१) गेल्या 8 ते 10 वर्षात भाजपकडून, नेहरू गांधी यांच्या बद्दल खोटा प्रचार करून सतत अभद्र बदनामी केली.
कुठंतरी काँग्रेसला हे सर्व असह्य झाल्याने, त्यानी भाजप ज्यांना आदर्श मानते त्यांची पोलखोल करायला सुरुवात केली, तर भाजप गोटात प्रचंड अस्वस्थता, तणाव दिसू लागला आहे. 👇
२) त्यावर सारवा-सारव म्हणून, भाजपच्या पोपटाना पाचारण करण्यात आलं. आणि त्यानी हळुच टूम काढत, सावरकराची बदनामी करू नका अस कळवळ्याचा नाटकी आव आणत सांगितलं. त्यांची अटकल बऱ्याच लोकांच्या लक्षात आली का याची कल्पना नाही. मात्र त्यानी, गांधी नेहरू टिळक सावरकर महान होते ;👇
३) त्यांची बदनामी करू नका, म्हणून गांधी नेहरू टिळक या महान काँग्रेसी ओळीत मोठ्या धुर्तपणे हिंदू महासभेच्या सावरकराना, सामील केलं. हा कावा भारतीय समाजातील बुद्धिजीवी लोकांच्या नजरेतून सुटण्यासारखा नाही.
सावरकर आणि काँग्रेसच्या नेत्यांची विचार व कार्यप्रणाली वेगळी आहे. 👇
४) सावरकर महान आहेत का ? स्वातंत्र्यवीर आहेत का ? त्यानी माफी मागितली, त्यामागे गनिमीकावा होता का ? या भिकार कोंबड झुंझीत पूर्ण भारत देश तन मन धन हरपून रटाळ चर्चा करत बसलाय. हे सर्व करण्यापेक्षा दोन्ही उभयपक्षीनी थेट कोर्टात जावं तिथेच काय ते दूध का दूध पाणी का पाणी करावं. 👇
५) सावरकराना महान ठरवण्यासाठी नेहरू गांधी टिळक बोस पटेल यांच्या ओळीत घुसवण्याची अटकल भाजपन करू नये, कारण सावकार यांची हयात काँग्रेसला टोकाचा विरोध करण्यात खपली आहे. त्याना काँग्रेसी नेत्यात घुसडवणे म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांचा आणि पूर्ण चळवळीचा अपमान आहे @sachin_inc
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#Thread
मराठयांचे स्वातंत्र्ययुद्ध - सारांश १ )
छत्रपती शिवशंभूच्या नंतर राजाराम महाराज, ताराराणी, येसुराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठे मोघलांना ताकदीने जिद्दीने झुंजत होते. शिव- शंभू गेल्यावर दक्षिण आपलंच अस समजणाऱ्या औरंगजेबाच्या स्वप्नाला धुळीस मिळवण्याच काम मराठ्यांनी केलं 👇
यात विशेष फरक नमूद करण्याजोगता आहे की
मोघली फौजा, औरंगजेबाच्या स्वप्नासाठी लढत होत्या, आणि मराठे आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. दिल्लीहून आलेले मोघल सरदार सरदार अक्षरशः वैतागले होते,
घरच्याची भेट नाही, आराम नाहीं, बादशहाची लहर आहे दक्षिण जिंकण्याची म्हणून आपण लढायचं
एवढंच काय सत्याची जाणीव झाल्याने, मोघल सैन्य, हातपाय गाळून लढत होत. पण दुसरीकडे मराठे, आपला मुलुख, आपले स्वराज्य, आपले धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा वचपा काढण्यासाठी लढत होते. मराठे आपली आक्रमकता आपला स्वाभिमान अजिबात सोडत नव्हते. हीच त्यांच्या विजयाची किल्ली.
सध्या काही कीर्तने पहिली तर - हे हभप महाराज मंडळी सुंदर कीर्तन करत असताना. मधेच, बाष्कळ बोलून जातात-
अतिशय अभ्यासहीन विचार मांडतात.
सध्याचे युग विज्ञानाचे असल्याने आपल्या धार्मिक मुद्द्याना लोकमान्य करण्यासाठी वैज्ञानिक मुद्द्याचा आधार घेऊन असे अकलेचे
तारे तोडले जातात. 👇
विधान १) 👇
नागपंचमीला झोका खेळताना झोका वर जातो तेव्हा रक्तपुरवठा पायाकडून मेंदूकडे होतो आणि झोका खाली येताना पुन्हा मेंदूकडून पायाकडे..आणि यामुळे छोटे मोठे ब्लॉकेज असेच निघून जातात.
( हा कीर्तन कार्यक्रम आमचे दोस्त @The_realist000 यांनी पहिला असून त्यानी हे ट्विट केले होत)
विधान क्रमांक २) 👇
Z चित्रमंदिर चॅनलवरील कार्यक्रमात -
"एक कीर्तनकार म्हणाले इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केलं पण ते मराठी शिकले नाही.आपले लोकं मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात" (@The_realist000 )
#बळीराजा
ईश्वर अवतार घेतो केव्हां? आणि कशाला?
परित्रणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम् ..!
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे..!
साधू संतांचे रक्षण करवून, गोरगरिबांचे कल्याण, आणि दुष्टाचा नाश करायला. याचाच अर्थ धर्माची संस्थापना होय.
मग बळीराजाने कोणते दुष्कर्म केलं ? 👇
बळीराजा हा जुलमी राजा होता ? प्रजेवर अन्याय करत होता ? तो प्रजेचा छळ करत होता ? त्याने साधू संताना त्रास दिला ? त्यांच्या यज्ञात बाधा आणली ? स्रियांना त्रास दिला ?
अज्जिबातच नाही. तसा उल्लेख कुणी वाचला नाही कारण तसा उल्लेख कुठेच नाही, बळीराजा हा अंत्यत न्यायप्रिय राजा होता 👇
बळीराजा हा प्रजाहितदक्ष राजा होता- त्याची चुकी काय एवढीच सांगितले जाते की-
त्याने शताश्वमेघ यज्ञ करून खुद्द इंद्राचे सिंहासन घेणार होता. त्याचें ९९ मेध पूर्ण होऊन १०० व्याला सुरूवात झाली होती. तेवढ्यात बुटका, आखूड पावलांचा, मोहक चेहऱ्याचा एक सुकुमार बटू येऊन उभा राहिला. 👇
गोब्राह्मण प्रतिपालक नाही रयतेचे राजे.
पुराव्यासाहित #Thread पूर्ण वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपलब्ध पत्रात महाराज कधीही स्वतःला गोब्राह्मण-प्रतिपालक अज्जिबातच म्हणवून घेत नाहीत. शिवचरित्र साहीत्य खंड मधील वाक्य महाराज म्हणत नाहीत, तर तो मोरेश्वर गोसावी म्हणतो. 👇
इ.स - १६४७- १६४८ च्या पत्रात त्या ब्राह्मणांने राजांवर खुश होऊन म्हटल आहे. तसा निर्वाळा थोर इतिहासक संशोधक -त्र्यंबक शंकर शेजवलकर देतात.
आणि त्या ब्राह्मणाने म्हटलं असेल तर त्यात वावग काहीच नाही. ती त्याची राजप्रति असलेलं प्रेम आणि भावना असावी. पण केवळ तेच उचलून मनाचे मांडे नको
हेच ते पत्र - या पत्रात आपण नीट वाचलं तर उमजून येईल, यात तो ब्राह्मण राजांना म्हणतोय - महाराज गो ब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती, आणि त्याच्या खाली 'महाराज कृपाळु हो, अस लिहल आहे. जर राजांनी स्वतः पत्र लिहले असते तर त्यात कृपाळु हो वैगरे लिहून स्वतःची आत्मप्रौढी मिरवली असती का ? 👇
#ज्ञानेश्वर
भटभिक्षुकीवृत्तीने ज्ञानराया सारख्या योगीचे ब्राह्मण्य नाकारले, त्याना वेद बोलण्यास मज्जाव केला. संन्यास्याची लेकरं म्हणून हेटाळणी केली, अन्न पाण्यासाठी झिडकारले. वर्णव्यवस्थेचा आघात करून त्याना समाजवंचित ठेवण्याचा जो यत्न केला, तो अगदी मानवतेच्या विरोधात होता. 👇
हे सगळं पाहून त्या बाल ज्ञानरायाच्या काळजाला चरे पडले, मन अक्षरशः दुःखात निराशेच्या गर्तेत आकंठ बुडाल. समाजातील वर्णवादी लोकांना दूषण देत, रडत झोपडीत गेला आणि दार बंद करून मनाशी मोठा निश्चय केला- आपल्याला मुळीच जायच नाही ह्या लोकांत. आणि ह्या सगळ्या वेदना सहन करत घरातच थांबला.👇
तेवढ्यात स्वभावाने संवेदनशील-निर्मळ आणि वाणीने सडेतोड फटकळ असणारी मुक्ता तिथं आली.
कुटीत ज्ञानेश्वर पाहिले, आणि विचारणा केली काय झालं दार का लावलं रे दादा ? उघड ती ताटी.! त्यावर ज्ञाना दुःखी स्वरात आणि हलक्या रागाने फुरफुरत म्हणाला - कशाला येऊ बाहेर, अपमान करून घ्यायला ?👇
3 शतकापासून व त्याआधीचाही इतिहास समजून घेतला तर उमजून येईल की महाराष्ट्रावर फक्त दक्षिण आणि महाराष्ट्रातील लोकांनीच सत्ता गाजवली आहे.
दिल्लीने अज्जिबात नाही. मग ते मौर्य असतील, तुघलक असतील, मोघल असतील.
ह्याच सह्याद्रीच्या काळ्या दगडाने सर्वांची माथी फोडली आहे.
आक्रमण नक्कीच झाले असतील. त्याची तर माळच लागेल गिणती करायला गेलं तर.
पण महाराष्ट्रभूमी आणि दक्षिणेवर बाहेरच्या लोकांना खास चमक दाखवता आली नाही.
(अपवाद युरोपियन लोकांचा सोडला तर )
याच कारणं आणि समान उदाहरण द्यायचे झाले तर. जगातील सर्वोच्च नीचात्म्यापैकी एक अशा हिटलर -
हिटलर जेव्हा रशिया जिंकण्यासाठी जातो तेव्हा तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता उतावीळ पण रशियात घुसतो, पण - उणे ४० तापमानाची सवय फक्त त्याच भूमीपुत्राना असल्याने जर्मन सैन्य हाल बेहाल होऊन मरतात. आणि नाझी भक्ताना तिथ हार मानावी लागली.