✍️इंग्रज नेहमीच म्हणायचे आम्हाला वारं आलेलं दिसतं पण हा #संभाजी कधी येतो हेच दिसत नाही ! येतो कधी आणि पुरता उध्वस्त करुन जातो कधी हेच कळत नाही ! कारण, थांबतील ते संभाजी कसले वाऱ्यापेक्षा वेगवान वृत्तीच्या महापराक्रमी योद्ध्यास शतष: नमन !
औरंगजेब रडायचा आणि रडता रडता म्हणायचा....
अगर हर मराठा संभाजी सा होगा तो हम कभी हिंदुस्थान पर राज नहीं कर पायेंगे ! औरंगजेबाला हे भाग्य कधी मिळालेच नाही तो कधीच हिंदुस्थान वर राज करु शकला नाही फक्त आणि फक्त शिवपुत्र छावा शंभुराजेंच्या डरकाळीमुळे ! कारण, झुकतील ते संभाजी कसले!
हजारों शत्रुंच्या समोर जाऊन मुठभर सैन्यासह लढणारी जात म्हणजे शंभुराजे !
कारण, मागे फिरतील ते संभाजी कसले जगाच्या इतिहासात १४० लढाया करुन एकाही लढाईत तह नाही, पराभूत नाही ! कारण, हारतील ते संभाजी कसले औरंग्या अतिविचित्र पद्धतीने शंभुराजेंना हालहाल करुन मारत होता
परंतु तब्बल ४० दिवस अत्याचार सहन करुन सुद्धा हा मराठा मरत नव्हता साक्षात् मृत्यु सुद्धा संभाजींच्या जवळ येयला घाबरायचा ! कारण, मरतील ते #संभाजीराजे कसले खरच सत्याला मरणच नाही...