गेल्या काही वर्षात देवांना देव्हारयातून थेट व्यवहारात म्हणजे मोकळच बोलायचं झाल तर थेट राजकारणातच आणले. रामाला तर स्टार प्रचारक केले आहे, हमुमानाची चालीसा आता एका पक्षाच्या अजेंड्यात असतो, म्हणजे देवाला स्वतःचे मंदिर बांधता येत नसल्याने रामाने एका
पक्षासोबत युती केली, तुम्ही माझ मंदिर बांधा आणि माझा खुशाल वापर करा, मुळात भिल्लीनीचे बोर खाणारा राम दलितांना अंतर देणाऱ्या मानसिकतेचा प्रचारक कसा, स्वतः वानर असलेला हनुमंत हिंदुत्ववादी व्हावा, जिवंतपणी योगीचे मंदिर व्हावे मोदींना अवतारी मानावे, यावर कुणाला आक्षेप नसतो
मात्र काल परवा भुजबळ म्हटले कि सावित्रीबाई, महात्मा फुले, आंबेडकर शाहू कर्मवीरांचे फोटो लावा आणि नंतर सरस्वतीचे पहा, मुळात देव सर्वांचा असतो हे मान्य झाले तर सावित्री सरस्वतीची वारस ठरते कारण लेकींना तिने शिकवले. मग आता आपल्या लेकीचा शाळेत फोटो लावला म्हणून कुठल्या आईला दुख होईल
पण आईचा वापर राजकारणासाठी करताना आम्ही देवतेचे समतातत्वच नाकारले. मुळात हाच देवावर अन्याय ठरतो राम हनुमान राजकीय रथाला जुंपल्यानंतर सरस्वतीला आपल्या पक्षात खेचल्याचे चित्र आहे, ७५ वर्षाच्या आसपास असलेल्या कुठल्या संघटना पक्षाला आपण हिंदू धर्म जपत वाढवत आहोत असा गैरसमज असेल
तर त्यांनी बुद्धी घासून घ्यावी ५००० वर्षापेक्षा अधिक जुनी असलेली सभ्यता अनेक सांस्कृतिक आक्रमणासमोर तगली, नुसती तगली नाही तर वाढली, मात्र भारत स्वतंत्र होऊन लांब अलीकडे आल्यावर कुणाला तरी हिंदू खतरेमे असल्याचा स्वप्नदोष झाला. म्हणजे देशात चार इस्लामिक शाह्या नांदत असताना
ग्यानबा तुकाराम चा गजर थांबला नाही, आणि आता लोकशाही असताना हिंदू खतरेमे आहे म्हणणारा खेटरानी जोडला पाहिजे.
सरस्वतीच्या फोटोबद्दल बोलत असतानाच, उत्तर प्रदेश मधील गोंडा मधील सरकारी शाळा. हिंदू शिक्षिका पूजा सिंग हिने, लहान हिंदू मुलीला दलित म्हणून शाळेतून काढून टाकले.
मग हिंदू खतरे में कोणापासून आहे ? मात्र इथे पुढून विचारायचे नाही. हिंदू म्हणून आम्ही बहुजनांना मंदिरे नाकारली ज्ञान नाकारले, मुळात जात म्हणून कुणाचाच निषेध केलाच नाही पाहिजे, अगदी ब्राम्हनांचा देखील ज्ञानेश्वर व भावंडे ब्राम्हणच होती ना, भुजबळ यांनी म्हटलेला तीन टक्के समाज
म्हणजे केवळ ब्राम्हण नाही तर कर्मकांड आहे. त्यांनी निषेध केलाय तो कर्मकांडाचा सरस्वतीच्या पाईकानी ज्ञानाची दारे केवळ काहींना उघडी आणि ज्ञानाच्या झोळीत शेण टाकण्याचे जे पातक केले आहे, ते किमान मान्य तर करणे गरजेचे आहे. सावित्री हीच सरस्वती आहे, किमान त्यांच्यासाठी
तरी ज्यांना सरस्वतीच प्राप्त झालेली नव्हती.
जंगल कट रहा था लेकिन सारे पेड़ कुल्हाड़ी को वोट दे रहे थे। क्योंकि पेड़ सोच रहे थे कि कुल्हाड़ी में लगी लकड़ी उनके समाज की है।
Preview.
रविवारी प्रकरण दाखल करून ठाकरेंना दोन दिवसात फ्लोवर टेस्ट बद्दल दम देणारे कोर्ट शिंदेना मात्र तारखावर तारखा बहाल का करते, यावर फारशी कुणाला तक्रार नाही, कारण सबब सर्वांनाच ठाऊक आहे. वरती मोदी नसते तर खाली फडणवीस परत आले नसते.
गेल्या पाच वर्षात सत्तातरांचे असे नमुने समोर आलेले आहे. निवडणूक आयोगासमोरील सुनावणीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. उध्दव ठाकरेंसाठी मोठा झटका आहे. ज्याला कोणाला पक्षांतर करायचं असेल त्याने सरळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि परत निवडून यावे.
मग ती एक व्यक्ती असो वा अनेक. शिवसेनेच निवडणुक चिन्ह उद्या निवडणुक आयोगाने गोठवल तरी त्याने काय फरक पडतो? काँग्रेस फुटली तेव्हा गाय वासरु निशाणी जाऊन इंदिराजींना हात ही निशाणी मिळाली आणि पक्षाच मुळ नाव पण गेल. पण त्याने काय फरक पडला ? १९८० च्या निवडणुकीत त्या प्रचंड बहुमताने
संत साहित्य व लोकवाङ्मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏
'वारी' स्वरूप आणि परंपरा” या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सवात डॉ. देखणे आपले विचार मांडतात.
महाराष्ट्राच्या लोकजीवनात आणि लोकाचारामध्ये पांडुरंगाचे स्थान मोठे आहे. पांडुरग हा येथील लोकजीवनाचा मोठा आधारस्तंभ असून तो लोकदेव असल्याचे डॉ. देखणे सांगतात साने गुरुजींनी ‘महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मुका अध्यक्ष’ असे पांडुरंगाचे वर्णन केल्याचा संदर्भही त्यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे ज्ञानपीठ तर संत तुकाराम हे योगपीठ आहेत असे ते सांगतात.
परी ते मनाच्या कानी ऐकावे ।
बोल बुद्धीच्या डोळा देखावे ॥
हे सांटोवाटी घ्यावे । चित्ताचिया ॥
जे विचार मनाच्या कानाने ऐकले जातात, बुद्धीच्या डोळ्याने पाहिले जातात, चित्ताने साठवले जातात