🔥मंडळी,
🔸आज ३१ ऑक्टोबर, स्वतंत्र भारताचे पहीले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐 #Statue_of_Unity
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच असा पुतळा बांधायचं गुजरात सरकार ने ठरवलं तेव्हा आजचे पंतप्रधान +
मा. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.
🔸रितसर निविदा प्रक्रिया करून PPP model ने L&T या कंपनीला काम दिलं.
३१ ऑक्टोबर २०१४ ला भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झालं आणि रितसर कामाला सुरुवात झाली.हजारो लोक त्यावर अहोरात्र काम करत होते. +
तेव्हा सगळे कावळे, मावळे, फुरोगामी गाढ झोपेत होते.
३१ ऑक्टोबर २०१८ ला पुतळ्याचं अनावरण होणार होतं, काही दिवस आधी ह्या पुतळ्याचं भव्य दिव्य स्वरूप समोर आलं आणि हे कावळे, मावळे, फुरोगामी झोपेतून खाडकन जागे झाले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, +
त्यांना कळून चुकलं कीं हे फारच काही तरी आहे आणि आपल्याला हे भारी पडणार.
आणि मग एकेकाचं विव्हळणं सुरू झालं, काय गरज होती एवढा खर्च करायची, एवढ्या पैशातून किती गरीबांची घरं झाली असती, कितीतरी शेतकऱ्यांना या पैशांचा फायदा झाला असता, सैन्याच्या उपयोगी आले असते आणि अजून बरंच काही.+
आता तो पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून जगासमोर आलाय, हे कावळे, मावळे, फुरोगामी यांच्या समोर आता केवळ विव्हळत बसण्याशिवाय आणि बर्नाॅल चोळत बसण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही. +
दारात एखादा भिकारी आला तर 'ए पुढच्या घरी जा' म्हणणारे हे लोक गरीबांचा पुळका दाखवून सरदार पटेलांसारख्या महान व्यक्तिच्या त्या भव्य दिव्य स्मारकाला, ज्यामुळे संपूर्ण जगात देशाची मान उंचावणार आहे त्याला कोरड्या उलट्या काढून अपशकुन करीत होते ते खरंच धन्य आहेत. +
🔥स्टॅट्च्युविषयी थोडंसं...
७५००० क्युबिक मीटर काँक्रीट, १८००० मेट्रिक टन स्टील, ५७०० मेट्रिक टन स्ट्रक्चरल स्टील, क्लॅडिंगसाठी २२५०० ब्राँझ शीट्स एवढं मटेरियल वापरून २४० मीटर उंच बेस स्ट्रक्चर असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा जगातला सर्वात उंच पुतळा +
गुजरातमधील नर्मदा नदीच्या तीरावर उभारण्यात आलाय.
यातील चीनच्या एका कंपनी कडून घेतलेले ब्राँझ शीट्स सोडले तर बाकी सर्व मटेरियल हे आपल्या भारत देशातच उत्पादन करून वापरण्यात आलंय.
१ क्युबिक मीटर काँक्रीट करण्यासाठी +
सरासरी ९ सिमेंट बॅग वापरल्या असं समजलं तर एकूण कामासाठी ६ लाख ७५ हजार सिमेंट बॅग वापरल्या आहेत, त्याचबरोबर १ क्युबिक मीटर काँक्रीट करायला सरासरी ०.७०० क्युबिक मीटर खडी आणि वाळू लागते म्हणजे साधारण पणे ५२५०० क्युबिक मीटर खडी या कामात वापरण्यात आली आहे.+
१८००० मेट्रिक टन रिबार्स वापरले आहेत. १ मेट्रिक टन स्टील बांधायला साधारणपणे ७ किलो बाइंडिंग वायर लागते म्हणजे जवळपास १ लाख २६ हजार किलो बाइंडिंग वायर या कामात वापरण्यात आली आहे.
५७०० मेट्रिक टन स्ट्रक्चरल स्टील च्या प्रमाणात वेल्डिंग राॅड, कटिंग साठी गॅस वापरले आहेत. +
म्हणजे बघा २०१४ ला सुरू झालेल्या या कामासाठी हे सर्व मटेरियल भारतात उत्पादित करून पुतळा तयार करण्याकरीता वापरलं आहे.उत्पादनांच्या ठिकाणाहून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी त्याची वाहतूक करण्यात आली आहे.हे उत्पादन करण्यासाठी आणि वाहतूकीसाठी किती मनुष्य बळ लागले असेल याची कल्पना येते.+
काम सुरू झाल्यानंतर या ठिकाणी जवळ पास ३५०० लोक काम करीत होते.
भारतातील एक अग्रगण्य कन्स्ट्रक्शन कंपनी एल अँड टी ने हे सर्व काम पूर्ण केलं म्हणजे या कामामुळे भारतातल्याच या ३५०० कामगारांशिवाय सर्व मटेरियल उत्पादन करणा-या कारखान्यातील +
हजारो कामगारांचे संसार यातून निश्चितच उभे राहिले आहेत.
हया प्रकल्पामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आता कायमचा रोजगार उपलब्ध झाला आहे. जगाच्या नकाशावर एक अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून हा परिसर आता पुढे आला आहे.
या प्रकरणी राजकारण करणारे हे विसरतात कीं +
या पुतळ्यामुळे लाखो लोकांचे संसार उभे राहतील.
मा. मोदींनी खरोखरच हा पुतळा उभा करून लाखो लोकांचे आशिर्वाद मिळवले आहेत हे निश्चित. तसंही विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी लोकहिताची कामं करताना मोदीजी विरोधकांना धूप घालत नाहीत आणि तेही एक अक्षर न बोलता. +
🔥पुतळ्याचं लोकार्पण झाल्यानंतर केवळ ६ दिवसांनंतर त्याचं दर्शन घेण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि तेही सरदार पटेल हा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या माझ्या स्व.बाबांना घेवून...
✍️रंगा
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
🔥मंडळी,
🔸कोणतंही स्ट्रक्चर पुर्ण बांधून झाल्यावर त्याची डिझाईन लोडच्या १.२५ किंवा १.५० पट जास्त लोड ठेवून टेस्ट केली जाते. स्टॅटिक किंवा डायनॅमिक लोडींग ठेवून अशा टेस्ट करतात. जर टेस्टमध्ये पास झालं तर त्यावर वाहतूक सोडली जाते.+
🔸काल गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरचा केबल स्टेड ब्रिज कोसळून जी दुर्घटना झाली त्याबद्दल वाचण्यात आलं कीं १४० वर्ष जुना हा ब्रिज बरेच दिवस बंद होता. ओरेवा नावाच्या कंपनीने स्वखर्चाने त्याची डागडूजी केली आणि तो ब्रिज चालू केला. +
🔸चालू करण्यापुर्वी कंपनीने लिहून दिलं होतं कीं एकावेळी फक्त १०० माणसांचं वजन हा ब्रीज पेलू शकेल. पण असं समजतं कीं दूर्घटना घडली त्यावेळी त्या ब्रीजवर ७०० लोक होते. म्हणजे डिझाईन लोडच्या ७ पट लोक. असं असल्यावर तो ब्रीज कसा तग धरेल?+
#नांव_एक_अस्मिता
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकणारे दोन प्रकल्प पूर्ण झाले.
मुंबई आणि पुणे यांना जोडणारा देशातला पहिला एक्सप्रेस वे आणि मुंबईच्या समुद्रात उभारलेला देशातला पहिला सागरी सेतु.
द्रुतगती महामार्ग पुर्ण झाला आणि +
त्याचं मोठ्या थाटामाटात नामकरण करण्यात आलं 'यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग' (नावात श्री.लिहिलं आहे कीं नाही मला माहीत नाही). श्री. पु.ल.देशपांडे यांचं नाव त्या महामार्गाला द्या म्हणून तेव्हा आंदोलन झाल्याचं लक्षात आहे.+
आज काय स्थिति आहे, हा महामार्ग 'मुंबई पुणे एक्सप्रेस वे' या नावानेच ओळखला जातो. 'यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग' म्हणणारा कोणीही या भूतलावर सापडणार नाही लिहून घ्या.
शिवसेना भाजपच्या काळात काम सुरू झालेला देशातला पहिला सागरी सेतु पूर्ण झाला +
"फेमस की पॅाप्युलर"
२००९ साली मी नागपुरला होतो, मिहान प्रकल्पात एका ऊड्डाणपुलाचं काम चालु होतं तेथे प्रकल्प व्यवस्थापक म्हणुन काम पहात होतो. सौ.अंजली आणि मुलगा सिद्धार्थ तळेगांव दाभाडेलाच होते म्हणुन मी एकटाच रहात होतो.+
३० मार्च २००९ ची रात्र, ११.३० वाजले असतील मी टीव्ही बंद करून नुकताच कॅाटवर पडलो होतो आणि अचानक फोन वाजला, माझा लहान भाऊ ऋषिकेशचा फोन होता, मी फोन ऊचलला आणि त्याने जोरात रडायला सुरूवात केली " दादा आपला पिन्या गेला रे ". क्षणभर मी सुन्न झालो, +
त्याच्या आणि माझ्या तोंडातुन शब्दच फुटत नव्हते. मग त्याने रडत रडत सांगितले कीं पुण्याहून सोलापुरला जात असताना मोहोळजवळ सावळेश्वर गांव आहे तिथे एका पुलाच्या कठड्याला धडकुन तो बसलेली कार खाली खड्यात पडली आणि त्याचा जागीच मृत्यु झाला.+
मंडळी सुप्रभात,
आमच्या लहानपणी एक गोष्ट सांगितली जायची. एका गावात एक माता आणि तिचा पुत्र राहायचे. मुलगा अतिशय वांड होता. नेहमी सगळ्यांशी भांडणं, मारामाऱ्या करायचा, छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा. त्याची माता त्याकडे कानाडोळा करायची. उलटपक्षी त्याच्या चोऱ्यामाऱ्या मुळे आपलं घर चालतं+
यात तिला समाधान वाटत असे. पुढे पुढे तर हे प्रकरण इतकं वाढलं की तो मुलगा अट्टल दरोडेखोर बनला.त्याने बरेच खून पण केले.तरीही माता काही बोलत नव्हती. पोलिसांचा ससेमिरा त्याच्या मागे लागला. शेवटी तो पकडला गेला. त्याच्यावर कोर्टात खटला भरण्यात आला.सुनावणी होऊन त्याला फाशीची शिक्षा झाली+
फाशीचा दिवस उजाडला. त्याला त्याची अंतिम इच्छा विचारली तेव्हा त्याने सांगितलं की मला माझ्या आईच्या कानात काही सांगायचं आहे.त्याच्या आईला बोलावलं आणि त्याने तिच्या कानाचा कडकडून चावा घेतला.कान तुटून पडला तेव्हा तो म्हणाला की "मी पहिली चोरी केली तेव्हाच तु आईं म्हणून डोळे उघडे+
आम्ही वरसावे खाडीवर जो ब्रीज बांधत आहोत त्याचे आम्ही दोन भाग केलेले आहेत. पहिला भाग हा जमिनीवरचा आणि दुसरा भाग हा पाण्यातला. जमीनीवरच्या १२ फाऊंडेशनच्या १५०० मिमी व्यासाच्या ८० पाईल आहेत तर पाण्यातल्या ४ फाऊंडेशनच्या १८०० मिमी व्यासाच्या ६० पाईल आहेत. +
साधारणपणे एका पाईलची लांबी ३२ ते ३५ मीटर आहे.
१.आजकाल पाईलिंग करायला सर्वत्र वापरली जाते ती "हायड्रॉलिक पाईलिंग रीग(फोटो क्रं १). रणगाड्यासारखे चाकं असलेल्या एका ट्र्रक वर ती फिट केलेली असते. समोर जो लोखंडी शाफ्ट दिसतो त्याला पाईलच्या व्यासाचा ऑगर लावलेला असतो. +
सोप्या भाषेत सांगायचं तर आपण छिद्र पाडायला वापरतो तशी मोठ्या आकाराची ड्रील मशीन.या मशीनच्या साह्यानेच जमीनीत किंवा पाण्यात लायनर, लोखंडाची जाळी टाकली जाते.+
विषय तसा खोल आहे.
पाण्यामध्ये काँक्रिट कसं करतात हा तसा प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय आहे. लिहिलेले किती समजेल हे मी सांगू शकत नाही पण प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहिला तर ते जास्त चांगलं समजेल.
काँक्रिट म्हणजे काय असतं वाळू, खडी, सिमेंट आणि पाणी +
यांचं प्रमाणबद्ध मिश्रण.
काँक्रिटची शक्ती म्हणजे काॅम्प्रेसिव्ह स्ट्रेंग्थ ही सिमेंटच्या प्रमाणावर अवलंबून असते ती वाढवायची असेल तर त्याप्रमाणात सिमेंट वाढवावं लागतं पण त्यालाही मर्यादा असतात म्हणून त्यात तत्सम पदार्थ मिसळावे लागतात. +
ते म्हणजे मायक्रो सिलिका किंवा सिलिका फ्युमस इत्यादी.
सिमेंट हा असा पदार्थ आहे कीं वातावरणाशी किंवा पाण्याशी त्याचा संपर्क आला कीं पावडर स्वरूपात असलेलं सिमेंट घट्ट व्हायला सुरुवात होते. आपण बघतो कीं अतिशय बंदिस्त गोडाऊन मध्ये ठेवलेल्या सिमेंटच्या गोण्या पण +