७० च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारवलेले होते
बहुदा त्यांची ही शेवटची पिढी...
माझे मराठी आणि इतिहासाचे शिक्षक #कॉँग्रेस विचारधारा मानणारे होते पण त्यांनी कधीही आमच्यावर ती थोपवली नाही उलट आम्हाला आमची स्वतःचं मत व्यक्त करायलाच शिकवलं. केंद्रात आणि राज्यात कॉँग्रेसचीच सरकारे होती पण तरीही आमच्या अभ्यासक्रमात #सावरकर होते....
या देशासाठी योगदान देणार्या कोणालाही कॉँग्रेसने कधीच कमी लेखलं नाही.मला आठवतं सावरकरांची " सागरा प्राण तळमळला" ही कविता आमचे हेच कॉँग्रेस विचाराचे असणारे गुरुजी किती तळमळीने डोळ्यात पाणी आणून शिकवायचे आणि ऐकताना आम्ही मूलमुली अक्षरशः रडायचो !!...
इतिहासाचे गुरुजी समुद्रात घेतलेल्या उडीचं वर्णन करू लागले की अंगावर शहारे उभे राहायचे आणि काळ्या पाण्याचे वेळी झालेला छळ ऐकला की मन सुन्न व्हायचं ! पण या मास्तरांनी कधीही आम्हाला सावरकरांनी माफी मागितल्याच, इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याचं किंवा..आपल्या राष्ट्रपित्याच्या हत्येत
त्यांच नाव आल्याच कधीही आम्हाला कळू दिल नाही. कारण कॉँग्रेस आणि गांधी-नेहरूंच्या विचारांचे संस्कार !!! आमच्या मनामधे सावरकरांची प्रतिमा एक थोर साहित्यिक, राष्ट्र कवि आणि स्वातंत्र्यवीर अशीच कायम रुजवली गेली होती...
सावरकरांविषयी कमालीचा आदरही होता
पण २०१४ मध्ये भाजपा सरकार आले आणि गांधी-नेहरू कसे हिंदू विरोधी हे दाखवायला आणि सावरकरच कसे वीर होते याची अतिशयोक्ती करण्याच्या नादात गांधी नेहरूंची बदनामी करायला सुरुवात केली गेली. इथूनच खऱ्या अर्थाने सावरकरांच्या '#वीर'पणाची पडझड सुरू झाली
कारण..
क्रियेला प्रतिक्रिया तर येणारच ना !
डाव्यांनी मग उत्तरादाखल आजपर्यंत माहीत नसलेले सावरकरांचे #माफीनामे, इंग्रजनिष्ठा, पेन्शन आणि इतर बाजू लोकांसमोर मांडायला सुरुवात केली. कॉँग्रेसच्या ७० वर्षात सावरकरांची कधी बदनामी झाली नसेल तेवढी २०१४ पासून झाली..
मला वैयक्तिक सुद्धा सावरकरांनीविषयी ह्या सगळ्या गोष्टी भाजप सरकार आल्यानंतर कळल्या आणि सावरकरांनीविषयी पहिल्यासारखा आदर आता राहिला नाही. एक साहित्यिक, कवी म्हणून आजही आदर आहे. मग तुम्ही ठरवा..
सावरकरांना #माफीवीर कुणी बनवलं ?
तुमच्या आजूबाजूच्या कोणालाही विचारा सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून पेन्शन घेतली हे तुला कधी कळालं ? #उत्तर असेल २०१४ नंतर..
मग आता तुम्हीच ठरवा सावरकर माफीवीर होते हे लोकांना कुणामुळे समजलं ?
काँग्रेस की भाजप ?
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
बरेच लोक केनियाने पाठवलेल्या १२ टन धान्याची थट्टा करीत आहेत. केनियाला सोशल मीडियावर "भिकारी, गरीब" इत्यादी म्हटले जात आहे. तर एक छोटीशी कथा ऐका..
तुम्ही अमेरिका, मॅनहॅटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ओसामा बिन लादेन ही सर्व नावे ऐकली असतीलच.
बहुतेक लोकांनी जे ऐकले नसेल, ते म्हणजे 'केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर पडणारे 'इनोसाईन' गाव आणि येथील स्थानिक जमात "मसाई"!
अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्याची बातमी मसाई लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने लागले. आपल्या जवळच्या गावात राहणारी आणि
स्टॅनफोर्ड विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी किमेली नाओमा सुट्टीवर जेव्हा केनियाला परत आली, तेव्हा तिने स्थानिक मसाई लोकांना ९/११ च्या हल्ल्याविषयी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगितली.
एखादी इमारत इतकी उंच असू शकते की ती पडली तर तिच्याखाली दबून इतकी
चहा, कॉफी, भुईमूग अशी केनियात पिकलेल्या १२टन खाद्यपदार्थांची भेट केनियाने भारताला देऊन करोना संकटात आपला मैत्रभाव व्यक्त केला आहे. मुंबईतील कोविड फ्रंटलाईन फायटर्सना मुख्यतः ही अन्नाची पॅकेट्स देण्याची इच्छा त्या देशाच्या भारतातील
उच्चायुक्तांनी व्यक्त केली आहे.
चहा, कॉफी, भुईमूग यांची भारतात वानवा आहे असे नाही. आपण जे देतोय ते अन्नपदार्थ भारतासाठी काही फार मोठे अप्रूप नसणार याची केनियाला कल्पना नाही, असेही नाही. पण थेट आपल्या शिवारातील वानोळा देण्यामागे जी " संकट काळात आम्ही सोबत आहोत " ही भावना या
लहानशा देशाने दाखवली आहे त्याला खरी दानत म्हणतात !
केनियातील माणसे आपण विडिओत पाहतो. काटक शरिराची व कणखर मनाची. तिथल्या वैविध्यपूर्ण निसर्ग व प्राण्यांशी एकरूप झालेली. चित्र विचित्र पोशाखाची. पर्यटकांशी देहबोलीतून हितगुज करणारी. निखळ, निर्व्याज मनाची.
हिरोला गुंडांनी बेदम मारले आहे... तो जमिनीवर अगदी मरणोन्मुख होऊन पडला आहे.. व्हिलनला वाटते तो मेलाच... आणि अचानक कशाने तरी प्रेरित होऊन तो उभा राहतो आणि सगळ्या गुंडांना मारतो- हे पाहणे आपल्या भारतीयांना जाम आवडते. भारताने दुसऱ्या कसोटीत मिळवलेला विजय यापेक्षा
1
काही वेगळा नव्हता. पण हा विजय केवळ क्रिकेटप्रेमींनी साजरा करावा असाच नाही, तर सगळ्यांनी काही लाईफ लेसन्स घेऊन जावे असा आहे..
त्याआधी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. ह्या जानेवारीमध्ये विरुष्काच्या प्रेमाला गोड फळ येणार हे आधीच डिक्लेअर झाले होते. जानेवारीतच भारत
2
महत्वाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही येणार होता. म्हणजे पहिल्या कसोटीनंतर विराट पितृत्व रजेला जाणार त्यानंतर उपकप्तान अजिंक्य रहाणे कडे नेतृत्वाची धुरा जाणार हे आधी माहित होतेच. बहुतेकांनी याकडे थोडे नाक मुरडूनच पहिले. म्हणजे ठीक आहे की तो कसोटी संघाचा उपकप्तान आहे,
सुशिक्षित कोण आणि अशिक्षित कोण ? या प्रश्नाचा एक नवा वेध घेणे गरजेचे आहे. सध्याची सुशिक्षित लोकांची व्याख्या त्याच्या शिक्षण नावाच्या रचनेशी जोडलेली आहे. अर्थात जो शिकलाय तो सुशिक्षित आणि नाही शिकला तो अशिक्षित . इथे एक प्रश्न जाणीवपूर्वक उभा करायला हवा की,
खरोखरीच शिक्षण घेतलेले " सुशिक्षित " आहेत का ? शिक्षण म्हणजे नेमके काय ? चार पुस्तके आणि शाळा नावाची रचना मनुष्याला सुशिक्षित बनविण्यासाठी पुरेशी आहे का ? सदसदविवेकबुध्दी शाबूत राखून या तीन प्रश्नांची उत्तरे शोधल्यास काही नकारार्थी उत्तर हाती येऊ शकतात. शिक्षण घेतलेल्या
बहुतांशी व्यक्तीचे सामाजिक वर्तन हे अत्यंत मागास दर्जाचे असते. याची उदाहरणे नुसते डोळे उघडून सर्वत्र फिरवले तरी ठायीठायी दिसतील. भ्रष्टाचार , व्यसनासक्त ,जातीयता अंधश्रध्दा अशा बरेच बाबतीत सुशिक्षित मंडळी मागे नाहीत तर पुढेच आहेत हे नाकारता येत नाही .