#शोध
प्रत्येकजण आयुष्यभर काहीना काही शोधतच असतो. सुख, संपत्ती, प्रेम, स्वातंत्र्य, वासना, सत्ता, मैत्री, समाधान... काहीही म्हणजे अगदी काहीही शोध घेतला जात असतो. हरवलेल्या माणसांचा शोध घेण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारी माणसंही असतात.
👇👇👇
जन्मापासून मृत्यूनंतर कशाचा ना कशाचा शोध सुरूच असतो. आपण ज्याचा आयुष्यभर शोध घेतोय ते ज्यादिवशी अवगत होतं तो क्षण आयुष्यातील सर्वात सुखाचा क्षण असतो. पण केवळ तुमचंच नाही तर तुमच्या कैक पिढ्या जर एका विशिष्ट शोधयात्रेचे प्रवासी असाल तर...?
👇👇👇
शोध. मुरलीधर खैरनार लिखित कादंबरी. या कादंबरीचं शीर्षक हे केवळ शिवाजी महाराजांच्या सुरतेहून जिंकलेल्या खजिन्याचा 'शोध' घेण्याचा प्रवास यापुरता मर्यादित नाही. तर समाजात विविध उद्दिष्ट घेऊन वावरणाऱ्या वृत्तींचा 'शोध' आहे.
शिवाजी महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा जिंकली आणि
👇👇👇
तेथून मिळवलेलं अमाप धन राजधानीवर घेऊन जात असताना शत्रू मागावर होता आणि ते धन शत्रूच्या हाती लागू नये म्हणून महाराजांच्या एका शिलेदाराने ते धन वाटेतच कुठेतरी दडवून ठेवलं. गेली साडेतीनशे वर्षे तो खजिना अजूनही तिथेच आहे आणि त्याचा आता 'शोध' लागणार आहे अशी कथानकाची मुख्य मांडणी आहे..
त्यानुसार मग विविध अपप्रवृत्ती त्यामागे आहेत आणि चांगली उद्दिष्टे असणारी मंडळीही त्यात आहेत. इथे फक्त त्या खजिन्याचाच नाही तर त्यासोबत असलेल्या इतरही काही 'अमूल्य' ठेवींचा सुद्धा शोध सुरू असतो हे कथानक उलगडत असतांना लक्षात येतं.
👇👇👇
मग त्यानुसार पात्रे, संघटना, विचार, सत्ता, शासकीय यंत्रणा इत्यादींची मांडणी आलीच.
कादंबरी वाचत असताना रोमांच उभे राहतात. शिवरायांचा इतिहास आपल्या मातीतील प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा असते अन त्यात जर काही गुप्त इतिहास उलगडणार असेल तर उत्सुकता वाढत जाणे हे स्वाभाविक आहे.
👇
त्यात शिवकालीन संदर्भ, ऐतिहासिक घडामोडी आणि आजही अस्तित्वात असलेल्या सर्व गडकोट, किल्ले, मंदिरं आणि जागांचा उल्लेख हा उत्कंठा वाढवणारा ठरतो.
प्रत्येक पान पालटून पुढे जात असताना आपल्या मनात एक द्वंद्व सुरू असतं. हे सगळं काल्पनिक आहे की यातील काही संदर्भ खरे आहेत.?
👇👇👇
शेवटपर्यंत हे द्वंद्व सुरू असतानाच आणखीन काही गुपितं उघडकीस येतात अन हा 'शोध' काळाच्या पडद्याआड किती महत्वाचा आहे हे जाणवतं.
कादंबरी उत्कंठावर्धक असली तरी काही ठिकाणी ती रटाळ वाटते. जिथे कथानक पुढे सरकत नाही तिथे पानं पालटण्याचा वेग आपोआपच वाढतो.
👇
शिवाय लेखकाने प्रसंग अथवा स्थळवर्णन करताना खूप जास्त detailing केल्याने तितका भाग फास्ट फॉरवर्ड पध्दतीने संपवावा लागतो. शिवाय शेवटच्या टप्प्यातही काही अनाकलनीय बाबींचा समावेश केला असल्याने मुख्य कथानक बाजूला पडतं.
👇
इतकं वगळता बाकी सर्व अर्थातच सुंदर आहे. एखादा हॉलीवूड चित्रपट पहावा तसा अनुभव आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी कादंबरी!
~ सर अल्बर्ट अभिषेकी
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
कोऱ्या कागदावर पेनाने शब्द लिहीत असताना मी रिक्त होत जातो. निवडक शब्दांचं हे बंड म्हणजे माझं व्यक्त होणं असतं. अडतीस पावलांवर असलेलं तुझं घर अन कैक प्रकाशवर्षे दूर वाटू लागतं. मी घराबाहेर पडतो, खूप धीर एकवटून बरंका; धडधडत असलेलं काळीज, जड पडलेले पाय अन कापणाऱ्या हातांनी...
केलेला तो प्रवास दिव्यत्वाची जाणीव करून देतो. मनातील वादळे, मेंदूतील गणिते सारं काही तुच्छ वाटू लागतं. तितक्यात वाऱ्याची एक झुळूक येते. माझ्या थरथरत्या हातातील पत्र उडून जातं. उंच उंच. मी बघतच राहतो! मला वाटतं ते तुझ्या बाल्कनीत जाऊन थेट तुला मिळेल, पण ते दुसरीकडे कुठेतरी जातं...
मी ते पत्र पुन्हा शोधत नाही. त्या पत्रासोबत विश्वासही कुठेतरी हरवलेला असतो. सांजसमयी मावळतीकडे पसरलेल्या लाल आभाळासारखं खिन्न झालेल्या माझ्या आयुष्याकडे बघत मला त्यातील सौंदर्य सापडतं. अंधार होण्यापूर्वीही सौंदर्य असतंच. पाखरांच्या आवाजाने भानावर येताच...
या बंडात अनेक चांगले नेते-कार्यकर्ते दुरावले गेले आहेत हे खरंय. पण रामदास कदम त्यातील नाहीत. कदम, शिंदे किंवा अन्य काही म्हणतात आम्ही हयात घालवली शिवसेनेसाठी. पण असे कितीतरी कार्यकर्ते आहेत ज्यांना कधीही कसलंही पद मिळालं नाही तरीही ते कायम शिवसेनेसोबत राहिले.
यांना सगळं स्वतःसाठी हवं असतं. बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरे हे प्रचार करणार अन आमदार, खासदार इतर नेतेमंडळी होणार असंच वर्षानुवर्षे सुरू होतं. चंद्रकांत खैरे सुद्धा नाराज झाले होते. त्यांचा पक्षांतर्गतही वाद झाला अन मातोश्रीशीही, पण त्यांनी विषय तिथेच संपवला.
आजही ते पक्षासोबत आहेत. गेल्या सरकारमध्ये कदम मंत्री होते तेंव्हा सेनेचे आमदार उद्धव ठाकरेंना सांगत की मंत्र्यांकडून आमची कामे होत नाहीत, विधानपरिषदेतील आमदारांना मंत्रिपद नको. तरीही उद्धव ठाकरेंनी यांचा मानमरातब ठेवत पाच वर्षे मंत्रीपदावर ठेवलं.
✅तुम्ही गुंतवणूक करत नाही.?✅
माझं आत्ता वयच काय आहे. मी कशाला गुंतवणूक करू असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी...
माझा एक मित्र आहे. अंकित त्याचं नाव. परवा सहज बोलता बोलता गुंतवणूक हा विषय निघाला. मी त्याला विचारलं, 'तू गुंतवणूक का करत नाहीस.?'
👇👇👇
त्याने मला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न केला, 'मी गुंतवणूक का करावी.?'
मी गुंतवणूक क्षेत्रात काम करत असल्याने मी त्याला पटवून देऊ लागलो की आर्थिक नियोजन किती महत्वाचं असतं, भविष्याचा विचार केला पाहिजे, कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याचा विचार केला पाहिजे,
👇👇👇
श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते अगदी मुलांची शिक्षणं, रिटायरमेंट, घर, वर्ल्ड ट्रिप वगैरे वगैरे विषय वाढवत नेला.
तो सर्वकाही शांतपणे ऐकत होता. मग मला म्हंटला, 'इतक्या लांबचा विचार कोण करतो.? आणि आपल्याला थोडीच माहिती असतं भविष्यात काय होणार आहे.?
👇
रात्रीचे दहा वाजले होते. रिमझिम पाऊस सुरू होता. काळ्याकुट्ट आभाळाला काळी छत्री दाखवत मी एखादी खानावळ दिसतेय का हे शोधत गावातले रस्ते भटकत होतो. काळ्याकुट्ट आभाळात पौर्णिमेच्या चंद्राचा पुसटसा पांढरा ठिपका दिसत होता तसंच...
👇👇👇
छत्रीच्या मधोमध पडलेल्या एका छिद्रातून पाणी माझ्या खांद्यावर पडत होतं. अलीकडेच सरकारने या गावाला तालुक्याचा दर्जा दिला होता. ती सरकारची चूक होती. कारण हे अजूनही एक मोठं गाव होतं. मी इथे तीन दिवसांपासून राहतोय. या भागात चांगलं हॉटेल वगैरे नव्हतंच. गावाचे दोन भाग होते.
👇👇👇
भावकीत वाड्याची वाटणी झाल्यावर होतात तसे दोन भाग! गाववाले त्याला अलाड अन पलाड म्हणायचे. अलाड मध्ये एकदोन हॉटेल होते पण माझी राहायची सोय पलाड मध्ये होती. इथे जवळपास कुठेतरी एक खानावळ आहे असं समजलं.
👇👇👇
#लातूर
काल परवाच मुंबईच्या एका मित्राशी बोलताना लातूर या विषयावर चर्चा झाली होती. आज दिवसभर TL वर लातूर संबंधित ट्विट बघितले अन हे ट्विटावं वाटलं.
∆
तुम्ही कुठल्याही शहरात जा, तिथे आवर्जून पाहण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं बरंच काही असेल. त्या त्या शहरांची एक विशिष्ट ओळख असेल.
😱
जशी शनिवार वाडा वगैरे पुण्याची ओळख. कोल्हापूरला रंकाळा आहे. तशी लातूरची विशिष्ट अशी काही ओळख नाही. काहीजण ठिकाणांची यादी देतील. पण ती लातूरपासून तशी दूर आहेत. शहरात म्हंटलं तर गोलाईच्या पलीकडे खास असं काही नाही. गोलाई सुद्धा तासाभरात पाहून होते.
.
कोणी पाहुणे आले की त्यांना फिरायला कुठे घेऊन जावं हा प्रश्न असतो. लातूरची विशिष्ट अशी खाद्यसंस्कृती नाही जशी कोल्हापूर मध्ये तांबडा रस्सा किंवा नाशकात मिसळ आहे. तसं पाहिलं तर अनेक वेगवेगळे पदार्थ घराच्या जेवणाच्या ताटात मिळतील पण बाहेर कुठला फेमस पदार्थ नाही.
.