🔥मंडळी,
🔸ईसवी सन २०१६ः अख्ख्या उत्तर प्रदेशात तात्कालिन कॉंग्रेस अध्यक्ष, युवा नेते (तेंव्हा थोडेफार युवा होते) श्रीजी राहुलजी गांधीजी यांची छबी असलेले "२७ साल युपी बेहाल" घोषणेचे पोस्टर्स,बॅनर्स,होर्डिंग्ज झळकत होते.भिंती पण याच घोषणांनी रंगवलेल्या होत्या.+
🔸ईसवी सन २०१७ उजाडलं, विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आणि ते पोस्टर्स,बॅनर्स,होर्डिंग्ज उतरवायला चालू झालं,रंगवलेल्या भिंतींवर चुना मारावा लागला कारण अखिलेशजी यादवजी आणि कॉंग्रेसचे श्रीजी (वर नाव लिहिलंय) हे "दो लडके" एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले. +
निवडणुका झाल्या,निकाल लागले आणि सिद्ध झालं "दो लडके दोनो कडके,दोनो जाकर दिवारसे धडके"
🔸ईसवी सन २०१९ उजाडलं, महाराष्ट्राच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले.भाजप आणि श्रीजी उद्धवरावजी बाळासाहेबजी प्रबोधनकारजी ठाकरेजी यांचा पक्ष यांनी एकत्र निवडणूक लढवायचं ठरवलं.+
मग प्रत्येक सभेत श्रीजी उद्धवरावजी "राहुल गांधी नालायक आहे" "राहुल गांधी नामर्द आहे" सोनियाजी गांधीजींचे फोटो जगात लोकप्रिय असलेल्या मराठी पेपर मध्ये "फिरंगी" "गोरी कातडी" "करप्शन क्वीन" म्हणून छापून येत होते.(त्याआधी बाळासाहेब काय काय बोलले होते ते गुगल केलं कीं सापडतं)+
🔸निवडणुका झाल्या,निकाल वेगळेच लागले पण श्रीजी (वर नाव लिहिलंय) नामर्द,नालायक,फिरंगी, गोरी कातडी,करप्शन क्वीन यांनाच शरण गेले आणि सरकार बनवलं.
पोस्टर्स,बॅनर्स,होर्डिंग्ज उतरवणं सोपं असतं, भिंतींवर चुना मारणं सोपं असतं पण बाकी मटेरियल गुगलबाबावर असतंच +
त्यामुळे नष्ट करता येत नाही आणि ते वाजतच राहतं,वाचलं जातं.
🔸ईसवीसन २०२२ उजाडलं, जुनच्या शेवटी श्रीजींचं सरकार पडलं,पक्षाचेही दोन फाड झाले आणि दिलासा म्हणुन कीं काय युवानेते(५२च्या वर वय झालेले) श्रीजी (वर नाव लिहिलंय) जोडत जोडत (काय जोडत आहेत त्यांनाच माहीत) +
महाराष्ट्रात आले आहेत. त्यांना भेटायला इकडचे युवानेते (आवाजावरून शिशुनेते वाटतात) त्यांना सामील व्हायला गेले. #HMV पत्रकारांना हर्षवायु झाला आणि त्यांनी त्या भेटीचं वर्णन परत एकदा "दो लडके" म्हणुन करायला सुरू केलं. +
🔸पण ईसवीसन २०१७ लोक विसरलेले नाहीत, ते हेच म्हणत आहेत "दो लडके दोनो कडके,मालुम भी नहीं पडेगा किधर जाकर धडके"😆😆😆😆
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
🔥मंडळी,
संपुर्ण महाराष्ट्रात३-४ मेडिकल आणि ६-७ ईंजिनियरींग कॉलेजेस होते.विज्ञान शाखेतुन १२वीची परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी होते.प्रत्येकाचं स्वप्न होतं डॉक्टर,इंजीनियर व्हावं पण मोजक्याच मुलामुलींना ही संधी मिळत होती.बाजूच्या कर्नाटकात खासगी कॉलेजेसचं पीक होतं +
आणि ज्यांना शक्य होतं ते पालक आपल्या पाल्यांना तिकडे पाठवून डॉक्टर इंजीनियर झालेलं बघण्याचं स्वप्न पुर्ण करून घेत होते.
१९८३ मध्ये, फक्त सातवी पास असलेल्या महाराष्ट्राच्या दृष्ट्या मुख्यमंत्र्यांना आपली मुलं दुसरीकडे जाऊन शिकतात तर हे थांबवलं पाहिजे याची जाणीव झाली आणि +
त्यांनी तात्काळ कायमस्वरूपी विना अनुदान तत्वावर मेडिकल,ईंजिनियरींग कॉलेजेस महाराष्ट्रात सुरू करण्याचे आदेश काढले. सुरूवातीला यावर टीका भरपुर झाली पण थोडक्यात संधी हुकलेले लाखो विद्यार्थी घरापासून फार दूर न जाता डॉक्टर, इंजीनियर होऊ लागले. +
🔥मंडळी,
🔸आज ३१ ऑक्टोबर, स्वतंत्र भारताचे पहीले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐 #Statue_of_Unity
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच असा पुतळा बांधायचं गुजरात सरकार ने ठरवलं तेव्हा आजचे पंतप्रधान +
मा. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.
🔸रितसर निविदा प्रक्रिया करून PPP model ने L&T या कंपनीला काम दिलं.
३१ ऑक्टोबर २०१४ ला भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झालं आणि रितसर कामाला सुरुवात झाली.हजारो लोक त्यावर अहोरात्र काम करत होते. +
तेव्हा सगळे कावळे, मावळे, फुरोगामी गाढ झोपेत होते.
३१ ऑक्टोबर २०१८ ला पुतळ्याचं अनावरण होणार होतं, काही दिवस आधी ह्या पुतळ्याचं भव्य दिव्य स्वरूप समोर आलं आणि हे कावळे, मावळे, फुरोगामी झोपेतून खाडकन जागे झाले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, +
🔥मंडळी,
🔸कोणतंही स्ट्रक्चर पुर्ण बांधून झाल्यावर त्याची डिझाईन लोडच्या १.२५ किंवा १.५० पट जास्त लोड ठेवून टेस्ट केली जाते. स्टॅटिक किंवा डायनॅमिक लोडींग ठेवून अशा टेस्ट करतात. जर टेस्टमध्ये पास झालं तर त्यावर वाहतूक सोडली जाते.+
🔸काल गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरचा केबल स्टेड ब्रिज कोसळून जी दुर्घटना झाली त्याबद्दल वाचण्यात आलं कीं १४० वर्ष जुना हा ब्रिज बरेच दिवस बंद होता. ओरेवा नावाच्या कंपनीने स्वखर्चाने त्याची डागडूजी केली आणि तो ब्रिज चालू केला. +
🔸चालू करण्यापुर्वी कंपनीने लिहून दिलं होतं कीं एकावेळी फक्त १०० माणसांचं वजन हा ब्रीज पेलू शकेल. पण असं समजतं कीं दूर्घटना घडली त्यावेळी त्या ब्रीजवर ७०० लोक होते. म्हणजे डिझाईन लोडच्या ७ पट लोक. असं असल्यावर तो ब्रीज कसा तग धरेल?+
#नांव_एक_अस्मिता
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकणारे दोन प्रकल्प पूर्ण झाले.
मुंबई आणि पुणे यांना जोडणारा देशातला पहिला एक्सप्रेस वे आणि मुंबईच्या समुद्रात उभारलेला देशातला पहिला सागरी सेतु.
द्रुतगती महामार्ग पुर्ण झाला आणि +
त्याचं मोठ्या थाटामाटात नामकरण करण्यात आलं 'यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग' (नावात श्री.लिहिलं आहे कीं नाही मला माहीत नाही). श्री. पु.ल.देशपांडे यांचं नाव त्या महामार्गाला द्या म्हणून तेव्हा आंदोलन झाल्याचं लक्षात आहे.+
आज काय स्थिति आहे, हा महामार्ग 'मुंबई पुणे एक्सप्रेस वे' या नावानेच ओळखला जातो. 'यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग' म्हणणारा कोणीही या भूतलावर सापडणार नाही लिहून घ्या.
शिवसेना भाजपच्या काळात काम सुरू झालेला देशातला पहिला सागरी सेतु पूर्ण झाला +
"फेमस की पॅाप्युलर"
२००९ साली मी नागपुरला होतो, मिहान प्रकल्पात एका ऊड्डाणपुलाचं काम चालु होतं तेथे प्रकल्प व्यवस्थापक म्हणुन काम पहात होतो. सौ.अंजली आणि मुलगा सिद्धार्थ तळेगांव दाभाडेलाच होते म्हणुन मी एकटाच रहात होतो.+
३० मार्च २००९ ची रात्र, ११.३० वाजले असतील मी टीव्ही बंद करून नुकताच कॅाटवर पडलो होतो आणि अचानक फोन वाजला, माझा लहान भाऊ ऋषिकेशचा फोन होता, मी फोन ऊचलला आणि त्याने जोरात रडायला सुरूवात केली " दादा आपला पिन्या गेला रे ". क्षणभर मी सुन्न झालो, +
त्याच्या आणि माझ्या तोंडातुन शब्दच फुटत नव्हते. मग त्याने रडत रडत सांगितले कीं पुण्याहून सोलापुरला जात असताना मोहोळजवळ सावळेश्वर गांव आहे तिथे एका पुलाच्या कठड्याला धडकुन तो बसलेली कार खाली खड्यात पडली आणि त्याचा जागीच मृत्यु झाला.+
मंडळी सुप्रभात,
आमच्या लहानपणी एक गोष्ट सांगितली जायची. एका गावात एक माता आणि तिचा पुत्र राहायचे. मुलगा अतिशय वांड होता. नेहमी सगळ्यांशी भांडणं, मारामाऱ्या करायचा, छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा. त्याची माता त्याकडे कानाडोळा करायची. उलटपक्षी त्याच्या चोऱ्यामाऱ्या मुळे आपलं घर चालतं+
यात तिला समाधान वाटत असे. पुढे पुढे तर हे प्रकरण इतकं वाढलं की तो मुलगा अट्टल दरोडेखोर बनला.त्याने बरेच खून पण केले.तरीही माता काही बोलत नव्हती. पोलिसांचा ससेमिरा त्याच्या मागे लागला. शेवटी तो पकडला गेला. त्याच्यावर कोर्टात खटला भरण्यात आला.सुनावणी होऊन त्याला फाशीची शिक्षा झाली+
फाशीचा दिवस उजाडला. त्याला त्याची अंतिम इच्छा विचारली तेव्हा त्याने सांगितलं की मला माझ्या आईच्या कानात काही सांगायचं आहे.त्याच्या आईला बोलावलं आणि त्याने तिच्या कानाचा कडकडून चावा घेतला.कान तुटून पडला तेव्हा तो म्हणाला की "मी पहिली चोरी केली तेव्हाच तु आईं म्हणून डोळे उघडे+