भगतसिंह साहित्य, तत्वज्ञान व भाष्य या सर्वांचा चाहता होता. मार्क्स, एंगल्स यांच्याबरोबर प्लेटो, ॲरिस्टॉटल, देकार्त, हॉब्स, लॉक, रुसो, व्हॉल्टेर, ट्राउटस्की यांच्या विचारांचाही त्यांनी अभ्यास केला होता.
तसेच बायरन, वाड्स्वर्थ, उमरखैय्याम, इकबाल, गालिब, रामप्रसाद बिस्मिल
२/५
यांच्याही काव्याचा आणि गीतांचा त्यांचा अभ्यास होता. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून त्यांनी वर्तमानपत्रातून लेख लिहिणे सुरु केले होते. तर्कशुद्ध, विवेकी आणि स्पष्ट भाषेतील लिखाण त्यांच्या लेखांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी अनेक विषयांवर लेख लिहिले.
३/५
पंजाबी भाषा व लिपीपासून ते ईश्वर, धर्म, अंधश्रद्धा, अविवेकी सामाजिक परंपरा, गुलामी, समाजवाद, स्वातंत्र्य लढे, राजकीय क्रांत्या ई. अनेक विषय त्यांनी हाताळले. तुरुंगात असतानाही त्यांनी जी पुस्तके मागवली, त्यावरून त्याच्या वैचारिक प्रवासाची कल्पना येते.
४/५
तुरुंगात असतानाच भगतसिंहाने चार पुस्तके लिहिली. 'भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास', 'समाजवाद', 'आत्मचरित्र' आणि 'मृत्यूच्या दरवाजात' ही ती पुस्तके आहेत.
५/५ 🙏
(प्रा. चमनलाल ह्यांच्या लेखावरून साभार)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
तुकोबांचे अभंग वाचणे-समजावून घेणे हा एक नितांत सुंदर अनुभव असतो!❤️
गाथा बुडविल्यानंतर बरेच अभंग गहाळ झाले आणि त्यांचा गाथेत समावेश झाला नाही. असेच काही अप्रकाशित अभंग शोधण्याचे आणि संकलित करण्याचे अतिशय अवघड काम संशोधक वा सी बेंद्रेंनी हाती घेतले होते. खालील अभंग त्यातलाच आहे.👇
ह्यात तुकोबा सांगतात, तुझा देव हा तुझ्यामधेच आहे आणि तू भ्रमिष्टासारखा त्याला सगळीकडे शोधात फिरत आहेस. तुझी अवस्था तू त्या चंचल हरणासारखी करून घेतली आहेस जो कस्तुरीचा शोध घेत जंगलात धावत सुटतो, पण तो स्वतःच्या नाभीतल्या कस्तुरीकडे का बरें ओळखू शकत नसेल?👇👇
आणि प्राणीच नाही तर माणसांमध्ये पण असे काही लोभी लोक आहेत (कृपण) जे की केवळ धनसंचय करण्याच्या मागे लागलेले असतात.. त्यांची लोभी वृत्ती त्यांना ते धन स्वतःसाठी पण वापरू देत नाही, जो आपलेच धन वापरू शकत नाही अशा माणसाला श्रीमंत तरी कसे म्हणणार?👇👇
प्रतिथयश लेखक त्याच्या सर्वोत्तम लिखाणानंतर काही लिहिताना तो त्याचं यश, अहंभाव, भीती कशी हाताळतो?
आणि त्यातून आपण काही शिकू शकतो का? ह्या विषयावर 'ईट, प्रे, लव्ह' ह्या पुस्तकाची लेखिका एलिझाबेथ गिल्बर्टने "यश, अपयश आणि नवनिर्मितीची प्रेरणा" हे TED Talk दिले आहे. #TedTalk_मराठी
एलिजाबेथचे 'ईट प्रे लव्ह' हे पुस्तक न्यूयॉर्क टाईम्सच्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक आहे, त्याच नावाने सिनेमा पण आलेला आहे.
एवढ्या प्रसिद्धी नंतर, लोकांना आवडलेल्या पुस्तकानंतर आपण दुसरे कोणतेही पुस्तक लिहिले तर ते लोकांना आवडणार नाही, कारण ते तिच्या पहिल्या पुस्तकांसारखे नसणार!👇
तर मग आता वाचकांची मने जिंकणे जवळपास अशक्य आहे असे समजून गावाकडे पाळीव प्राण्यांसोबत उर्वरित आयुष्य घालवावे असा तिने विचार केला.
..पण जर सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे लिहिणं सोडून दिलं तर आपण आपलं स्वत्व, किंवा आयुष्यातला राम सोडून दिला असेच होईल हे तिला मनोमन जाणवले!👇
सनावळ्या, जयंत्या-पुण्यतिथ्या, हारतुरे, तसबिरी म्हणजे इतिहास नाही - ते झालं इतिहास “मिरवणं”!
आपण फक्त हेच जर करत बसलो तर मग या सर्वांच्या मागे काय दडलंय ते कधी समजावून घेणार?🎯
इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने वाचन/आकलन करणे गरजेचे आहे. सावित्री हे पुस्तक तसेच अभ्यासपूर्ण आहे.📚
१👇
“ज्योतीबांच्या सावली सावित्रीबाई”
ह्यापलीकडे एक स्वतंत्र समाजसुधारक, स्त्री उद्धारक, शिक्षण प्रसारक, कवयत्री आणि दीनदुबळ्यांची आई म्हणून सावित्रीबाई कशा होत्या?
हे ९ भागांमध्ये ह्या पुस्तकात मांडले आहे..
सुरवात होते तीच त्यांच्या शैक्षणिक कार्यातील अमूल्य योगदानाने..📖📚
२👇
- भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी केलेले काम
- इतर स्त्री शिक्षिकांना दिलेले प्रोत्साहन
- सहन केलेल्या हाल-अपेष्टा
- ज्योतिबांसोबत नगरच्या शाळांना दिलेल्या भेटी
- आरंभलेली शैक्षणिक क्रांती
ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी "श्री" लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त !
1/12
त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की,
दिल्ली पर्यंत यायला पैसे नाहीत, “पद्मश्री”पोस्टाने पाठवा साहेब !
अजब आणि अफाट आहे न हे ? मी सत्यकथा सांगतोय ओडिशातील हलधर नाग या अवलियाची..
2/12
कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी,
कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे.
आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या "हलधर ग्रंथावली - भाग -2" याचा पाठयक्रमात समावेश करण्यात आलाय.
3/12
“विज्ञानावर अतूट निष्ठेतूनच राष्ट्रं मोठी होत असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात वैज्ञानिक आणि विज्ञान हेच त्यांच्या आदरस्थानी आले.”
ब्रिटनमधल्या माध्यमांमध्ये सध्या एक वेधक चर्चा चालू आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लावलेलं एक सफरचंदाचं झाड वादळात पडलं
👇 1/5
2/5 यासाठी हळहळ व्यक्त होत आहे. झाड साधंसुधं नव्हतं. १९५४ साली लावलेलं हे सफरचंदाचं झाड विशेष होतं कारण आयझॅक न्यूटनला ज्या झाडाखाली बसून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला होता त्या झाडाच्या फांदीचं ग्राफ्टींग करून हे झाड तयार झालं होतं!
3/5 विज्ञानावर अतूट निष्ठेतूनच राष्ट्रं मोठी होत असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात वैज्ञानिक आणि विज्ञान हेच त्यांच्या आदरस्थानी आले.
न्यूटनची जयंती किती धूमधडाक्यात साजरी होते माहित नाही. न्यूटनचं नाव एखाद्या विद्यापीठालाही दिलेलं नसावं,