Preview.
रविवारी प्रकरण दाखल करून ठाकरेंना दोन दिवसात फ्लोवर टेस्ट बद्दल दम देणारे कोर्ट शिंदेना मात्र तारखावर तारखा बहाल का करते, यावर फारशी कुणाला तक्रार नाही, कारण सबब सर्वांनाच ठाऊक आहे. वरती मोदी नसते तर खाली फडणवीस परत आले नसते.
गेल्या पाच वर्षात सत्तातरांचे असे नमुने समोर आलेले आहे. निवडणूक आयोगासमोरील सुनावणीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. उध्दव ठाकरेंसाठी मोठा झटका आहे. ज्याला कोणाला पक्षांतर करायचं असेल त्याने सरळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि परत निवडून यावे.
मग ती एक व्यक्ती असो वा अनेक. शिवसेनेच निवडणुक चिन्ह उद्या निवडणुक आयोगाने गोठवल तरी त्याने काय फरक पडतो? काँग्रेस फुटली तेव्हा गाय वासरु निशाणी जाऊन इंदिराजींना हात ही निशाणी मिळाली आणि पक्षाच मुळ नाव पण गेल. पण त्याने काय फरक पडला ? १९८० च्या निवडणुकीत त्या प्रचंड बहुमताने
विजयी झाल्या होत्या. इंद्रधनुष्य हातात घेऊन उतरलेले शिंदे २४ च्या पूर्व संध्येला एकटेच उरु नये म्हणजे झाले. कारण अर्धा गट फडणवीसावर विसंबून आहे. त्यामुळे विलीनीकरण शिवाय पर्याय नाही असे जे न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणतात तेच खरे या अर्थी शिंदे सरकार अर्थातच केव्हाही कोसळेल,
नाहीच कोसळले तर मग नक्कीच त्यांना महाशक्तीचा व गुहाहटीच्या कामाख्या देवीचा आशिष असल्याचे मान्य करावे लागणार आहे, मात्र ज्या १६ आमदारांना अपात्र ठरले जाण्याची शक्यता आहे त्यात मुख्यमंत्री शिंदे असल्याने सरकारची नितीमत्ता आणि सत्ता दोन्ही डळमळीत आहे .
काल ठाकरेंना धक्का अश्या बातम्या आलेल्या असल्या तरी त्याचे नेमके विश्लेषण वेगळे होऊ शकते, आयोग अत्यंत उत्साही दिसते यावरून बाण पळवून नेण्याची बहुदा सर्व तयारी सिद्ध दिसते आहे मात्र मुळात धनुष्य घेऊन शिंदेंना आखाड्यात राहता यावे एवढेच ज्या अर्थी अपात्रतेची तलवार टांगती आहे
त्यावरून ती कधी सरकारच्या गळ्यावर कोसळल सांगता येत नाही, काही दिवसा पूर्वी पवारांचा निवडणुकांना तयार व्हा रे हाकारे किती खरे होते असेच म्हणावे लागेल.
पक्षाने काढून टाकलेल्या आमदारांवर कुठलाही निर्णय नाही, आणि त्याच काढलेल्या आमदारांच्या सर्व कारवायांना वाट मोकळी करुन दिली का आज
कोर्टाने अशी शंका केवळ डॉ संग्राम पाटलांची नाही. ज्या गतीने शिंदे सरकारच्या अस्तित्वाचा निकाल येणार असेल त्यापरी गावातल्या तंटा मुक्तीच्या समित्या निर्वाळा देतात मात्र मुकीच्या बाब्दतीत जे झाले तेच होतंय ना हाक ना बोंब महाशक्ती आणि एकनाथ शिंदे जितकी दिल्लीतल्या सत्तेची मस्ती
दाखवतील कोर्ट, तपास यंत्रणा, निवडणूक आयोग म्यानेज करून ही लढाई जिंकण्याचा प्रयत्न करतील तितकीच जास्त उद्धव ठाकरेंवर अन्याय झाल्याची लोकांची भावना वाढत जाईल. परिणामी न्यायालयीन लढाई जरी ठाकरे हरले तरी ज्यावेळी निवडणुकीच्या माध्यमातून खरी लढाईची वेळ येईल तेव्हा लोक उद्धव ठाकरेंनाथ
निवडून देतील. बाळासाहेबांचं एक वाक्य यावेळी आम्ही आठवलं पाहिजे
मी बरोबर आणि चूक, हे तुम्ही नाही तर देशातील जनता ठरवेल, कारण माझा विश्वास आहे फक्त एकाच न्यायालयावर आणि ते म्हणजे जनतेचे न्यायालय.
गेल्या काही वर्षात देवांना देव्हारयातून थेट व्यवहारात म्हणजे मोकळच बोलायचं झाल तर थेट राजकारणातच आणले. रामाला तर स्टार प्रचारक केले आहे, हमुमानाची चालीसा आता एका पक्षाच्या अजेंड्यात असतो, म्हणजे देवाला स्वतःचे मंदिर बांधता येत नसल्याने रामाने एका
पक्षासोबत युती केली, तुम्ही माझ मंदिर बांधा आणि माझा खुशाल वापर करा, मुळात भिल्लीनीचे बोर खाणारा राम दलितांना अंतर देणाऱ्या मानसिकतेचा प्रचारक कसा, स्वतः वानर असलेला हनुमंत हिंदुत्ववादी व्हावा, जिवंतपणी योगीचे मंदिर व्हावे मोदींना अवतारी मानावे, यावर कुणाला आक्षेप नसतो
मात्र काल परवा भुजबळ म्हटले कि सावित्रीबाई, महात्मा फुले, आंबेडकर शाहू कर्मवीरांचे फोटो लावा आणि नंतर सरस्वतीचे पहा, मुळात देव सर्वांचा असतो हे मान्य झाले तर सावित्री सरस्वतीची वारस ठरते कारण लेकींना तिने शिकवले. मग आता आपल्या लेकीचा शाळेत फोटो लावला म्हणून कुठल्या आईला दुख होईल
संत साहित्य व लोकवाङ्मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏
'वारी' स्वरूप आणि परंपरा” या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सवात डॉ. देखणे आपले विचार मांडतात.
महाराष्ट्राच्या लोकजीवनात आणि लोकाचारामध्ये पांडुरंगाचे स्थान मोठे आहे. पांडुरग हा येथील लोकजीवनाचा मोठा आधारस्तंभ असून तो लोकदेव असल्याचे डॉ. देखणे सांगतात साने गुरुजींनी ‘महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मुका अध्यक्ष’ असे पांडुरंगाचे वर्णन केल्याचा संदर्भही त्यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे ज्ञानपीठ तर संत तुकाराम हे योगपीठ आहेत असे ते सांगतात.
परी ते मनाच्या कानी ऐकावे ।
बोल बुद्धीच्या डोळा देखावे ॥
हे सांटोवाटी घ्यावे । चित्ताचिया ॥
जे विचार मनाच्या कानाने ऐकले जातात, बुद्धीच्या डोळ्याने पाहिले जातात, चित्ताने साठवले जातात