#शिवसेना 🏹🚩✌️
दरबारात गोंधळ निर्माण झाला होता.दोघींनी एकाच बाळावर दावा केला होता.दोघी म्हणत होत्या की मीच बाळाची खरी आई.
महाराजांच्या डोक्याचा भुगा झाला होता,कारण बाळ दोघीच्या पण अंगावर पीत होत,हाक मारली की दोघीना ओळखत होत.
महाराजांनी वजीराला बोलावले त्याला हे प्रकरण सांगितलं.
वजीराने आठ दिवसात निकाल होणार म्हणून जाहीर केलं.दोन्ही आया व ते बाळ सादर करण्यात आले.वजीराने जाहीर केलं की "बाळ मधोमध कापून त्याचे समान भाग करून दोघीना दोन भाग द्यावेत" एकीने किंकाळी फोडली तर दुसरीने हसून फैसला मान्य केला .
जिने किंकाळी फोडली तिला विचारले की फैसला मान्य आहे का?
रडत ती म्हणाली "महाराज बाळ मला नको तिच्याजवळच राहू द्या पण कापू नका."
दुसरीला विचारले तर ती म्हणाली की मला न्याय मान्य आहे.
काही क्षणांत ते बाळ कापू नका म्हणणाऱ्या खऱ्या आईला दिले.
ज्या प्रतिकासाठी शिवसैनिक जीव टाकतात ते धनुष्यबाण गोठवा म्हणणाऱ्या गद्दाराशी खुशाल संबंध जोडा.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
तो पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहे का माहीत नाही. तो उत्कृष्ठ राजकारणी आहे का माहीत नाही. तो पप्पू नक्कीच नाही.तसं माईंड सेट करण्यात भाजप यशस्वी झालेय हे ही खरं.आपल्याला आता खरं खोटं जाणून घ्यायची ईच्छा नसते.प्रवाहासोबत वाहत जायलाच शिकवलं आपल्याला २०१४नंतरच्या काळाने
पण याच्या बाबतीत एक गोष्ट नक्की सांगता येईल, तो कपटी नाही, तो मत्सरी नाही, त्याच्याकडे द्वेषभावना नाही, तो कोणावर डूख धरून रहाणारा नाही.
त्याच्याकडे ध्येय आहे पण तो त्यासाठी झपाटलेला नाही. त्याला सत्तेची हाव नाही. तो त्याच्या मार्गाने चालत असतो पण तुम्ही सोबत याच हा आग्रह नसतो.
येताय तर या नाहीतर मी एकटा चालेन, पडेन धडपडेन, पुन्हा उठेन पुन्हा लढेन, एवढंच तो करत आलाय. तुमच्या चीडवण्याचा त्याला फरक पडत नाही. तो हसतो आणि सोडून देतो.
तो खरतर मस्तमौला आहे. तो राग, लोभ, द्वेष, मत्सर याच्या पलीकडे गेलाय. नियतीने केलेले आघात सहज पचवलेत त्याने.