महिन्यांचा आहे.
त्यामुळे या संकल्प केलेल्या तीन मुद्द्यांपैकी एका बाबतीत जरी त्यांनी अंमलबजावणी करून दाखवली तरी ते फार महत्त्वपूर्ण काम ठरणार आहे. यातलं किती त्यांनी करून दाखवलं, किती महत्त्वाच्या केसेस तडीस नेल्या,
किती केसेसमध्ये लोकशाहीला नख लावण्याचे प्रयत्न त्यांनी हाणून पाडले हे आपल्याला अडीच महिन्यांनी दिसणार आहेत.
त्यामुळे सध्यातरी, येत्या अडीच महिन्यांत सरन्यायाधीश म्हणून भारतीय लोकशाही बळकट करणारे काम करण्यासाठी न्या. उदय उमेश लळीत यांना शुभेच्छा देणेच औचित्याचे आहे!
भक्त ही अत्यंत नीच लोकांची टोळी आहे याचा अजून पुरावा... एका मुस्लिम स्त्रीने भारतीय क्रिकेट टीमच्या विजयाचा आनंद झाल्याची पोस्ट केली त्यावर हा हलकट भक्तशिरोमणी काय म्हणतो बघा!
याला सरकारमधले ज्येष्ठ मंत्री फॉलो करतात... असेच हलकटपणा करणारे अजूनही भक्त त्या स्त्रीच्या रिप्लायमध्ये तिला टार्गेट करायला आलेले बघायला मिळतात.
गेल्यावेळी विराटने असल्या लोकांना स्पष्ट शब्दांत लायकी दाखवली होती, गेल्यावेळी आपली टीम हरली म्हणून हे मुहम्मद शमी या
गुणवान गोलंदाजाला टार्गेट करत होते. तेव्हा कॅप्टन असलेला विराट म्हणाला होता की असले लोक म्हणजे माणूस किती हीन वागू शकतो याचा पुरावा असल्याचमी समजतो!
खास यांची नांगी ठेचावी म्हणून सांगून ठेवतो, कालची मॅच जिंकली त्यात आवेश खानने फखर जमानची महत्त्वाची विकेट घेतली.
भीमा कोरेगाव प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते श्री.वरवरा राव यांना सुप्रीम कोर्टाकडून विनामुदत जामीन मंजूर.
या प्रकरणी (होऊ घातलेले सरन्यायाधीश) न्या.लळीत आणि न्या.भट यांच्या न्यायपीठाकडून उच्च न्यायालयाने सहा महिन्यांपुरता दिलेला जामीन, विनामुदत वाढवून दिला आहे.
आरोपीचे वय ८२वर्षे इतके आहे, तपासयंत्रणांना २०१८पासून त्यांची कस्टडी मिळालेली आहे, त्यांची शारीरिक स्थिती व्याधीग्रस्त आहे, अजून सदर प्रकरणात गुन्हे सिद्ध झालेले नाहीत आणि अजूनही प्रकरणाचा तपास पूर्ण होणे बाकीच आहे ही कारणे देत न्यायालयाने श्री. राव यांचा हा जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणी श्री.राव हे देशाला धोकादायक व्यक्ती असल्याने त्यांना जामीन मिळूच नये अशी सरकारी वकिलांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे
वीस रुपयांचा झेंडा घ्या नाहीतर रेशन मिळणार नाही अशी स्कीम सध्या सुरू आहे! एक गरीब, मळक्या कपड्याचा देशद्रोही म्हणतोय अरे माझ्याकडे पैसे नाहीत, मला रेशन हवंय, झेंडा का घेऊ? तर त्याला सांगितलं जातं आहे वरून आदेश आहे, रेशन पाहिजे तर झेंडा घ्या!!
५जी स्पेक्ट्रमचा लिलाव मोदी सरकारने पूर्ण केला असून त्याद्वारे एकूण १,५०,१७३ कोटी रुपये इतक्या रकमेची बोली प्राप्त झाली आहे. म्हणजे २जी पेक्षा ३जनरेशन प्रगत टेक्नॉलॉजीचे स्पेक्ट्रम दीड लाख करोडच्या घरात रक्कम स्वीकारून विकले जाणार आहेत.
हे तेच सरकार आहे जे २जी प्रकरणी घोटाळा करून काँग्रेसने देशाचं १,७६,३७९ करोडचं नुकसान केलं अशा बतावण्या करून सत्तेत आलं...
आता त्या कॅगने हवेतून निर्माण केलेल्या २जी प्रकरणातील नुकसानीच्या आकड्यापेक्षाही कमी किंमतीत आज मोदी सरकारने ५जी स्पेक्ट्रम विकून टाकले आहेत!
म्हणजे २जी मध्ये काँग्रेसने देशाचे पावणे दोन लाखाचे नुकसान केले म्हणून बोंब मारणाऱ्या लोकांनी सत्तेत आल्यावर ५जी स्पेक्ट्रम अवघ्या दीड लाखात विकून टाकले आहेत!!
भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा म्हणतात की आज भाजपसमोर इतर पक्ष संपत चालले आहेत. जे उरले आहेत तेही संपतील! फक्त भाजप उरेल!!
एकच पार्टी शिल्लक उरणे म्हणजे आपली अवस्था चीनसारखी करायची योजना आहे. आणि सत्ताधारी भाजपचे पक्षाध्यक्ष हे विखारी,
देशातील लोकशाहीला नख लावायचे मनसुबे भरसभेत जाहीर बोलून दाखवतात.
नड्डा यांना आमचं एक सांगणं आहे! तुम्ही एकवेळ सगळे विरोधी पक्ष संपवाल, सगळ्या संविधानिक संस्थांना नख लावाल, सगळ्या ठिकाणी सत्तेत बसाल... पण आधुनिक भारताच्या मातीत जनआंदोलनाची,
सत्तेशी संघर्षाची बीजे तुम्ही गायब करू शकणार नाही! देशाच्या करोडो नागरिकांचा आवाज तुम्ही कुठल्या ईडीने दाबणार आहात? तुमच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला आव्हान देणाऱ्या करोडो लोकांना डांबून ठेवायला जे नवे तुरुंग बांधावे लागतील, त्यासाठी श्रमणारे हात कुठून शोधून आणणार आहात?
१. तुम्ही म्हणताय महाराष्ट्रातून गुजराती, राजस्थानी बाजूला झाले तर महाराष्ट्रात पैसाच उरणार नाही. याचा अर्थ काय? तुम्हाला मराठी माणूस म्हणजे भिकारी, कर्तृत्वशून्य वाटतो का?
२. तुमच्या माहितीसाठी सांगतो- महाराष्ट्रात मराठा साम्राज्याचं सत्ताकेंद्र होतं.
गुजरात, राजस्थानच नव्हे तर दिल्लीपर्यंतच्या राजकारणात मराठी मनगटाचा आणि मुत्सद्देगिरीचा दबदबा होता. हे तुम्हाला शाखेत शिकवत नसतील तर सांगा, तुम्हाला मराठी मातीचा इतिहास कळावा यासाठी आमच्या शालेय इतिहासाची क्रमिक पुस्तकं तुम्हाला मोफत उपलब्ध करून द्यायला तयार आहोत!
३. मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी इथल्या माणसांनी आपलं रक्त सांडलं आहे. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासही तुम्हाला शाखेत शिकवत नसतील तर सांगा,म्हणजे आचार्य अत्रेंचे 'नवयुग'मधील अग्रलेखही तुम्हाला वाचायला उपलब्ध करून देता येतील!