ॲड ऑन: चायनीज लेखन संस्कृतीच्या विपुल उपलब्धतेमागे अनेक कारणे आहेत. चायनीज लिपीत वर्णमाला नसते, प्रत्येक वर्ण हा एक शब्द असतो. चायनीज बोलीभाषा कितीही वैविध्यपूर्ण असल्या तरी लिहण्यासाठी वापरली जाणारी लिपी सारखी राहते. 'ऑरकल ऑफ बोन्सच्या' उपलब्ध ऐतिहासिक ठेवीमुळे चायनीज
इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. चायनीज इम्पायरला संस्कृतीशी एकसंध ठेवण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण हेच राहिलेय. याउलट भारतीय उपखंडात संस्कृतचे प्राबल्य असले तरी तिची लिपी वेगवेगळ्या ठिकाणी बदलत गेली त्यासोबतच विविध भाषांचा उगम बौध्द कालवधीनंतर वाढला. श्रुति व स्मृतीची ऐकीव
परंपरा वाढत गेली नंतर तिला Rhythmic मंत्रोच्चाराची पाश्र्वभूमी लाभली. सुस्पष्ट मंत्रोउच्चारांशिवाय प्राप्ती होत नसल्याच्या भावनेने भाषेला आणखी जटील बनवले.
भारतीय संस्कृती ती वैदिक असो वा सब अल्टर्न असो तिला ऐकिव/मौखिक इतिहासाची पाश्र्वभूमी आहे. Sub altern मांडणी तर मौखिक
इतिहासाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे इतिहासाला एकाच कप्प्यात तोलताना कुठेतरी गफलत होते. लिखित इतिहास महत्त्वाचे की ऐकिव/मौखिक? या वादापेक्षा त्यांच्या उपलब्धतेमागील कारणांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
आज भारतात बोटांवर मोजण्याइतकी विद्यापीठे असतील ज्यांनी
मौखिक इतिहासाला (Oral history) आपल्या अभ्यासक्रमात स्थान दिले असेल. यामागची अनेक कारणे आहेत जसे की या इतिहासाला Discredit करण्याची शक्यता जास्त असते. तिच्यामधे पिढ्यानपिढ्या होत गेलेले विरोधाभास तिला आणखी क्लिष्ट बनवते. खासकरून बहुजन इतिहासाची मांडणी करताना ही समस्या येते.
चायनीज इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध असण्यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या संस्कृतीत सुंदर हस्तकलेला (Calligraphy) असलेले अनन्यसाधारण महत्व. कँटोनीज असो वा क्लासिकल मँडरीन प्रत्येक बोलीभाषेत सुंदर हस्तकलेला महत्त्व दिले गेले त्यामुळे लेखणाची उपलब्धता सहज वाढत गेली.
भारतीय उपखंडात फक्त एकाच वर्गाला लिहण्याचे स्वातंत्र्य होते. बौध्द कालखंडाआधी व नंतरही राजदरबारात गुणवत्तेपेक्षा जन्माआधारित व्यवस्थेला अधिक महत्त्व होते.
याउलट वैदिक समकालीन शांग राजवंश असो वा झाऊ राजवंश असो त्यांच्या अतिप्राचीन काळापासून अपवाद वगळता 'गुणवत्ता' (Meritocracy)
हेच एकमेव निकष महत्त्वाच्या पदांसाठी वापरले गेले.
चायनीज लिखित इतिहास समृध्द असण्यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे हाडांवर लिहण्याच्या कलेसोबत कागदाचा लवकर लागलेला शोध. काई लून याने कागदाचा शोध लावला (जो सेक्शूअल अल्पसंख्यांक गटातून येतो) त्यामुळे कागदाची उपलब्धता
झाऊ काळानंतर प्रचंड प्रमाणात वाढली. या समकालीन भारतात विविध संस्कृतीचा उदय झाला, विविध भाषांनी आपला इतिहास सांगायला सुरुवात केली तरी लिखित इतिहास अत्यंत बाल्यावस्थेत होता. बौध्द काळानंतर हळूहळू ही परिस्थिती बदलली.
चायनीज लेखनसंस्कृती तिच्या वर्णमालेमुळे संपन्न होती त्याउलट
भारतीय इतिहास ती बहुजनांची असो वा प्रमाण मानली गेलेली असो, ती मौखिकच राहिली.
मौखिक इतिहासाची हेटाळणी असो वा तिच्या विश्वासार्हतेवरील प्रश्न यांची मांडणी करताना Sub altern इतिहासावर प्रश्नचिन्हे लावण्याच्या प्रस्थापित दृष्टीकोनामुळे वैदिक/हिंदू ऐकिव इतिहासावर प्रश्न उपस्थित करणे
थोडे जटील बनते. ज्यांची संस्कृती ही लिखित होती वा ज्यांना स्वातंत्र्य होते त्यांना जटील कसोटीवर तोलायला हवे याउलट Sub altern मांडणीवर संशोधनाची आवश्यकता असल्याने तिच्या फंडिंग व उपलब्धतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आज JNU आणि DU मधील एखाद्या विद्यालयाचा अपवाद वगळता मौखिक
इतिहास अभ्यासक्रमाची उपलब्धता दिसून येणार नाही. त्यातल्या त्यात आदिवासी इतिहासाची वाणवा आहे. त्यामुळे आपला दृष्टीकोन हा अधिक सूक्ष्म (Nuanced) असायला हवा. जनरलाईज मांडणी कधी कधी शोषक इतिहासासोबत शोषित इतिहासासाठीही समस्या बनत असते.
ब्लू टिक ही सामाजिक ओळख डिजीटल सरंजामशाहीचे प्रतीक आहे. ही सामाजिक ओळख मिळवण्याची प्रक्रिया अपारदर्शक व भेदभाव करणारी आहे. कित्येक वर्षांपासून सामान्य शोषितांना न मिळालेला आवाज तो या समाजमाध्यमांनी मिळवून दिलाय. सतत एकाच वर्गाने प्रिंट असो वा डिजीटल माध्यमात वर्चस्व गाजवले आहे.
आजही इंडियन एक्सप्रेस असो वा द हिंदू यातील लेखकांची विविधता धर्म, जात,लिंग आणि सेक्युशिलिटी या सर्व वर्गात तपासली असता एका मोठ्या वर्गाने मक्तेदारी कायम केलेली दिसून येईल. असंही नाही की ही मंडळी लिहण्यास पात्र नाहीत मात्र फक्त तिच लिहण्यास पात्र आहेत का? हा प्रश्न पडायला हवा.
बदलत्या काळानुसार शोषित आवाजांना सामावून घेण्याची जबाबदारी या माध्यम समूहांची असते मात्र कित्येक पटीने उत्तम लिहणाऱ्या शोषित आवाजांना प्रिंट वा माध्यम समूह संधी देत नाही. त्यामुळे त्यांना ट्विटर सारख्या माध्यमावर वावरताना अधिकृत सदस्य बनण्याचा हक्क मिळत नाही.