Be a woman who can do both represent our culture as well as protect dharma 🚩🙏
Why bindi?
सिंधू संस्कृतीच्या उत्खननातून (Indus River Valley civilizations) पुरातत्त्व विभागाला ज्या काही स्त्री आकृत्या दिसल्या त्याच्या कपाळावर बिंदू होता. ++ #Bindi #सौदामिनी_आधी_कुंकू_लाव🔴
ख्रिस्तपूर्व ३००० ( bc )मध्ये संतांनी वेद लिहिले. वेदांमध्ये आपल्या शरीरातील सात चक्रांचे विस्तृत वर्णन आहे. ही चक्रे आपल्या शरीरातील उर्जेच्या प्रवाहाशी संबंधित आहेत. ७ चक्रे थेट अंतःस्राव (एन्डोक्राईन) ग्रंथीला जोडून शरीराची सर्व तंत्रे सांभाळतात ++
सहस्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मूलाधार चक्र.
अग्न/अजना/आज्ञा हे सहावे चक्र आहे आणि ते आपल्या कपाळावर आपल्या भुवयांच्या दरम्यान असते. हे अंतर्ज्ञान आणि बुद्धीचे ठिकाण आहे.++
आपल्या कपाळाच्या मध्यभागी टिळक किंवा बिंदी धारण केल्याने आपल्याला चक्र संतुलित करण्यास आणि आपली एकाग्रता सुधारण्यास मदत होते. आपल्या भुवयामधील क्षेत्र हे अजना चक्र किंवा सहाव्या चक्राचे स्थान आहे. हे आपल्या शरीरातून उर्जेचा प्रवाह वाढविण्यात मदत करते आणि ते मजबूत करते. ++
उगीच विरोधाला विरोध म्हणून टिकली कुंकू लावणार नाही हे म्हणणारे तेच आहेत ज्यांना सनातन हिंदू धर्मा विषयी पराकोटीचा तिरस्कार आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
तुळशीचं लग्न का लावले जात याची ही कथा आहे.
एकवेळ भगवान शंकरांनी आपल्या तेजाचा काही भाग समुद्रात फेकून दिला होता, त्या तेजातून जालधंर नावाचा तेजस्वी बालक जन्मला. हा पुढे जाऊन पराक्रमी असा दैत्य राजा झाला. दैत्यराज कालनेमी ची कन्या वृंदा हिच्याशी ++ #तुलसी_विवाह_कथा
त्याचा विवाह झाला. जालंधर क्रूर होता, मदमस्त झालेला राक्षसराजा, त्याचा अत्याचार, वाढतच जात होता. पण त्याची पत्नी वृंदा ही भगवान विष्णूंची भक्त होती. जेव्हा देव आणि दानवांच्या मध्ये युद्ध झाले, वृंदेने पतीला सांगितले की जोपर्यंत तुम्ही युद्ध संपवून येत नाही. ++
मी उपासनेला बसेन. आणि जोपर्यंत तुम्ही परत येत नाही मी संकल्प सोडणार नाही, पूजेतून उठणार नाही. व्रताच्या परिणामामुळे देवतांना जालंधरवर विजय मिळवला आला नाही, जालंधर विजयी होईल ह्या भीतीने सर्व देवता श्रीविष्णूंकडे गेले.++
कार्तिक शुक्ल द्वितीया अर्थात यमव्दितीया किंवा #भाऊबीज.
ऋग्वेदात एक कथा आहे, जेव्हा ब्रम्ह देवांनी पृथ्वी चा निर्माण केला, सर्व ऋषींनी त्याची परतफेड म्हणून यज्ञकर्म करायचे ठरवले, यज्ञात बळी द्यावा लागतो तेव्हा यमराज ने बळी म्हणून जायला तयारी दाखवली, यमाने यज्ञात++
उडी घेतली हे पाहून बहिण यमी ने ही यज्ञात उडी घेतली, संतुष्ट इष्ट देवांनी वर दिला, की लोक हा दिवस नेहमी लक्षात ठेवतील यमव्दितीया म्हणून साजरा करतील. यम दिसायला सुंदर होता आहे, मृत्यू नसेल तर जग काय असेल याचा विचार न केलेला बरा, जीवनचक्र संतुलित राखण्यासाठी तो आवश्यक आहे. ++
भारतीय संस्कृती औदार्य आणि कर्तृत्व ह्यांची पूजक राहिली आहे. म्हणून कदाचित भगवान शंकराने बीजेचा चंद्र माथ्यावर धारण केला आहे. आता बहिण भावाला ओवाळते भाऊबीज दिवशी याची कथा पाहूया, भगवान सूर्य आणि माता छाया (विश्वकर्मा यांची मुलगी संज्ञा) यांच्या पोटी यम आणि ++
Thread🧵 दिवाळी पाडवा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा ( दिवाळी पाडवा ). श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते.
बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. ‘दान देणे’ हा गुण आहे; ++
पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे.सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात.++
बलीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार (वामनावतार) घेतला. (मुंजा मुलगा लहान असतो अन् तो ‘ॐ भवति भिक्षां देही ।’ म्हणजे ‘भिक्षा द्या’ असे म्हणतो.) वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, ‘‘काय हवे ?’’++
#नरकचतुर्दशी 🧵
आश्विन वद्य चतुर्दशी,
श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर / नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला.++
श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व स्त्रियांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. ++
त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.++