आज राहुल गांधी यांनी एक ट्विट केले, ज्यामध्ये ते म्हणतात की,
'ज्या हिंसेच्या राजकारणामुळे माझ्या वडिलांना मला गमवाव लागलं, ती वेळ मी माझ्या देश वासीयांवर येऊ देणार नाही. प्रेम द्वेषावर विजय मिळवेल , आजची आशा उद्याच्या भीतीवर मात करेल, आणि आम्ही पुन्हा भरारी घेऊ..."
भारतामध्ये वाढत चाललेली द्वेषाची भावना,एकमेकांप्रती अविश्वास व भारतीय संस्कृतीच्या मुळ मूल्यांना तिलांजली देत उन्माद उत्पन्न करणार वातावरण भारताला कमकुवत बनवत आहे.अशामध्येच भारत जोडो यात्रा या एका संकल्पनेने भारतीय एकात्मतेची भावना निर्माण होण्याच्या अपेक्षेने पेटविलेली एक ज्योत
ही फक्त काँग्रेसची पदयात्रा नाही तर ज्या-ज्या लोकांची भारतीय मुळ संस्कृतीवर अढळ श्रद्धा आहे व ज्यांना ती अबाधीत राहावी असे मनापासून वाटते त्या सर्वांनी या पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो....