वयाच्या एका टप्प्यावर माणसाला तटस्थता येते. आयुष्यभर माणसांचे, नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता आलेली असते किंवा ती येते. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. घडुन गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन करता येते.
हे खरंच घडलं का? मग घडलं तर का घडलं? आपलं काय चुकलं? ह्याचा विचार करण्याची क्षमता वाढते. माफ करण्याची वृत्ती वाढते. साध्या साध्या गोष्टींवरून येणारा राग आता येत नाही.
मनःशांती मिळायला सुरुवात होते. कशाचेही काही वाटेनासे होते. आता हे चांगले का वाईट हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात. येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लाउन घ्यायची ह्याचे जणू काही प्रात्यक्षिकच आपल्याला मिळालेले असते.
एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघता येते. आपली ह्यामध्ये काय भूमिका आहे? ती महत्वाची आहे का? आपल्या मताची गरज आहे का? हे सगळे समजून घेता येते. त्याची उत्तरे मिळत राहतात. जी उत्तरे मिळतात त्याने आपल्याला त्रयस्थपणे वागता येते.
आता वारंवार डोळ्यात येणारे पाणी थोपवण्याची कला अवगत झालेली असते. आपले कोण परके कोण? किंवा जी आहेत ती खरंच आपली आहेत का? किंवा मग जी होती ती आपली होती का?
ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येत होत ती माणसे आता दुरावलेली असतात. आपल्याला हवी तशी माणसे वागतच नाहीत हे समजायला लागतं.
मग अपेक्षांचं ओझ हळूहळू कमी होत जात आणि एक अंतर आपोआपच तयार होते.
हा आलेला एकटेपणा जास्त सुंदर असतो. कुणाचेही बंधन नाही, अपेक्षा नाहीत आणि त्यामुळे होणारे दुःख नाही. त्यामुळे वागण्यातला ओलावा आपोआपच कमी होतो. बोलणे कमी होते.
कर्तव्य भावनेने काही गोष्टी केल्या जातात.
पण त्यातील गुंतवणूक कमी होते त्यामुळे तटस्थता येते. आपल्या आजुबाजुचा गोतावळा आपोआप कमी होतो. आपले आपण उरत जातो आणि जग जास्त सुंदर होतं.
हा एकटेपणा जास्त सुंदर असतो. जग जास्त सुंदर दिसायला लागत. खरं म्हणजे ते सुंदर होतच पण आपण दुसऱ्याच्या नजरेतून बघत होतो.
ही आलेली तटस्थता जगायला शिकवते.
आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक उमेद देते कारण आता कसलेही ओझ नसत. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते, कोण काय म्हणेल ह्याची भीती नसते. आपण कुणाला बांधील नसतो.
आपल्या कर्तव्यातून आपण मोकळे हौऊ शकत नाही पण दूर राहून ती करू शकतो हे अनुभवायला येते. ज्या गोष्टींमध्ये विनाकारण गुंतून पडत होतो त्या गोष्टी किती फोल होत्या हे कळते. त्यामुळे आत्मपरीक्षण केले जाते.
नव्या आयुष्याला सुरुवात होते. आता माहित झालेलं असत कि कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे.
त्यामुळे आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आलेली तटस्थता ही छान वाटू लागते. हे ज्याला कळलं / उमगलं ती व्यक्ती खरच भाग्यवान. तर, काहींचे आयुष्य मात्र आम्ही अजूनही शिकतोय !
👏 श्रीकृष्ण.... ! 🍁
कोण आहे श्रीकृष्ण ?
पहिला अपशब्द ऐकल्यानंतर शिरच्छेद करण्याची शक्ती असताना सुद्धा नव्यान्नव अपशब्द ऐकण्याचा संयम आहे! सुदर्शन चक्रासारखे शस्त्र असताना सुद्धा हातात मुरली आहे! द्वारका नगरी सारखं वैभव असताना देखील सुदामा सारखा मित्र आहे!
शेषनागाच्या मृत्यू रुपी मुखावर उभे असताना देखील नृत्य होत आहे! प्रचंड सामर्थ्य असताना देखील युद्धात सारथी बनून सारथ्य करत आहे! तो श्रीकृष्ण आहे.
श्रीकृष्ण व्यक्ती नाही, विचार आहे.
जन्मानंतर लगेच जन्मदात्यांना सोडावं लागलं! पालनकर्त्यांनाही सोडावं लागलं! मित्रमंडळींना सोडावं लागलं! जिच्यावर प्रचंड प्रेम केलं तिलाही सोडावं लागलं! गोकुळ सोडलं! शेवटी मथुरा ही सोडली! आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर परिस्थितीच अशी निर्माण झाली की काही ना काही सोडावं लागलं!
नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव,,
प्रत्येक शब्द हा जोडाक्षर,,
जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण,,
पण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा,,
जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर कृष्ण समजून घ्यावा,,
दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण,,
सातवा अवतार प्रभू राम,,
राम ही अक्षरे सुद्धा सरळ अन त्याचं वागणं ही सरळ,,मर्यादेत,,
म्हणून मर्यादा पुरुषोत्तम,,,
रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही,,
तरीही काही जणांनी त्याच्यात दोष शोधले,त्याच्यावर टीका केली,,,
जीवनात आचरण रामसारखं असावं अन समजून कृष्ण घ्यावा,,
कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये,,
कृष्ण म्हणजे श्रीमदभगवद्गीता,,,
जीवनाचं सार,,,
जन्म झाल्याबरोबर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावं लागलं,,
गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंत राहिला,,,
सद्गुरूंचे उपदेशामृत .... अवधूत चिंतन 1 मन वळु नये अशी श्रध्दा हवी
निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी
सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी
कधी विसरु नये अशी नाती हवी
2 .: "यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे."
: आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
3 "ज्या पायांना पूर्वीपासून ऊन- वारा-पाऊस-पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते, अशी पावले शेवट पर्यंत कधीही थकत नाही.."
जर कशाची इच्छा केली आणि ते नाही मिळालं तर समजाव की अजून काही तरी चांगलं लिहिलं असणार नशिबात
१.आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ;
"मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!"
२.माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, "एवढ्यात शेफरलास ?
जी मोजता येत नाही ती खरी उंची."
३.कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो. तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला आणि त्याने मला विचारलं," या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील?" तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल.
४.मला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार ?
एक हिरा लुकलुकला.म्हणाला, "वेडा रे वेडा !!"
५. कमी मार्क मिळाले म्हणून एका कोकराला कोणीतरी बदडत होतं. त्या कोकराच्या डोळ्यातले भाव वाचले मी ! ते म्हणत होतं, 'करून बघायचं कि बघून करायचं,
ठरवू दे की मला मी कसं जगायचं !'
१] पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे = सोलापूर
२] पंढरपूरस्थित मंदिराचे नाव = श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
३] विठ्ठल कुणाचे देवरूप आहे = श्री विष्णू (कृष्ण)
४] विठोबा द्वापारयुगामध्ये कितवा अवतार मनाला जातो = दुसरा
५] त्याला दशावतारातील कितवा अवतार मानले जाते = नववा
६] शास्त्र पुराणातील विठ्ठलाचे नाव = बौद्ध/बोधराज
७] महाराष्ट्रातील विठ्ठलभक्त संप्रदाय = वारकरी
८] कर्नाटलातील विठ्ठलभक्त संप्रदाय = हरिदास
९] विठ्ठलमंदिर कोणत्या नदीकाठी वसले आहे = भीमा
१०] या नदीला या ठिकाणी कोणत्या नावाने ओळखतात = चंद्रभागा
११] विठ्ठलाला कशाचा हार घातला जातो = तुळशी व मंजिरी
१२] तुळस हे कोणाचे प्रतिक मानले जाते = श्री लक्ष्मी
१३] मुख्य मंदिराची निर्मिती कोणत्या शतकात झाली असावी = १२ वे शतक
१४] कोणी केली/कोणाच्या कालखंडात झाली असावी = देवगिरीचे यादव प्रशासक
१५] विठ्ठलाचे पंचाक्षरी नाव = पंढरीनाथ