यशवंतराव चव्हाण ही एक व्यक्ती नसून तो एक प्रगल्भ विचार आहे,जो विचार देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रस्थानी होता आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात आणि राष्ट्रउभारणीत मोलाचा वाटा उचलणारे असे पुरोगामी,सुसंस्कृत,बहुआयामी,ऋषितुल्य,संयमी व्यक्तिमत्त्व
महाराष्ट्राला लाभले हे राज्याचे थोर भाग्यच मानायला पाहिजे..
या पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देण्याच काम यशवंतराव यांनी केले आजही राज्य त्यांच्या पावलावर पाय ठेऊन चालत आहे.समाजहिताचे, लोकहिताचे अनेक कायदे त्यांनी केले त्यामध्ये कृषी,सिंचन, सहकार,औद्योगिक इ कामांच्या विकासावर
त्यांनी भर दिला,ग्रामीण विकास असो की औद्योगिक विकासाचा विस्तृत पाया यासाठी यशवंतराव कुठेच कमी पडले नाहीत.स्थानिक शासनाचे विकेंद्रीकरण करून सत्तेत जास्तीतजास्त लोकांना सहभागी करण्याच्या धोरणाचा देशाने स्वीकार केला यातच त्यांच्या कर्तुत्ववाची व्याप्ती कळते.1962 मध्ये जवाहरलाल नेहरू
यांनी त्यांचे महत्त्व जाणून त्यांना देशाची सेवा करण्याची संधी दिली त्या माध्यमातून देशाचे संरक्षणमंत्री,अर्थमंत्री, गृहमंत्री,परराष्ट्रमंत्री इ महत्वाच्या पदावर काम करून त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली.असे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व त्यांची आज पुण्यतिथी #यशवंतराव_चव्हाण #अभिवादन
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh