#पितृपक्ष सुरु आहे, त्यानिमित्ताने खाद्यपदार्थाच्या माध्यमातून दोन व्यक्तींच्या भावना #अन्नपदार्थ आणि त्यांचे #अन्नसंस्कार संदर्भ यातून कशा व्यक्त होतात त्याबद्दल एक #थ्रेड -
म्हणे तीच्या घरी आज पक्ष होता,
पण माझ्या फीलिंग्सचं श्राद्ध तीने कधीच घातलं होतं.
१/n
म्हणे तीच्या घरी आज पक्ष होता,
पण माझ्या फीलिंग्सचं श्राद्ध तीने कधीच घातलं होतं.
म्हणलं तुला गुलाबजाम देईन, पण तीचं मन रव्याच्या खिरीत अडकलं होतं
कारण, माझ्या फीलिंग्सचं श्राद्ध तीने कधीच घातलं होतं.
२/n
आंबाडीच्या भाजीवर तेलाची धार सोडून भाकरीसोबत खायला देणार होतो तीला, पण तीला अळूचं फदफदं खायचं होतं कारण, माझ्या फीलिंग्सचं श्राद्ध तीने कधीच घातलं होतं
४/n
पनीर अंगारा आवडतो तीला एकदा ती बोलली होती, आज नेमकं भेंडीच्या भाजीत तीचं मन अडकलं होतं कारण, माझ्या फीलिंग्सचं श्राद्ध तीने कधीच घातलं होतं.
पालक पुरीचं पीठ मळून तयार केलं होतं, पण तीचं मन आज भाजणीच्या वड्याकडं वळलं होतं कारण,माझ्या फीलिंग्सचं श्राद्ध तीने कधीच घातलं होतं
५/n
वरण भात आणि तुपाचं भांड काठोकाठ भरून ठेवलं होतं पण तिला भातावर कढीचं चढण हवं होतं कारण,माझ्या फीलिंग्सचं श्राद्ध तीने कधीच घातलं होतं
खोबऱ्याच्या वडीचा बेत मांडला होता तीच्यासाठी,पण तिला घशात टोचणाऱ्या अळू वडीचं अप्रूप होतं कारण,माझ्या फीलिंग्सचं श्राद्ध तीने कधीच घातलं होतं
६/n
वाटलेलं मी सौभाग्याचं कुंकू लावेन तीच्या कपाळावर, पण तीला त्याच्या कामचलाऊ टिकलीचं पाकीट आवडलं होतं, कारण,माझ्या फिलिंग्सचं श्राद्ध तीने कधीच घातलं होतं.
७/n
मला तीचा चंदनरुपी सहवास हवा होता, पण तीने माझ्या कपाळावर sorry चा टिळा लावला, हे मला रुचलं नव्हतं, पण काय करणार मी तरी,कारण माझ्या फिलिंग्सचं श्राद्ध तीने कधीच घातलं होतं,
म्हणे आज तीच्या घरी पक्ष होता,
पण माझ्या फिलिंग्सचं श्राद्ध तीने कधीच घातलं होतं.
n/n
समाप्त.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh