#ज्ञानेश्वर
भटभिक्षुकीवृत्तीने ज्ञानराया सारख्या योगीचे ब्राह्मण्य नाकारले, त्याना वेद बोलण्यास मज्जाव केला. संन्यास्याची लेकरं म्हणून हेटाळणी केली, अन्न पाण्यासाठी झिडकारले. वर्णव्यवस्थेचा आघात करून त्याना समाजवंचित ठेवण्याचा जो यत्न केला, तो अगदी मानवतेच्या विरोधात होता. 👇
हे सगळं पाहून त्या बाल ज्ञानरायाच्या काळजाला चरे पडले, मन अक्षरशः दुःखात निराशेच्या गर्तेत आकंठ बुडाल. समाजातील वर्णवादी लोकांना दूषण देत, रडत झोपडीत गेला आणि दार बंद करून मनाशी मोठा निश्चय केला- आपल्याला मुळीच जायच नाही ह्या लोकांत. आणि ह्या सगळ्या वेदना सहन करत घरातच थांबला.👇
तेवढ्यात स्वभावाने संवेदनशील-निर्मळ आणि वाणीने सडेतोड फटकळ असणारी मुक्ता तिथं आली.
कुटीत ज्ञानेश्वर पाहिले, आणि विचारणा केली काय झालं दार का लावलं रे दादा ? उघड ती ताटी.! त्यावर ज्ञाना दुःखी स्वरात आणि हलक्या रागाने फुरफुरत म्हणाला - कशाला येऊ बाहेर, अपमान करून घ्यायला ?👇
कशाला येऊ बाहेर, हे लोक आपल्याला स्वीकारतच नाही, आपल्याला साधी माधुकरी काय, पाणी सुद्धा देत नाही. शिवत नाही. शूद्रापेक्षाही, हलकट व्यवहार आपल्याशी केला जातोय, आई बाबाचा जीव घेऊन झाला तरी आपल्याला स्वीकारत नाही, हे सगळं मला सोसत नाही. मी मुळीच बाहेर येणार नाही. 👇
त्या सगळ्या दुःखाच निराकारण करण्याकरीता आणि आपल्या भावाला नवउर्जा-नवचैतन्य देण्याकरिता जे ताटीचे अभंग म्हटले ते सर्वश्रुतचं आहे. मुक्ताबाई म्हणते -
संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें
तरीच अंगी थोरपण । जया नाही अभिमान
थोरपण जेथे वसें तेथे भूतदया असें. 👇
संत तेचि जाणा जगीं। दया क्षमा ज्यांचे अंगी
लोभ अहंता न ये मना। जगी विरक्त तोची जाणा
- तू संत झालाय, संताला जगाचे बोलणं सोसावच लागत. आणि कुणावर राग धरतो, हे सगळे आपलीच माणस आहेत. 👇
दया क्षमा शांती हे तुझ्यासारख्या योगीनाथाचे भूषण आहे. त्याना माफ कर आणि ताटी उघड.
जीभ दातानी चावीली, कोणे बत्तीशी तोडीली.!
असा खडा सवाल करत मुक्ता सांगतेय- आपल्याच दातांनी आपली जीभ चावली म्हणून आपण दात पाडतो काय.? ही सगळी आपली लोक आहेत. सुखसागर होऊन जगाला बोध कर. 👇
दुःखाची ताटी उघडून, तुझ्या ज्ञानाचा प्रकाश सर्व ज्ञानवंचित लोकांना दे. अशी सर्व समजुत घातल्यावर ज्ञानाचा राग शांत झाला
हे सगळं ऐकून, खाडकन ताटी उघडून, ज्ञानाची दारे सताड खुली केली, गुरुपित्याकडून आलेला उपदेश ब्राह्मणेतर जगाला केला. अडाणी जगाला सद्ज्ञानाचा झरा खुला केला. 👇
जसे अखंड तर्कशास्र आणि आध्यात्मिक शास्राचे आगार म्हणजे उपनिषदे. त्याचे संपुर्ण सार- कर्मधर्मकर्ता श्री योगेश्वराच्या भगवद्गीतेत, पण ते ब्राह्मणभाषा संस्कृतमधे असल्याने गोरगरीब त्रिवर्णीयांना समजण्यास कठीण, मात्र ज्ञानेश्वरानी ते सुलभ सोप्या अशा मायबोली मराठी भाषेत मांडले. 👇
असा स्वतःच्या कार्याचा सुंदर उल्लेख ज्ञानेश्वर सांगतात. ज्ञानेश्वर एवढ्या थोर मनाचा प्रतिभावंत कवी, धर्मशास्त्र, चारीवेद, उपनिषद, अध्यात्म आदींचा परिपूर्ण-परिपक्व-परिपोष असलेला ज्ञानयोगी. 👇
ज्ञानेश्वर एवढे थोर की स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतंत्र ग्रंथकार्य निश्चितच करू शकत होते. तरीही त्यानी गीता अनुवादाचे दुय्यम ग्रंथकर्तव्य स्वीकारले. कारण त्यानी भटभिक्षुक मंडळीं अन भटांच्या वर्णवादी ओंजळीने पाणी पिणाऱ्याकडून हाल सोसले. त्याना जाणीव झाली. 👇
समाजतील सर्व लोकांना ईश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. तस त्यांनी त्याकाळच्या पैठणच्या बिलदंर धर्मपीठाला उद्देशुनच म्हटलंय.
( अहो हे धर्मपीठ कसले ? हे तर भटाळ कंपनीकृत मनुवादाचे पीठ पाडण्याची आणि गोरगरिबांच्या उरावर शेंडी जानव्याचे जातं फिरवण्याची क्रूर गिरणीच ती. ) 👇
मनुवादाच्या जाचक नियमाने सामान्य माणसाला प्रभुची भक्ती आणि संदेश समजून घेणे फार कठीण झाले. वेद उपनिषदे आणि गीतेचे ईश्वरी भांडार सर्वाना खुले केले. लोकांनां अध्यात्म सोपं करून सांगितले, धर्म समजुन सांगितला, उदारमतवादाची स्थापना केली तेही अगदी कोवळ्या तरुण वयात. 👇
वेगवेगळ्या ठिकाणी फिरून लोकोपदेश केला,
गुरु बंधू निवृत्तीनाथाचे शिष्य असल्याने शैव पंथातील, तरीही पंढरीच्या पांडुरंगाची प्रेमाने भक्ती केली, शैव आणि वैष्णव असे दोन्ही भक्तीपंथ एकत्र आणण्याचे महान कार्य केले. सोबतच्या संत मंडळींना मोलाचे मार्गदर्शन करून संत चळवळ फुलविली.👇
एवढयाशा वयात, ज्ञानेश्वर प्रतिभाशाली कवी, मोक्षदाते, अध्यात्मगुरु, धर्मचिकित्सक. जीर्णमताचा धिक्कार करून आधुनिक नवविचाराचे पुरस्कर्ते. आता विश्वात्मक देवें म्हणोन, ईश्वर निर्गुण निराकार असल्याची ग्वाही दिली. पसायदान सारखी गोड प्रार्थना करून सदभावनेचा संदेश दिला. 👇
13 व्या शतकापासून जी अध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात जी लोकशाही निर्माण झाली त्याचा पाया ज्ञानरायांनीच रचला, बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीची जी लोकक्रांती झाली तिचा श्रीआरंभ ज्ञानरायांनीच केला. असे मराठी भाषाभिमानी, मराठीत ज्ञानेश्वरी रचून भगवद्गीतेवर अप्रतिम अशी टीका लिहली. 👇
भाषाप्रभू राम शेवाळकर तर म्हणतात- ज्ञानेश्वरानी गीतेचा सुलभ अनुवाद करून मराठी माणसाच्या उंबरठ्यावर मोक्ष आणून ठेवला.
अन गीतेतील कर्म धर्म ज्ञान अशा सर्व योगाची मुक्त उधळण करत समाजातील ज्ञानवंचित लोकांना सुखी केलं. ज्ञानेश्वरांची कवी म्हणून एक वेगळीच उंची होती. 👇
व्याकरण, अलंकार, ओघवत्या अमोघ मधुर काव्याचा आणि दृष्टांताचा तर पाऊसच पाडलाय ज्ञानोबांनी.
अशी ज्ञानेश्वरी अनेक लोकांच्या चिंतनाचा, अभ्यासाचा विषय, पण ज्ञानेश्वरीचा जन्म केवळ सामान्य मराठादेशाच्या उध्दारासाठीच झालाय हेच त्रिकाळबाधित सत्य आहे. आणि याची आपण जपणूक केली पाहिजे. ❤️🌿
गोब्राह्मण प्रतिपालक नाही रयतेचे राजे.
पुराव्यासाहित #Thread पूर्ण वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपलब्ध पत्रात महाराज कधीही स्वतःला गोब्राह्मण-प्रतिपालक अज्जिबातच म्हणवून घेत नाहीत. शिवचरित्र साहीत्य खंड मधील वाक्य महाराज म्हणत नाहीत, तर तो मोरेश्वर गोसावी म्हणतो. 👇
इ.स - १६४७- १६४८ च्या पत्रात त्या ब्राह्मणांने राजांवर खुश होऊन म्हटल आहे. तसा निर्वाळा थोर इतिहासक संशोधक -त्र्यंबक शंकर शेजवलकर देतात.
आणि त्या ब्राह्मणाने म्हटलं असेल तर त्यात वावग काहीच नाही. ती त्याची राजप्रति असलेलं प्रेम आणि भावना असावी. पण केवळ तेच उचलून मनाचे मांडे नको
हेच ते पत्र - या पत्रात आपण नीट वाचलं तर उमजून येईल, यात तो ब्राह्मण राजांना म्हणतोय - महाराज गो ब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती, आणि त्याच्या खाली 'महाराज कृपाळु हो, अस लिहल आहे. जर राजांनी स्वतः पत्र लिहले असते तर त्यात कृपाळु हो वैगरे लिहून स्वतःची आत्मप्रौढी मिरवली असती का ? 👇
3 शतकापासून व त्याआधीचाही इतिहास समजून घेतला तर उमजून येईल की महाराष्ट्रावर फक्त दक्षिण आणि महाराष्ट्रातील लोकांनीच सत्ता गाजवली आहे.
दिल्लीने अज्जिबात नाही. मग ते मौर्य असतील, तुघलक असतील, मोघल असतील.
ह्याच सह्याद्रीच्या काळ्या दगडाने सर्वांची माथी फोडली आहे.
आक्रमण नक्कीच झाले असतील. त्याची तर माळच लागेल गिणती करायला गेलं तर.
पण महाराष्ट्रभूमी आणि दक्षिणेवर बाहेरच्या लोकांना खास चमक दाखवता आली नाही.
(अपवाद युरोपियन लोकांचा सोडला तर )
याच कारणं आणि समान उदाहरण द्यायचे झाले तर. जगातील सर्वोच्च नीचात्म्यापैकी एक अशा हिटलर -
हिटलर जेव्हा रशिया जिंकण्यासाठी जातो तेव्हा तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता उतावीळ पण रशियात घुसतो, पण - उणे ४० तापमानाची सवय फक्त त्याच भूमीपुत्राना असल्याने जर्मन सैन्य हाल बेहाल होऊन मरतात. आणि नाझी भक्ताना तिथ हार मानावी लागली.
#औरंगाचे_बेरंग ( भाग-१)
१) मुघल औरंगजेब हा अतिशय हरामखोर व नीच दानतीचा क्रूर रानटी शासक होता.
याचा दाखला देताना, त्याकाळचा 'बर्नियर नावाचा एक प्रवाशी सांगतो- मुघल राज्यात कोणी सरदार, उमराव कर्तव्यावर गेले की, औरंगजेब त्यांची सगळी मालमत्ता सोने-चांदी आदी माया जप्त करत असे.
२) मुख्य याच कारणाने मोघली सरदार- उमराव, अज्जिबात तणाव घेत नव्हते, फार दिलखुलास राहायचे, चैन करायचे, तऱ्हेतऱ्हेचे शौक- नाटकशाळा, रंगशाळा आदीमध्ये दौलत फुकुन यायचे.
त्याना माहीत होतं मतलबी बादशहा, आपण खपल्यानंतर आपल्या कुटूंबाला चुकुन -ढुंकून- थुंकूनही बघणार नाही.
३) बादशहा त्यांची मालमत्ता जप्त करताना त्यांचे घरदार सुद्धा जप्त करायला मागेपुढे बघत नसत. मर्जी झालीच तर पुढे त्या सरदाराच्या कार्ट्याना बक्षीसी वैगरे देत सरदारी बहाल करी.
ह्या सगळया भिकार भानगडीचा विचित्र परिणाम मोघल प्रजेवर, राज्यावर, आर्थिक परिस्थिती अन व्यवस्थेवर झाला.
#Thread - महाराष्ट्राचा पहिला सार्वजनिक नवरात्र उत्सव -
"श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव"
( दादर-मुंबई- महाराष्ट्र राज्य )
हा उत्सव कुणी सुरू केला, त्यामागचा सद्हेतू काय होता. मराठी मातीचा गौरव वाढवणाऱ्या ह्या नवरात्र उत्सवाबद्दल माहिती देणारा हा लेख संपूर्ण वाचा. ( १३/१)
1920 च्या दशकातील घटना-
दादर ला सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होण्यास बहुजन बांधवाना बंदी होती, यातून पूज्य डॉ आंबेडकर, रा. बोले व प्रबोधनकार ठाकरे यांनी आंदोलन उभा करत तो डाव हणून पाडला, यापुढे उत्सवात दलित नको ह्या कुयोजनेने ब्राह्मणांनी गणेशोत्सव बंद पाडला. ( १३/२)
मात्र प्रबोधनकार ठाकरेना मनोमन वाटायचे असा कुठला तरी उत्सव असावा ज्यात स्पृश्य-अस्पृश्य आदी मंडळी आनंदाने सहभागी व्हावे व महाराष्ट्र धर्म वृद्धिंगत व्हावा. याच पुण्यहेतू कारणे राव बहादूर बोले यांच्या बंगल्यावर अनेक पुरोगामी मंडळींची नियोजनबद्ध बैठक झाली व ठरले.. (१३/३)
आज महाराष्ट्राचे लाडके, प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती. या निमित्ताने त्यांच्या महालोकप्रिय अशा देवळाचा धर्म धर्माची देवळे या पुस्तकातली काही मुख्य ओळी थ्रेडमार्फत आपल्या वाचनास देत आहे. नक्की वाचा..👍 आणि त्यावर विवेकबुद्धीने चिंतन करा. #लोकप्रबोधनदिन 🔥
१) देवळें म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या. देवळाशिवाय भट नाहीं आणि भटाशिवाय देऊळ नाहीं.
३) देशांतला शेतकरी कळण्याकोंड्याला आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला, तरी देवळांतल्या भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिला एवढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही
४) गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही
हा भटांचा ‘सनातन धर्म’ त्यांनी आजर्यंत पोटापाड मेहनत करून टिकविला आहे