रविश कुमारांच्या काँग्रेस सरकारच्या काळातील काही भूमिका वादग्रस्त होत्या हे कुणीही नाकारू शकत नाही.जसं ती आर्मी चीफ ने अण्णा सोबत हात मिळवावा ही भूमिका असेल किंवा अण्णा हजारे बद्दलच्या भूमिका असतील.
पण जेव्हा भाजप सरकार आल्यावर अनेक पत्रकार सत्तेचे गुलाम होत सरकारची(1/11)
चाटूगिरी करू लागले तेव्हापासून आजपर्यंत रविश कुमारांनी सत्तेत बसलेल्याना प्रश्न विचारणारा पत्रकार म्हणून स्वतः चं अस्तित्व टिकवलं हे ही कुणी नाकारू शकत नाही. आज बोटावर मोजता येतील इतकेच असे पत्रकार उरलेत जे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात,सामान्य जनतेचे मुद्दे उचलतात.
(2/11)
आणि त्यात रविश कुमार आहेत.
रवीश कुमार सारख्या पत्रकाराने तेव्हा असे ट्विट/वक्तव्ये केले असतील यावर विश्वास बसत नाही कारण आर्मी चीफ सारखे ट्विट संविधानाला आणि लोकशाहीला धरून नाहीत.
पण mainstream media मध्ये सरकारला प्रश्न विचारणारा पत्रकार म्हणूनच रवीश यांनी काम केलं
(3/11)
जेव्हा काँग्रेस सरकार होतं तेव्हा भाजपचे भक्त रवीश कुमारांवर खूश असायचे कारण ते तेव्हा काँग्रेस सरकारवर टीका करायचे.आज भाजप सरकार आहे तर काँग्रेसवाले खुश असतात आणि भाजपवाले रवीश कुमारांना ट्रोल करत असतात.उद्या जर पुन्हा काँग्रेस सरकार आलं तर काँग्रेसचे भक्त
(4/11)
त्यांच्यावर टीका/ट्रोलिंग करतील.
#रवीश_कुमार यांच्यावर आपच्या बाबतीत नरम भूमिका घेतल्याचा आरोप केला जातो.NDTV आपचा अजेंडा चालवते असं अनेकदा दिसलं आहे.
मला पण कधी कधी वाटतं की #रवीशकुमार केजरीवाल विरोधात बोलायचं टाळतात पण या दोन दिवसात काही जुने व्हिडीओ बघितले ज्यात
(5/11)
केजरीवालला देखील प्रश्न विचारले आहेत.तरीपण आता जेव्हा युट्युब चॅनल वरून #रवीशकुमार बोलतील तेव्हा केजरीवालच्या बाबतीत बोलताना काही फरक पडतो का बघावं लागेल.
तसं पाहिलं तर alt न्यूज देखील केजरीवाल आणि आपच्या बाबतीत biased भूमिका घेते आणि असे बरेच आहेत जे भाजप विरोधात तर
(6/11)
बोलतात पण केजरीवाल आणि आपच्या विरोधात एकतर बोलत नाहीत किंवा त्यांच्या बोलण्यात तो आक्रमकपणा दिसत नाही जो भाजप विरोधात बोलताना असतो.
असं असलं तरी alt न्यूज फेक न्यूज विरोधात चांगलं काम करतंय हे ही नाकारून चालणार नाही.
(7/11)
#रवीश_कुमार च्या राजीनाम्यानंतर काही गोदी मीडियाचे पत्रकार ट्रोलिंग करायला लागले.
पण त्यांना एवढं समजलं पाहिजे की ते जेव्हा एखादं चॅनेल सोडून दुसरं जॉइन करतात तेव्हा कुत्रं देखील विचारत नाही आणि त्या गोष्टीची चर्चाही होत नाही पण #रवीश_कुमार ने राजीनामा दिल्याची चर्चा
(8/11)
सर्वत्र होतेय हे आपण बघतच आहोत.
आज बहुतांश पत्रकार सत्तेची गुलामी करताना दिसतात त्यामुळे अशा परिस्थितीत #रवीश_कुमार सारख्या पत्रकारांकडे लोकं आशेने बघत आहेत.
हा काल साडेनऊ वाजता घेतलेला स्क्रीनशॉट आहे, तेव्हा त्यांच्या चॅनेलचे 7.14 लाख subscribers होते.
आता 24 तासाच्या आत
(9/11)
Subscribers ची संख्या 12 लाखांहून अधिक झाली आहे. यावरून लोकांना किती अपेक्षा आहेत हे दिसतंय.
त्यामुळे त्यांचे जुने ट्विट किंवा वक्तव्ये वादग्रस्त जरी असले तरी जनतेच्या मुद्यावर बोलणारा आणि जनतेचे मुद्दे उचलणारा पत्रकार या आशेने सगळे त्यांच्याकडे बघत आहेत.आणि सध्या अशा
(10/11)
पत्रकारांच्या मागे लागणं बरोबर नाही असं मला वाटतं.
आणि जे काँग्रेसी भक्त त्या ट्विटचा आधार घेऊन ट्रोल करू पाहत आहेत त्यांनी स्वतः च्या नेत्याने भूतकाळात केलेल्या चुका बघव्यात.सगळं विसरून लोकं तुमच्या नेत्याला स्वीकारतच आहेत की.
विचार करा.
(11/11)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 𝓐𝓫𝓱𝓲𝓳𝓮𝓮𝓽

𝓐𝓫𝓱𝓲𝓳𝓮𝓮𝓽 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @The_realist000

Dec 2
#थ्रेड
#रवीश_कुमार चं जुनं आणि एक ट्विट दाखवून अनेक जण त्यांना ट्रोल करतात.
ट्विटमध्ये त्यांनी "Army chief must join hands with Anna."
असं लिहिलं होतं.या वाक्याचे अनेक अर्थ निघतात. प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार याचे अर्थ लावतो.मी देखील लावला होता.पण हे अर्थ तेव्हाच निघतात(1/9) Image
जेव्हा आपल्याला हे एकच ट्विट दाखवलं जातं आणि त्याच्या आधीचे किंवा नंतरचे ट्विट दाखवले जात नाहीत किंवा मुद्दाम लपवले जातात.
अनेक जण त्या ट्विट ला कोट, रिप्लाय करत #रवीश_कुमार ला ट्रोल करत असतात. यात प्रामुख्याने काँग्रेसचे अंधभक्त, इथे पुरोगामी,रॅशनल म्हणून वावरणारे इ. आहेत.
(2/9)
त्या ट्विट वर आत्ताही जाऊन बघा,रोज अनेक जण रिप्लाय करत असतात,कोट करत असतात.
लिंक देतोय इथे त्या ट्विटची.👇
हा सगळा गोंधळ यामुळे होतोय की या ट्विटचा संदर्भच बऱ्याच जणांना माहीत नाहीये.
झालं असं होतं की तत्कालीन आर्मी चीफ जनरल व्ही के सिंग यांनी
(3/9)
Image
Read 9 tweets
Dec 1
कोणत्या पक्षाचे किती खासदार आहेत हे बघून पत्रकाराने पत्रकारिता करायला पाहिजे का?😄
यातून असा अर्थ निघतो की तो पत्रकार चमकोगिरी साठी मोठमोठे पक्ष निवडून त्याबद्दल बातम्या करतोय.
आप आणि केजरीवाल ज्या पद्धतीचं राजकारण आणि जाहिरातबाजी करतंय त्याची वेळीच दखल घेऊन जनतेला
(1/7)
जागरूक करणं पत्रकारांचं कर्तव्य आहे.
ज्या दिल्ली मॉडेलची मार्केटिंग आप करतंय त्यात खरंच तथ्य आहे का हे बघायला नको का?लोकांना त्याबद्दल सत्य सांगायला नको का?
मोदींनी जेव्हा गुजरात मॉडेल ची मार्केटिंग केली तेव्हा वेळीच जर त्या मॉडेलचं सत्य पत्रकारांनी जनतेसमोर आणलं असतं तर
(2/7)
गुजरात मॉडेल,अच्छे दिन या भूलथापांना लोकं बळी पडले नसते आणि देशाचं एवढं नुकसान झालं नसतं.
केजरीवालचा ढोंगीपणा बघा.पंजाबमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या नावावर राजकारण केलं.हे दोघेही धार्मिक राजकारणाच्या विरोधात असणारे होते.
जेव्हा केजरीवाल पंजाब निवडणूकीत
(3/7)
Read 7 tweets
Nov 19
महात्मा गांधी आणि इतर कैद्यांसाठी ब्रिटिश सरकारने पास केलेल्या बजेट चे फोटो सोशलमीडियावर टाकून अनेक भक्त सावरकरांचा बचाव करू पाहतात.भक्त दावा करतात की सावरकरांना तर 60 च रुपये मिळत होते,पण गांधीना एवढी मोठी रक्कम मिळत होती.
प्रथमतः यातून भक्त हे तर मान्य करतात की
(1/6)
सावरकरांना 60 रुपये मिळत होते.
आता वरील फोटो टाकून करण्यात येणाऱ्या दाव्यांबद्दल बोलायचं झालं तर 1942-43 साठी गांधीजी आणि त्यांच्यासोबत स्थानबद्ध असणाऱ्या इतर लोकांच्या खर्चासाठी जे पैसे ब्रिटिश सरकारने मंजूर केले होते त्याबद्दलचा तपशील त्या फोटो मध्ये दिसतो त्यामुळे
(2/6)
पहिली गोष्ट ती पेंशन नाही जी माफी मागून सुटका झाल्यानंतर मिळत होती.
दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांधीजींनी यासंदर्भात 1943 मध्ये एक पत्र लिहिलं होतं ज्यात त्यांनी त्यांच्या व इतर लोकांच्या सुटकेची मागणी केली होती. या पत्रात गांधीजी लिहितात
"अशा देशात जिथे लाखो ..
(3/6)
Read 6 tweets
Aug 7
अनर्थमंत्री निर्मला अक्का ने ऑईल बॉण्ड वर पुन्हा एकदा संसदेत भाषण देत लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला.
ऑइल बॉण्डचं व्याज आणि परतावा मोदींना करावा लागतोय,त्या इथपर्यंत म्हणाल्या की 2026 मध्ये पण आम्हालाच परतावा करावा लागणार आहे.त्यांच्या बोलण्याचा सूर असा होता की
(1/6)
जसं तत्कालीन 2005 मध्ये असणाऱ्या सरकारला स्वप्न पडलं होतं की 2014 ला मोदी सत्तेत येणार आहे त्यामुळे आपण बॉंडचं व्याज आणि परतावा त्यांच्या माथी मारण्यासाठी 2014 पासून repayment सुरू करू.😅
ऑईल बॉण्ड वर अनर्थमंत्री पहिल्यांदा बोलत आहेत असं नाही,2021 मध्येही त्यांनी यावर
(2/6)
भाषण देऊन पेट्रोल डिझेल वरील टॅक्स कमी करण्यासाठी हे ऑइल बॉण्ड्स कशाप्रकारे अडथळा ठरत आहेत हे सांगितलं होतं.
पण वस्तुस्थिती वेगळी आहे,यांनी इंधनावरच्या वाढवलेल्या टॅक्स मधून एवढा पैसा कमावला आहे की त्याच्यासमोर या ऑईल बॉण्डचं रिपेमेंट काहीच नाही.
त्यासंदर्भातील हा लेख .
(3/6)
Read 6 tweets
Aug 6
बातम्यांच्या चॅनलवर आता अशा प्रकारची जाहिरातबाजी चालू झाली आहे.17 हजारांचा कोर्स 7 वाजेपर्यंत विकत घेतल्यास 2400 मध्ये मिळवा वगैरे.
यात 2-4 लोकांच्या प्रतिक्रिया पण दाखवतात जे सांगत असतात की या सरांकडून ट्रेडिंग शिकल्याने खूप फायदा झाला वगैरे.
पण ट्रेडिंग करताना (1/7)
कुणी आपल्याला 80-90% accuracy असलेली स्ट्रॅटेजी शिकवू द्या, जर आपण रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट प्रॉपरली फॉलो केलं नाही तर शेवटी आपल्याला लॉस होतो.
आपण 80-90% accuracy मध्ये छोटे प्रॉफिट घेण्यात यशस्वी ठरतो पण जे 20% ट्रेड आपले फेल जातात तिथे आपण मोठे लॉस घेऊन बसतो
(2/7)
आपण मोठे लॉस सहन करू शकतो पण मोठे प्रॉफिट सहन करणं अवघड असतं. थोडा प्रॉफिट व्हायला लागला की आपल्याला वाटतं की मिळतंय तेवढं पदरात पाडून घ्या.पण जेव्हा लॉस होत असतो आणि आपण स्ट्रिक्टली स्टॉप लॉसचे रुल्स फॉलो करत नाही तेव्हा आपण वाट बघत बसतो की price आपल्या buying Price ला येईल(3/7)
Read 7 tweets
May 5
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताला ओळखलं जातं. या लोकशाहीचा पंतप्रधान गेल्या आठ वर्षात भारतात भारतीय पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊ शकला नाही.ती 1 पत्रकार परिषद सोडून द्या ज्यात धरून आणल्यासारखं पंतप्रधानांना बसवलं होतं.
पंतप्रधान ज्या स्क्रिप्टेड मुलाखती देतात
(1/4)
त्यात त्यांना प्रश्न विचारले जातात की तुम्ही थकत का नाही,एवढी एनर्जी कुठुन येते वगैरे.
देशात बेरोजगारी,महागाईचा भडका उडाला असताना पंतप्रधान त्यावर बोलत नाहीत.
नुकतेच पंतप्रधान युरोप दौऱ्यावर असताना पत्रकारांचे प्रश्न न घेतल्यामुळे पंतप्रधानांवर टीका होत आहे.
(2/4)
डॅमेज कंट्रोल साठी भाजप IT cell कडून आणि भाजप नेते, मंत्री,गोदी मीडिया यांच्याकडून 65 तास ,3 देश वगैरे मेसेज सोशल मीडियात पोस्ट केले जात आहेत.
हेच गोदी मीडिया आणि IT सेल भारत विश्वगुरू,महासत्ता वगैरे झाल्याचं दाखवत असतात.
ज्या देशांसोबत आपण भारताची तुलना करतोय
(3/4)
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(