#वाचकांचे_पार्लमेंट भाग -२
जळगांव मधील बातमीदार साप्ताहिकात वाचकांचे पार्लमेंट या सदरात वाचक विविध प्रश्न विचारायचे, अन प्रबोधनकार त्याना मार्मिक, तिखट, विनोदी, शैलीत उत्तर द्यायचे त्यालाच आपण ठाकरी स्टाईल म्हणतो.!
अशीच काही प्रश्नोत्तरे खाली दिले आहेत वाचा. 👇
प्रबोधनकार -असल्या भाडखाऊ लग्नावर समाजानी नि गावक-य़ानी एकजूट बहिष्कार घालावा. त्या लग्नाला कोणी जाऊच नये. छी थू करावी. समाजात मान्यता देऊ नये. 🔥
( यावरून प्रबोधनकारांची महान स्त्रीवादी भुमिका दिसते.)
२) प्रश्नकर्ता - ग्रहदशेवर मानवी दुर्दशा अवलंबून असते, यातले सत्य काय?
प्रबोधनकार - ज्योतिष हे मुळी शास्त्रच नव्हे. पोटभरू लफंग्यानी लोकांचे मानसिक दास्य वाढवून त्यावर पोळी भाजण्याचा चालवलेला हा एक धंदा आहे..🔥
( प्रबोधनकारानी त्याकाळी जोतिष्याचा पाखंडावर केलेला प्रहार )
३) प्रश्नकर्ता- धर्म बुडाला, धर्म बुडाला, या सनातन्यांच्या ओरड्यातला त्यांचा धर्म कोणता?
प्रबोधनकार- त्या धर्माचे नाव शेण्डी-जानवे-पोट-धर्म. धर्म बुडाला हा ऐतखाऊ भटांचा बारामास शिमगा..! 🔥😂
( प्रबोधनकार हे भटभिक्षुक कंपनीचे कडवे विरोधक, ते अतिशय तिखट भाषेत भटांचा समाचार घेत )
४) प्रश्नकर्ता -वेश्यांनी राष्ट्रगीत म्हणणे, हा राष्ट्राचा अपमान नव्हे का?
प्रबोधनकार- आणि तुम्ही हा प्रश्न विचारणे हा वेश्यांचा अपमान नव्हे कां? त्यांचा अपमान करण्याचा तुम्हाला काय अधिकार? काय त्या भारताच्या सामान्य नागरीक नव्हेत ?
प्रश्नकर्ता- हिंदी कम्युनिस्ट पक्षानें हिंसावृत्ति सोडली म्हणतात, ते खरे आहे काय?
प्रबोधनकार- सापाने कात टाकली म्हणून त्याला कोणी आपला बाप मानीत नाही.
( प्रबोधनकारानी कम्युनिस्टाना साप संबोधून त्यांचा राजकीय वावर भारतात कसा होता हे यावरून स्पष्ट केलंय..)
७) प्रश्नकर्ता- मूठभर खरा स्वार्थ कोठे आहे नि तो कोणता?
प्रबोधनकार ठाकरे- माणसाच्या पोटात. कशीहि परिस्थिती असो, आपण काटा कूटा न रुपता खुपता शंभर वर्षे जगावे, हा तो स्वार्थ.
प्रश्नकर्ता- बुद्धिजीवी नि श्रीमंत समाजातल्या तरुणींनी श्रमजीवी युवकांशी विवाह केले तर राष्ट्रीय जीवनात काय घडेल?
प्रबोधनकार ठाकरे - काय घडणार? नवरा बायकोच्या जोड्या पडणार. आणखी कसलाहि कल्पांत होणार नाहीं.. 😂😂🔥
९) प्रश्नकर्ता - जीवनाचे खरे रहस्य कशात असते? प्रबोधनकार- कोणत्याहि क्षेत्रात गाजवलेल्या कर्तबगारीची गोड फळे प्रथम इतराना चारून मग आपण खाण्यात.❤️
!२! प्रश्नकर्ता- पाप नि पुण्य कशाला म्हणतात?
प्रबोधनकार- पुष्कळांचे पुष्कळ सुख साधणारे ते पुण्य आणि त्या सुखाला बाधणारे ते पाप.
१०) प्रश्नकर्ता- विवाहित स्त्रियांनी नोकरी करावी काय?
प्रबोधनकार-अहो करीत आहेतच ना आज? कोठे काय बिघडले? माझी एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनहि मुली हापिसात जातात
प्रश्नकर्ता- पोलिस खात्यातील सर्वच अधिकारी व्यसनी कां असतात?
प्रबोधनकार - कुठे पाहिले हे तुम्ही खोटा आहे हा भ्रम
११) प्रश्नकर्ता- लव्ह मॅरेज झालेल्यांचे काही वर्षांनी (बहुतेक) कां पटत नाही?
प्रबोधनकार- लव्ह मॅरेज न झालेल्यांचे पटतेच पटते, 😂 असा तरी दाखलां मिळतो का? अहो, तडजोड नसली का जोडाजो़ड होते, यात विशेष काय नि नवल काय? 🔥❤️
प्रश्नकर्ता- सूर्य पश्चिमेला न उगवता पूर्वेलाच कां उगवतो?
प्रबोधनकार - कानानी ऐकण्यापेक्षा डोळ्यांनी आपण कां ऐकत नाही? आणि पोटानी कां पहात नाही? काही तरी विचारायचे म्हणून विचारले, झालं. वेळाचा अपव्यय नि कार्डाचा खर्च. 😂😂🔥
आज महाराष्ट्राचे लाडके, प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती. या निमित्ताने त्यांच्या महालोकप्रिय अशा देवळाचा धर्म धर्माची देवळे या पुस्तकातली काही मुख्य ओळी थ्रेडमार्फत आपल्या वाचनास देत आहे. नक्की वाचा..👍 आणि त्यावर विवेकबुद्धीने चिंतन करा. #लोकप्रबोधनदिन 🔥
१) देवळें म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या. देवळाशिवाय भट नाहीं आणि भटाशिवाय देऊळ नाहीं.
३) देशांतला शेतकरी कळण्याकोंड्याला आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला, तरी देवळांतल्या भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिला एवढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही
४) गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही
हा भटांचा ‘सनातन धर्म’ त्यांनी आजर्यंत पोटापाड मेहनत करून टिकविला आहे
भाजपचे नेते- जे लोकशाहीत अधिकृतपणे कुठल्याही शासकीय प्रशासनात सहभागी नाही.
ते प्रेस कॉन्फरन्स घेतात, विरोधी पक्षांतील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात, अन शासकीय यंत्रणा लगेच कारवाई करतात..! याचा अर्थ जनतेने नक्की काय घ्यायचा ?
ज्या पक्षाचे सरकार आहे त्या पक्षातील पक्षातील नेते पदाधिकारी यंत्रणेत हस्तक्षेप कसा काय करू शकतात ? अन त्यांनी दिलेले पुरावे व तत्सम बाबींवर तातडीने होकारार्थी निर्णय घेऊन, सरकारी यंत्रणेतील लोक संबंधीत विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी मोठ्या वेगाने करतात, आणि थेट अटक करतात..!
नीट पाहिलं तर त्या राजकीय पक्षांनी केलेले आरोप हे फारसे मोठ्या स्वरूपाचे नसूनही, त्या यंत्रणा केवळ हुकमावरून असा हावभाव दाखवतात जणू काय त्यांनी भारत सरकारची तिजोरी फोडलीय. मला वाटत अशा आकसभावनेतून केलेल्या कारवाया समाजात, अन त्या विरोधी पक्षात एक विक्षिप्त मत तयार करत आहेत..!
देशात अनेक पुढारी होऊन गेले प्रत्येक जण लोकप्रिय होता, सर्वाना जनतेनं भरभरून प्रेम दिल, मात्र त्यात मला राष्ट्रपिता गांधी बापूचं व्यक्तिमत्त्व हे अधिक तेजस्वी आणि अद्वितीय दिसतं. त्याची अनेक कारणं आहेत, त्यापैकी मुख्य कारणे.👇
स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व गांधी बापु आधी बऱ्याच जणांनी केलं होतं, मात्र त्या सर्वांना गांधीजी इतका प्रतिसाद आणि प्रेम मिळाला नाही, फक्त गांधीजीना का लोकांनी डोक्यावर घेतले याचा कुणी मनन केलंय का ? ते मला ठाऊक नाही. पण मला जे वेगळेपण आढळलं ते थोडक्यात आपल्यापुढे स्पष्ट करतो..!!
कुठल्याही राष्ट्राला पारतंत्र्याच्या अभेद्य पोलादी साखळदंडातुन मुक्त करावयाचे झाल्यास नेमकं काय करायचं ? सशस्त्र उठाव, की आक्रमक आंदोलन, ? की शांततापूर्ण आंदोलन ?
ह्यामध्ये गांधींनी निवडलेला पर्याय आपल्याला ज्ञात आहेच. यामागे जी आंदोलने झाली ती हिंसक आणि नुकसानकारक होती.
१) नमस्कार, आपल्याला वाटेल मी हे काय नवीनच शीर्षक लिहलय ? त्यासाठी आपल्याला हा लेख विस्तृतपणे वाचावा लागेल..!
महाराष्ट्र हा बहुजनांची भुमी आहे. इतिहास, सांस्कृतिक ठेवण, लोकसंख्या, विचार प्रवाह, आदींकडे ढोबळमानाने आपण पाहिलं तर-
२) आपल्या हेच आढळून येईल की महाराष्ट्र हा बहुजनवादाचा भोक्ता आहे. मागे चित्पावन पेशवेशाहीचा काळ असेल किंवा थोड्या-फार फरकाने भटभिक्षुकशाहीचा वर्चस्ववादी वरवंटा या मराठी भुमीवर आदळत असेल.
त्याच्या ठिकऱ्या- ठिकऱ्या उडवण्याच काम संतांनी व आधुनिक काळात समाजसुधारकानी केलं.
३) त्यात प्रबोधनकार ठाकरे यांच नाव आपण आदराने घेतो. प्रबोधनकार हे समाजसुधारक, बहुजनवादी, प्रखर हिंदुत्ववादी होते.
ते एकट्याने त्यांची लढाई लढत, नंतर लोक त्यांच्या विचाराकडे आकर्षित झाली. पण त्यानी राजकरणात सक्रिय सहभाग घेतला नाही.
#Thread भट्ट सांगे अन मठ्ठ ऐके- भाग ३.
१)
पुर्वी कुठल्या प्रांतात भयंकर दुष्काळ पडला की, लोकांना भाकरीसाठी अमाप संघर्ष करावा लागायचा, त्याच वेळी ऐतखाऊ भटाळ टोणगे म्हणायचे देव कोपला, अमुक तमुक ग्रामदेव- ग्रामदेवता कोपली, आता चंदनात, तेलातुपात काजूबदामात; यज्ञ होमहवन करावं लागेल.
२) तेव्हा तो गरीब बहुजन, घरातली दागदागिने मोडुन पैशाची तजवीज करत, आणि त्या
बिचाऱ्या कुणब्याच्या अशा दुष्काळसमयी घरात शिळ्या भाकरी चटणीची पंचाईत पण भटभोजन मोठे राजेशाही पार पाडण्याकरिता, फार हाल काढावे लागत, तेव्हा कुठेतरी लचाड भटांचे पोटदेव तृप्तानंदी होऊन ढेकर देत..!!
३) आपल्याला दक्षिणा नावाचा प्रकार सर्वश्रुत असेलच, त्याकाळी हेच उपजीविकेचे साधन, दक्षिणा अल्पप्रमाणात मिळु नये यासाठी मनुनी आपल्या भिक्षुकी धर्मघटनेत खास तरतूद करूनच ठेवलिय.
Happy birthday Rahul gandhi..🎂
१) राहुल गांधी म्हणजे कोण ? जेव्हा तुम्हाला कुणी अस विचारेल तेव्हा त्याला हे सांगा -
आपल्या विचारावर, तत्वावर, निर्णयांवर ठाम राहणारा माणूस. कितीही संकट, अपयश आली तरी हार मानली नाही. झुकला नाही, अनेक जवळच्यानीं साथ सोडली.
( पुढे वाचा. )👇
२) कुटूंबाची व स्वतःची घाणेरडी बदनामी केली तरीही डगमगला नाही. सोशल मीडियाद्वारे त्यांचं भ्रामक व खोटं चित्र तयार केलं.
ज्यात राहुल म्हणजे मोठ्या घरचा अय्याश पोरगा, जो कधी माणसात गेला नाही, ज्याला लोकनेतृत्व कळत नाही. आणि इतर व्यक्तीगत आरोप, चरित्रावर किळसवाणी चिखलफेक, 👇
३) असे सर्व हल्ले परतवुन 'राहुल राजीव गांधी' धीरोदात्त महानायकाप्रमाणे पाय रोवून उभा आहे, तेही रणभेरी वातावरणात न घाबरता.
ताणतणाव समोर असताना, पार्टी खोल दरीत असताना सुद्धा हा माणूस संयमी मुद्रेत, आपल्या मुखावर हलकंस स्मितहास्य करतो. ते बेजबाबदार किंवा अजाण म्हणून नाही.👇