#20lakhcrore
साधारण २ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
covid च्या वेळी चौथे lock-down चालू होते आणि ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रुपयांचे एक पॅकेज जाहीर केले होते.
👇
त्याचे तपशील बाहेर येताच सगळीकडे मोदी आणि सीतारामन यांच्या घोषणेची थट्टा उडवणारे खूप सारे जोक viral होऊ लागले होते.
त्यातले काही उदाहरणादाखल मी इथे दिले आहेत.
आज या गोष्टीला २ वर्ष होऊन गेल्यावर काय परिस्थिती आहे ते आपण बघू.
Every action has an equal and opposite Reaction. 👇
एखादी गोष्ट जितकी वर जाते तितकीच खाली येते हा निसर्गाचा नियम आहे.
हा नियम जितका Physics ला लागू पडतो तितकाच तो अर्थव्यवस्थांना सुद्धा लागू आहे.
याचे भान बाकी कोणाला नसेल तरी मोदी आणि सीतारामन यांना नक्की आहे.
👇
covid मुळे एकीकडे अर्थव्यवस्थेचे चाक रुतून पडलेले असल्याने केंद्र सरकारचे उत्पन्न ठप्प झालेले होते. GST ची भरपाई देण्याची तरतूद असल्याने राज्यांना lockdown चा आर्थिक फटका फारसा बसला नव्हता. त्यामुळेच कदाचित एका पाठोपाठ एक राज्य सरकारांनी lockdown वाढवायचा सपाटा लावला होता. 👇
त्यामुळे आर्थिक कात्रीत सापडलेल्या केंद्राने इंधनावरील कर भरमसाठ वाढवले म्हणून खूप टीका झाली.
अशा मंदीमध्ये जगभरातल्या जवळपास सगळ्याच सरकारांनी बाजारात पैसे खेळता ठेवण्यासाठी थेट सामान्य माणसाच्या हातात थेट पैसे देण्यावर भर दिला. पण lockdown असल्याने तो पैसा बाजारात आला नाही 👇
आणि परिणामी उद्योगांनी आपली उत्पादनक्षमता कमी केली, कामगार कपात केली आणि बाजारात पुरवठा कमी झाला.
covid लसीकरण झाले तसे lockdown चे परिणाम कमी होऊ लागले आणि लोकांनी बचत केलेला जास्तीचा पैसे बाजारात येऊ लागला. 👇
मागणीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आणि मागणी पुरवठ्याचे चक्र पूर्णपणे कोलमडले. उत्पादन क्षमताच कमी केलेल्या उद्योगांना हि मागणी पूर्ण करणे शक्य नव्हते आणि त्याचा परिणाम भाववाढ आणि महागाई चे दर वाढण्यामध्ये झाला.
विकसित देशांमध्ये गेले कितीतरी दशके १ ते २ टक्क्यांच्या दरम्यान 👇
असलेले infletion अचानक ६-८ आणि १० टक्क्यांच्या पुढे गेले. तिथल्या सर्वसामान्य घरांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून पडले.
त्यात भर पडली युक्रेन मधल्या युद्धाची आणि त्यामुळे झालेल्या इंधन दरवाढीची.
जानेवारी मध्ये सत्तर च्या आसपास असलेले तेलाचे दर थेट १३० च्या आसपास गेले. 👇
त्यामुळे तर आगीतून फुफाट्यात अशी अवस्था झाली.
बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान किंवा तुर्की अशा विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांचे तर कंबरडेच मोडले आणि हे देश मंदीच्या उंबरठ्यावर उभे राहिले आहेत. 👇
मग भारतात असे काय वेगळे झाले?कि सगळ्या जगामध्ये मंदी असताना भारतीय अर्थव्यवस्था ८ टक्के वाढ दाखवते आहे आणि महागाई तुलनेने नियंत्रणात आहे.
लसीकरण हा तर प्रमुख मुद्धा होताच.
१३०करोड लोकांचे लसीकरण करणे सोपे काम नव्हते.पण त्या व्यतिरिक्त सुद्धा मोदींनी काही प्रमुख गोष्टी केल्या.👇
१. covid काळातही सरकारचे उत्पन्न सुरु राहील यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी इंधनकर, covid cess अशा मार्गांचा अवलंब केला गेला.
२. थेट लोकांच्या हातात पैसे न देता उत्पादक साखळी सुरु राहील या साठी infrastructure मध्ये गुंतवणूक केली गेली. उद्योगांना कामगार कपात करू नये म्हणून 👇
वेगवेगळ्या सवलती दिल्या गेल्या.
त्याच वेळी अतिशय गरीब वर्ग, शेतकरी यांना रेशनचे धान्य विनामूल्य दिले गेले. शेतकऱ्यांना ६००० रुपयांच्या किमान आधाराची तरतूद केली गेली.
३.लोकांच्या हातात आलेला जास्तीचा पैसा cryptoसारख्या unregulated चॅनेल ने देशाबाहेर जाऊ नये याची दक्षता घेतली👇
.
४. आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत येऊ घातलेल्या supply chain disruptions पासून अर्थव्यवस्थेला वाचवण्याचे प्रयत्न केले.
आजची परिस्थिती बघितली तर जागतिक स्तरावर भारताची अर्थव्यवस्था तुलनेने खूप सशक्त आणि चांगल्या परिस्थिती मध्ये आहे. महागाई आहे पण ती इतर देशांप्रमाणे 👇
अफाट वाढलेली नाही. भारतात इंधनाचे दर जानेवारीच्या तुलनेत २०% जास्त आहेत जेव्हा कि जागतिक स्तरावर इंधन दर दुप्पट झालेले आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनेसुद्धा भारतीय अर्थव्यवस्था हि काळ्या आकाशातली सोनेरी किनार आहे, आशेचा किरण आहे असे सांगितले आहे.
👇
हे सगळे एक सजग आणि योग्य नेतृत्व भारताला मिळाल्यामुळेच शक्य झाले हे मात्र नक्की.
मोदींना ट्रोल करणाऱ्यांना आणि पेट्रोल डिझेल किमतीवरून त्यांची थट्टा उडवणाऱ्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी हा लेखप्रपंच.
महाराष्ट्रात MVA सरकारचा जो पद्धतशीर कार्यक्रम चालू आहे तो एखाद्या बुद्धिबळाच्या खेळापेक्षा कमी नक्कीच नाही.
महाराष्ट्र सरकारने वसुली चा सपाटा लावला आणि त्याला प्रोटेक्शन म्हणून CBI ला महाराष्ट्रात तपास करायला बंदी घातली. 1/n
CBI आणि केंद्र सरकार आपले काही वाकडे करू शकणार नाही याच्या फाजील आत्मविश्वासात माविआ सरकार एकामागून एक घोडचूक करत होते.
वाझे सारखा माणूस वसुलीच्या कामाला लावणे, देशमुखांनी १०० कोटीचे टार्गेट देणे हे त्यातलेच काही भाग. 2/n
पण वरवर बघायला कंगना आणि अर्णब सारख्या फालतू प्रकरणात त्यांना भरीला घालून त्यांच्यात एक फाजील आत्मविश्वास तयार करायचे काम तेव्हा सुरु होते.
वाझे, परमबीर आणि देशमुखांवर केंद्रीय यंत्रणांची पाळत होती पण सगळे गुपचूप चालू होते, पडद्याआड. 3/n
RW आणि भाजप समर्थकांमध्ये मध्ये सध्या १० मार्च नंतर महाराष्ट्र आणि राजस्थानातही सत्ताबदल होईल हे पसरवले जात आहे.
ज्याने मोदी आणि फडणवीसांचे राजकारण जवळून बघितले आहे त्याला त्यातला फोलपणा जाणवेल.
मोदी आणि फडणवीस हे खूप जास्त पेशन्स असलेले नेते आहेत आणि म्हणूनच यशस्वी आहेत. 1/n
मला तरी वाटत कि मुंबई महानगरपालिका जिंकणे हे भाजपचे पुढचे टार्गेट असेल. एकदा मुंबई आणि बाकीच्या महानगरपालिका जिंकल्या कि शिवसेनेचा किल्ला ढासळला हे भाजपने आतापर्यंत ओळखलेच असेल.
बाकी राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा हिशोब ठेवायला ED आणि NIA आहेतच. 2/n
स्वतःच्या जाळ्यात फसलेल्या कोळ्यासारखी माविआची अवस्था झाली आहे आणि ती अजूनच अवघड होत जाणार आहे.
NCP मध्ये उभी फूट सरळ दिसत आहे, काकांचा वाचक पुतण्यावर नाहीये. मनसे भाजपाला अनुकूल भूमिका घेताना दिसतीये आणि शिवसेना स्वतःच्या कबरीकडे वेगाने धावतीये. 3/n
आपल्यापैकी अनेकांनी हे छायाचित्र पाहिले असेल. कधी "सरकारी नोकरीचे फायदे" म्हणून तर कधी "लंगूरके हाथ अंगूर" म्हणून. प्रत्येकवेळी सूर त्यातल्या काळ्या, कुरूप पोराची खिल्ली उडवण्याचाच असणार. इतक्या विद्रुप पोराला एवढी सुंदर, गोरीपान पोरगी कशी मिळाली याबद्दल पोटदुखी व्यक्त करणारा.1/n
गोऱ्या चमडीचे लोक आमच्यावर राज्य करून निघूनसुद्धा गेले, पण अजूनही गोरा रंग म्हणजेच सौंदर्य हा वेडगळ विचार काही आमचा जात नाही. त्यातून टिव्हीवर रोज त्या बिनकामाच्या फेअरनेस क्रिम्सचा मारा असतोच! अमुक क्रिम लावा, यशस्वी व्हाल. तमुक क्रिम वापरा, सगळं काही मनासारखं घडून येईल!2/n
क्रिम्स नव्हे, अलादिनचा दिवाच जणू काही!! यातून गोऱ्या, पण अक्कल गुडघ्यात असणाऱ्यांना जो माज यायचा तो येतोच पण त्याहून वाईट म्हणजे भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात बहुतांश असलेल्या सावळ्या लोकांचा आत्मविश्वास अश्या प्रकारांमुळे उणावतो. मग सुरू होते ती घुसमट, जिचे रुपांतर 3/n