Jayant Patil- जयंत पाटील Profile picture
President & Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|7th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra
Sep 13, 2022 4 tweets 1 min read
वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे. महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती.
Sep 12, 2022 5 tweets 3 min read
उरूण-इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष स्व. विजयभाऊ पाटील यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. भाऊंची काम करण्याची पद्धत, निवडणुका या सर्व गोष्टी नजरेसमोरून गेल्या. दैनिक तरुण भारतचे पत्रकार युवराज निकम यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विजय भाऊंच्या सहकाऱ्यांचे सत्कार यावेळी संपन्न झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शहाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार 🙏
Sep 11, 2022 5 tweets 3 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आज दिल्ली येथे संपन्न झाले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
@NCPspeaks
@PawarSpeaks ImageImageImageImage आज देशात महागाईने नागरिक हैराण झाले आहेत, केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होत आहे, बिगर भाजपा शासित सरकार उलथवून टाकण्याचे काम सुरू आहे. आठ वर्षात केंद्र सरकारने काय केले याचा कोणताही हिशोब नाही. देश अधोगतीकडे जात असल्याची खरी परिस्थिती मान्य करण्यास सरकार तयार नाही. ImageImageImageImage
May 3, 2020 4 tweets 1 min read
भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. हि मागणी करण्यापुर्वी त्यांनी 'आघाडी बिघाडी', 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी. आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजपा नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्या वरील टिका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच यातून स्पष्ट होते. सोशल मीडियातील टिका थांबवणे हि जीवनावश्यक सेवा आहे का ?