Long thread #चुनाभट्टी
मुंबईतल्यांना चुनाभट्टी हे नाव सहज माहीतेय. हार्बर ला रेल्वे स्टेशन ही आहे त्या नावाचे.
मुंबईतली ब्रिटिशकालीन जी काय बांधकामे झालीत, आणि आजही ही मजबूत आहेत याचे संपूर्ण श्रेय चुनाभट्टी भागाचे आहे. चुन्याच्या खूप मोठ्या भट्ट्या त्याभागात होत्या. (१)
चुन्याच काम हे सिमेंटच्या कामापेक्षा कितीतरी मजबूत.जुन्या गड किल्ल्यांची पण साक्षय याला.
मुंबईत आता चुनाभट्टी नाहीत,मला चुनाभट्टी बघायला मिळाली रत्नागिरी मधल्या जुवे गावात.जुवे म्हणजे खाडीतले बेट.खाडीत मिळणारे शिंपले गोळा करून भट्टीत भाजून मग चोपले की बारीक शुभ्र चुना मिळतो(२)
हे वाचायला जेवढे सोप्पे वाटते तेवढेतर नक्कीच नाही.
गोलाकार भट्टीत लाकडाचा थर द्यावा लागतो. थोडीही जागा न ठेवता तो मांडवा लागतो. मध्ये उभा ओंडका बसेल एवढीच जागा ठेवायची, मग त्यावर शिंपल्यांचा थर लावायचा. परत लाकडांचा थर लावायचा. अशे पाच थर लावायचे.(३)
फोटोत गोलाकार भट्टी दिसतेय त्याच्या वर तीन फूट थर लावायचे. मग भट्टी पेटवायची. सतत पेटत ठेवायची. तीन दिवसांनंतर परत सगळा थर जमीनीपासून दीड फूट एवढाच राहतो. त्यावर पुन्हा लाकडाचे व शिंपल्याचे थर रचायचे. परत भट्टी पेटवायची. परत ते थर पुर्ण भट्टी च्या परिघापर्यंत राहतात.(४)
यावर मग पाणी मारावे लागते. ते कोणीही मारून चालत नाही, मुरलेला सेंद्रीय पध्दतीने अनुभव घेतलेलाच माणूस ते काम करू शकतो नाहीतर काम बिघडते. मग थरातला माल काढून चोपावा लागतो. नंतर चाळावा लागतो. तीन वेगवेगळ्या दर्जाचा माल चाळणीने बाजूला करतात.(५)
यातला शुभ्र बारीक पावडर ही एक नंबरचा चुना असतो.
सध्या अशा भट्ट्या मोजक्याच उरल्यात, चुना बांधकामांना वापरणे बंद झाले. घरांच्या प्लॅस्टर ला चुना वापरला जायचा तो पुट्टी नावाची गोष्ट आल्याने बंद झाला. दर्जा राखण्यासाठी मोजके बिल्डर वापरतात चुना.(६)
काही कोळंबी प्रकल्पात कोबंळी संपल्यानंतर नवीन बीज टाकण्याआधी पाणी अल्कलाईन करण्यासाठी चुना वापरला जातो.
सात ते आठ दिवसांची मोक्कार अंगमेहनत. लाकूड व शिंपल्यांसाठी इतर ठिकाणांवर अवलंबून राहावे लागते. त्याचेही अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागतात.(७)
एवढे झाल्यावरही खूप कमी चुना तयार होतो. त्यात वीस किलोच्या गोणीला ४०० रूपये मिळतात.
मुद्दा कायय तर हे जुन ज्ञान आहे, माहीती नाही जी इथे पोस्ट मध्ये मांडलीय. इथल्या शंभर शब्दात नव्वद चुका असतील. अनुभवातून आकळणे हे सर्वच कलेत समाविष्ट होते. (८)
हा चुना बनवणे म्हणजे एक कविताय लयदार कविताय, त्यात माहीतीचे फुंदके मारता येत नाही. पण चुना लावण्याची कला अनेकांनी सहज साध्य केलीय. कित्येक घामाच्या भावना ह्या चुन्यात मिसळल्या असतील. ह्या भावनाही काही दिवसांनी मरतील. आणि चुना बनवण्याची कविताही संपतील.(९)
अशा कवितांना शहरातला खंडेराव हुंदके देईल. पण त्या घामाची तुच्छता त्याला आहेच.
इथून पुढे काय होईल, कोणाला चुना लावायचाय असे बोलायला पण भीती वाटेल. कारण चुना बनवणे लै अवघडय. कोणत्या इंजिनीयरलाही जमणे अवघड. कारण नाळ जोडावी लागते, मशीनीला असतात का नाळी.(१०) @MarathiRT@MeeTejaMES
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
हे आहे साखरी नाटे.
४००० वा थोडी कमी जास्ती लोकसंख्या. साखरी नाट्यात साधारण ५०० मोठ्या तर २०० च्या वर छोट्या बोटी आहेत.मोठ्या बोटीवर ४० च्या आसपास काम करतात. तर छोट्या बोटावर १० जण काम करतात. हे बघता एकूण २२ हजार लोकांना काम यातून मिळत. हे फक्त मासेमारी शी निगडित(१)
मासे विकणे , त्याचे परिवहन , प्रक्रिया याचा यात उल्लेख नाही. ते धरले तर ४० हजार हून अधिकचा रोजगार केवळ साखरी नाटे हे बंदर देते. एक मोठी बोट व त्यावरचे इतर सामान यांची किंमत साधारण ७० लाखांच्याही वर जात असते. म्हणजे ३५० कोटी हे बोटींसाठी लागलेत.(२)
आणि दिवसाला ३ कोटींची उलाढाल ह्या बंदरातून होत असते. आजही हे बंदर पुर्ण क्षमतेने कार्य करत नाही. कारण बंदरावर जाण्यासाठी मोठा रस्ता नाही किंवा मोठी जेट्टी सुध्दा नाही. त्याची अंमलबजावणी केली तरी लाखभर रोजगार निर्माण करण्याची क्षमता ह्या ‘गावाची’ आहे.(३)
दहिहंडी जुनी असेल खूप , काला म्हणत असतील जुन्या काळी. पण ही मुंबईतली थरांची दहिहंडी ही इथून सुरू झालीय.
ही दहिहंडी का सुरू झाली असेल, किर्तनात तर काठीनेच हंडी फोडतात थर लावत नाही. कोणी सुरवात केली हे थर लावायला, तर मुंबईतल्या भंडारी समाजाने.(१)
कसे ते नंतर सांगतो. भंडारी हे भांडार रखवालदार म्हणून नाव पडले असावे असेही म्हणतात. संस्कृतच्या ‘मनधारक’ वरून भंडारी झाले असे बोलले जाते पण मला काही पटत नाही. माहिम हे भंडारी राज्य होते. बिंब राजे हे भंडारी होते असे बोलले जाते. पहिल्यापासून लढवय्ये.(२)
पण ते ताडी कधी बनवायला लागले माहीत नाही. मनधारक हे ताडी बनवणार्याला संस्कृत मध्ये म्हटले जाते. मुंबई गॅजेट मध्ये मारामारी आणि ताडी बनवणे ह्या गोष्टी भंडारी समाजाला येतात असे बोललेय.
तर हे मध्ययुगात ताडी बनवणे व विक्री करणे यात आले.(३)
यश नेहमीच खर नसत ,अस कोणीतरी बोललंय.खरच बरोबर वाटत जेव्हा साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड च्या क्रिकेट टीम बघतो.त्यांच्या कडे यश मिळवून देऊ शकणारे खेळाडू होतेच,पण टीम पण होती. पण नाही शक्य झालं.यश शक्य होणे याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात.पण यश नाही म्हणून कोणी कच्चा असतो असे नाही.(१)
खेळाच्या परिपक्वतेवरून खेळाडू चा दर्जा ठरवला जातो बहुतेक. पण समीक्षा करणारे लोकच ह्या जगात तुन बाद झालेत. त्यांना समीक्षा करायची असते का गांड खाजवायची असते. लोकांच्या समीक्षेवर आता बोलणंच बंद केलं पाहिजे, समीक्षेचा उद्देश त्यांच्यासाठी आत्मप्रौढी मिरवण असाही असू शकतो.(२)
मिरवावी पण पळणाऱ्याच्या पायात पाय टाकून पाडणारी कशाला. त्यात आपण अभिजात कलेचे खेळाचे वाहक आहोत हा आदिम दंभ.
परवा कोणी तरी म्हटल कंपौंडर का काय ते, चांगली समीक्षा करतात बहुतेक ते. खरंच आहे त्यांचं. माझ्या एका मित्राचा बाप सरकार मध्ये क्लर्क आहे अशी नोंद असेल सरकार दप्तरी,(३)
रात्री आपल्याला जे कळत नसत त्यावर बोलावं.
टिकटोक बंदी नंतर थेट फायदा इंस्टा फेसबुक ला झाला, मागेच अंबानी च्या जिओत पैसे टाकले झुक्याने. व्हाट्सप् पण त्याचच आहे.
अशा काळात बीजेपी चे सरकार सत्तेत आहे. काँग्रेस ने काय केले असते, वाटून वाटून दिले असते.(१)
लोकशाही अबाधित ठेवल्याचा फील आला असता.
आयरणी ही हे फेसबुक वर टाकतोय मी. अंबानी माझा डेटा घेऊन झोप विकत देईल का? सरकारला माझ्या झोपेची काळजी आहे म्हणून चीन चे लफडे केले. खरतर लॉकडाऊन हे देशात झोपेची कमी होती म्हणून केलेला. सर्व जनतेला पुरेशी झोप मिळावी. पण जनता ऐकणार तर ना ,(२)
यांना चीन बरोबर युद्ध करायचे होते म्हणून ती चालत निघाली. रस्त्यारस्त्याने. संसार घेऊन. असाच संसार घेऊन जावं लागायचं युद्धात रामाच्या काळात. अगदी पानिपत पर्यंत. पण मोदिजीनी साधलेच त्यांना माहितेय चालत गेलेल्यांचा डेटा झुक्याला नाहीच देणार. तो पोलिसांकडे देणार.(३)
सगळ्याच खिडक्यांना मिळत नाय दान पुस्तकांचं
पानकळ्यात त्यांना मिळतो ट्रंकेचा कोपरा
चहाचा निवेद खिडक्यांना मकबूल नसतोच काही
घासलेट च्या चिमणीन काही खिडक्या उजळतात पावसात(१)
पावसाचा गनिमी कावा दिसत नसतोय खिडकीतून
कधी तो तात्पर्य देतो माळाच्या झाडावर
सगळ्याच खिडक्या नाय दाखवत पान फुल
काही दाखवतात पावसाने तुंबलेली गटार संसाराने वाहिलेले नाले(२)
सगळ्याच खिडक्यातून दिसत नसतोय पाऊस
काही बंद कराव्या लागतात निळ्या ताडपत्रीन
चौकातून चोरून आणलेल्या बॅनरने
त्या खिडक्या गेट होतात गोमांचं झुरळांच
जित्याच ठिबक गोळा करणारी बादली
मग खाली करावी लागते वेळोवेळी मोरीत(३)
म्हणजे कस तर कधीही आनंद देण्याच्या काळात क्रिकेट ही आहेच, सध्याच्या काळात रोहित बघणे डोळ्याला सुख देते. पण काळाने मागे गेले पाहिजे त्याशिवाय आनंद हा सुखात जात नाही. आनंद वेगळा सुख वेगळं. सुख. रात्रीची वेगळी, सकाळची वेगळी. उगा शुजात खा च नाव घेण्यात काही अर्थ नाही.(१)
पण अनेक वेळा रात्री जागून काढल्यात. मग मॅच कोणाचीही असू त्याला काही फरक पडत नाही. मी वेस्ट इंडिज च्या मॅच बद्दल बोलतो. जुन्या काळातली दादागिरी नाही बघितली तर मला अँबरोज, वॉलश, लारा, चांदरपाउल, हुपर, जिमी अडम्स, किथ आथरटन, सरवान हेही आवडलेत. बघितलेत.(२)
म्हणजे त्यांची मॅच बघताना क्रिकेट बघायचे नुसते. तर प्रेक्षक ही बघायचे असते. ते जे आनंद घेतात तो आपण घ्यायचा असतो. ते नाचत असतात आपण मनात नाचायचे असते, मग कुठे चान्स मिळाला झलक मारायची असते. मग उगाच बॉब मार्ले आठवायचा असतो ,नो वूमन नो क्राय.अस वाटायचं बॉब त्या सगळ्यांच्यात आहे,(३)