#बळीराजा
ईश्वर अवतार घेतो केव्हां? आणि कशाला?
परित्रणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम् ..!
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे..!
साधू संतांचे रक्षण करवून, गोरगरिबांचे कल्याण, आणि दुष्टाचा नाश करायला. याचाच अर्थ धर्माची संस्थापना होय.
मग बळीराजाने कोणते दुष्कर्म केलं ? 👇
बळीराजा हा जुलमी राजा होता ? प्रजेवर अन्याय करत होता ? तो प्रजेचा छळ करत होता ? त्याने साधू संताना त्रास दिला ? त्यांच्या यज्ञात बाधा आणली ? स्रियांना त्रास दिला ?
अज्जिबातच नाही. तसा उल्लेख कुणी वाचला नाही कारण तसा उल्लेख कुठेच नाही, बळीराजा हा अंत्यत न्यायप्रिय राजा होता 👇
बळीराजा हा प्रजाहितदक्ष राजा होता- त्याची चुकी काय एवढीच सांगितले जाते की-
त्याने शताश्वमेघ यज्ञ करून खुद्द इंद्राचे सिंहासन घेणार होता. त्याचें ९९ मेध पूर्ण होऊन १०० व्याला सुरूवात झाली होती. तेवढ्यात बुटका, आखूड पावलांचा, मोहक चेहऱ्याचा एक सुकुमार बटू येऊन उभा राहिला. 👇
तस पाहिलं तर भारतीय क्षत्रिय राजे आधीपासूनच उदार मनोवृत्तीचे कुठेही कपट नाही- विशेष कुणी साधू, ब्राह्मण, फकीर आला की तिजोरीतील खजिना त्यांच्या पायावर रिता करायला मागेपुढे बघणार नाही. एवढे उदार.
याच कारणाने आमच्या श्रेष्ठ श्री विष्णुदेवाने ब्राह्मण अवतार अर्थात वामन अवतार घेतला👇
त्याना माहीत होतं- बळीराजाकडे काही मागितलं तर नाही म्हणणार नाही- अशा आणि यज्ञाच्या काळात मागणी केली असल्याने. त्यात बळीने वामन महाराजांना विनंती केली काय इच्छा आहे आपली प्रभू - ती मागणी आपल्याला माहीत आहे. तीन पावले जमीन दे.
त्यात बळीला हसू आलं, कसली क्षुल्लक मागणी केली. 👇
पण श्री वामन यांनी आपला देव अक्राळ विक्राळ करत एक पाऊल स्वर्गावर एक पाऊल धरणीवर देऊन व्यापले. मग पुढच पाऊल कुठं टाकू विचारलं ? तेव्हा बळी आपल्या क्षत्रिय धर्माला जागला आणि वचन पुर्ण करायला म्हटला माझ्या टाळक्यावर ठेवा. आणि त्याच क्षणी श्री वामन प्रभुनी बळीला थेट पाताळात लोटला.👇
नंतर वामन त्यावर प्रसन्न झाले बळीला पाताळाचे राज्यपद दिले. आणि स्वतः त्याचे द्वारपाल झाले.
हे सगळं वाचलं तुम्ही ! यात तुम्हाला ईश्वर अवताराचे महानकार्य दिसले ? यात वामनाने कुठे गोर गरिबांचे कल्याण केले ? यात कुठं साधू संतांचे परित्राण केलं ? यात कोणता थोर संदेश दिला ? 👇
जसे रामाने आणि कृष्णाने, नरसिंहाने अवतार घेऊन मानवाला अनेक नीतिमूल्ये शिकवली. प्रेम, सद्गुण, दया, क्षमा, शांती, मोठ्यांचा आदर शिकवला. - अन्यायी लोकांचे वध केले. दुष्ट लोकांना धर्म सांगितला. अहंकारी लोकांना अद्दल घडवली. गोरगरीब लोकांचे दुःख दूर करून अनेकांना मोक्षमार्ग दिला. 👇
बळीराजा हा काय राक्षस होता ? बळीराजा हा पापी होता का? त्याने कुणाचे अहित केले ? त्याना कुण्या गरिबाला छळले.? याचे दाखले कुठेही नाही. कारण तो तसा नव्हताच. त्याचा गुन्हा एकच की तो इंद्राची सत्ता घेणार होता. हीच भीती इंद्राला वाटली म्हणून विष्णूंना विनंती केली बळीकडे बघा.👇
यापूर्वी आपण वाचलं असेल. कैक नीच दैत्य लोकांनी त्रैलोकवर आक्रमणे केली. मग तो रावण असेल. अथवा इतर दैत्य मंडळी.
बळीने रावणाप्रमाणे कुणा देवाला बंदीवान केलं नाही. बळीने जरासंधा सारख राजेलोक बंदी केले नाही. बळीने हिरण्यकश्यपा सारख देवाच्या जपावर- भक्तीवर बंदी आणली नाही.👇
त्याने कुठलेही दुष्कर्म केलं नाही. तरीही त्याला कट पाताळात ढकलले.
या कथेत आपल्याला निरीक्षण केल्यास दिसून येईल - बळीची ईश्वरभक्ती, प्रजाहितदक्ष कारभार, सर्वगुणसंपन्नता, कुणी ब्राह्मण आला तर त्याला रित्या हाताने परत जाऊ न देणे. साधू ब्राह्मणाना दिलेले वचन पाळणे. 👇
त्यासाठी स्वतःच्या महाराज्यविस्तार या प्रिय महत्वकांक्षावर तात्काळ पाणी सोडून राज्यत्याग करणे. अन प्रभुनी त्याला पाताळात पाठवले तर त्यावर गुरगर न करता. वचन आज्ञा पाळणे. हे सगळं निरीक्षण सर्वाना दिसून येईल. 👇
वामन अवतार विष्णूच्या इतर अवताराच्या सर्वस्वी उलट अवतार आहे. भटभिक्षुकी मनोवृत्तीने अवतार मुद्दाम विष्णुच्या अवतार लिस्ट मध्ये घुसडून दिला असे ठाम मत महाराष्ट्राचे प्रबोधनकार केशव ठाकरे यांचे आहे. आणि ते अनेकांना बरोबरच वाटते. ईश्वर अवताराची एकही उद्देश या वामन अवतारात नाहीच. 👇
आता ही सगळं पुराणकथा वाचून तुम्हीच ठरवा हा ब्राह्मणरुपी वामन अवतार कोणत्या धर्म संस्थापनेसाठी झाला होता की आपले राज्य वाचविण्यासाठी ?
गोब्राह्मण प्रतिपालक नाही रयतेचे राजे.
पुराव्यासाहित #Thread पूर्ण वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपलब्ध पत्रात महाराज कधीही स्वतःला गोब्राह्मण-प्रतिपालक अज्जिबातच म्हणवून घेत नाहीत. शिवचरित्र साहीत्य खंड मधील वाक्य महाराज म्हणत नाहीत, तर तो मोरेश्वर गोसावी म्हणतो. 👇
इ.स - १६४७- १६४८ च्या पत्रात त्या ब्राह्मणांने राजांवर खुश होऊन म्हटल आहे. तसा निर्वाळा थोर इतिहासक संशोधक -त्र्यंबक शंकर शेजवलकर देतात.
आणि त्या ब्राह्मणाने म्हटलं असेल तर त्यात वावग काहीच नाही. ती त्याची राजप्रति असलेलं प्रेम आणि भावना असावी. पण केवळ तेच उचलून मनाचे मांडे नको
हेच ते पत्र - या पत्रात आपण नीट वाचलं तर उमजून येईल, यात तो ब्राह्मण राजांना म्हणतोय - महाराज गो ब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती, आणि त्याच्या खाली 'महाराज कृपाळु हो, अस लिहल आहे. जर राजांनी स्वतः पत्र लिहले असते तर त्यात कृपाळु हो वैगरे लिहून स्वतःची आत्मप्रौढी मिरवली असती का ? 👇
#ज्ञानेश्वर
भटभिक्षुकीवृत्तीने ज्ञानराया सारख्या योगीचे ब्राह्मण्य नाकारले, त्याना वेद बोलण्यास मज्जाव केला. संन्यास्याची लेकरं म्हणून हेटाळणी केली, अन्न पाण्यासाठी झिडकारले. वर्णव्यवस्थेचा आघात करून त्याना समाजवंचित ठेवण्याचा जो यत्न केला, तो अगदी मानवतेच्या विरोधात होता. 👇
हे सगळं पाहून त्या बाल ज्ञानरायाच्या काळजाला चरे पडले, मन अक्षरशः दुःखात निराशेच्या गर्तेत आकंठ बुडाल. समाजातील वर्णवादी लोकांना दूषण देत, रडत झोपडीत गेला आणि दार बंद करून मनाशी मोठा निश्चय केला- आपल्याला मुळीच जायच नाही ह्या लोकांत. आणि ह्या सगळ्या वेदना सहन करत घरातच थांबला.👇
तेवढ्यात स्वभावाने संवेदनशील-निर्मळ आणि वाणीने सडेतोड फटकळ असणारी मुक्ता तिथं आली.
कुटीत ज्ञानेश्वर पाहिले, आणि विचारणा केली काय झालं दार का लावलं रे दादा ? उघड ती ताटी.! त्यावर ज्ञाना दुःखी स्वरात आणि हलक्या रागाने फुरफुरत म्हणाला - कशाला येऊ बाहेर, अपमान करून घ्यायला ?👇
3 शतकापासून व त्याआधीचाही इतिहास समजून घेतला तर उमजून येईल की महाराष्ट्रावर फक्त दक्षिण आणि महाराष्ट्रातील लोकांनीच सत्ता गाजवली आहे.
दिल्लीने अज्जिबात नाही. मग ते मौर्य असतील, तुघलक असतील, मोघल असतील.
ह्याच सह्याद्रीच्या काळ्या दगडाने सर्वांची माथी फोडली आहे.
आक्रमण नक्कीच झाले असतील. त्याची तर माळच लागेल गिणती करायला गेलं तर.
पण महाराष्ट्रभूमी आणि दक्षिणेवर बाहेरच्या लोकांना खास चमक दाखवता आली नाही.
(अपवाद युरोपियन लोकांचा सोडला तर )
याच कारणं आणि समान उदाहरण द्यायचे झाले तर. जगातील सर्वोच्च नीचात्म्यापैकी एक अशा हिटलर -
हिटलर जेव्हा रशिया जिंकण्यासाठी जातो तेव्हा तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता उतावीळ पण रशियात घुसतो, पण - उणे ४० तापमानाची सवय फक्त त्याच भूमीपुत्राना असल्याने जर्मन सैन्य हाल बेहाल होऊन मरतात. आणि नाझी भक्ताना तिथ हार मानावी लागली.
#औरंगाचे_बेरंग ( भाग-१)
१) मुघल औरंगजेब हा अतिशय हरामखोर व नीच दानतीचा क्रूर रानटी शासक होता.
याचा दाखला देताना, त्याकाळचा 'बर्नियर नावाचा एक प्रवाशी सांगतो- मुघल राज्यात कोणी सरदार, उमराव कर्तव्यावर गेले की, औरंगजेब त्यांची सगळी मालमत्ता सोने-चांदी आदी माया जप्त करत असे.
२) मुख्य याच कारणाने मोघली सरदार- उमराव, अज्जिबात तणाव घेत नव्हते, फार दिलखुलास राहायचे, चैन करायचे, तऱ्हेतऱ्हेचे शौक- नाटकशाळा, रंगशाळा आदीमध्ये दौलत फुकुन यायचे.
त्याना माहीत होतं मतलबी बादशहा, आपण खपल्यानंतर आपल्या कुटूंबाला चुकुन -ढुंकून- थुंकूनही बघणार नाही.
३) बादशहा त्यांची मालमत्ता जप्त करताना त्यांचे घरदार सुद्धा जप्त करायला मागेपुढे बघत नसत. मर्जी झालीच तर पुढे त्या सरदाराच्या कार्ट्याना बक्षीसी वैगरे देत सरदारी बहाल करी.
ह्या सगळया भिकार भानगडीचा विचित्र परिणाम मोघल प्रजेवर, राज्यावर, आर्थिक परिस्थिती अन व्यवस्थेवर झाला.
#Thread - महाराष्ट्राचा पहिला सार्वजनिक नवरात्र उत्सव -
"श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव"
( दादर-मुंबई- महाराष्ट्र राज्य )
हा उत्सव कुणी सुरू केला, त्यामागचा सद्हेतू काय होता. मराठी मातीचा गौरव वाढवणाऱ्या ह्या नवरात्र उत्सवाबद्दल माहिती देणारा हा लेख संपूर्ण वाचा. ( १३/१)
1920 च्या दशकातील घटना-
दादर ला सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होण्यास बहुजन बांधवाना बंदी होती, यातून पूज्य डॉ आंबेडकर, रा. बोले व प्रबोधनकार ठाकरे यांनी आंदोलन उभा करत तो डाव हणून पाडला, यापुढे उत्सवात दलित नको ह्या कुयोजनेने ब्राह्मणांनी गणेशोत्सव बंद पाडला. ( १३/२)
मात्र प्रबोधनकार ठाकरेना मनोमन वाटायचे असा कुठला तरी उत्सव असावा ज्यात स्पृश्य-अस्पृश्य आदी मंडळी आनंदाने सहभागी व्हावे व महाराष्ट्र धर्म वृद्धिंगत व्हावा. याच पुण्यहेतू कारणे राव बहादूर बोले यांच्या बंगल्यावर अनेक पुरोगामी मंडळींची नियोजनबद्ध बैठक झाली व ठरले.. (१३/३)