विशाल Profile picture
फैन ऑफ नेताजी सुभाषचंद्र बोस | वाचक | भगतसिंग आणि गांधीवादी | एकांती | आळशी | इतिहास प्रेमी | सत्तेचा कायमस्वरूपी विरोधक | AB+| @ManUtd @NUFC |
Jul 28, 2023 22 tweets 4 min read
सरदार वल्लभाई पटेल यांना हायजॅक करण्यास #RSS व भाजपाने इतकी घाई का ? केली हे समजून घेण्यासाठी अगदी मुद्देसुद्द असणारा अत्यंत महत्त्वाचा लेख आहे अगदी आवर्जून वाचा.

#नेहरूंचे_महत्व_नाकारणारी_पटेलवादी_विध्वंसक_तत्वे

+ Image सरदार वल्लभभाई पटेल हे खरेच जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा मोठे होते ? पंतप्रधानपदावर खरेच नेहरूं ऐवजी पटेल यांचा हक्क होता ? कशामुळे ? नेहरूंऐवजी पटेल पंतप्रधान झाले असते तर भारतीय राष्ट्रीय समाज जीवनात क्रांतिकारक बदल झाले असते ? हे सारे प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे
+
Jul 15, 2023 7 tweets 3 min read
सावरकरांची समुद्रात मारलेली उडी घराघरात पोहोचली पण अजूनही इंग्रजांना चुकवणार्या खालील 4 जणांच्या उड्या लोकांना माहीत नाही

1) क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अटकेत असताना रेल्वेतून कृष्णेच्या पात्रात मारलेली उडी. Image 2) वसंतदादा पाटील यांनी पाठीमागून सुरू असलेला इंग्रज पोलिसांचा गोळीबार चुकवत ( यात वसंतदादांचे 2 साथीदार शहिद झाले होते ) दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीत 40 फुटांवरून मारलेली उडी यावेळी कुंडल चे क्रांतिकारक मामासाहेब पवार यांचा ही सहभाग होता. Image
Mar 23, 2023 23 tweets 4 min read
भगतसिंग लिहितात..."जेव्हा माणूस पाप किंवा गुन्हा करत असतो तेव्हाच त्याला तुमचा तो सर्वशक्तिमान परमेश्वर त्यापासून परावृत्त का करत नाही? हे तर तो अगदी सहज करू शकतो. त्याने युद्ध करणाऱ्या राजांना का ठार मारले नाही किंवा त्यांच्यातील युद्धाची उर्मी गाडून का टाकली नाही, आणि याप्रकारे विश्वयुद्धामुळे मानवतेवर पडलेल्या संकटापासून त्याने का नाही वाचवले ? भारताला स्वतंत्र करण्याची भावना त्याने इंग्रजांच्या मनात का नाही निर्माण केली ? उत्पादनाच्या साधनांवर असलेला आपला व्यक्तिगत मालकीहक्क सोडावा अशी भांडवलदारांच्या मनात परोपकाराची भावना तो का उत्पन्न
Jan 23, 2023 12 tweets 4 min read
नेताजी सुभाष बाबुंचे सावरकर आणि हिंदुत्ववाद्यांबद्दल नक्की काय विचार होते?

1938 मध्ये सुभाष चंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी संघटनेच्या घटनेमध्ये एक दुरुस्ती प्रस्ताव आणला.

1/12 सुभाषबाबुंच्या ह्या प्रस्तावाद्वारा हिंदू-महासभा अथवा मुस्लिम लीग ह्या दोन जातीय संघटनांचे सदस्यत्व असलेल्या कुणाही व्यक्तीस काँग्रेस संघटनेच्या कोणत्याही निर्वाचित समितीचे सद्स्यत्व देण्यापासून प्रथमच रोख लावण्यात आली.

2/12
Dec 9, 2022 9 tweets 3 min read
डॉ. सुनील देशमुख यांच्या फेसबुक वॉलवरून

सावरकरांना " #माफीवीर " कुणी बनवलं ??
कॉँग्रेसने की भाजपने ??

७० च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारवलेले होते बहुदा त्यांची ही शेवटची पिढी...
माझे मराठी आणि इतिहासाचे शिक्षक #कॉँग्रेस विचारधारा मानणारे होते पण त्यांनी कधीही आमच्यावर ती थोपवली नाही उलट आम्हाला आमची स्वतःचं मत व्यक्त करायलाच शिकवलं. केंद्रात आणि राज्यात कॉँग्रेसचीच सरकारे होती पण तरीही आमच्या अभ्यासक्रमात #सावरकर होते....
Jun 5, 2021 12 tweets 3 min read
बरेच लोक केनियाने पाठवलेल्या १२ टन धान्याची थट्टा करीत आहेत. केनियाला सोशल मीडियावर "भिकारी, गरीब" इत्यादी म्हटले जात आहे. तर एक छोटीशी कथा ऐका..

तुम्ही अमेरिका, मॅनहॅटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ओसामा बिन लादेन ही सर्व नावे ऐकली असतीलच. बहुतेक लोकांनी जे ऐकले नसेल, ते म्हणजे 'केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर पडणारे 'इनोसाईन' गाव आणि येथील स्थानिक जमात "मसाई"!

अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्याची बातमी मसाई लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने लागले. आपल्या जवळच्या गावात राहणारी आणि
Jun 5, 2021 4 tweets 2 min read
कनवाळू 'केनिया' कडून आलेला वानोळा ...

चहा, कॉफी, भुईमूग अशी केनियात पिकलेल्या १२टन खाद्यपदार्थांची भेट केनियाने भारताला देऊन करोना संकटात आपला मैत्रभाव व्यक्त केला आहे. मुंबईतील कोविड फ्रंटलाईन फायटर्सना मुख्यतः ही अन्नाची पॅकेट्स देण्याची इच्छा त्या देशाच्या भारतातील उच्चायुक्तांनी व्यक्त केली आहे.

चहा, कॉफी, भुईमूग यांची भारतात वानवा आहे असे नाही. आपण जे देतोय ते अन्नपदार्थ भारतासाठी काही फार मोठे अप्रूप नसणार याची केनियाला कल्पना नाही, असेही नाही. पण थेट आपल्या शिवारातील वानोळा देण्यामागे जी " संकट काळात आम्ही सोबत आहोत " ही भावना या
Jan 23, 2021 13 tweets 4 min read
नेताजी सुभाष बाबुंचे हिंदुत्ववाद्यांबद्दल नक्की काय विचार होते?

1938 मध्ये सुभाष चंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी संघटनेच्या घटनेमध्ये एक दुरुस्ती प्रस्ताव आणला.

1/12 Image सुभाषबाबुंच्या ह्या प्रस्तावाद्वारा हिंदू-महासभा अथवा मुस्लिम लीग ह्या दोन जातीय संघटनांचे सदस्यत्व असलेल्या कुणाही व्यक्तीस काँग्रेस संघटनेच्या कोणत्याही निर्वाचित समितीचे सद्स्यत्व देण्यापासून प्रथमच रोख लावण्यात आली.

2/12 Image
Jan 2, 2021 28 tweets 6 min read
#अजिंक्य विजय

हिरोला गुंडांनी बेदम मारले आहे... तो जमिनीवर अगदी मरणोन्मुख होऊन पडला आहे.. व्हिलनला वाटते तो मेलाच... आणि अचानक कशाने तरी प्रेरित होऊन तो उभा राहतो आणि सगळ्या गुंडांना मारतो- हे पाहणे आपल्या भारतीयांना जाम आवडते. भारताने दुसऱ्या कसोटीत मिळवलेला विजय यापेक्षा

1 काही वेगळा नव्हता. पण हा विजय केवळ क्रिकेटप्रेमींनी साजरा करावा असाच नाही, तर सगळ्यांनी काही लाईफ लेसन्स घेऊन जावे असा आहे..

त्याआधी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. ह्या जानेवारीमध्ये विरुष्काच्या प्रेमाला गोड फळ येणार हे आधीच डिक्लेअर झाले होते. जानेवारीतच भारत
2
Jan 2, 2021 5 tweets 1 min read
सुशिक्षित कोण आणि अशिक्षित कोण ? या प्रश्नाचा एक नवा वेध घेणे गरजेचे आहे. सध्याची सुशिक्षित लोकांची व्याख्या त्याच्या शिक्षण नावाच्या रचनेशी जोडलेली आहे. अर्थात जो शिकलाय तो सुशिक्षित आणि नाही शिकला तो अशिक्षित . इथे एक प्रश्न जाणीवपूर्वक उभा करायला हवा की, खरोखरीच शिक्षण घेतलेले " सुशिक्षित " आहेत का ? शिक्षण म्हणजे नेमके काय ? चार पुस्तके आणि शाळा नावाची रचना मनुष्याला सुशिक्षित बनविण्यासाठी पुरेशी आहे का ? सदसदविवेकबुध्दी शाबूत राखून या तीन प्रश्नांची उत्तरे शोधल्यास काही नकारार्थी उत्तर हाती येऊ शकतात. शिक्षण घेतलेल्या
Dec 13, 2020 4 tweets 1 min read
शेतकरी आंदोलन करताहेत हा प्रॉब्लेम नाहीये,

शेतकरी सरकार प्रत्यक्ष चालवणाऱ्या दृश्य असलेल्या अदृश्य हातांचा बहिष्कार करायला सांगताहेत आणि कृती करताहेत हा खरा प्रॉब्लेम आहे.

कधीही कुठेही या दोन उद्योग समूहांचा उल्लेख आला की भक्त मंडळी, आयटीसेल, भाजपचे लोक का चिडतात आणि तुटून पडतात त्यामागे हेच उघड गुपित आहे.

सगळ्यांना पक्के ठाऊक आहे,

महामहिम फक्त परदेश दौरे आणि चमकोगिरी करण्यापूरते आणि संघाचा धार्मिक अजेंडा राबवायला आहेत.

सरकारची आर्थिक, औद्योगिक धोरण ठरवणारे दुसरेच आहेत.

म्हणूनच खऱ्या मालकांची नाव घेतली की भक्त चवताळून जातात.
Dec 13, 2020 5 tweets 1 min read
दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांना लंगर, रोटी मशिन्स, दूध तूप भाजीपाला यांना पैसे कोण देतंय म्हणून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना ,

नोटबंदी मध्ये अचानक भाजपची सगळ्या देशभरात टोलेजंग ऑफिसेस कशी उभी राहिली याचे प्रश्न पडले कधी ? काकाजी दहा लाखाचा सूट कुठून घालत्यात आणि तैवानी मश्रुम कुठून आणतात याचे प्रश्न पडलेत कधी ?

ठोक भावात कानडी, एमपी मधले आमदार खासदार खरेदी करायला पैशे कुठून येतात याचे प्रश्न पडलेत कधी ?

पीएम केअर फंडात आलेले पैसे कुठं गेले याचे प्रश्न पडलेत कधी ?
Aug 29, 2020 16 tweets 3 min read
शेठ जसे सत्तेत आले तस मालकांनी देशातील कोणकोणत्या सरकारी संस्था,कंपन्या यांना विकून टाकले,किंवा त्या कंपन्यांत असणारी सरकारी गुंतवणूक काढून घेतली...यावर एक नजर टाकूयात.

2014-15

1. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड.
0.29% सरकारी हिस्सा विकण्यात आला. 2. SAIL (Steel Authotiry of india ltd.)
5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

3. NALCO (National Aluminium Company Ltd.)
0.13 % सरकारी हिस्सा विकण्यात आला.

4. MMTC (Minerals and Metals trading Company)
0.073% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
Jun 14, 2020 13 tweets 5 min read
लॅटिन अमेरिका नावाने ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण अमेरिका खंडातील, अर्जेंटीना या देशातील एक तरुण, १९५१ साली आपल्या मित्राबरोबर, मोटरसायकलीवर स्वार होऊन पॅसिफिक किनारपट्टीने, लॅटिन अमेरिकेच्या सफरीवर निघाला. ही सफर त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. लॅटिन अमेरिका खंड म्हणजे अनेक छोट्यामोठ्या देशांचा समूह. युरोपियन साम्राज्यवादाचे बळी असलेले, हे सर्व देश शोषण, दारिद्र्य, बेरोजगारी आदी समस्यांनी ग्रस्त. शेतकरी, खाण कामगार यांची पूंजीपती वर्गाने चालवलेली भयंकर पिळवणूक बघून तो तरुण कमालीचा अस्वस्थ झाला.
Jun 11, 2020 16 tweets 4 min read
" चीन नेहरू मोदी आणी संघी पिलावळ.!"

चीनने दिल्लीतील मोदी यांचे सरकार 'छानछोकी'तच मश्गूल असतांना लडाख मधील अत्यंत मोक्याच्या भुभागाचा ताबा मिळवून त्या भागात पर्मनंट स्ट्रक्चर बनवून अत्याधुनिक क्षेपणास्त्रे,रडार, युध्दसज्ज वाहने सैनिक यांचे तळ ही उभारले.

1/15 दोन महिन्यांपासून सरकार बेसुध होते. काही
राष्ट्रप्रेमी सामायिक वार्ताहर,माजी लष्करी अधिकारी आणी विशेषतः मा राहूल गांधी यांनी जबरी टिका सुरू केल्यावर हे 'कुंभकर्ण' ऊठलेत म्हणे .बरं हे असे का झाले यांचे आणी आपला भुभाग परत ताब्यात करण्यासाठी मिळवण्याचे नियोजन करायच्या ऐवजी ही
2/15
Jun 7, 2020 44 tweets 7 min read
गांधींनी दक्षिण अफ्रिकेतून आल्या आल्या अहमदाबाद येथील कोचरब इथे आश्रम स्थापन केला. त्या आश्रमात एक जोडपं अस्पृश्य जातीच होतं. म्हणून आश्रमातच नव्हे तर त्या संपूर्ण भागात खळबळ माजली. त्या जोडप्याला आश्रमात ठेवू नये, असा दबाव जेवढा आश्रमातून होता तेवढाच तो बाहेरुनही वाढला होता.

1/ कोचरब आश्रम त्या जोडप्याला आश्रमाबाहेर काढलं नाही, तर आश्रमासाठी देण्यात येणारी आर्थिक मदत बंद केली जाईल, अशी धमकीही आश्रमाला आर्थिक मदत करणाऱ्याने गांधीना दिली होती. त्या आश्रमातील त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा या मुद्द्यावर आश्रम सोडण्याची तयारी केली होती.

2
May 30, 2020 17 tweets 6 min read
कोरोना मुंबईचा आणि न्यूयॉर्कचा

गेले काही दिवस विरोधी पक्षाकडून सतत मुंबईतील कोरोनाच्यापरिस्थिती वरून महाराष्ट्र सरकारला सर्व बाजूने घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे.रोज भाजप नेत्यांकडून मुंबईतील कोरोना पेशंटची आकडेवारी समोर केली जाते. किरीट सोमय्या, राम कदम, आशिष शेलार किंवा राणे
1/16 भाजप नेत्यांकडून वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमातून प्रसारित करून मुंबईत परिस्थिती खूप भयानक आहे अश्या पद्धतीचे खोटं चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

खरंतर मुंबईतील परिस्थिती खराब आहे हे दाखवून पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्न पाहणाऱ्या भाजप नेत्यांना
2/16
Apr 2, 2020 23 tweets 9 min read
दिनांक- 26 November 2016
#फिडेल_कॅस्ट्रो

अमेरिकेच्या साम्राज्यवादी राजकारणाला तब्बल सहा दशकांहून अधिक काळ यशस्वी आणि कडवं आव्हान देणाऱ्या आणि क्युबन क्रांतीचे जनक फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन झाल्याची बातमी जेव्हा इंटरनेटवरून कळाली तेव्हा आधी विश्वासच बसला नाही. कारण याआधीही फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनाच्या अनेकदा अफवा उडाल्या होत्या.ऑगस्ट 2011 मध्ये फिडेल इज डेड नावानं ई मेल आले होते. तर 2012 आणि नंतर 2104 मध्येही अशाच अफवा इंटरनेट हॉक्समुळे सातत्याने येत होत्या. पण आज आलेली बातमी अफवा नव्हती. आज खऱ्या अर्थानं वीसाव्या शतकाची अखेर झाली.