यशवंतराव चव्हाण ही एक व्यक्ती नसून तो एक प्रगल्भ विचार आहे,जो विचार देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रस्थानी होता आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात आणि राष्ट्रउभारणीत मोलाचा वाटा उचलणारे असे पुरोगामी,सुसंस्कृत,बहुआयामी,ऋषितुल्य,संयमी व्यक्तिमत्त्व
महाराष्ट्राला लाभले हे राज्याचे थोर भाग्यच मानायला पाहिजे..
या पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देण्याच काम यशवंतराव यांनी केले आजही राज्य त्यांच्या पावलावर पाय ठेऊन चालत आहे.समाजहिताचे, लोकहिताचे अनेक कायदे त्यांनी केले त्यामध्ये कृषी,सिंचन, सहकार,औद्योगिक इ कामांच्या विकासावर