#नरकचतुर्दशी 🧵
आश्विन वद्य चतुर्दशी,
श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर / नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला.++
श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व स्त्रियांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. ++
त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.++
आदल्या रात्री १२ वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते; कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते.नादयुक्त कंपन लहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनीची निर्मिती करतात++
या लहरींतील ध्वनीकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणार्या तेजतत्त्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रज-तम कणांचे विघटन केले जाते. ++
आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात. ++
अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, ++
प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा करतो.
पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान. वसंतोत्सवाचा प्रारंभ दिवस म्हणजे फाल्गुन कृष्ण प्रतिपदा. दिवाळी चे तीन दिवस ++
आश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा.
आपल्या सर्वांच्या जीवनात, ही दीपावली समृद्धी उत्तम आरोग्य आणि सुख घेऊन येवो हीच प्रार्थना 🙏🙌🎇🎆🪔🪔( वरील माहिती सनातन पंचांग व भागवत पुराण तून घेतलेली आहे.)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
कार्तिक शुक्ल द्वितीया अर्थात यमव्दितीया किंवा #भाऊबीज.
ऋग्वेदात एक कथा आहे, जेव्हा ब्रम्ह देवांनी पृथ्वी चा निर्माण केला, सर्व ऋषींनी त्याची परतफेड म्हणून यज्ञकर्म करायचे ठरवले, यज्ञात बळी द्यावा लागतो तेव्हा यमराज ने बळी म्हणून जायला तयारी दाखवली, यमाने यज्ञात++
उडी घेतली हे पाहून बहिण यमी ने ही यज्ञात उडी घेतली, संतुष्ट इष्ट देवांनी वर दिला, की लोक हा दिवस नेहमी लक्षात ठेवतील यमव्दितीया म्हणून साजरा करतील. यम दिसायला सुंदर होता आहे, मृत्यू नसेल तर जग काय असेल याचा विचार न केलेला बरा, जीवनचक्र संतुलित राखण्यासाठी तो आवश्यक आहे. ++
भारतीय संस्कृती औदार्य आणि कर्तृत्व ह्यांची पूजक राहिली आहे. म्हणून कदाचित भगवान शंकराने बीजेचा चंद्र माथ्यावर धारण केला आहे. आता बहिण भावाला ओवाळते भाऊबीज दिवशी याची कथा पाहूया, भगवान सूर्य आणि माता छाया (विश्वकर्मा यांची मुलगी संज्ञा) यांच्या पोटी यम आणि ++
Thread🧵 दिवाळी पाडवा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा ( दिवाळी पाडवा ). श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते.
बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. ‘दान देणे’ हा गुण आहे; ++
पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे.सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात.++
बलीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार (वामनावतार) घेतला. (मुंजा मुलगा लहान असतो अन् तो ‘ॐ भवति भिक्षां देही ।’ म्हणजे ‘भिक्षा द्या’ असे म्हणतो.) वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, ‘‘काय हवे ?’’++