छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वोच्च गुणांपैकी एक गुण म्हणजे - राजेंची अमोघ गोड वाणी' महाराजांची बोली, अन त्या बोलीमधील चातुर्य, याबद्दल ऐतिहासिक दस्ताऐवजामधील वर्णने फार कमी आहेत तरीही उपलब्ध साधने काय सांगतात हे आपण बघू 👇
समकालीन छत्रपती शिवाजी महाराजांचे चरीत्र लिहणारे परमानंद आपल्या शिवभारत संस्कृत काव्यग्रंथात सांगतात, "राजेंची वाणी अतीशय छान आणि गोड होती" याच सविस्तर वर्णन आपल्याला समकालीन कृष्णाजी अनंत विरचित सभासद बखर, आग्रा भेटी दरम्यान राजपूत बातमीदारानी टिपलेली काही वर्णने यात मिळेल
सभासद बखरीत - सभासद सांगतात -
"मातब्बर चहु जागचे मराठे यासी आप्तपणा करावा, पत्रे लिहावी; त्यास आणवून भेट घ्यावी; आपण त्याजकडे जाऊन आम्हास अनुकूल व्हा असे बोलावे; असे करण्यात ज्यानी महाराजांचे बोलणे परम आदराचे व पराक्रमाचे ऐकावे त्यास वेध लागून वाटावे की, हे परमथोर आहेत;
यांचेच संमते चालावे; हे सांगतील तैसे करावे; प्राणही गेले तरी जावोत; परंतु सेवा करून त्यांचे आज्ञेत राहावे अशी सर्वांची चित्ते वेधून घेतली.”
यात सभासद जे लिहतात ते अतिशय योग्य आणि वस्तुस्थितीला धरूनच आहे ! त्याकाळचे मातब्बर शूरवीर मराठे सरदार हे परकीय सत्तेकडे चाकरी करत !
हिंदवी स्वराज्याच्या महान उपक्रम तडीस लावायला या वीर मराठ्यांची गरज लागणारच, यामुळे त्यांनी 12 मावळातील, विविध दऱ्या खोऱ्यातील मातब्बर मराठे सरदारांना पत्र लिहली ! व आपण एकमेकांचे आप्त आहोत आपण एकत्र यावे यात सामील व्हावे अशा आशयाची अनेक पत्र उपलब्ध आहेत ! त्यांपैकी एक पत्र देतोय
12 मावळपैकी गुंजनमावळचे देशमुख; हैबतराव देशमुख यांना लिहलेले पत्र याचा उत्तम नमुना आहे, यात राजे हैबतरावाना सांगतात की अनेक लोकांनी तुमचे आमच्याविरिद्ध कान फुंकले आहेत, तुमची देशमुखी बळकावू, तुमच्या अडचणी आहेत, याचा फायदा आम्ही घेऊ अस तुम्हाला लोक सांगत आहेत !
अशा गोष्टी असल्या तरी तुम्ही घाबरण्याचे कारण नाही, तुमचे हजार गुन्हे माफ, तुम्हाला वाईट वर्तणूक केली तर, आम्हाला आईसाहेबांची आणि महादेवाची शपथ आहे, कुठलीही चिंता करू नका, आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याकडे या !
या पत्रात महाराजांनी हैबतरावाना स्वराज्यात सामील होण्यासाठी धीर दिलाय
लोकं आपल्या बाजूने वळवण्याचे हे पत्र उत्तम उदाहरण आहे ! झाल्या गेल्या गोष्टीना, हेवेदावे विसरून, अथवा त्याना महत्व न देता त्या कुशल व कार्यक्षम माणसाना आता सोबत घेणे व एकत्र मिळून काम करणे व स्वराज्याचा उत्कर्ष साधने हे जास्त महत्वाचे महाराजांनी जाणले, ही एक उत्तम मुत्सद्देगिरी !
महाराजांची वाणी कशी होती, त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या राजपूत बातमीदाराने नमूद करून ठेवली आहे ! आग्रा भेटीत असताना एक राजपूत बातमीदार सांगतो की - मी त्यांच्याशी ( राजे ) बोललो, काही प्रश्न विचारले, त्याची समपर्क उत्तर मिळाली, त्याचा युक्तिवाद काय वर्णावा !
ते जे सांगतात, आणि आपण ऐकतो ते शब्द आपल्याला लगेच पटतात, आणि आवडतात ! ते ससस्मित बोलतात, राजे अंतर्बाह्य सज्जन आहेत !
राजेंची वाणी व बोलण्याच्या अंदाजावरून समजून व उमजून येईल की, राजेंच वक्तृत्व व वाणी अंत्यत प्रभावी आहे, एक राजाला व एका लोकपुढारी ला शोभेल अशीच आहे !
संदर्भ - १) शिवकाल -१६३० ते १७०७ - इतिहास अभ्यासक डॉ वि. गो खोबरेकर ,
१) माणसांची माणुसकी त्यांच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याने होत असते. ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य नाही, परकीयांच्या राजसत्तेखाली जे जगत असते, त्या राष्ट्रांतल्या माणसांना `ह्यूमेन कॅटल’ माणशी गुरेढोरे हीच संज्ञा यथायोग्य शोभते. 👇
२) राजेंच्या हृदयांत राष्ट्रधर्माच्या या तीव्र भेदाची विद्युल्लता चमकेपर्यंत, सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत, महाराष्ट्रातला हिंदू म्हणजे ह्यूमन कॅटल बनलेला होता. तोंड असून मुका, कान असून बहिरा, डोळे असून आंधळा आणि माणूस असून परकीय मुसलमानी सत्तेच्या पखाली वाहणारा बैल होऊन राहिला
३) होता. गुलामगिरीचा पेंड कडबा खाऊन खाऊन हा बैलसुद्धा इतका मस्तवाल बनला होता, की इस्लामी मानपानाच्या नक्षीदार झुली घुंगुरमाळांनी नटलेल्या त्याच्या अनेक पुढारी नंदीबैलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय प्रबोधन – कार्यांत शेकडो वेळा शिंगे खुपण्यास कमी केले नाही.
14 जानेवारी 1761 रोजी पेशव्यांचा अब्दाली कडून दारुण पराभव झाला.अब्दालीचे सैन्य पेशव्यांच्या सैन्याच्या तुलनेत अत्यंत कमी असताना देखील पेशव्यांचे एक लाख सैन्य मारले गेले, हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत दुःखद दिवस आहे.
महाराष्ट्राची एक पिढी गारद झाली. पण हा दारुण पराभव का झाला, याची कारणे काय आहेत? त्याचा परामर्श घेणे इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण इतिहास हा इतिहासात रमण्यासाठी नसतो, तर इतिहासातून बोध घेऊन
वर्तमानकाळावरती मात करून भविष्यकाळात यशस्वी होण्यासाठी इतिहास असतो. पेशव्याच्या सैन्याचे नेतृत्व सदाशिवभाऊ आणि विश्वास पेशवे करत होते, त्यांच्या सैन्यात मराठा (कुणबी, माळी, धनगर, कायस्थ, रामोशी मातंग, महार, आग्री इत्यादी होते. मराठा हा शब्द जातीवाचक नसून समूहवाचक आहे.)
#राजमाता म्हटलं की ज्यांची तेजस्वी प्रतिमा डोळ्यासमोर येते त्या म्हणजे- जिजाऊ माँसाहेब.
जिजाऊंची जडणघडण ही एका घरंदाज कुळात झाली, पुढे त्याच तोलामोलाच्या घराण्यात त्यांचा विवाह झाला. धैर्य -शौर्याचा, साहसाचा वारसा त्यांच्या माहेराकडून मिळाला.
जाधव घराणे हे त्यावेळी राजे किताबाने गौरवलेलं सन्मानप्राप्त घराणं होत. पुढे राजे किताब असलेल्या भोसले घराण्याच्या सुनबाई झाल्या. व इथून खरी त्यांच्या कार्याची कर्तुत्वाची, ओळख सगळ्या जगाला होते.! इथूनच मध्ययुगीन भारतातील सुवर्णकाळाचा अध्याय सुरू झाला अस म्हणण्यास हरकत नाही.
जिजाऊ व शहाजी राजेंचा विवाह झाल्यावर, समकालीन कवी - परमानंद यांनी आपल्या शिवभारत ग्रंथात जिजाऊ बद्दल जे लिहल आहे ते नक्की बघण्याजोगत आहे.!
परमानंद म्हणतो - "जेव्हा 'विनयशील' जिजाऊ, भोसले घरात येतात तेव्हा, शहाजीराजे व जिजाऊ या जोडीला जणू लक्ष्मीनारायणाची शोभा येतेय."
#Thread 📍
महाराष्ट्राच्या राजकरणाची पातळी घसरली आहे
जेव्हापासून हे सरकार आलं तेव्हापासून आपण पाहिलं तर लक्षात येईल की -महाराष्ट्राने एकही दिवस सुखाचा आणि शांततेचा स्थैर्याचा पाहिला नाही. रोज नवीन वाद महाराष्ट्राच्या माथी मारला जातोय, रोज नवीन गाढव गोंधळ
घातला जातोय.
सध्याचे नागपूर नगरीत चालत असलेलं हिवाळी अधिवेशन तुफानी आणि वादळी ठरत आहे. विरोधात असलेले MVA पक्षाचा आवाज दाबला जातोय, सदनात बोलू दिलं जात नाही. महत्वाच्या - जनहितार्थ मुद्द्यावर चर्चा करायला अथवा, काही विशेष काम करायला शिंदे फडणवीस सरकार असमर्थ असल्याचं दिसुन येतंय.
महाविकास आघाडी सरकारने या अधिवेशनात, अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आहे. तो म्हणजे भूखंडाचा श्रीखंड. नेमकं काय आहे हा मुद्दा ―
एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना, नागपूर सुधार प्रन्यास चा सुमारे 83 कोटींचा भूखंड, डेव्हलपर ला 2 कोटीला भाड्याने दिले आहे,
बौध्द धर्माच्या पतनानंतर भारत सामाजिक, शारीरिक, बौद्धिक गुलामगिरीच्या गर्तेत ढकलला गेला. तो दोन हजार वर्षाचा काळ अमानुष होता. त्या गुलामगिरी विरोधात थेट विसाव्या शतकात आपल्या ज्ञानतेजाने, मानवतावादाचे अधिष्ठान घालणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर.
भारतीय समाज गुलामगिरीत एवढा गुंग झाला होता की. त्याला त्याचे शोषण करणारे पुज्य- आदरणीय वाटत. तुमची गुलामगिरी तुमचा अभिशाप आहे. ती तुमच्या मागील जन्मातील पातकांची वसुली आहे. तुमची गुलामगिरी दुर्दैवी असली तरी दैवी आहे, असा ग्रह त्यांच्यात पेरण्यात ब्राह्मणवादी विचारधारा यशस्वी झाली
या गुलामगिरी विरोधात कार्य करण्याचे प्रयत्न म्हणावे तितके झाले नाही, जे झाले त्यांची व्याप्ती ही फार क्षुल्लक होती. तुमच्यावर लादलेली गुलामगिरी ही गतजन्मानचे पातक नसून ही एका विशिष्ट वर्गाच आत्मवर्चस्व अबाधित ठेवण्याकरीता केलेली हुकूमशाही व अमानवीय खटपट होय.
माँसाहेब बघताय का ?
तुमच्या प्रिय शिवबाचा घोर अपमान.
तुमच्या सदकृपेने,महाराष्ट्राला स्वाभिमान, अभिमान दिला, वर्षानुवर्षे गुलामीत खितपत पडलेल्या रयेतला, भूमीपुत्राला शक्ती दिली, स्वातंत्र्यप्रेरणा दिली. आज तोच महाराष्ट्र तुमच्या शिवबाचा अपमान सहन करतोय.
आबासाहेब शहाजीराजे- बघताय का तुमच्या पराक्रमी वीर पुत्राचा अपमान.!
महाराष्ट्रातील 12 कोटी मराठ्यांनो याचसाठी, शहाजीराजेनी स्वराज्यसंकल्प केला होता का ?
राजांना स्वराज्याच तोरण बांधण्यास उत्कृष्ट शिक्षण संस्कार दिले, पुण्यास येताना विद्वान शिक्षक दिले, हुशार कारभारी दिले.
आबासाहेब तुम्ही मोघलांना रक्ताच पाणी करून तीन वर्षे लढला, विजापूरी आपल्याला कैदही झाली, आपले बहुत हाल केले, तरीही आपण आपला स्वराज्य संकल्प सोडला नाही.
आणि आजचा मराठा, आपल्या छत्रपती पुत्राचा अपमान बघुन थंड पडलाय. हे तुम्हाला बघवत नसेल याची मला कल्पना आहे.