ब्रेकिंग
थेट सरपंचपदांसह 1,166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान
18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे.
त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होईल
संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील #निवडणूक
नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 होईल
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत. #निवडणूक
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
एक मुलगी प्रेमात पडते..लग्न करते..दुसऱ्या देशात सासरी नांदायला येते ( मुंबईत पश्चिम रेल्वेला राहणाऱ्या लोकांना मध्य रेल्वेला राहणाऱ्याचे स्थळ नको हवं असतं) वेगळं वातावरण,संस्कृती,भाषा सगळं स्वीकारते.. #काँग्रेस
नवऱ्याचं घराणं, राजकारण सतत तणाव, त्यात इंदिरा गांधी सारखी सासू (आपल्या घरातील किचन पोलिटिक्स सासू-सून वाद बघा.. ) डोळ्यासमोर दोन जिवलग लोकांची हत्या ,द्वेष पचवून इथे टिकणे.. साधी गोष्ट नाही #काँग्रेस
पण तरी इथं राहून पक्ष टिकवला,दोन वेळा सत्ता आणली..बाई म्हंटल की चारित्र्याला हात घालणार..इतकं टोकाचं सहन करून पण भारताच्या राजकारणात स्थान सोनिया गांधींनी टिकवून ठेवलं.. #काँग्रेस
एक सुपरस्टारला कोरोना झाल्यावर हळहळणारी ही तीच लोक आहेत ज्यांच्या आसपास कुणाला कोरोना झाली की हे आधी बिळात पळतात
ही तीच लोक आहेत की कोणी कोरोना positive आला की मागून गॉसिप करतात
ही लोक कशी बेजबाबदार आहेत, यांच्यामुळे इतरांना कसा धोका आहेत अशी चर्चा करतात.. cont.. #CoronaDiary
ह्यांच्यामुळे इतरांना पण कोरोना झाला असा निष्कर्ष काढतात,जेव्हा डॉकटर पण सांगू शकत नाही एखाद्या व्यक्तीला विषाणूची बाधा कशी आणि कुठे झाली
ही तीच लोक आहेत जी whatsapp group वर कोरोना झालेल्या व्यक्तीला नैतिकतेचा आव आणत लेक्चर देतात..आधी लक्षण दिसल्यावर संगायच होत #coronaDiary
इतरांना कशाला अडचणीत आणलं अस सांगून त्या व्यक्तीला अपराधीपणाची वागणूक देतात, त्यांचा अपमान करतात.
त्या व्यक्तीला, कुटुंबाला अप्रत्यक्षरीत्या वाळीत टाकतात,ती व्यक्ती इतकं सहन करून बरी झाली तरी तिला लांब ठेवतात..सगळं नीट झालं तरी त्या व्यक्तीला पुन्हा स्वीकारत नाही #CoronaDiary