वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे.
महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. गुजरातच्या निवडणूका तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त दिसते.
महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
उरूण-इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष स्व. विजयभाऊ पाटील यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. भाऊंची काम करण्याची पद्धत, निवडणुका या सर्व गोष्टी नजरेसमोरून गेल्या.
दैनिक तरुण भारतचे पत्रकार युवराज निकम यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विजय भाऊंच्या सहकाऱ्यांचे सत्कार यावेळी संपन्न झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शहाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार 🙏
विजय भाऊ झपाटून काम करायचे, निवडणुक म्हटल्यावर त्यांच्यात ऊर्जा संचारायची आणि त्या ऊर्जेतून प्रेरणा घेऊन आम्ही प्रचार करायचो. लोकांशी संवाद साधण्याची कला भाऊंमध्ये होती. त्यावेळी सर्वांशी घनिष्ठ मैत्री असायची, कोणाबद्दलही मनात द्वेष नसायचा, शुद्ध भावनेने भाऊ लोकांशी समन्वय साधत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आज दिल्ली येथे संपन्न झाले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. @NCPspeaks @PawarSpeaks
आज देशात महागाईने नागरिक हैराण झाले आहेत, केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होत आहे, बिगर भाजपा शासित सरकार उलथवून टाकण्याचे काम सुरू आहे. आठ वर्षात केंद्र सरकारने काय केले याचा कोणताही हिशोब नाही. देश अधोगतीकडे जात असल्याची खरी परिस्थिती मान्य करण्यास सरकार तयार नाही.
युपीए सरकारच्या काळात देशात सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे देशातील प्रत्येक घटकांनी प्रगती केली. आज सामान्य जनतेवर जीएसटी लादला जात आहे. नागरिक हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत देश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत आहे.
भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. हि मागणी करण्यापुर्वी त्यांनी 'आघाडी बिघाडी', 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी.
आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजपा नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्या वरील टिका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच यातून स्पष्ट होते. सोशल मीडियातील टिका थांबवणे हि जीवनावश्यक सेवा आहे का ?
गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, अत्यंत अश्लील टिका एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर होत होती, त्यावेळी आमच्या तक्रारी सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते. आज जनता भाजपा नेत्यांवर रचनात्मक टिका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहिये. भाजपाने रडीचा डाव खेळू नये.