जादूटोनाविरोधी कायदा असलेल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र धीरेंद्र समोर हातबंद आम्ही पाहिलेच आहेत मात्र त्यांच्याबद्दलच्या चर्चेने दोन टोक घेतले आहेत. हिंदुत्व म्हणून भाजपच्या बगलाला लागलेल्या भक्तांनी बागेश्वरचा जयजयकार करणे
म्हणजे त्यांनी तुकोबा नाकारणे नाही काय, तुकोबांच्या भूमीत जाऊन मोदी तुकाराम तुकाराम करणार आणि त्यांचा पक्ष तुकोबांचं प्रबोधन खोडून काढणार, कसला भंपकपणा आहे, अंगारा धुपारा, सुकून पाहणे, नवसे करणारे लोक तुकोबांचे वारस होऊच शकत नाहीत. मात्र आमची गफलत अशी आहे की आम्ही पूर्ण
काहीच नाहीत, हिंदू धर्मातल्या अनेक पंथात असमन्वय आहे, स्वामी समर्थवाले केवळ गुरुदेव म्हणतात ते पांडुरंगाला भंजतात असे नाही, 'ब्रम्हा-विष्णू- महेशा'च्या एकत्राने दत्त निर्मित असताना दत्ताचे भक्त पंढरपूरची वाट चालतातच असे नाही, महादेवाला मानणारे महादेव सोडून इतर देवतांचे पूजन
करतात का, मागे तुळशी उपटून टाकायला काय अफगाणीस्तानमधून कुणी आलेले नव्हते, मुळात धर्माचे विवेचन आचरण इतके विभाजित आहे की देवत्वाच्या नावानेच समाज बहुभंगतो केवळ दुभंगतो नाही. एकईश्वरवाद सांगून दोनशे वर्षे लोटली, नवसे करणे जादूटोना म्हणजे भंपक आहे हे सांगून तुकोबांना ३०० वर्षे झाले.
विज्ञानाची उपकरणे हाताळून आम्ही विज्ञानालाच घोडा लावतो आणि त्यातच बागेश्वरधामचे धीरेंद्रसारखे फसवे लोक आमच्यावर मानसिक अत्याचार करतात, बुवाबाजी अंगारा-धुपारा करणारे काही एकाच धर्मात आहेत असे नाही, मुस्लीम समाजात देखील मोराचे पंख डोक्यावर आणि धुपाचा भपकारावाले कमी नाहीत
आसरा म्हसोबा मटणाच्या पंगतीचे निमित्त आहेत, एकीकडे जळीतळी ईश्वरमान्य करायचा, दर्शनाला मात्र पूजा पाठ कर्मकांड सारखे सोपस्कार करून समाज आपली नीट लाऊन घेतो, त्यात असले धीरेंद्रसारखे अध्यात्माच्या नावाखाली श्रध्दा व विश्वासाचा बाजार उठवतात, आम्ही आमची एकदा परीक्षा घेतली पाहिजे
जर आम्हाला बागेश्वर जादू खरी वाटत असेल तर तुमचा आणि तुकोबांचा आणि तुमचा संबंध संपला आहे, सगळच उली उली अशी आमची पंचायत आहे, सर्वच धर्मात कमी अधिक असा अंधश्रद्धाचा कार्यक्रम असतो हिंदू धर्मात मात्र जरा जास्त आहे म्हणूनच हिंदू धर्माची आर्थिक उन्नती कर्मकांडाने रोखण्यात आलेली आहे.
१२ सण कंदुरी नवस तीर्थयात्रा तिथल्या पूजा यात हिंदू धर्माच्या वेळ आणि अर्थाची अक्षरश: नासाडी होते, तुकोबांनी यावर गाथा लिहिली, संत ज्ञानेश्वराने रेड्या सारख्या समाजाला वेद का वदवले कारण आमचा तर्क जागृत व्हावा, गौतम बुद्धाच्या नंतर तर्क शिकवणारा ओशो आमच्याच भूमीत झाला
त्या मातीतल्या माणसांनी बागेश्वर सारख्या पोराच्या नादी लागावे, अहो आसाराम बापूबद्दल देखील असेच लाखो लोकांचे मेळे लागायचे, कुठे आहेत जेलात, बलात्काराच्या केसेसमध्ये. हरियाणात राम रहीम नावाचा बाबा अन् त्याच्या पुढे लोटांगण घालणारा समाज आज कुठे आहे, राम रहीम तुरुंगात आहे.
राजकारण आणि अशा बाबांची सांगड असते, लोकांना अध्यात्माच्या नावाखाली भूलवणे आणि त्याच लोकात नेत्यांना मतदार पेरणे, आसाराम बापू लाख लोकात म्हटले होते, 'हा नरेंद्र एकदिवस दिल्लीत बसेल, म्हणजे मोदींची पेरणी ज्यांनी केली ते तुरुंगात आहेत, आम्हाला हे समजले पाहिजे की
अध्यात्म आणि कर्मकांड अर्थात थोतांड यात मोठी तफावत आहे.
कसंय, गावच्या मुख्य रस्त्यावरून हायवे गेला अन ब्रिज बांधला तर विकास नेमका कुणाचा अन कसला झाला हे ८०, ९० च्या स्पीडने सांगन जरा कठीणच. गावोगावी रस्ते, मेट्रो, रेल्वे प्रकल्प, दिवसागणिक विकास कामांचे भूमिपूजन, त्यावर होणारा लाखांचा खर्च
कारण, भूमिपूजन करण्यासाठी अख्खं मंत्रीमंडळ हजर असत. त्यांच्यासाठी लोकांना करावी लागणारी गर्दी असं सगळ काही सध्या फोफावत आहे. कारण, गेल्या आठ वर्षापूर्वी एवढा काही बडेजाव केलेला दिसला नाही. पण, सध्या लोकार्पणाचे काहिही होवो ! भूमिपूजनं मात्र मोठ्या धुमधडाक्यात होत आहेत.
रस्ता झाला की, झाला विकास अशी सद्यस्थिती दिसते आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. बेरोजगारांच्या वाढत्या समस्येमुळे उपासमार कायम आहे. अनेकांच्या डोक्यावर छप्पर नाही. जगण्याच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला
पत्र क्रमांक १
राज ठाकरेंनी पत्र लिहले आणि अंधेरीत भाजपने माघार घेतली, काय जरब आणि वकूब आहे साहेबांचा.
पत्र क्रमांक २
ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून राज ठाकरे यांच्या पत्राचा दहावा झाला तरी साधा प्रतिसाद ही नाही.
किस्सा...
दिवाळीच्या अगोदर राज ठाकरे यांची एक मुलाखत भावेंनी घेतली, त्यातला 'सु सुबोध' काय होता, सुबोध भावे म्हटले डबिंगसाठी दिलेला आवाज ऐकून लोक खुश होतील आणि म्हणतील टायमिंग बादशहा राज ठाकरे म्हटले हेच करत रहा दोघेही निखळ हसताना ते सत्य स्वीकारत होते, सत्य हे कि राज ठाकरे
यांना राजकारण जमत नाही, हे कोण म्हटले स्वत राज ठाकरे. चला विषय समजून घेऊ...
राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांच्या करारी आवाजाचा वारस, साहेबांची वाणी आणि ब्रश घेऊन मार्मिक टोमणे मारायला सराईत झालेला हा पुतण्या, गेली दीड दशकापासून जगाला हेवा वाटावा असा घडवायला महाराष्ट्र मागत आहेत
गेल्या काही वर्षात देवांना देव्हारयातून थेट व्यवहारात म्हणजे मोकळच बोलायचं झाल तर थेट राजकारणातच आणले. रामाला तर स्टार प्रचारक केले आहे, हमुमानाची चालीसा आता एका पक्षाच्या अजेंड्यात असतो, म्हणजे देवाला स्वतःचे मंदिर बांधता येत नसल्याने रामाने एका
पक्षासोबत युती केली, तुम्ही माझ मंदिर बांधा आणि माझा खुशाल वापर करा, मुळात भिल्लीनीचे बोर खाणारा राम दलितांना अंतर देणाऱ्या मानसिकतेचा प्रचारक कसा, स्वतः वानर असलेला हनुमंत हिंदुत्ववादी व्हावा, जिवंतपणी योगीचे मंदिर व्हावे मोदींना अवतारी मानावे, यावर कुणाला आक्षेप नसतो
मात्र काल परवा भुजबळ म्हटले कि सावित्रीबाई, महात्मा फुले, आंबेडकर शाहू कर्मवीरांचे फोटो लावा आणि नंतर सरस्वतीचे पहा, मुळात देव सर्वांचा असतो हे मान्य झाले तर सावित्री सरस्वतीची वारस ठरते कारण लेकींना तिने शिकवले. मग आता आपल्या लेकीचा शाळेत फोटो लावला म्हणून कुठल्या आईला दुख होईल
Preview.
रविवारी प्रकरण दाखल करून ठाकरेंना दोन दिवसात फ्लोवर टेस्ट बद्दल दम देणारे कोर्ट शिंदेना मात्र तारखावर तारखा बहाल का करते, यावर फारशी कुणाला तक्रार नाही, कारण सबब सर्वांनाच ठाऊक आहे. वरती मोदी नसते तर खाली फडणवीस परत आले नसते.
गेल्या पाच वर्षात सत्तातरांचे असे नमुने समोर आलेले आहे. निवडणूक आयोगासमोरील सुनावणीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. उध्दव ठाकरेंसाठी मोठा झटका आहे. ज्याला कोणाला पक्षांतर करायचं असेल त्याने सरळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि परत निवडून यावे.
मग ती एक व्यक्ती असो वा अनेक. शिवसेनेच निवडणुक चिन्ह उद्या निवडणुक आयोगाने गोठवल तरी त्याने काय फरक पडतो? काँग्रेस फुटली तेव्हा गाय वासरु निशाणी जाऊन इंदिराजींना हात ही निशाणी मिळाली आणि पक्षाच मुळ नाव पण गेल. पण त्याने काय फरक पडला ? १९८० च्या निवडणुकीत त्या प्रचंड बहुमताने
संत साहित्य व लोकवाङ्मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏
'वारी' स्वरूप आणि परंपरा” या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सवात डॉ. देखणे आपले विचार मांडतात.
महाराष्ट्राच्या लोकजीवनात आणि लोकाचारामध्ये पांडुरंगाचे स्थान मोठे आहे. पांडुरग हा येथील लोकजीवनाचा मोठा आधारस्तंभ असून तो लोकदेव असल्याचे डॉ. देखणे सांगतात साने गुरुजींनी ‘महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मुका अध्यक्ष’ असे पांडुरंगाचे वर्णन केल्याचा संदर्भही त्यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे ज्ञानपीठ तर संत तुकाराम हे योगपीठ आहेत असे ते सांगतात.
परी ते मनाच्या कानी ऐकावे ।
बोल बुद्धीच्या डोळा देखावे ॥
हे सांटोवाटी घ्यावे । चित्ताचिया ॥
जे विचार मनाच्या कानाने ऐकले जातात, बुद्धीच्या डोळ्याने पाहिले जातात, चित्ताने साठवले जातात