#मग_काय_हुईल ?
नवीन सरपंच उपसरपंच दुपारी गावातल्या पारावर झाडाच्या गार सावलीत बसून आराम करत होते.
सोबत नासा मधून नोकरी सोडून गावात परतलेला वरच्या आळीचा बैतुल(काही लोकांनी अफवा पसरवली की त्याला नासा ने हाकलून दिलं आहे),चहा बिस्किटावर खुष असणारा आणि गावभर बातम्या पोहोचविणारा १/७
प्रसाद आणि ग्रामपंचयातीचा सतरंज्या उचलणारा शिपाई अदभूत होते.
गप्पांचा फड रंगात आला होता, तेवढ्यात दोन चारचाकी गाड्या धूळ उडवीत गावात पोहोचल्या.
पारावर बसलेली मंडळी त्यांना दिसली आणि गाड्या त्यांच्या जवळ येऊन थांबल्या
गाडीची काच खाली करून मागच्या सीट वर बसलेल्या साहेबांनी २/७
ग्रामपंचायत कुठे आहे ? म्हणून विचारले तसा अदभूत बोलला -सायेब तुमाला पंचायतीत जायाची गरजच नाय बगा
साहेब - का ?
प्रसाद- आवो साक्षात सरपंच उपसरपंच हितं हजर असताना पंचायतीत जाऊन काय करणार हाईसा
सरपंच उपसारपंचाची त्याने ओळख करून दिली तसा गाडीतला साहेब दरवाजा उघडून बाहेर आला ३/७
नमस्कार चमत्कार झाले आणि आणखी दोन साहेब दुसऱ्या गाडीतून बाहेर आले.
साहेब- मागील सरपंच उपसारपंचांनी आमच्या कंपनीला तुमच्या गावात कारखाना उभारणी करिता जमीन देण्याचा करार केला होता.
उपसरपंच (नेहमीप्रमाणे) - पण आमी का द्याची जमीन ? तेनं काय हुईल ?
(सरपंच मनातल्या मनात चरफडत ४/७
बोलला बेनं मला बोलूच देत नाय, सारखं लय हुशार असल्यागत दावतंय)
साहेब- अहो तुम्ही जमिनी दिल्या तर आमचा कारखाना उभा राहील तिथे.
उपसरपंच (सरपंचाकडे बघत, आता मी बोलू ?)
सरपंच (नाईलाजाने)- बोला
उपसरपंच (सायबाकडे बघत)- बरं मग काय हुईल ?
साहेब- मग तुमच्या शेत मालाला जास्त भाव मिळेल ५/७
अदभूत (उत्साहाने)- बरं मग काय हुईल ?
साहेब- गावातल्या तरुणांना रोजगार मिळेल
सरपंच- मग पुढं काय हुईल ?
साहेब- हातात पैसा येईल आणि तुमची श्रीमंती वाढेल
उपसरपंच - मग काय हुईल ?
साहेब- चांगली घरे बांधाल , सुख समृद्धी येईल
प्रसाद- मग काय हुईल सायेब ?
साहेब- मग मस्त आराम कराल ६/७
सरपंच (सर्वांकडे बघत, एक डोळा मिटून)- मग आत्ता काय करतोय?
राजकारणाच्या चौकात #भाजी'पाल' (भाजी विक्रेता) भाज्या घेऊन बसला होता
त्यात एक 'फळांचा राजा', एक 'फळांचा उपराजा', मोजकी मोठी रसाळ 'संत्री' अनेक छोटी 'सामान्य संत्री'
आणि वेगवेगळ्या कलर च्या भरपूर 'भेंड्या' मांडल्या होत्या
भाजी'पाल' ओरडत होता भेंड्याच्या बदल्यात आंबा, संत्री घ्या sss 📢
एक स्थूल गृहस्थ आणि त्यांचे चारपाच सोबती जवळ जवळ धावत तिथे पोहोचले
स्थूल पणामुळे दम लागला होता
तरीही भाजी'पाल' यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते
आमच्याकडे एकशे ....(पण मध्येच दम लागला)
भाजी'पाल' नी भाज्यांवर पाणी मारत, ग्लासभर पाणी त्या स्थूल गृहस्थास दिले
आणि चहा घेणार का ? विचारले
सद्गगृहस्थाना खूपच घाई होती, पाणी पीत पीतच बोलले
आमच्याकडे एकशे चार भेंड्या आहेत,
या घ्या आणि आम्हाला फळांचा राजा, उपराजा, आणि संत्री द्या
#पुस्तकांचे_पुतळे
टीप १- खालील धागा मनातल्या मनात वाचावा, जाहीरपणे मोठ्याने वाचल्यास होणाऱ्या दुष्परिणामांना आम्ही जबाबदार राहणार नाही
तर वाचनाची आवड आम्हाला लहानपणापासूनच आहे,
काहीही वाक्य नजरेस पडले की, आम्ही ते जाहीरपणे मोठ्याने, चार चौघास ऐकू गेले पाहीजे अशा पद्धतीने वाचतो
एसटी त तिकीट काढायच्या आधी
"वाहकास नेमके व सुट्टे पैसे द्यावेत" असे मोठ्याने वाचत कंडक्टरास ५०० रुपयांची कडक नोट देत एक पुस्तकनगरी द्या, असे बोललो होतो,
आता त्याने आमच्याकडे रागाने का बघितले ,हे मात्र आम्हाला समजले नाही
बस स्टँड वरील (अ)स्वच्छतागृहातील सुविचार ही
आम्ही कित्येकदा मोठ्याने वाचले आहेत, पण ते इथे सांगण्यासारखे नाहीत (वाचकांनी आम्हाला माफ करावे)
एकदा आम्ही सार्वजनिक ठिकाणी लिहिलेले
" *** वापरा, एड्स टाळा " हे वाक्य जाहीरपणे मोठ्याने वाचले , तर उपस्थित लोक आमच्याकडे वेड्यासारखे पहात हसत होते, एका काकू ने तर पायातील चपलेकडे
क्रिकेट जगतातील महान क्रिकेटपटू, थोर क्रिकेट समालोचक, तज्ञ क्रिकेट प्रशिक्षक, ऑल टाईम ऑल राउंडर... आणखी बरेच काही बाही असणारे आमचे परमखिलाडी 'सेठ मनोहरदास' यांचे नाव एका छोट्याशा मैदानाला काय दिले आमच्या विरोधकांनी आकाश पाताळ एक केले
ज्याचे नुसते पोस्टर खोलीत लावून आम्ही क्रिकेट शिकलो ,आशा या प्रातः स्मरणीय, सेठ मनोहरदास यांचे योगदान माहिती नसणाऱ्या पामारांना त्यांचे योगदान आम्हास सांगावेच लागेल, म्हणून हा लेखन प्रपंच .
सेठ दासांना बोलायला यायला लागलं तर त्यांच्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडला 'क्रिकेट'
पण आईवडील शिकले नसल्याने याची नोंद इतिहासात नाही, पण सेठनीच येकदा खाजगीत आम्हाला सांगितले होते, आता त्यांनी सांगितले म्हणजे साक्षात शंकेस ही शंका घेण्याचा अधिकार नाही.
लहानपणी सेठ 'बडावनं' (शब्द थोडा अवघड आहे पण दास सोप्पं काम करतच नाहीत)