सुगी ❤️
नुकतीच कडधान्याची पिकं निघून गेली . लगबग सुरू झाली ती खरीप पिकांची काढणी आणि रब्बी पिकांची लागवड . भुईमुगाच्या शेंगा निघून वाळायला पडल्यात दारात तर कोणाच्या काढायच्या चालू आहेत . हरभरा आत्ताच नवीन जन्म घेऊन लुसलुशीत हिरवीगार मान वरती काढून डोलत उभा आहे . #माझाक्लिक#शेती
गव्हाणे पण आपलं एक एक पातं वर काढायला सुरुवात केली आहे . शेताच्या कडेने पावटा फुलोऱ्यात आलाय लवकरच त्याचाही आस्वाद घ्यायला मिळेल . दोडका आता जवान झालाय लवकरच सर्वांच्या जिभेवर रेंगाळत रेंगाळत परतीचा प्रवास सुरू करेल . त्याच्या जोडीला मळ भिंडी नसेल असं कधी होईल का .?
आम्हा कुनब्याच्या नशिबी नसेल पिझ्झा , बर्गर पण या साऱ्या पेक्षा जिभेवर चव रेंगाळत राहते ती याच रान मेव्याची .. नुसतं नाव जरी निघालं तरी जिभेवर पाणी येतं. रानात आता गार वरा त्याच्या सोबतीला थोडी बोचरी थंडी आणि लांब कुठतरी वाजणारं ट्रॅक्टर वरचं गाणं आसमंत दणानुन टाकतय...
गावाकडचं हे दिस म्हणजे अगदी सुवर्ण काळच.. दोन हाताला दहा हातचं काम आहे पण त्या कामापेक्षा ह्या सुगीचा आनंदच काय और असा . या सुगीचा पदर भरून देरे म्हसोबा राया तुझ्या भक्ताच येवढं मागणं पूर्ण कर ..सुगी भरून पावू दे .