आनंद दिघे हे काँग्रेसविरोधक आणि भाजपभक्त ही त्यांची प्रतिमा आज निर्माण केली जातेय ती चुकीची आहे
भारतीय जनता पक्षाला ठाण्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिघे व डावखरे कधी उघडपणे तर कधी पडद्यामागून सूत्रे हलवीत
एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली आहे
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने शिवसेना मूळ विचारापासून दूर गेली
बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघे यांना हे मान्य झाले नसते
- अशी थाप हे लोक मारत आहेत
मुळात शिवसेनेचे एक अष्टप्रधान मंडळ होते. शिवसेनाप्रमुख या अष्टप्रधान मंडळाशी चर्चा करून निर्णय घेत
या अष्टप्रधान मंडळात व निर्णय प्रक्रियेत आनंद दिघे नव्हते
ठाण्यातील सतीश प्रधान हे नेते म्हणून त्या अष्टप्रधान मंडळात होते
त्यावेळी व नंतरही दिघे यांचे प्रभाव क्षेत्र ठाणे जिल्ह्याच्या बाहेर नव्हते, पण आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ राज्यात तेव्हा अनेकांना पडली होती
त्याग, निःस्वार्थी भावना व शिवसेनेवरील अढळ श्रद्धा ही त्यांची राज्यात ओळख होती
दिघे किती भाजपप्रेमी होते त्याचा एक प्रसंग👇
दिघे किती भाजपप्रेमी होते त्याचा १ प्रसंग-
शिंदे व त्यांच्या 40 गद्दारांना माहीत नसावा
1992 साली अयोध्येत बाबरी पडली
भाजपने जबाबदारी झटकली
बाबरी पाडणारे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे जाहीरपणे सांगणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समस्त देशाचे #हिंदुहृदयसम्राट बनले
देशात हिंदुत्वाची तुफान लाट त्यातून आली व शिवसेनाप्रमुख त्या लाटेचे नेतृत्व करू लागले
उत्तरप्रदेशात कल्याणसिंग सरकार बरखास्त केल्याने कल्याणसिंगांच्या कपाळावर हौतात्म्याचा टिळा लागलेला
कल्याण-डोंबिवली सह ठाणे या लोकसभा जागेवर भाजपचे राम कापसे शिवसेना-भाजप युतीतर्फे निवडून आलेले
ठाणे लोकसभेआधी कापसे हे कल्याण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत असत
तर या कापसे यांनी बाबरी पाडल्याचा आनंद म्हणून ठाण्याच्या सेंट्रल मैदानात भाजपची सभा लावली व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना सभेस बोलावून त्यांचा वीरोचित सत्कार करण्याचे ठरवले
ही सभा म्हणजे ठाण्यातील शिवसेनेस अप्रत्यक्ष आव्हान देण्याचा पहिला प्रयोग होता
आनंद दिघे यांना हे पटले नाही. त्यांनी सभेत मोडता घातला नाही, पण संध्याकाळी ते सभेच्या ठिकाणी दूर एका बाजूला गाडीत बसून सभा ऐकायला गेले
त्यांचे खास लोक गाडीत बसले होते.
सभा सुरू होताच खा. राम कापसे यांनी भाषणात कल्याण सिंग यांचा उल्लेख देशाचे एकमेव हिंदुहृदयसम्राट असा करताच दिघे अस्वस्थ झाले
मी आता सांगतो, इकडची दुनिया तिकडे होईल, पण कापसे पुन्हा ठाण्याचे खासदार नसतील. ठाण्याचा खासदार फक्त शिवसेनेचाच असेल!” आनंद दिघे त्या गाडीतच जाहीर करून बसले.
ही खदखद त्यांनी मनातच ठेवली, पण लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच जागा वाटपात ठाण्याचा विषय येताच दिघे यांनी #ठाणेलोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा सांगितला.
ठाण्यात भाजप चालणार नाही.
दिघे बाळासाहेबांना भेटले व त्यांनी आग्रह केला - “राम कापसे व #भाजप ठाण्यात चालणार नाहीत”
“राम कापसे व भाजप ठाण्यात चालणार नाहीत. शिवसेनाप्रेमी जनता त्यांचा पराभव करेल. ठाण्याचा खासदार शिवसेनेचाच होईल.”
शिवसेनाप्रमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी दिघे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण दिघे ठाम होते. अखेर त्यांच्या हट्टापुढे सगळ्यांना मागे हटावे लागले.
कापसे यांना मागे ठेवून ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आला व महापौर निवडणुकीत पराभूत झालेले प्रकाश परांजपे शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभेत निवडून गेले
भारतीय जनता पक्षाच्या शिवसेनाद्वेषाला आव्हान देणाऱ्या दिघ्यांचे हे खरे रूप होते, पण शिंदेनिर्मित चित्रपटात ते कोठेच दिसले नाही!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतला
दिघे यांची आठवण शिंदेंना 21 वर्षांनंतर झाली
आपण दिघे यांच्या किती निकट हे दाखविण्यासाठी शिंदेंनी काही कोटी खर्च करून ‘धर्मवीर’ सिनेमा काढला
सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला. हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना पडला
कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व शिवसेना फोडली
शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीव्हीवर या सिनेमाचा भडीमार सुरू आहे तो फक्त शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी.
जसे मोदींनी आपण सरदार पटेलांसारखे लोहपुरूष दाखवायचा प्रयत्न केला तसेच
या चित्रपटाद्वारे दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हेच एक अद्भुत व्यक्तिमत्त्व असल्याचे दाखविण्यात आले.