हे आहे साखरी नाटे.
४००० वा थोडी कमी जास्ती लोकसंख्या. साखरी नाट्यात साधारण ५०० मोठ्या तर २०० च्या वर छोट्या बोटी आहेत.मोठ्या बोटीवर ४० च्या आसपास काम करतात. तर छोट्या बोटावर १० जण काम करतात. हे बघता एकूण २२ हजार लोकांना काम यातून मिळत. हे फक्त मासेमारी शी निगडित(१)
मासे विकणे , त्याचे परिवहन , प्रक्रिया याचा यात उल्लेख नाही. ते धरले तर ४० हजार हून अधिकचा रोजगार केवळ साखरी नाटे हे बंदर देते. एक मोठी बोट व त्यावरचे इतर सामान यांची किंमत साधारण ७० लाखांच्याही वर जात असते. म्हणजे ३५० कोटी हे बोटींसाठी लागलेत.(२)
आणि दिवसाला ३ कोटींची उलाढाल ह्या बंदरातून होत असते. आजही हे बंदर पुर्ण क्षमतेने कार्य करत नाही. कारण बंदरावर जाण्यासाठी मोठा रस्ता नाही किंवा मोठी जेट्टी सुध्दा नाही. त्याची अंमलबजावणी केली तरी लाखभर रोजगार निर्माण करण्याची क्षमता ह्या ‘गावाची’ आहे.(३)
रत्नागिरी जिल्ह्यातील क्रमांक दोन नंबरचे मासे ह्या बंदरातून वहन होतात.
असे का आहे? तर साखरी नाटे च्या आजुबाजुच्या समुद्रात प्रचंड मासे मिळतात, कारण अत्यंत स्वच्छ समुद्र आणि समुद्राखाली असणारे पान वनस्पतींचे जंगल. स्थानिक मच्छिमार सांगतात की गुजरात मुंबईहून मोठ्या बोटी साखरी(४)
नाट्याच्या आसपासच्या समुद्रात मासेमारी साठी येतात.
राजकारणी नेहमी रोजगार रोजगार याच पालुपत लावत असतात.ते तर खोट आहेच पण ते दुट्टपी आहे. यासाठी हे लिहलय
साखरी नाट्याच्या दक्षिणेला जैतापूर चा प्रकल्प प्रस्तावित आहे तर उत्तरेला प्रस्तावित बारसू रिफायनरी चे क्रूड ॲाईल टर्मिनल आणल(५)
गेलय. आणि स्थानिकांना रोजगार मिळेल याच्या आश्वासनावर. ह्या दोन्ही प्रकल्पांचा विचार केला तरी प्रत्यक्ष रोजगार हा ३० हजार च्या वर जात नाही. ह्या दोन्ही प्रकल्पांमुळे तात्काळ नाही पण प्रकल्प उभे झाल्यानंतर काही काळानंतर साखरी नाट्याची मासेमारी हळू हळू नष्ट होत जाणार आहे.(६)
आणि त्या मासेमारीच्या परिसंस्थेवर आधारीत ४० ते ५० हजाराचा रोजगार सुध्दा.
म्हणजे सरकारी धोरण किती उरफाटे असू शकतात यासारख वेगळ उदाहरण सापडू शकत नाही.
परत विकासच्या गोंडस नावाखाली सुध्दा प्रकल्प हे समुद्र किनारी प्रदेशात नाहीतर जंगलाच्या आसपासच्या प्रदेशात लादले जातात.(७)
पण साखरी नाट्याची आर्थिकता बघितली तर त्या गावाला वा त्याच्या जवळ अशा प्रकल्पांची गरज आहे का ज्या प्रकल्पांमुळे साखरी नाटे ची आर्थिकतेला मोठा धोका पोहचतो हा प्रश्न सतत पडत राहतो.(८) #saynotorefinery
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
दहिहंडी जुनी असेल खूप , काला म्हणत असतील जुन्या काळी. पण ही मुंबईतली थरांची दहिहंडी ही इथून सुरू झालीय.
ही दहिहंडी का सुरू झाली असेल, किर्तनात तर काठीनेच हंडी फोडतात थर लावत नाही. कोणी सुरवात केली हे थर लावायला, तर मुंबईतल्या भंडारी समाजाने.(१)
कसे ते नंतर सांगतो. भंडारी हे भांडार रखवालदार म्हणून नाव पडले असावे असेही म्हणतात. संस्कृतच्या ‘मनधारक’ वरून भंडारी झाले असे बोलले जाते पण मला काही पटत नाही. माहिम हे भंडारी राज्य होते. बिंब राजे हे भंडारी होते असे बोलले जाते. पहिल्यापासून लढवय्ये.(२)
पण ते ताडी कधी बनवायला लागले माहीत नाही. मनधारक हे ताडी बनवणार्याला संस्कृत मध्ये म्हटले जाते. मुंबई गॅजेट मध्ये मारामारी आणि ताडी बनवणे ह्या गोष्टी भंडारी समाजाला येतात असे बोललेय.
तर हे मध्ययुगात ताडी बनवणे व विक्री करणे यात आले.(३)
यश नेहमीच खर नसत ,अस कोणीतरी बोललंय.खरच बरोबर वाटत जेव्हा साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड च्या क्रिकेट टीम बघतो.त्यांच्या कडे यश मिळवून देऊ शकणारे खेळाडू होतेच,पण टीम पण होती. पण नाही शक्य झालं.यश शक्य होणे याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात.पण यश नाही म्हणून कोणी कच्चा असतो असे नाही.(१)
खेळाच्या परिपक्वतेवरून खेळाडू चा दर्जा ठरवला जातो बहुतेक. पण समीक्षा करणारे लोकच ह्या जगात तुन बाद झालेत. त्यांना समीक्षा करायची असते का गांड खाजवायची असते. लोकांच्या समीक्षेवर आता बोलणंच बंद केलं पाहिजे, समीक्षेचा उद्देश त्यांच्यासाठी आत्मप्रौढी मिरवण असाही असू शकतो.(२)
मिरवावी पण पळणाऱ्याच्या पायात पाय टाकून पाडणारी कशाला. त्यात आपण अभिजात कलेचे खेळाचे वाहक आहोत हा आदिम दंभ.
परवा कोणी तरी म्हटल कंपौंडर का काय ते, चांगली समीक्षा करतात बहुतेक ते. खरंच आहे त्यांचं. माझ्या एका मित्राचा बाप सरकार मध्ये क्लर्क आहे अशी नोंद असेल सरकार दप्तरी,(३)
रात्री आपल्याला जे कळत नसत त्यावर बोलावं.
टिकटोक बंदी नंतर थेट फायदा इंस्टा फेसबुक ला झाला, मागेच अंबानी च्या जिओत पैसे टाकले झुक्याने. व्हाट्सप् पण त्याचच आहे.
अशा काळात बीजेपी चे सरकार सत्तेत आहे. काँग्रेस ने काय केले असते, वाटून वाटून दिले असते.(१)
लोकशाही अबाधित ठेवल्याचा फील आला असता.
आयरणी ही हे फेसबुक वर टाकतोय मी. अंबानी माझा डेटा घेऊन झोप विकत देईल का? सरकारला माझ्या झोपेची काळजी आहे म्हणून चीन चे लफडे केले. खरतर लॉकडाऊन हे देशात झोपेची कमी होती म्हणून केलेला. सर्व जनतेला पुरेशी झोप मिळावी. पण जनता ऐकणार तर ना ,(२)
यांना चीन बरोबर युद्ध करायचे होते म्हणून ती चालत निघाली. रस्त्यारस्त्याने. संसार घेऊन. असाच संसार घेऊन जावं लागायचं युद्धात रामाच्या काळात. अगदी पानिपत पर्यंत. पण मोदिजीनी साधलेच त्यांना माहितेय चालत गेलेल्यांचा डेटा झुक्याला नाहीच देणार. तो पोलिसांकडे देणार.(३)
सगळ्याच खिडक्यांना मिळत नाय दान पुस्तकांचं
पानकळ्यात त्यांना मिळतो ट्रंकेचा कोपरा
चहाचा निवेद खिडक्यांना मकबूल नसतोच काही
घासलेट च्या चिमणीन काही खिडक्या उजळतात पावसात(१)
पावसाचा गनिमी कावा दिसत नसतोय खिडकीतून
कधी तो तात्पर्य देतो माळाच्या झाडावर
सगळ्याच खिडक्या नाय दाखवत पान फुल
काही दाखवतात पावसाने तुंबलेली गटार संसाराने वाहिलेले नाले(२)
सगळ्याच खिडक्यातून दिसत नसतोय पाऊस
काही बंद कराव्या लागतात निळ्या ताडपत्रीन
चौकातून चोरून आणलेल्या बॅनरने
त्या खिडक्या गेट होतात गोमांचं झुरळांच
जित्याच ठिबक गोळा करणारी बादली
मग खाली करावी लागते वेळोवेळी मोरीत(३)
म्हणजे कस तर कधीही आनंद देण्याच्या काळात क्रिकेट ही आहेच, सध्याच्या काळात रोहित बघणे डोळ्याला सुख देते. पण काळाने मागे गेले पाहिजे त्याशिवाय आनंद हा सुखात जात नाही. आनंद वेगळा सुख वेगळं. सुख. रात्रीची वेगळी, सकाळची वेगळी. उगा शुजात खा च नाव घेण्यात काही अर्थ नाही.(१)
पण अनेक वेळा रात्री जागून काढल्यात. मग मॅच कोणाचीही असू त्याला काही फरक पडत नाही. मी वेस्ट इंडिज च्या मॅच बद्दल बोलतो. जुन्या काळातली दादागिरी नाही बघितली तर मला अँबरोज, वॉलश, लारा, चांदरपाउल, हुपर, जिमी अडम्स, किथ आथरटन, सरवान हेही आवडलेत. बघितलेत.(२)
म्हणजे त्यांची मॅच बघताना क्रिकेट बघायचे नुसते. तर प्रेक्षक ही बघायचे असते. ते जे आनंद घेतात तो आपण घ्यायचा असतो. ते नाचत असतात आपण मनात नाचायचे असते, मग कुठे चान्स मिळाला झलक मारायची असते. मग उगाच बॉब मार्ले आठवायचा असतो ,नो वूमन नो क्राय.अस वाटायचं बॉब त्या सगळ्यांच्यात आहे,(३)
थोडा पूर आला की एक सुलभीकरण असते की 'हे सगळं वातावरण बदलाचे परिणाम आहेत' म्हणजे थोडं काही झालं की हे र्हेटोरिक मांडलं की मुक्ती मिळते अस काहीसे.
वातावरण बदल होतोय का ? तर नक्की होतोय. होणार आहे का ? होत राहणार आहे. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.(१)
तापमान वाढ होतेय का तर होतेय. मुद्दा एवढा आहे की तापमान वाढीचा वेग जास्त आहे. यापूर्वी कोल्ड एज येऊन गेलंय. आणि असे अनेक नैसर्गिक घटक आहेत त्यांनी वातावरण बदल वा तापमान वाढ होत असते. ज्वालामुखी उद्रेक त्यातून निघणारा धूर मोठ्या प्रदेशावर वातावरण बदल घडवून आणू शकतो.(२)
निसर्ग वादळ आले , कशामुळे तर वातावरण बदलामुळे का ह्याच्या आधी अशा वादळं ची एकही नोंद नाही का? मध्ये मुंबईत खूप पाऊस झाला का ? दुसरं काय वातावरण बदल. का मुंबईत यापूर्वी एवढा पाऊस कधीच झाला नव्हता का. सांगली कोल्हापूर ला पूर आला , वा इतर ठिकाणी पूर येतात लगेच सुलभीकरण.(३)